प्रेम सोप्प नाहीये

 


प्रेम हि एक कल्पना आहे अस मानल तर हि कल्पना प्रत्येकजण आपल्या आयुष्यात करत असतो. त्यासाठी तो त्याचा वेळ खर्ची घालत असतो. या खर्चिक वेळेला खर्ची घालून आयुष्यातला काही काळ माणूस अगदी अस्सा वाया घालवतो. त्याबद्दल त्याला काहीही वाटत नाही. वाटलच तर बर वाटत. बाकी आणखी दुसर काही वाटत नाही. प्रेम करण्यासाठी जस कोणतही कारण लागत नाही तसच प्रेम का करू नये यासाठीही कोणतीच पर्यायाची यादी नाहीये. जी-जी गोष्ट आयुष्यात जगण्यासारखी, अनुभवण्यासारखी आहे ती-ती गोष्ट प्रेम नावाच्या नात्यात राहून जगण्याचा प्रत्येकाचा जो हट्ट असतो. तो मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी असेल. माणूस प्रेम आणि पैसा याचा दिवाना आहे. पैशाशिवाय माणसाच आयुष्य नाही. मान्य, पण तोच माणूस जेव्हा प्रेमात असतो तेव्हा त्याला पैसा हि गरजेचा आणि इतका महत्वाचा वाटत नाही.

प्रेमाने कित्येकांची आयुष्य बदलून गेली आहेत. इतकी ताकद प्रेमात असून ही प्रेम हि एक साधी गोष्ट माणसाला व्यवस्थित पोसता येत नाही. काय कराव लागत नक्की प्रेमात, प्रेमासाठी ? बस... सुरुवातीला ओळख मग मैत्री त्यानंतर होणारी सवय आणि मग मन जुळण्याची कुणकुण लागली असता एकमेकांची मनं ओळखण्याची ओढ लावून धरायची. एकमेकांना समजून घेण्याइतपत जेव्हा नात्याची पायरी येते. मग मनाची ओढ शरीराकडे वळते. मनं ओळखून झाल्यावर मग शरीर ओळखण्याची इच्छा होते. ती इच्छा खूप जास्त तीव्र असते. इतकी कि त्या इच्छेपुढे मन आणि मेंदु आणि हृद्य हि हतबल असत. शरीराची शरीराला ओढ लागली असताना जेव्हा पहिला स्पर्श होतो मग पुढे कित्येक स्पर्श होत जातात आणि मग अखेर समागमाला येऊन थांबते जी इच्छा ते म्हणजे प्रेम.

कारण प्रत्येक गोष्टीला एक अखेर आहे. तसच प्रेमाला अखेर हा समागमाने मिळतो. त्यानंतर काय करायचं असत ? भेट आणि समागम. बस इतकच. आणि हे जेव्हा होऊन जात त्या नंतर जी जबाबदारी असते ते खर प्रेम असत अस मला वाटत. किंवा हे असच आहे. प्रेम करायचं नसत. ते मिळवायचं नसत. ते द्यायचं असत. त्याहून जास्त ते जपायचं असत. नेमक ह्या दोन गोष्टी सोडून जगात प्रत्येकाची प्रेम करण्याची आणि प्रेम मिळवण्याची जिद्द इतकी आहे कि प्रेम जपायची किंवा समजून घ्यायची मानसिकता कुणाची दिसतच नाही. बदल्यात मोजता येतील इतके क्षण, सहज विसरता येतील इतकीच सोबत घेऊन हे लोक प्रेम केल्याचा आनंद व्यक्त करतात आणि प्रेम बीम काहीच नसत म्हणून त्याबद्दल शोक हि करत बसतात. पण जे प्रेम देवाने हि केल आहे. त्याच प्रेमाबद्दल माणसाने हळहळ व्यक्त का करावी ? मग मला अस वाटत कि, प्रेम हा माणसातला दोष आहे कि माणसाची भावना ? प्रेम आहे म्हणून मिजास करणारे, नसलेल्या प्रेमाला शोधत आख्ख आयुष्य खर्ची घालून शोधत फिरणारे, फुकट मिळणाऱ्या प्रेमाला डावलणारे आणि पैसे उधळून प्रेम जिंकणारे हे जे कोणी लोक आहेत त्यांना प्रेम म्हणजे काय हेच मुळी समजल नाही हे सिद्ध होत आहे. आणि हे त्यांना माहित असून हि, सोशल मिडीयावर एकत्र हसरे फोटो ठेवून जगाला आमच एकमेकांवर प्रेम किती आहे आणि आम्हाला किती आनंद होतो आहे हे दाखवून प्रेम व्यक्त करणारे लोक, समजतील का कि दाखवता येईल, सांगता येईल, व्यक्त करता येईल इतक सोप्प प्रेम नाहीये. ते फक्त आहे. त्याच अस्तित्व, अनुभव, आनंद आहे. बाकी प्रेम सर्वांच सारखाच आहे....       

 

copyrighted@2021

1 टिप्पण्या