ओह फ्रिडा

 


आयुष्य हे देवाकडून मिळालेलं असत. जे मिळालेलं असत ते सांभाळायच असत. जेव्हा सांभाळायची ताकद संपते तेव्हा माणूस मरतो. या आयुष्याला सांभाळण्याच्या प्रयत्नासोबत माणसाला प्रेम शोधाव लागत आणि कराव लागत. कारण मिळालेल्या आयुष्याला जन्म आणि मृत्यू नक्की असतो. लहानपणापासून शरीरासोबत झालेले वाटोळ जगायची इच्छा मारून टाकत होत. शाळेत असताना पोलियो झाला आणि डावा पाय उजव्या पायापेक्षा बारीक झाला. माझ्या वयाच्या मुलांकडून मला चिडवल जायचं. कमी कपडे घालायची आवड होती मनाविरुद्ध मी घोट्यापर्यंतचे कपडे घालून स्वतःचे पाय लपवायला लागले. हायस्कूलला असताना बस अपघातात कित्येक लोक मेले. बऱ्याच लोकांना खूप लागल आणि मी कित्येक महिने झोपून होते. तेहत्तीस पेक्षा जास्त कंबर, खुबा, खांदा, मनका, मांड्यातली हाड मोडली. पोलियोचा पाय लपवण जमायला लागलेलं पण आता पाय लपवायचं कारण हि राहील नाही. कारण मला उभ हि राहता येत नव्हत. आयुष्य मिळालेलं सांभाळण अवघड झालेलं माझ्याच्याने. आणि मला माझीच स्वतःची चित्र काढायची आवड झाली. पेंटिंग सुरु होत. मनातल्या चित्रात मी व्यक्त करत होते मला. आणि मला पहिलं प्रेम झाल. चित्रकलेवर.
याच चित्रकलेशी पुन्हा पुन्हा संभोग करून मी रोज नवीन नवीन मुल एकेका चित्राच्या रुपात जन्माला घालयची. एव्हना खूप मुल झालेली माझी. आणि आता ती सांभाळण मला अवघड झालेलं. कारण मी मला सांभाळू शकत नव्हते. पण माझी मुल लवकर वाढली. चार भिंतीतून बाहेर पडून मेक्सिकोमध्ये फिरायला लागली. बाहेरून मुलांची होणारी कौतुक ऐकून मला उभारी आली. आणि मी सहा महिन्यातच उभी राहायला लागले. संभोग रोज-रोज कोण करत ? आणि कुणाला आवडत ? पण मला आवडायला लागला. चित्रकला आणि मी एकमेकांच्या प्रेमात बुडून फक्त संभोग करत जगत होतो. आणि अशात एक दिवस मला दिएगो रिवेरा दिसले. ज्यांना मेक्सिकोमध्ये मोठ्या चित्रकारांमध्ये गणल जायचं. मी चौदा वर्षाची असताना शाळेच्या भिंतीवर चित्र काढायला आलेल्या दिएगोंना मी “जाडा म्हातारा” म्हणून चिडवलेल. ते मला विसरून गेलेले. पण मी त्यांना आठवण करून देऊन माझी चित्र त्यांना दाखवली आणि ते माझे चाहते झाले. आणि त्यांच्या या साधेपणाची मी चाहती झाले. मी दाखवलेल्या दोन चित्रांना दाखवून मिळालेलं त्यांच्याकडून कौतुक मला आवडल. आणि मी त्यांना अजून चित्र दाखवायला घरी बोलावल. आणि नंतर ते कायम घरी यायला लागले. आणि मला दुसर प्रेम झाल. आम्ही लग्न केल. दिएगो माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते.
पहिलच प्रेम खर असत आणि त्याच प्रेमाची आपल्या माघारी हि तारीफ होते. पहिल्या प्रेमाला आपण विसरू शकतच नाही आणि आपल्या प्रेमाबद्दल माहित असलेले देखील आपल्या माघारी या प्रेमाचा विषय काढतात अस मला वाटत. दहा वर्ष एकत्र राहून बरीच भांडण होऊन शेवटी आम्ही घटस्फोट घेतला. आणि एका वर्षानंतर आम्ही पुन्हा लग्न केल. पण नंतर मला खूप आजार झाले. आणि आत्ता मी झोपून आहे पूर्ण. पण मला एक माहित आहे. दिएगो नंतर पण माझ प्रेम माझी पेंटिंग्ज व्यक्त करतील. आणि माझी जाणीव माझ्या प्रेमाची जाणीव ते प्रत्येकाला देतील. कारण खर प्रेम कधीच विसरल जात नाही. बस, ओह गॉड मला तिसर प्रेम होण्याआधी तुझ्याकडे बोलाव.
copyrighted@2022

0 टिप्पण्या