Love Letters Collection

 

प्रिय,

xxxx

चंद्र होता का तिथ ? काय माहित. माझ लक्ष फक्त तुझ्याकडे होत. म्हणजे इतक सुंदर कोणी असत का ? नजर हटवू वाटत नव्हत. एकटक बघत असताना तुला तुझी नजर माझ्याकडे आली कि मी नजर फिरवत होतो. तुला जायची घाई होती. पण तू जाऊ नये अशी माझी इच्छा होती. बडबड मी करत होतो आणि शांत ऐकून तू घेत होतीस. जाताना तुझ्यापुढे हात केला. तुला समजलच नाही काही. पण जेव्हा तू हातात हात दिलास. तो स्पर्श वेगळाच होता. माणसाला स्पर्शाची ओळख डोक्याने होते. पण तुझा स्पर्श थेट हृदयाला झाला. छान वाटल तुला बघून, तुला भेटून.

त्या रस्त्यावर माणसांचा वावर नव्हता. बहुदा आपण होतो म्हणून. तो क्षण खास होता म्हणूनच कि काय नशिबाने आपल्याला साथ दिली आणि अंधार झाला लवकर. एक धडधड हृदयाची होत होती. आणि तू सोबत होतीस अजून काय हव असत माणसाला आयुष्यात ? पैसापानी असून उपयोग काय ? सुख हे आपल्या माणसासोबत असत ते म्हणतात ते काहीही चुकीच नाही. आजवर ऐकून होतो पण आज अनुभवल. खरच खूप सुख असत आपल्या माणसाच्यासोबत असण्यात. ते सुख तू मला दिलस.

त्या चंद्राचा प्रकाश पण किती फिका होता. पण तरीही तू मला त्यात स्पष्ट दिसत होतीस. आणि हो मला चष्मा आहे. चष्म्याशिवाय मला लांबच स्पष्ट दिसत नाही. पण तू दिसत होतीस. उगीच नाही करत मी तारीफ तुझी. तू आहेसच तशी. जगातली सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी फक्त तू आहेस. आणि म्हणूनच जगात कुणी कुणावर करत नाही इतक सार प्रेम माझ फक्त तुझ्यावर आहे आणि राहील...

तुझाच

xxxxx

प्रिय,

xxxx

सकाळ माझी तुला बघून व्हावी. पहिला जागेपणी घेतलेला श्वास आणि त्या श्वासासोबत आलेला तुझ्या केसांचा वास हा, हेच हवय मला. तू उठण्याआधी घर आवरून घेऊन मग तुला उठवायचं आहे. घरी पाणी चोवीस तास आहे त्यामुळे पाणी भराव लागणार नाही. तुला मग चहा बनवत ठेवेन. तू ब्रश करून आलीस कि मग दोन कप तो चहा घेऊन आपण सोफ्यावर बसू. टीव्हीवर अर्जितची फ्रेश गाणी लावून मग तुझ्याजवळ बसून माझ्या कपाचा पहिला घोट तुला प्यायला देऊन मग पुढे मी माझा चहा घेईन जो तुझा उष्टा असेल. त्या नंतर तुला गरम पाणी काढून देईन. तुझ आवरून झाल कि आरशात बघून आवरताना एक मागून मिठी तुला रोज देईन. आणि सगळच आवरून झाल कि मग एकदा मिठीत घेऊन तुला कीस करून आय लव्ह यु रोजच म्हणेन. तू तुझ्या कामाला मी माझ्या कामाला जाऊ. तुला कंटाळा येणार असेल तर मीच सोडायला येत जाईन. दिवसभर काम मन लावून करेन. पैसे आपल्याला लागतील त्यासाठी मी खूप मेहनत करीन. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तेवढ तर मी करूच शकतो. दुपारी जेवायच्या वेळेस तुला आठवणीने कॉल करून तू जेवलीस का याची खात्री करीन. सकाळी जेवण बनवताना हि तुला सगळी मदत करीन. तुझा डबा मीच भरत जाईन, मी देईन तेवढ तुला खाव लागेलच. संध्याकाळी आपण घरी आलो कि तुला कोमट पाणी तयार करून ठेवीन. तू फ्रेश झालीस कि मग तुला मला चहा बनवेन.

चहा घेऊन आपण बाल्कनीत बसू. मंद प्रकाश असेल तिथ. तू आणि मी आपण खिडकी उघडून बाहेर चमकणाऱ्या लाईट बघत चहा पिऊ. तेव्हा हि तू पहिला घोट माझ्याच चहाचा घ्यायचा. मग पुढे स्वयपाक करून जेवण केल कि मी भांडी घासेन तो पर्यंत तू घर आवरून आपला बेड निट करून बसायचं. कधी पिरेड असेल तुझा तुला मी खास जेवण बनवून देत जाईन. तुझ्या पायाला तेल लावून हलके दाबून देत जाईन.

तुला बर वाटेल. कधी कधी तुझ डोक दाबून देईन. आणि रोज तुझी झोपताना तारीफ करेन. रोज वेगळी तारीफ वेगवेगळ्या शब्दात. आणि मग माझ्या हातावर डोक घेऊन तुला जवळ घेऊन झोपवेन. तू झोपल्यावर मगच मी झोपेन. असा दिवस मी जगेन.

एक आई मुलीची जितकी काळजी घेते मी तुझी घेईन. एक वडील आपल्या मुलीला जस जपतात जगापासून तीच रक्षण करतात मी तुझ करेन. एक मित्र जस सगळ ऐकून घेतो आपल. आपण आपल्या मित्राशी कहीही, कितीही बोलू शकतो अगदी तसच मी तुझ सगळ ऐकून घेईन तुझ्या विरोधात कधी बोलणार नाही. एक नवरा जस आपल्या बायको वर प्रेम करतो तसच मी कायम तुझ्यावर प्रेम करीन. आणि हो आत्ता हि करतोच. पुढच्या या सगळ्या विचारात अस वाटत कुठल्या संकटामुळे तू लांब जाऊ नयेस. म्हणून तुला लवकर माझ बनवण्याची इच्छा रोज होते.

कोहिनूर आहेस तू माझा. तुला हरवून बसलो तर मला महत्व काहीच नाही या जगात. खूप प्रेम करतो तुझ्यावर लेखक असून पण मला ते शब्दात मांडता येत नाही. म्हणजे विचार कर किती मी प्रेम करतो. बस तू आता माझ नाव लवकर लावून घ्यावस तुझ्या नावापुढे इतकीच एक गिफ्ट मला तुझ्याकडून हव आहे देशील ?

तुझाच,

xxxxx

प्रिय,

xxxx

तुझ्या स्पर्शात मी खूप प्रेम अनुभवल. त्या प्रत्येक क्षणाला मी तुझा मला जाणवत होतो. तिथ शांतात होती, मंद हवा होती, पुरेसा ऑक्सिजन होता पण तुला सांगू, त्या वेळेस वाटत होत तू जवळ आहेस म्हणून मी जिवंत आहे. तू गरज होतीस. जवळ असण्याची. खूप प्रेम आहे माझ तुझ्यावर ते सांगायची गरज नव्हती. मी तुला स्पर्शातून देत होतो तुला जाणवल ?

खूप खुप अस प्रेम मी तुझ्यावर करतो म्हणत होतो पण तुला सांगू ? ते खूप किती खूप आहे हे देवाला पण नाही सांगता येणार. जगात सगळ्या गोष्टींना मोजण्याची मापक आहेत. म्हणजे पाणी लिटरमध्ये, धान्य किलोमध्ये मोजता येत पण माझ तुझ्यावरच प्रेम मोजता येईल अस अजून काहीच उपलब्ध नाहीये. तुला हि ते समजणार नाही. आणि माझ्या इतक प्रेम कुणीच देणार नाही. हि खात्री आहे मला. जगात कुणी कुणावर करत नाही इतक प्रेम मी तुझ्यावर करतोय. कधीच ते संपणार नाही. कधीच ते कमी होणार नाही. बस वाढत जाईल. प्रत्येक क्षण निघून जात राहील. आपण एकत्र येऊ आपला संसार सुरु होईल. वेळ निघून जात राहील. वय वाढत जाईल. आत्ताचे क्षण आठवण होत जाईल पण माझ तुझ्यावरच प्रेम तसच तितकच राहील किंवा जास्त वाढलेलं असेल. अस म्हणतात अमर फक्त देव असतात. बाकी सगळ नष्ट होत जात. माझ तुझ्यावरच प्रेम अमर आहे. कधी मी मेलो तर लोक माझा अभ्यास करतील आणि त्यांना समजेल कि एक अजिंक्य होता ज्याची एक ‘ती’  होती. आणि मला समजून घेण्यासाठी लोक तुझा शोध घेतील. आणि माझ्यासारखेच ते लोक हि तुझ्या प्रेमात पडतील. मी वेडा आहे तुझ्यासाठी, मग लोक हि तुझ्यावर फिदा होतील. तेच लोक मग नंतर तुझ्यासारखी आपली साथीदार शोधतील आणि मुली अजिंक्यासारखा साथीदार. आणखी काय सांगू ? खूप प्रेम आहे माझ तुझ्यावर. आणि तुझ्यावरच राहील.

तुझाच,

xxxx 


प्रिय,

xxxx

तु जवळ आलीस की हृदयाला माझ्या नवीन एक धडधड मिळते. काय असत त्या वेळी त्या वातावरणात काय माहित पण एक ओढ लागून राहिलेली असते तुला जवळ घेण्याची. सगळी ताकद हाताशी येते. बाकी शरीर हलक होऊन जात. तुला जवळ घेताना मी मला तुझ्यात वाहून नेत असतो. जगात कुणी कुणावर करत नाही इतक प्रेम मी तुझ्यावर करतो. हे मला तेव्हा तुला सांगायचं असत. स्पर्श तुला करून. तुला ते जाणवत का माझं प्रेम ??

तुज्याशीच लग्न करून पुढचं सगळं आयुष्य तुझ्या सोबत जगायचं आहे मला. तु असणं, जवळ बसणं, माझ्या बोलण्यावर हसणं, सगळंच आवडत मला. तुला न भेटता किती जीव कासावीस होतो.

तुला न बघता किती माझा मी एकटा पडतो काय सांगू तुला... जगात कोणी नव्हतं माझं आणी तुझ्याशिवाय आता कोणीच नसेल. इतक जवळच.

 माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.. तुझं ही आहे का...? मला तुझी सोबत हवीय.. तुझ त्याहून जास्त प्रेम हवंय...आणि प्रेम वाढवणारी भेट सतत हवीय..... एवढंच मला देशील ना...???

तुझाच,

xxxx


1 टिप्पण्या