STORY

 


काही गोष्टी त्या तुला आणि मलाच माहित आहेत. ते क्षण आता आठवण म्हणून असतील आपल्या मनात, पण त्या आठवणी ज्या क्षणांनी तयार झाल्या त्यात हि आपण दोघेच होतो फक्त. ती पुढची स्वप्न बघण्यासाठी ठरवलेल्या काही गोष्ट, त्यासाठीची कित्येक प्रश्न आणि स्वप्न पूर्ण नाही झाली तर त्यासाठीचे पर्याय हि आपलेच, मग आपणच खुश होऊन एकमेकांना बघून प्रेम व्यक्त करायचं कस तर एकमेकांच्या मिठीत जाऊन. तेव्हा हि तो क्षण जगला, बघितला, अनुभवला तो फक्त आपणच. काय अस वेगळ करत होतो आपण ? जे प्रत्येक जण करतात या जगात तसच अगदी आपल प्रेम सुरु होत. वेगळ अस काहीच नव्हत. आपली स्वप्न पण इतरांसारखीच होती. काय तर एकमेकांना शेवटपर्यंत सोबत, साथ द्यायची. एकमेकांना समजून घ्यायचं. एकमेकांवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. आणि प्रेम....ते तर अजिबातच कमी होऊ द्यायचं नाही. 

तुला आवडायचा पाऊस. मला अजिबात नाही. तरीपण आपण भेटल्यावर तू मला तुझी शप्पथ घालून थोड तरी भिजायला सांगयची. तुझा हात धरून मी तुझ्यासोबत मोकळ्या त्या आड-रस्त्यावरून चालायचो. जेव्हा मग दोघ हि पूर्ण भिजायचो. मी नेहमीसारखा रुमाल विसरलेलो असायचो आणि तू तुझ्या ओढणीला पिळून त्यातल पाणी घालवून त्याच ओलसर ओढणीने माझ तोंड पुसायचिस आणि केसांना हि. आणि स्वतः मात्र केसांना मोकळ सोडून मग माझा हात हातात घट्ट धरून मला चिटकून बसायचीस. तो थंड वारा अंगाला लागायचा आणि तू आणखी जवळ यायचीस. त्या क्षणाला त्या वार्याने थंडी नाही वाजायची. शरीर थंड पडलेलं असायचं पावसात भिजून पण आतून अस गरम गरम जाणवायचं. अस वाटायचं तुला त्या क्षणी जवळ ओढून मिठीत घट्ट घ्याव. पण आड-रस्ता असला तरी माणूस हा असा प्राणी आहे जो जगाच्या काण्याकोपर्यात पोचला आहे. पार अगदी अंतराळात पण. मग अशा अवस्थेत आपण असताना आड त्या रस्त्यावर का कोणी येणार नाही ??? 

मला काय मी निर्लज्ज आहेच. पण तुला भीती असायची. आणि मग मी तुझ्या शेजारी बसून तुझ्या गालावरून माझे ओठ फिरवायचो. डोळे गच्च मिटून. आणि तू डोळे उघडे ठेवण जमत नसताना पण बारीकसे डोळे करून आजूबाजूला बघत अंदाज घेत तसाच चेहरा माझ्याकडे वळवून तुझे ओठ माझ्या ओठांच्या ताब्यात द्यायचीस. त्या क्षणी सगळ विसरून जाऊन एकमेकांमध्ये हरवून जाणारे आपण दोघ, आज मी इथे आहे. तू कुठे आहेस ? मला माहित नाही. इतक अंतर का ? कधी ? कस झाल ? माहित नाही. पण आपण दोघे हि लांब आहे. तू तुझ्या आयुष्यात जगत आहेस. नव्याने पुन्हा. ज्या आयुष्यात प्रत्येक स्वप्न तुझी आहेत माझ्या सोबत तू बघितलेली. तीच स्वप्न बहुदा आता पूर्ण होत असतील हो ना ? 

मी माझी स्वप्न सोडून दिली मागेच, त्या आठवणीत. त्यांची मी आठवण काढत नाही आता जशी तू मला विसरून गेलीयस. बस असतो विचारात कोणत्या तरी वेगळ्याच. जिथे तुला मी आठवत नाही. पण तू त्या विचारातून जात पण नाहीस. माझ आयुष्य, माझ भविष्य, माझे विचार, माझ्या आठवणी, माझा वेळ सगळ माझ असून पण तू तुझी अशी छाप सोडून गेलीयस कि तुझ्या नंतर हि इथ मी तुझ्यासोबत नाही पण तुझच एक आयुष्य जगतोय. बाकी माझ अजून हि तुझ्यावर प्रेम आहे. तुझ आणखी कुणावर असेल. तुला माझी आठवण येत नसेल मला हि तुझी येत नाही. कारण तू मनातून अजून गेलीच नाहीयेस. निदान माझ्यातला तो तुझा जीव न्यायला तरी एकदा भेटून जा. आणि भेट शक्य नसेल तर लांबून कुणासोबत तरी दिसून जा. तुला कुणासोबत बघून तरी या जीवाला खात्री पटेल आणि काही काळ का होईना हे मन तुझा विचार करण सोडून देईल.    

COPYRIGHTED@2021    


Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies