Need

 

रोजचा नियम तिचा, मी काही लिहील कि मला विचारायचं. मला मीच लिहिलेलं वाचता येत नाही. शब्द असे पुढे मागे होतात. मीच लिहून पण माझ्या लक्षातून जात. पुरती भंबेरी उडते माझी. हे माहित असून पण मला वाचायला सांगायची. विषय प्रेमाचा असला तरी ते वाचताना मी इतके वेळा चुकायचो कि ती इतका गंभीर विषय हसत-हसत ऐकायची. आणि माझ वाचून झाल कि मग एकांतात बसून पुन्हा एकदा वाचत बसायची. आज लिहिलेल्या गोष्टीला उद्या प्रतिक्रिया देणारी ती. जिच्यासाठी मी लिहायचो ती सोडून सगळ जग मला प्रतिक्रिया द्यायचं. आणि जेव्हा दुसरा नवीन लेख मी लिहायचो तेव्हा तिची पहिल्या लेखाला प्रतिक्रिया यायची. ती ऐकुन खुश व्हायचो मी. पण मला लिहायला त्रास लागतो आनंद नाही. मनाला वाईट वाटल नाही माझ्या तर मला काही सुचत नाही. अलीकडे हि मला काही सुचत नाही. कारण ती सोबत नाही. अस नाही. ती आहे.. मनात माझ्या. कायम सतत.
ती सोबत नसून तसे झाले दोन किंवा त्याहून जास्त वर्ष पण मनातून एक क्षण गेली तर शप्पथ. त्या तिच्या सोबतीमुळे मी लिहित राहिलो. पण आता तिला आठवून लिहिता लिहिता आता तिचचा चेहरा डोळ्यांपुढून धूसर झालाय. सुचायचं कमी झाल म्हणून इतकी गाणी ऐकली कि आता तिचा आवाज तितकासा लक्षात नाही. उरले सुरले फोटो होते ते हि मोबाईलसोबत हरवून गेले. उरल काय शेवटी तिनी दिलेली गिफ्ट्स. त्यांना आता एका कपाटात मी जपून ठेवलय पण ते कपाट दुसऱ्याच घरी आहे. तिथ कधी गेलो तर त्या कपाटाच दार उघडत नाही मी. कारण त्या गिफ्ट्सना तिच्या सेंटचा वास आहे. तो मला आता हरवायचा नाही. दोन वर्षापासून ते दार बंद आहे. त्या तिच्या सेंटच्या वासाचा जीव तर गेला नसेल ना गुदमरून ? कायम हा विचार पडतो मला. पण ते तपासायला मी गेलो आणि उरलेला तो वास वाऱ्यासोबत निघून गेला तर मी काय करू ? हा हि प्रश्न पडतो मला म्हणून मग ते दार कित्येक महिने बंदच आहे. लिहायला सुचत नाही म्हणून त्रास होतो. त्रास होतो तरी सुचत नाही. सुचत नाही म्हणून जगू वाटत नाही. जगू वाटत नाही या विचारातून बाहेर पडायला काहीतरी काम करतो. पण कामात हि मी मला एकटाच वाटतो. एकटा मी मला भासलो कि मला गरज लागते. गरज असताना कोण कधी गरजेला पडेल माझ्या अस होत नाही. म्हणजे काय तर मी एकटाच आहे. आणि आता कोणाची सोबत शोधावी म्हणतो तर ती अर्धवट तर नसेल ना याची भीती वाटते. भीती मला सगळ्याच गोष्टीची वाटते. सगळ्याच गोष्टी माझ्या नशिबात नाहीयेत. नशीब माझ चांगलच नाहीये. पण असा विचार करून मी थांबू पण शकत नाहीये. पण पुढे जातोय तो मी कुणासाठी ते हि मला आता माहित नाहीये.....  
copyrighted@2021


1 टिप्पण्या