ती : अस किती दिवस आपण बोलणार ? भेटण होत आपल, पण रोज रोज नाही ना होत.
झाली भेट तरी ती काही वेळापुरती असते. मला ना तुझ्यासोबत सतत रहायचंय आहे अजिंक्य.
तुझ्याशी बोलताना मेसेज नाही करायचे मला. किंवा आजूबाजूला कोण नाही बघून कॉल नाही
करायचा. बोलताना कुणी आल तर मैत्रीण आहे कॉलवर म्हणून खोट नाही बोलायचं. भेटल्यावर
जाणारा वेळ नाही मला फक्त तुला बघायचं आहे. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगायचं आहे
मला.
तो : मग करायचं काय ? डोक्यात काय आहे तुझ्या ? प्रेम होण जितक सोप्प आहे
ना, तितक निभावण नाही. मला हि नाही रहावत तुझ्यापासून लांब पण पर्याय नाही. पर्याय
नसलेले प्रश्न जेव्हा आयुष्यात येतात न तेव्हा एक उत्तर असत ठरलेलं. तेच उत्तर
पक्क असत. पर्यायाला पण पर्याय नसतो मग. आपल्या या आयुष्यात आपल्या दोघांच्या
नात्याला पर्याय नाहीये. उत्तर आहे एक.
ती : पर्याय शोधले तर मिळतात अजिंक्य. आणि उत्तर जे काही असेल मला मान्य
नाही.
तो : तुला मला मान्य असण्या-नसण्याचा प्रश्नच नाही.
ती : बर मग ते उत्तर काय आहे ?
तो : तुझ लग्न झालेलं आहे.
ती : हा मग ? माझ लग्न झाल नसत तर तुला माझ्यावर इतक प्रेम झाल नसत का ?
तो : अस काही नाहीये. पण तुझा नवरा. त्याला अजून आपल काहीच माहित नाहीये.
जेव्हा समजेल तेव्हा काय ?
ती : त्याला सांगायचं कशाला ? आपण लग्न करू. आणि जाऊ इथून निघून दुसरीकडे.
तो : आणि ?
ती : आणि काय आपण दोघ लग्न करू. एकत्र राहू. जे जे पण बोललोय एकमेकांना
त्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करू. माझा नवरा नाही रे तुझ्यासारखा. माझ नाहीये
प्रेम आता त्याच्यावर. माझ आता फक्त तुझ्यावर प्रेम आहे.
तो : त्याच हि तुझ्यावर खूप प्रेम आहे.
ती : तुला माझ्याशी लग्न करायचं आहे कि नाही सांग ?
तो : हो.
ती : मग प्रॉब्लेम कशात आहे ? माझ लग्न झालंय यातच ना ?
तो : हो.
ती : ठीक आहे मग.
आणि कॉल कट झाला. पुन्हा काही कॉल आला नाही. सगळीकडून डीपीवरचे तिचे फोटो
दिसायचे बंद झाले. एक मेसेज फक्त रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला आला. “माझे
सगळे फोटो डिलीट कर. गुगल फोटोजवरून पण डिलीट कर” तो मेसेज त्याने वाचला लगेच.
तिने तो मेसेज करून तिच्या मोबाईल मधून डिलीट केला. मोबाईल स्वीच ऑफ केला. नवरा
तिच्या जवळ गेला आणि तिच्या अंगावरून हात फिरवायला लागला. पुढे होणार ते प्रेम हे
तिला समजल. तिने केसातून क्लचर काढल. आणि ह्याने मोबाईलमधले सगळे तिचे फोटो उघडून
बघायला सुरुवात केली.
लग्न झालेली ती. अस असून हि त्याच्या प्रेमात पडलेली तीच. अस प्रेम कुठ असत का ? अस आधी म्हंटल जायचं पण आता तो ट्रेंड आहे. आणि तो त्याच नव्या ट्रेंडला आत्ता जगत होता.
copyrighted@2021
0 टिप्पण्या