विवाहबाह्य

 


संबंध म्हणजेच नात. नात बनवण्यामागे कारण काहीही असोत, पण माणसाला एकाच या आयुष्यात खूप सुख मिळाव अशी त्याची इच्छा असते. तो त्याचा अधिकार आहे. माणसाचा जन्म केव्हा, कुठे, कुणाच्या पोटी घ्यायचा हे हातात नसत. कुठे मराव, कधी मराव आणि कशा स्थितीत मराव हे हि त्याच्या हातात नसत. जन्मतःच मिळालेलं नशीब आणि त्या स्थितीत जगत मरणाच्या दाराकडे चालणारे लोक या वाटेत बरीच अशी नाती बनवत असतात. लग्न हे त्यातल एक मोठ नात. जे आयुष्यभर पुरणार असत. नात बनवण सोप्प असल, त्यात इच्छा, अपेक्षा जरी जास्त ठेवल्या नाहीत तरी सुख हि एक गोष्ट तरी हवीच असते. निदान सुख मिळत म्हणून तरी काही नाती बनली जातात. लग्न झाल, मुलबाळ झाली कि बायको जुनी होते. होते का ? सतत, सतत समागमाने एकमेकांचा खरच का कधी एवढ कंटाळा येतो ? शारीरिक गरज नीटशी भागवली जात नाही हे कारण काय वाटत या बद्दल ? आजकाल माणूस माणसापेक्षा मोबाईलसोबत जास्त असतो. कारण काहीही असो. पण माणूस माणसापासून अंतर ठेवून जगत चालला आहे. अगदी नवरा बायकोसुद्धा. अशात मग होणार कमी संभाषण, असणाऱ्या गरजा, न घेतली जाणारी एकमेकांची काळजी, लयाला चालेलेल प्रेम, बळजबरी निभवाव लागणारा नात्याचा संसार आणि अशी बरीच कारण मनात साठवून ठेवत असताना जगत असताना, कोणी तरी आपल्या आयुष्यात येतो. ती व्यक्ती, तीच बोलन आणि त्याच किंवा तीच आपल्याप्रती अव्यक्त प्रेम कोणत्यातरी कृतीतून व्यक्त करण, आणि मग जे आपल्या साथीदाराकडून मिळत नाही ते मिळवण्याच्या हट्टाने नात एक बनवून त्याला प्रेमाच नाव देऊन जगणारे चुकीचे का असतात ? शरीरसुख या एका कृतीसाठी देवाने केलेलं प्रेम सुद्धा आजकाल माणूस बदनाम करू लागला आहे. बदफैली या प्रेमाला करताना असे विवाहबाह्य संबंध ठेवणारे प्रेमी मानसिक गरजेपोटी एकत्र आलेले असतात. न कधी पुरुष आपल्या बायकोला सोडायचा विचार करतो ना कोणती स्त्री आपल्या मुलांना किंवा नवऱ्याला सोडून जायचा लगेच विचार करू शकते. जगात घडत बरच काही. पण त्या नंतरच्या चुकीच्या कृत्याला सुरुवात तर सुंदर प्रेमानेच तर होते ना?. मानसिक आधाराची गरज लहान मुलापासून शेवटचा श्वास घेणाऱ्या माणसापर्यंत असते. विवाहबाह्य प्रेम तर कधीच बालिश नसत. तरून मुलांच्या सारख अल्लड अस ते प्रेम नसत. जगाची लाज सोडून मनाची चाड सोडून हे अस प्रेमाच नात.झाकून पाकून केलेलं लपवून हे प्रेम यात गैर काहीच नसत. प्रेम कस अअसाव यावर खूप काही लिहील आहे. त्याचे नियम हि आहेत. पण मुळात प्रेम कस असत याबद्दल कुठ काय आहे ? प्रेमाला बंधन नाही. सीमा नाही. वयाच भान नाही नात्याचं अडकवण नाही. प्रेम कराव अगदी मनसोक्त. एका आयुष्यात खूप प्रेम जगून माणसाने एक कुणासोबत जगाव यात चूक कसली. मानसिक सुखासाठी केलेलं प्रेम यात कुठ आल पाप ? शरीरीसुख मी म्हणत नाही. विषय फक्त मानसिक सुखाचा आहे. ज्याला ज्याला मन आहे त्याने प्रेम करत रहाव. अगदी मन भरेपर्यंत. आणि मग ? ( जगाचे दोष, टोमणे बोलणी ऐकून गप्प बसाव एकट आपल्या साथीदाराचा विश्वास आणि प्रेम गमावून ) . . . खर प्रेम कुणाला कळाल आहे ?

0 टिप्पण्या