अनुभव

सहज विसरता येत असेल ते प्रेम कसल ? पण लक्षात ठेवण्यासारख तरी काय इतक असत ? ज्या व्यक्तीची इतकी सवय झालेली असते त्याच व्यक्तीपासून जास्तीत जास्त लांब राहण्यासाठी जी धडपड केली जाते अजब आहे. प्रेम करण्यापेक्षा प्रेम विसरण्यात कसरत बरी करावी लागते. ज्या विचारांनी माणूस खुश होण्याचा प्रयत्न फक्त प्रयत्न करत राहतो त्या आनंदाच्या बदल्यात मिळालेल्या दुःखाला लपवण्यात किती कसरत होत असते माणसाची. काय बोलाव त्याबद्दल ?

मनात नसताना पण हसायचं. विचार केला नसताना पण डोळ्यात पाणी आणायचं. बधीर कानात तीच नाव ऐकू आणायचं आणि विसरलेले नाव ओठात आणायला पण किती धाडस लागत काय म्हणून सांगू ? प्रेम करण्यापेक्षा विसरण्यासाठी जी मेहनत माणूस घेतो कबिल-ए-तारीफ असते. अशा या कबिल-ए-तारीफ प्रेमाला धुडकावणाऱ्या माणसाला खर प्रेम समजलेलच नस्त हे नक्की. प्रेम मिळाव म्हणून माणूस काय आणि काय करत असतो. देवापासून रस्त्यावरच्या दगडापर्यंत, तथाकथित झाडापासून काल्पनिक खांबाची पूजाअर्चा करून प्रेम व्यक्त करण्याआधी ते मिळवण्याची मागणी करणारा माणूस प्रेम मिळाल कि हव तस वाट्टेल तस वागून, वागवून माणूस प्रेमाचा शेवट करून टाकतो. ज्या प्रेमाच्या स्वप्नात तो जगत असतो ते सत्यात मिळाल कि त्याला वाट्टेल तस वागून प्रेमाला त्रास देऊन मग शेवटी स्वतःला त्रास करून घेऊन मग अखेर प्रेमाला नाव ठेवून एकटा राहण्याचा विचार तो करत असतो. एकटेपणा वाईट. खूप वाईट.

आणि अशा एकटेपणात जगत असताना होत असलेला आतून त्रास तो बाहेर चेहऱ्यावर लपवताना जो प्रयत्न करत असतो तो कुणाही पासून लपत नाही. आणि मग तो त्रास लपवण्याचा प्रयत्न निष्फळ होत आहे जाणवायला लागल कि आणखी त्रास मनाला व्हायला लागतो. ई जेव्हा त्रास वाढतो त्या त्रासातून मार्ग काढायला माणसाला दुसरा माणूस लागतो. नुसता माणूस किंवा त्याची सोबत नाही तर त्याच प्रेम हि हव लागत. आणि मग एका प्रेमाच्या त्रासातून वाट काढून पुढे आलेला माणूस त्या प्रेमाच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी पुन्हा प्रेमाचाच आधार घेतो. आणि असे अनुभवी लोक किती आहेत जगात माहित आहेत का ?

अगदी सगळेच. कुणी मान्य करो अगर ना करो. पण हेच खर आहे.          

copyrighted@2021


 

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies