तिथे होतो मीसंध्याकाळची वेळ. किमान सात वाजत आलेले. सूर्य केव्हाच हरवलेला. उजेड हि निघाला होता. अंधार आवडतो कुणाला ? तरी त्याला त्याच काहीच नाही. तो येतच होता. ती बसलेली कुशीत. मांडीवरून हात फिरवत. बडबड करत. अर्थ काहीच नाही बोलण्याला त्या पण बडबड इतकी कि तीच ते ऐकताना कधी कधी वाटत ओठ ताब्यात घ्यावेत. एक कीस कित्येक मिनिट करत राहावा आणि तिला शांत करावा. ती बोलताना हात-वारे करत असताना मोकळ एक वार केसातून तिच्या जाताना ते केस तिचे हलत होते. ते बघून मला हि बर वाटल.

वेळ एरवी घरी असताना संपता संपत नाही पण तिच्याकडे बघताना सातचे कधी पावणे आठ झाले अजून गणित मला सुटलेलं नाही. घरी जायची घाई होती तिला पण न जाण्याची लक्षण हि दिसत होती. तोंड थांबत नव्हत पण पाय अगदी तिथेच तिला थांबवून ठेवत होते. मोबाईल वाजला. आणि तिने तो कानाला लावला. घरूनच होता बहुतेक. काय कुठ आहेस वैगरे असच काहीतरी विचारत असणारा तिची आज्जी. माहितेय मला. ती येते ग म्हणून मोबाईल ठेवते. मग पुढे सरकून त्याच्या मिठीत जाते. तोही तिला जवळ घेतो. वार सोडल तर दोघांच्या मध्ये काहीच नव्हत. काहीच नाही. प्रेम हि नाही. तरीही ते जवळ झाले. त्याने तिच्या केसात हात टाकला. तिने त्याच्या मानेवर हात ठेवला. एक कीस केला आणि ती निघाली. गाडी सुरु झाली. आणि पुढे जाऊन ती दिसेनाशी पण झाली. तो तिथेच बसला. त्याचा मोबाईल वाजला. तो बोलयला लागला. अगदी गोड बोलत होता. हेल्लो पासून तुला भेटू वाटतय पर्यंत सगळ ऐकल मी. पण जी आत्ता गेली इथून तिला परत भेटू का वाटेल ?

या विचारात मी असताना पुढच्या वाक्यांनी माझा अंदाज पक्का झाला कि हि कोणी दुसरीच आहे. तो बोलत होता. बोलताना मनाने तिच्या मिठीत होता. तिला कीस करत होता आणि बरच काही. शब्दातून हि ते व्यक्त करत होता. ती जी आत्ता निघून गेली तीच प्रेम होत त्याच्यावर. बहुदा खूप जास्त. त्या नात्यावर विश्वास ठेवून ती आत्ताच निघून गेली ना...? ती जाऊन एक क्षण झाला नाही आणि त्याच दुसर प्रेम आणखीच त्याला खुश करत होत. मी हि तिला खूप खुश करत होतो आधी. पण तिला ते झेपलच नाही. मग ती लांब झाली. विनाकारण. आणि मी एकटा झालो विनाकारण. मला सोडून ती तिला चांगला साथीदार शोधणार होती. तिने शोधला आणि मी बघितला. काय सांगू आणखी.........ती जे करत होती खर प्रेम त्याच्यासोबत, तिथे मी होतो....

Copyrighted@2021

1 टिप्पण्या