पण हे कळत कुणाला ?

 


प्रेम इतक सोप्प नाही. जितक ते वाटत. खर तर प्रेम हे करायच नाही जगायच असत. पण हे कळत कुणाला ? जो तो प्रेम करण्यात वेळ आणि आयुष्य घालवत राहतो. उरलेला क्षण जेव्हा मागे वळून बघितल जात किती सुंदर असत ते सगळ. गोड गुलाबी आठवण विचारात आठवताना ही मनाला जो आनंद होतो तो क्षणिक आनंद नाहीस होऊन जातो जेव्हा जाणवत की आपण आत्ता वर्तमानात आहे. 

प्रेमात केलेल्या गोष्टी पुढे जाऊन त्या सवयीच्या बनतात. या त्याच सवयी असतात ज्या अंगवळणी सहज पडतात पण त्याच सवयी नंतर जाता-जात नाहीत. 

त्याचा त्रास होतो पण तो कुणाला सांगता हि येत नाही. जुनाट आजारासारखा जडलेला एखादा रोग असावा तशा या सवयी आणखी-आणखी त्रास देत राहते. प्रेमात  घालवलेला वेळ इतका स्वतःसाठी घालवला असता तर आयुष्य  खूप मोठं असत हे इतकं सोप्प गणित केव्हाच उमगलं असत. ज्या गोष्टीसाठी हि उठाठेव करून एकत्र येऊन जगण्याचा जो कार्यक्रम प्रत्येक जण आपल्या आयुष्यात करतो त्याला खरतर  काय म्हणतात मला माहित नाही पण नात्याला नाव हवं म्हणून लग्न नावाचं पदक बहाल केलं गेलं आहे.  खरं तर लग्न झाल्यावर प्रेम वाढायला हवं पण ते कमी होत जात.  एकमेकांना जास्त ओळखत असल्याचा त्रास आणि त्यातून होणारी घुसमट किती तरी लोक अनुभवत असतात. होणार भांडण प्रेम कमी  आणि उरलेलं जे काही असत ते तिरस्काराला जन्म घालत असत. मग विचार पडतो हेच असत का ते प्रेम ? ज्याच्यासाठी वेळ आणि आयुष्य आपण घालवलेला असत ? हि तीच व्यक्ती असते का जी कधी आपल्यासाठी तिचा वेळ आणि आयुष्य बरोबरीने खर्च करत असे. असो. प्रेमाचे पदर इतके असे विस्तृत पसरलेले आणि तितकेच जखडलेले आहेत. आणि ते शोधण्यासाठी हे असं प्रेमात पडून बाजूला  लागत. कारण अशा लोकांनाच हे समजू शकत.

0 टिप्पण्या