प्रेमाची शप्पथ आहे तुला सिजन ०८

 भाग ०१

बसमध्ये.

अजिंक्य खिडकीतून बाहेर बघत होता. प्रतीक्षा बाळाला घेऊन बसलेली. अजिंक्यच्या आणि तिच्यामध्ये सारा बसलेली.

प्रतीक्षा : साताऱ्याला जाऊन काय करायचं अजिंक्य ?

अजिंक्य : माहित नाही. पण जो आत्ता सोबत त्रास आहे त्याला मागे सोडून येण भाग होत. नवीन आयुष्य सुरु करू आपण.

प्रतीक्षा : तुझ घर सोडल तर आता आपल्याकडे काहीच नाहीये.

अजिंक्य : म्हणजे ?

प्रतीक्षा : तुझ्या स्टोरीवर मालिका सुरु करणार होते मी. आणि खूप प्रयत्न केले पण प्रोड्युसर मिळाला नाही म्हणून मग मीच पैसे गोळा केले. गाडी विकली. साताऱ्यातल तू मला घेतलेलं घर आणि अमितने घेतलेले दागिने सगळ विकून मी पैसे गोळा केले पण. मालिका झाली नाही.

अजिंक्य : का ?

प्रतीक्षा : तुझी तब्येत बिघडली जास्त.

अजिंक्य : बस एवढच कारण ?

प्रतीक्षा : हो.अजिंक्य : पण माझी शेवटची स्टोरी ज्या डायरीत लिहिलेली ती माझ्या हाताने जाळून टाकलीय.

प्रतीक्षा : हो, माहितेय मला.

अजिंक्य : मग कोणत्या स्टोरीवर करणार होतीस मालिका ? नक्की काय झालय ?

प्रतीक्षा : मी तुझ्या कॉम्प्युटरमधल्या स्टोरी घेऊन खूप जणांकडे गेले. सगळ्यांनी त्या स्टोरी अप्रूव्ह केल्या पण त्याचा लेखक तू आहे समजल्यावर त्यांनी स्टोरी रिजेक्ट केली. जोशी म्हणून एक होते. त्यांनी अभिजित नावाच्या एकासोबत ओळख करून दिली. आणि त्याने तयारी दाखवली. मी त्याला पैसे द्यायला तयार होते पण तो म्हणाला पैसे मी निम्मे लावतो बाकीचे तु लाव. मी तयार झाले. स्टोरीला त्याने री-राईट करायला माझ्याकडून हक्क घेतेले आणि ती स्टोरी त्याने त्याच्या नावावर केली.

सॉरी अजिंक्य. माझ चुकल मी विश्वास ठेवला. पण तुझी मेहनत मी घालवली. ती स्टोरी तू स्वतः त्यावर काम करणार होतास पण मला तुझ्या बाकीच्या स्टोरी मिळत नव्हत्या आणि मला तू शुद्धीवर आल्यावर सांगायचं होत कि तुला काम मिळाल आहे. जेणेकरून तुला बर वाटेल पण स्टोरीच हातून गेली. ती स्टोरी मिळवायला त्याला मी पैसे द्यायची तयारी दाखवली त्याने होकार दिला. मी त्याला भेटायला गेले पण ( आणि प्रतीक्षा एकक्षण थांबली, अजिंक्यने तिच्याकडे बघितल )

अजिंक्य : पण ?

प्रतीक्षा : काही नाही. त्याने नाही दिली स्टोरी.

अजिंक्य : असुदे. सोड. एक स्टोरी गेली म्हणून मला फरक पडत नाही.

दोघांच्यात पुन्हा शांतता. नंतर प्रतीक्षा तो शुद्धीत नव्हता तेव्हाच्या सगळ्या गोष्टी सांगत बसली. त्यात सातारा हि आला. बस थांबली. अजिंक्य साराचा हात धरतो. एका हाताने नीट बाळाला धरतो. आणि प्रतीक्षा त्याला चिटकून चालत राहते. अजिंक्य शांत पडलेल्या तोंडाने चालत होता. प्रतीक्षा त्याला बघत चालत राहते. एका रिक्षात बसून ते घरी जातात. घराजवळ आल्यावर अजिंक्यला त्याची बुलेट दिसते. पापणी मिटून पुन्हा उघडतो तर ती तिथे नसते. त्याला वाईट वाटत. बाजूला इनोव्हा आणि स्विफ्टपण नसते. प्रतीक्षा त्याच्या खिशातून चावी काढून कुलूप उघडते. ते आत जातात. अजिंक्य बाळाला बेडवर ठेवतो आणि त्या हालचालीने बाळ जाग होत आणि रडायला लागत. प्रतीक्षा बाळाला दुध पाजायला बसते. सारा प्रतीक्षाजवळ असते. अजिंक्य किचनमध्ये जातो. सगळा पसारा असतो. तो आवरायला लागतो. थोडफार आवरून तो खाली खुर्चीला टेकून बसतो. प्रतीक्षा बाळाला झोपवून आत येते तर अजिंक्यला खाली बसून रडताना बघून तिच्या डोळ्यात पाणी साचत. 

 

भाग ०२

प्रतीक्षा त्याच्या जवळ जाते. ती ही खाली बसते. अजिंक्याच्या डोक्यावरून ती हात फिरवते आणि अजिंक्य तिच्या मिठीत जातो आणि रडायला लागतो. प्रतीक्षाला हि राड्याला येत. ती त्याला आणखी जवळ घेते. थोड्यावेळाने प्रतीक्षा त्याला मिठीतून बाहेर काढते, त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला ती पुसते. अजिंक्य तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठांना स्वतःच्या ओठात घेतो.

प्रतीक्षा : अजिंक्य तू आता आराम कर जरावेळ.

अजिंक्य : गरज तू आहे. खूप दगदग, त्रास झालाय तुला. तू आराम कर. बाळाला आणि साराला बघतो मी. तू झोप शांत.

प्रतीक्षा : नको.

अजिंक्य : मी सांगतोय ना. चल.

तो तिचा हात धरतो आणि दोघ उठतात. बाहेर येऊन बेडवर बाल झोपलेलं असत त्याच्या शेजारी तो प्रतीक्षाला झोपवतो. सारा हि तिथच बाजूला झोपलेली असते. अजिंक्य प्रतीक्षाच्या डोक्यावरून हात फिरवत तिला झोपवतो. प्रतीक्षा आतून इतकी थकलेली असते कि ती पुढच्या दोन मिनिटात झोपून जाते. ती झोपलीय बघून अजिंक्य बाजूला खुर्चीवर बसला. खूप प्रश्न पडलेले त्याला. खूप काही बदलल होत त्याच. बदल होणार होताच पण या बदलामुळे त्याला इथून पुढच आयुष्य नव्याने सुरु करायचं होत. आणि त्यासाठी त्याच्याकडे काहीच उरल नव्हत. होती ती फक्त वाढलेली जबाबदारी. त्याने प्रतीक्षाचा मोबाईल बघितला. तो घेतला आणि त्याने एक कॉल लावला आणि तो बाल्कनीत गेला.

अजिंक्य : हेल्लो, सर, मी...अजिंक्य भोसले.

... : कोण ?

अजिंक्य : रायटर अजिंक्य तुमची एक स्क्रिप्ट लिहिली होती मी. आठवल का ?

... : हा,..हा, आठवल आठवल. बोल अजिंक्य कसा आहेस.

अजिंक्य : मी ठीक. मला काम हव होत.

... : सध्या माझ एका फिल्मवर काम सुरु आहे.

अजिंक्य : पुढचा प्रोजेक्ट कधी सुरु करणार आहात ?

... : इतक्यात तरी नाही. सध्या सलग चार फिल्म्सच काम चालू असणार आहे. मध्यंतरी मला स्टोरीची गरज होती. मला तुझी आठवण हि झाली पण तुझा कॉल लागला नाही. मग दुसर्याला मी तो प्रोजेक्ट देऊन टाकला. आता कुणाला हवी असेल स्टोरी तर सांगेन.

अजिंक्य : नक्की ?

... : हो, पण एक सांगू का अजिंक्य, कोणती करायला नाव असाव लागत. तुझ गेलय या बर्याच दिवसात तुझा कुठ ठाव ठिकाणा नाही. बर्यापैकी विसरलेत तुला सगळे. आणि तुला काम देतील अस वाटत नाही. पण मी करेन काही न काही तुझ्यासाठी प्रयत्न. तू काळजी करू नकोस.

अजिंक्य : चालेल.

... : बर चल ठेवू फोन ? शुटींग स्पॉट वर आहे.

अजिंक्य : हो. चालेल.

अजिंक्य पुन्हा खोलीत आला. बाळाची हालचाल चालू होती. बहुतेक बाळ उठणार होत. अजिंक्यने त्याला जवळ घेतल आणि झोपवल. तो तसाच बाळाला मांडीवर घेऊन खुर्चीवर बसला.

अजिंक्य थोड्यावेळाने घराबाहेर गेला. खूप वेळ चालत होता तो. इतका चालला कि त्याच्या छातीत दुखायला लागल. तरी तो चालत होता. एका डोंगरावर जाऊन त्याने सिगरेट पेटवली. पहिला कश घेतला आणि त्याला खोकला यायला सुरुवात झाली. त्या खोकल्याची ढास इतकी होती कि त्याच्या छातीतून कळ यायला लागली. तो उठला. आणि त्याच्या पुढे अंधारी यायला लागली. तरी तो कसाबसा उठला आणि एका झाडाला धरून तो उभा राहिला. त्याने मोबाईल सुरु केला. प्रतीक्षाचा त्याने फोटो बघितला. मोबाईल बंद केला आणि खिशात ठेवला आणि तेवढ्यात पुन्हा एकदा त्याच्या छातीत जोरात कळ आली. इतकी जोरात कि क्षणभर त्याचा श्वास अडकला. त्याने घरून आणलेली बंदूक मागच्या खिशातून काढली. स्वतःच्या छातीवर ठेवली. आणि बंदुकीचा खटका दाबला.        


copyrighted@21

Post a Comment

1 Comments