PASSION

 


माझ्यावर प्रेम कोण करणार ? मी हा असा लेखक. स्वतःच्या विश्वात हरवलेला. व्यसन नाही कसल. पण लिखाण केल काहीजरी मग नशा केल्याचा फील यायचा. खायला भूक लागते. नुस्त समोर जेवण ठेवल तर ते जात नाही. आणि खाल्ल जरी ते सरत नाही. त्रास होतो. लिखाणाच पण तसच आहे. त्रास नाहीतर प्रेम लागत लेखकाला त्याच्या आयुष्यात. पण माझे विचार. एकट राहण्याची आवड यात कोणी कधी जवळ आलच नाही. किंबहुना मी गेलो नाही. लिखाण करत होतो. लिखाण करत गेलो. एक दिवस असा आला कि लिहायचं होत पण लिहायला सुचत नव्हत. पाच दहा मिनिट झाले पण विचार काही येईनात. आत अस हृदयात काहीतरी टोचत होत. श्वास जड-जड झालेले. डोक जड झाल. श्वास नाकातून आत बाहेर करत होता पण काहीतरी अस जे जाणवत होत पण कळत नव्हत अस एक आतून बाहेर न पडल्याच दुःख होत होत.

मोबाईल बघत बसलो असताना एक जुना मेसेज दिसला. लिखाणाला माझ्या आलेली एक सुंदर प्रतिक्रिया एका सुंदर मुलीची. प्रतिक्रियेला उत्तर दिल मी आणि पुढे ओळख झाली. जी ओळख झाली ती वाढली आणि ओळखीच प्रेम व्हयला वेळ कुठे का लागतो ? आवडली ती मला. आवड झाली प्रेम झाल. विषय संपला. पुढे मग बरच बोलन व्हायला लागल आमच. सुरूवातीच ते गोड गोड बोलन होत असताना प्रेम अव्यक्त होत. ती मैत्री नक्कीच नव्हती पण प्रेम आहे हे हि दोघांनी मान्य केलेलं नव्हत. त्या काळात बरच मी लिखाण केल. जे लिखाण करून मी खुश होत होतो. आणि कुठे तो सुकून कमी पडला तर ती होतीच.

पुढे एकदा तिनेच प्रेम व्यक्त केल. कारण तिच्यामते मी जास्त वेळ घालवत होतो. तिला नकार देणारा मुलगा कोणी वेडाच असावा. आणि मी वेडा नाही. पुढे आम्ही एक सुंदर नात्यात एकबंध झालो. पुढे मग बोलण्यावर भागेना मग भेटीची ओढ वाढली. एक अशाच सुंदर दिवशी रविवार होता. रविवार तसा नेहमीचाच आळसाने भरलेला होता पण तेव्हा आमची भेट झाली त्यामुळे तेव्हापासून मला रविवार आवडायला लागला. त्या भेटीनंतर मन पुरेपूर भरून गेल माझ. लिहायचं विसरून गेलो. जग विसरून गेलो. मला काय करायचं आहे. मी आधी काय करत होतो. मला काय व्हायचं आहे आणि मी काय करतोय काहीच लक्षात नव्हत राहील. घरच्यांचे मोबाईल नंबर घराचा पत्ता ऑफिसचा पत्ता काही दोनचार इथले रस्ते. बस बाकी सगळ विसरलेलो. प्रेम काय असत. तो फील घेतला. त्या सहा महिन्यात इतक प्रेम केल तिच्यावर कि या जगात आणि पुन्हा नव्या जन्मात तिला कोणी इतक करू शकत नाही. पण का जाणे ती लांब झाली माझ्यापासून. विनाकारण. म्हणा एकत्र यायला हि कारण नव्हत. नकळत घडल होत सगळ.

त्या सहा महिन्यात मी फक्त एक प्रेम पत्र लिहील. बस. इतकच जे तिच्याचसाठी लिहिले. ती गेली आणि इतका त्रास झाला कि. मग भानावर आलो. विसरलेल सगळ कस आठवायला लागल. आणि मी लेखक आहे हे आठवल्यावर पुन्हा लिखाण सुरु केल. ती गेल्या नंतर पुढच्या तीस दिवसात १२०० पेक्षा जास्त उर्दू हिंदी शायरी लिहिल्या. शंभर पेक्षा जास्त लेख लिहिले. शोधत होतो तिला माझ्या शब्दात. मी सोडून सगळ्यांना ती सापडत होती. पण त्यांना तीच नाव माहित नव्हत. आणि मला माहित असून पण ती मिळत नव्हती.

शेवटी लिखाण करता करता मनातल्या भावना इतक्या कागदांवर उतरवल्या कि त्या हि संपल्या. प्रेमावरचा विश्वास उठायला लागला. या सगळ्याला दीड वर्ष लागल. पुन्हा आधीसारखा होऊन जगत असताना एकदा लिखाण करत असताना तिचा मेसेज आला. “कसा आहेस ?” मी खोटच बोललो “एकदम मस्त आणि तू?” आणि तिचा कॉल आला. बराच वेळ बोलत होती माझ्याशी. बरच काही घडलेलं तिच्यासोबत. कोणा एकासाठी मला सोडून ती त्याच्यासोबत जगत होती. त्याने तिचा वापर केला. तिचा एक हि शब्द पडून न देता ते मुल पाडे पर्यंतचा प्रवास त्याने या दीड वर्षात केलेला. तरीही ती त्याच्याच मागे फिदा होती. मग त्याने दुसरी बघितली आणि मग हि एकटी पडली आणि तिला माझी आठवण झाली.

आणि मग तो हा आमचा कॉल झाला. पुन्हा तिला सहानभूती देता देता माझ्यातल तिच्यासाठीच प्रेम जाग झाल. पुन्हा कॉल मेसेज आणि भेट हे सगळ सुरु झाल सहा महिने. आणि पुन्हा ती लांब गेली. याही वेळेस कारण काहीच नव्हत. आणि या हि वेळेस तिला दुसरा कोणी भेटला. त्याने तिच्यावर रेप केला. तिला मारहाण केली. तिचा मानसिक शारीरिक छळ केला. हे सगळ मला समजल कस ? तिनेच तिच्या तोंडाने कॉल करून सांगितल आणि माझ्याकडे प्रेमाची भिक मागायला लागली. भिक द्यायला मी श्रीमंत नाही. मी सहानभूती दिली. बस. त्यावर तीच भागल नाही आणि तिचा आणि एका मुलाचा सोबतचा एक फोटो मला त्यानंतर फेसबुकवर दिसला. Passion साठी माणूस काहीही करू शकतो. हे मात्र नक्की. आणि मी अजून हि तिची आठवण काढतो हि माझ्या प्रेमातली passion आहे. बाकी आठवण येते तिची पण आता ती माझी वाटत नाही.....   

copyrighted@2021

0 टिप्पण्या