SIMPLE LOVE

 
तीच ते प्रेम बघून माझ जगन पूर्ण बदलून गेल. काय शक्य होत ? काहीच नाही पण ‘काळजी करू नकोस’ या तिच्या वाक्यान सगळ शक्य होऊन गेल. मनातले सगळे विचार तिच्याशी बोलताना इतके हरवून गेले कि बोलन झाल्यानंतर एकांतात मी काय विचार करत होतो हे हि आठवत नाही. तीच प्रेम खूप आहे. जे आहे फक्त माझ्यासाठी आहे. स्वप्नं कधी पडली नाहीत मला. कारण तशी शांत झोप लागली नाही. पण तिच्या सोबतीने जागेपणी तिच्यासोबतची अनेक स्वप्न रंगवली मी. जी पूर्ण होतील न होतील हे माहित नसताना पण ती मी रंगवली. काय दिवस काय रात्र. असेच्या असे दिवस तिच्याशी बोलताना निघून जातात. दिवस जात राहतात. दोघांमधल अनेक किलोमीटरच अंतर या लॉकडाऊनमध्ये पण फक्त बोलून कमी केल जाऊ शकत. याचा अनुभव हि आला. काय असत अवघड ? काहीच नाही तिच्यामुळे आयुष्य सगळ सोप्प आहे याचा अनुभव आला. या आधी आयुष्य खडतर, बेकार, आहे एवढच माहित होत. पण तो माझा भ्रम होता आणि आत्ता जो आहे तो अनुभव आहे.

तिच्यावर प्रेम करून मला हि प्रेमच मिळत आहे. जे मला होत, जे माझ आहे. तिच्या प्रत्येक वाक्याला शब्दाला मी माझ प्रेम देऊन मी कित्येक अशा गोष्टी करायच्या तयारीत आहे. कारण प्रेमात सगळच सोप्प वाटत. जरी तस नसल तरीही. एक सुंदर जग इथल. त्यातली सुंदर एक ती. तो प्रत्येक सुंदर क्षण आणि त्याहून सुंदर दिसणारी ती. सगळ जगच माझ ती आणि माझ आयुष्यच आता सुंदर झाल आहे. तिच्यासोबत घेतलेल्या वचनांना पूर्ण करण्यासाठी काहीही करायची तयारी असलेलो मी तिला वाटल तर तिच्यापर्यंत जाऊ शकत नाही. तिला हव असताना पण जवळ घेऊ शकत नाही. तिच्या प्रश्नांना उत्तर द्यायला जमतात मला पण तिच्या उत्तरातले प्रश्न मला सोडवले जात नाही. ‘आय लव्ह यु’ म्हणून प्रेम व्यक्त करताना ती जवळ नसल्याचा त्रास होतो. तिचा आवाज ऐकू येतो पण ती समोर नसते याचा हि त्रास होतो. तीच इतक सार प्रेम आहे माझ्यावर हे मला जाणवत असत पण त्याचा हि त्रास होतो कि ते फील करायला समोर मी नाहीये. आणि मी.....तिला फक्त तुझाच आहे म्हणतो पण तिच्याजवळ नाही. याचा हि मला फक्त त्रासच होतो. हे बस अस हे सगळ प्रेम करताना सुख कुठच नाहीये. एक धडपड, एक आस, काही अपेक्षा आणि खूप सारा त्रास हे इतक सगळ असल तरी माझ तिच्यावर प्रेम आहे. तीच माझ्यावर प्रेम आहे.

एक फक्त ती बाकी कुणीच नाही. एक जग सुंदर त्यात तिच्याहून सुंदर कुणीच नाही. जे आहे ते तीच सगळ माझ आहे. आणि मी ? तिच्याशिवाय मी कुणाचाच नाही. हे असे सगळे बालिश विचार पण एकमेकांना प्रेमात पडण्यासाठी पुरेसे असतात. “प्रेमाने माणूस बालिश होतो. प्रेमात लग्न झाल तर माणूस समजूतदार होतो. आणि समजून घेण्याची कला त्या माणसात जेव्हा आत्मसात होते तो माणूस मग जबाबदार होतो.” हीच ती पायरी मला जगण्याची संधी मिळाली आहे. “प्रेम करण्यापेक्षा ते व्यक्त असाव. आणि व्यक्त प्रेम कृतीतून सिद्ध करायचं असत.” इतक सहज सोप्प प्रेम असत जे प्रत्येकाला जमत नाही. पण आमच जमलय....बस मी तिला मिस करतोय. आणि ती मला.......

COPYRIGHTED@2021

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies