सफर

 कोण म्हणत प्रेम एकदाच होत ? ज्याला एकदाच होत तो माझ्या नजरेत माणूस नाही. प्रेम, प्रेम म्हणजे तरी काय अस वेगळ असत ? आवड ? बरोबर ? कोणीतरी आवडत पासून कोणीतरी माझ आहे पर्यंतचा प्रवास ज्या वाटेने होतो तो प्रेम नावाच्या नात्यापर्यंत येऊन पूर्ण होतो. इतकच आहे हे प्रेम. आपल्याला न मिळणाऱ्या वेळेतून कुणाला तरी बघून जी आवड मनात निर्माण होते ती आवड जपण्याच्या नादात स्वतःला स्वतःकडे बघायला नसलेला वेळ, त्यातून तो त्या आवडीला जपण्यासाठी काढलेली सवड. जी सवड जपताना आपल्याला आपल आयुष्य उरणारच नाहीये हे माहित असून देखील ती सवड पण जेव्हा आपली आवड होऊन जाते तेव्हा जी आवडणारी व्यक्ती असते तिच्यावर प्रेम व्हायला लागत. प्रेम म्हणजे भावना नक्कीच आहे. पण ती कल्पना जास्त आहे. प्रेम जेवढ व्यक्त केल जात नाही त्याहून कित्येक पटीने विचारात विचार केली जाते. कल्पना मोफत आहे म्हणून एकाच नजरेत बघून ठेवून, पहिल्या मिठीपासून बेडवर शेजारी बघितली जाणारी हि काल्पनिक कल्पना असते पण प्रेम व्यक्त इतक सरळ, थेट आणि वेळ न घेता कोण व्यक्त करत का ?

प्रेम मिळत नाही मिळवाव लागत. त्या आधी ते द्याव लागत. दिलेले प्रेम दान असत. मिळालेलं ? ते पण दानच असत. दान देताना त्याची खात्री आणि त्याचा आवका ठाऊक असतो. मिळणार दान एक अंदाज असतो एक कल्पना असते. दिलेल्या दानाच्या बदल्यात तेवढच दान मागण्याचा हट्ट एक मुर्खपणा आहे. आणि प्रेमात सगळेच असे मूर्ख असतात / दिसतात. प्रेम मागून मिळाल असत तर ते कधीच कुणाला मिळाल नसत. आणि न मागता मिळत म्हणून त्याची किंमत हि कुणाला नाहीये.

पहिली भेट ते पहिली मिठी यातल अंतर कापायला जितका वेळ त्या दोघांना जातो. इतका वेळ तर प्रेम मिळवायला हि लागत नाही. पण एकदा मिठीत गेल कि, अनोळखी व्हायला एक क्षण हि लागत नाही. जो अनोळखीपणा घेऊन प्रेम मिळवण्याचा प्रयत्त्न माणूस करत असतो तेच प्रेम मिळाल्यावर क्षणात ते अनोळखीपण संपवून बसतो. पुढे, दिलेली वचन कोण लक्षात ठेवतो ? बघितलेली स्वप्न कोण सत्यात साकारतो ? सोबत घालवलेला वेळ कुणाला आजवर पुन्हा मिळवता आलाय ? आणि प्रेम ? आज जेवढ होत तितकच उद्या कुणाला करता आलय ? हि खरी बाजू आहे प्रेमाची. प्रेम हि भावना समजून न घेता करायला गेली तर त्यातून फक्त निराशाच मिळते. निराशा उद्याच्या नवीन मिळणाऱ्या प्रेमाबद्दलची अशा मारून टाकते. विश्वास जराही राहत नाही. आणि जिथे विश्वास नाही तिथे प्रेम टिकत नाही. जिथे प्रेम जास्त जगू शकत नाही तिथे ते प्रेम खर नाही. खर प्रेम नसेल तर त्याला आपण प्रेम का म्हणाव ? आणि असे लोक कित्येक आहेत जगात पण असे नसलेले किती आहेत ? तुम्हाला माहित आहेत काय ?

copyrighted@2021


 


2 टिप्पण्या