समज’ती’स्त्री. अर्धा-अर्धा शब्द. तो धड पूर्ण एक हि नाही. तरी स्त्री या अर्धवट शब्दापेक्षा खूप काही तरी आहे. समज म्हणजे काय हे समजण्यात पुरुष आपल आयुष्य जगत असतो. स्वतःला अति-शहाणा समजताना तो किती किव येण्या इतका क्षुल्लक असतो. हे त्याला सजमत नाही. जगात स्त्री नसती तर हे सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि हे सध्याच कलियुग माणसाच्या नशिबी आलच नसत.

एक पुरुष बाप असतो. तो असा सकाळी दहा वाजता स्कूल बसची वाट बघत असतो. सोबत एक मुलगा आणि एक मुलगी असते. मुलगा अगदी ठीक ठाक भांग पाडून शाळेचे कपडे घालून आवरून वडिलांसोबत तिथ उभारलेला असतो. आणि मुलगी अगदी तशीच होती. पण दोघात सुंदर नीट दिसते ती मुलगी. स्कूलबस येते. आणि मुलगा तो अगदी मोठा असल्यासारखा हात पुढे करून त्या मुलीच्या पुढे होतो.
मुलगी जागेवरच असते. तो बाप मुलाला धरून मागे करतो. मुलगी जागेवरच असते हि तिची समज. दोन मुलीना घेऊन एक बाप चौपाटीवर येतो. एक मुलगी नुकतीच बोलायला लागेलेली. आणि एक मुलगी पहिली दुसरीतली. बाप विचारतो काय हव ? मुलगी घेते तिला 

माहित असेलेली नाव. आणि ती बारकी मुलगी बहिणीचे शब्द ऐकून पुन्हा अर्धवट बोलून मागणी करते. सगळ बोलून झाल्यावर बापाच तोंड बघून ती मुलगी बाजूला बघते. शेजारी चार लोक असलेल कुटुंब पावभाजी खाताना दिसत. एकाच ताटात भरपूर भाजी आणि दोन दोन पाव बघून तिने बापाला सांगितल पप्पा, पावभाजी घ्या. छोटी ती मुलगी कुल्फी मागायला लागते. बाप तोपर्यंत पावभाजी आणायला जातो. तो येईपर्यंत ती मुलगी छोट्या मुलीला जवळ घेऊन बसते आणि सांगते पप्पा आपल्याला उद्या पण आणणार आहेत इथ. ती छोटी मुलगी नाही नाही करत होती. बाप आला. काय झाल विचारल. ती पटकन बोलली तिला पाव हवाय. हो न पिल्लू ? अन ते पिल्लू....... हो बोलल. पावभाजी आली. सोबत चार पाव आले. एक पाव छोट्या बहिणीला देऊन ती मुलगी एक पाव खाऊन भाजी खात राहते.

बापाला दोन पाव ठेवते. बाप वाट बघत राहतो. थोडा थोडा सावकाश घेत एक एक घास खातो. पण ती पाव उचलत नाही. म्हणून तोच दोन्ही पाव खाऊन टाकतो. तिघे ते निघतात. वाटेत एक दुकान असत. तिथ ती मुलगी
  बापाला दोन रुपये मागून चार चोकॉलेट घेते. आणि तीन छोट्या बहिणीला देऊन एक बापाला देते. हे इतक सार घडताना मी फक्त मुलीच्या बाबतीतच बघितल आहे. इतकी समज. इतका भावनिक स्वभाव आणि स्त्रीत्व नाही मला कधी पुरुषात अनुभवता आल. मी पुरुष असून माझ्यात काही कमतरता आहे. मी समजदार असून माझ्यात कुठेतरी समज कमी आहे. भावनिक मी लेखक असून भावना माझ्या कुठेतरी कमी जाणवतात मला. पण स्त्री. कमी नाही. प्रत्येक स्त्री कशातच कमी नाही. जिच वावरण त्यात प्रत्येक पुरूषाच सावरण असत. पुरुषाला पुरुष समजू शकत नाही. पण स्त्रीला स्त्री-परुष दोन्ही समजतात कोणत्या हि वयात. 

Copyrighted@june2022

0 टिप्पण्या