सगळ झाल : पुढे ?

 

त्याच्यासोबत सगळ करून बसल्यानंतर आता अजून काय करायचं ? प्रेम ? कि अजून काही. प्रेम तर होणार नाही. कारण आधी करून ठेवलेल प्रेम अजून तरी तिथच त्याच्यावर जुनाट रोगासारख जडलेल आहे. त्याला दवा नाही त्यामुळे त्याचा असर हि इतक्यात उतरणार नाही. शरीराची भूक इतक्यांदा भागवून सुध्दा जर का माझी इच्छा जगत असेल आणि त्याची इच्छा मरत असेल तर माझ्या इच्छेने आत्महत्या करायची का त्याच्या मरत्या इच्छेला मी अग्नी द्यायची ? त्याने माझ्या शरीराची एक न एक चढ-उताराची खून ओळखून असावी. माझ्या अंगावरचा तो स्पष्ट दिसता तीळ आणि न दिसणारे असे अजून सात, आठ तीळ हि त्याने जाणून असाव. मी त्याच्यासोबत सगळ करून आत्ता हि वेळ आहे कि, त्याच्यासमोर मी कपडे घालून उभी राहिले तरी नग्न भासते मी स्वतःला. त्याच्या केसाळ शरीराच्या धडाला मी नव्याने पाहत जाते. आणि तो ? रोजचच एक काम समजून प्रेम करून माझ्यापासून दूर होतो. 
अती विश्वास माझा घातक बनला. विश्वासावर एक तर प्रेम होत किंवा प्रेमामुळे विश्वास अधिक दृढ होतो. आमच्यात प्रेम होत. विश्वास होता. जोवर शरीर आमच एकमेकांना ओळखत नव्हत तो पर्यंतच. मनाने मन ओळखल. समजल. तिथवर ठीक होत. आणि तेच बर होत. पण शरीराने ते नाविन्य, तो समजूतदारपणा, तो विश्वास सगळ माझ गहाण ठेवल गेल त्याच्या पुढ. त्याने प्रेम केल जेव्हा त्याला गरज होती. त्याने मला गरज असताना प्रेम देण्याचा सहसा असा क्षण आठवत नाही. त्याने मला काय दिल ? प्रेमाचे क्षण जे कि बाहेरच्या खुल्या जगापेक्षा खोलीतल्या बेडवर जास्त. सोबतचा गोड वेळ जो कि तो माझ्यापेक्षा जास्त घड्याळ्याच्या काट्याकडे बघून घालवलेला होता. लक्षात राहतील अशा आठवणी. ज्या कडू आहेत आणि तितक्याच कटू हि आहेत. तो माझा होता या वाक्यापेक्षा तो माझा नाहीच या वाक्यावर जितका जोर पडतो तितका तसा तो माझा. 
मी त्याची होते आणि अजून हि त्याची इच्छा झाली कि त्याचीच होते. तो माझा होतो पण त्या क्षणापुरता. मी चुकते. मी चुकले. मान्य मला पण, गुन्ह्याची चूक कबूल होईल, मान्य होईल पण चुकीच्या प्रेमाची चूक मान्य झाली तर माणूस कसला ? आणि ते प्रेम हि कसल ? त्याने माझ्या केसांना नको तितक ओढलंय. माझ्या ओठांना किती चावलय. छातीशी किती खेळ करून त्याने मला त्याच्या अजून जवळ येण्यासाठी उतावीळ केलय. त्याने माझ सगळ बघितलय. जगाने फक्त बघितल मी त्याला केलेले अवेळी फोन कॉल्स. माझ्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतलाय. माझ्या खऱ्या प्रेमाचा त्याने पुरेपूर फायदा घेतलाय. माझ सगळ त्याला माहित आहे. मला त्याच सगळ माहित आहे. पण तरीही मला भीती त्याची. का ? तर लाज फक्त मलाच आहे. जी मी त्याच्यासोबत विकून खाल्ली पण पुन्हा त्याच्याचपुढे प्रेम गहाण ठेवून ती उपरी लाज कर्ज मागून आणलेली असते मी. प्रेम विसरायचा प्रयत्न करते. तो आठवतो. त्याचा नंबर डिलीट केलाय मोबाईल मधून पण इतके कॉल्स झालेत कि त्याचा मोबाईल नंबर तोंडपाठ आहे. त्याचे, आमच्या दोघांचे सोबतचे फोटो सगळे डिलीट केलेत, फेसबुकवरून काढून टाकलेत पण डोळ्यासमोरून त्याचा चेहरा विसरला जाईना. आज कळतय विश्वास किती खोल असतो. किती खोलवर परिणाम करतो. आणि किती काय काय करू शकतो. खरच ज्या विश्वासावर हे असल प्रेम होत ते प्रेमाला बदनाम करूनच सोडत. आणि लोक हि प्रेमालाच बदनाम करून विश्वासावर विश्वास ठेवून डोळे झाकून प्रेम करून घेतात पुन्हा एकदा. 
मी संपले. उरल काय माझ्यात ? कुणाला काय दाखवायला. कुणाला काय द्यायला ? तरी मला दुसर प्रेम झालच. ते हि खर...

आजकालच प्रेम. या शब्दातच प्रेमाचे दोन जमाने आहेत. आजच आणि कालच. आजच हे प्रेम जे खोट, वरवरच फसवं आहे आणि कालच प्रेम जे खर आणि निव्वळ खर आहे. त्याच्यात आणि तिच्यात सगळ झाल. पुढे ? स्त्रीने, मुलीने घेण्यासारखं अस काही नसतच तिच्यात. पण तरीही सगळ घेण्याची तयारी मात्र असते तिची. आणि त्याच्यात फक्त देण्याची ताकद असते कधी हि. उठल्यापासून झोपेपर्यंत आणि मध्यरात्री सुध्दा. तिच्याकडून घेताना सगळ काही घेऊन पुन्हा काय आहे तुझ्यात अस ? विचारणार ते पुरुषी तोंड. आणि खरच का काय उरल आहे आता आपल्यात त्याला किंवा अजून कुणाला देण्यासाठी, दाखवण्यासाठी अस विचारमग्न झालेलं तिच तोंड. या तोंडांवर शरम नसते. लाज नसते. पण विचार फक्त असतात. तिच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतच राज्य आपल्या मालकीच करून स्वतः मात्र दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्याच्या बेतात असलेले हे पुरुष आजकालची मुल प्रेमापासून खूप लांब आहेत. डिप्रेशन घालवण्याच्या नावाखाली किती संस्था, दवाखाने उघडली जातायत सध्या जशी कि किराणा मालाची दुकाने आणि मॉल मध्ये जाणारे जसे हौशी लोक आहेत तशीच स्वतःच्या कर्माने अंगावर अशी परिस्थिती ओढवून घेऊन हौशीने त्या दवाखान्यात, संस्थेत जाणारे हि कित्येक जण आहेत. 

प्रेमाच्या नावाखाली कित्येकदा समागमाची वेळ येते नंतर कसली तरी कारण देत लांब व्हायचं. तेच समागमाच्या आधी लग्नाची आमिष, सोबत राहण्याची वचन देत ती वेळ सावरत नेण. काय आहे हे ? सेक्स म्हणजेच प्रेम अशी माझी स्वतःची व्याख्या आहे. पण तरी हि त्यात हे लॉजिक आहे कि, ज्याच्यासोबत प्रेम त्याच्यासोबतच सेक्स हवा. पण हे कुणाला कळणार ? या सुशिक्षित लोकांना कि डिप्लोमा-डिग्री शिकणाऱ्या मुलांना. कित्येक अशा रात्री म्हणणार नाही मी कारण असली प्रेम हि रात्री व्हायला तस त्यांच नात नसत कि ते चार चौघांना उघडपणे कळेल. असो..! असली प्रेम हि दुपारी कुठेतरी आणि कुठेही होत राहतात. तर, अशा बऱ्याच समागमाच्या वेळा खेळत नंतर दूर होण आणि तिने दुसरा शोधण आणि त्याने दुसरी शोधण म्हणजे दुसरा आधार बघण होय. पण एक नक्की यात तो देणारा पुरुष-मुलगा देत राहतो स्वतःच शरीर त्या बाईला-मुलीला प्रेमाच्या नावाखाली हातचा राखून. आणि ती घेत राहते त्याच्या नावचा बलात्कार आपल्या नावे करून. मनाविरुध्द सेक्स करून खून झालेल्या मुलींचीच बातमी फक्त जगासमोर येते. मग अशा प्रेमात वावरणाऱ्या युगुलातल्या मुलीची कहाणी का समोर येत नाही जगाच्या ? तिथेही तिच्या मानसिकतेवर आणि शरीरावर बलात्कारच होत असतो. पहिल्या मिठीपासून झालेला सूरु हा बलात्कार पुढे पहिला कीस आणि नंतर बरेच कीस करत सेक्स करूनच संपतो. यातून ज्यांची समागमाची वेळ आयुष्यभर एकमेकांसोबतच राहते. त्याचं ते प्रेम बाकी सगळ्या युगुलांमध्ये सध्या फक्त बलात्कारच सुरु आहेत. आणि ह्या पीडितांच सांत्वन करत कोण ? तर त्या डिप्रेशन निर्मुलन संस्था. तिची मैत्रीण किंवा तिचा मित्र. आणि त्याची मैत्रीण किंवा त्याचा मित्र.

पण हे प्रेमाचे बलात्कार थांबवणारे कोणच नाही. प्रेम व्हाव पण पुढे त्यातून लग्न व्हाव बलात्कार नाही. आणि हे समजणार कोणाला ? सगळ झाल. मग आता पुढे काय  

आणि एवढ सगळ होऊन हि पुन्हा प्रेमच झाल तर.....


0 टिप्पण्या