पिया

 

पिया-प्रेम करत असताना,

बरच काही होत असत. प्रेम काहीच न बघता, काहीच न ठरवता होतं. प्रेमात जसे पुढे पुढे दिवस सरत असतात तसे सुरुवातीला सारख्या वाटणाऱ्या आवडी निवडीतला फरक हि मग स्पष्ट दिसू लागतो. जाणवू लागतो. तेव्हाच खरे आपण एकमेकांना ओळखू लागतो. प्रेमात असताना प्रत्येक क्षण सोबत असण्याचा विचार मनाला सुख देत असतो. पण तरी स्वतःच्या रोजच्या कामात जमत नाही भेटण, मेसेजवर जास्त-जास्त बोलन, व्हिडीओ कॉल करून समोर बघण, पण तरी जेव्हा-केव्हा पण उसंत मिळते तो एक क्षण आराम करण्याऐवजी चेहरा एकदा स्वतःचा माझ्या नजरेने बघून ती मला कॉल करते. ती जवळ येण्याची, सोबत राहण्याची ओढ सतत मनात असली तरी एकसलग कॉल मेसेज करून पुरी होऊ शकत नाही. पण कामातून वेळ मिळेल तसा एक एक मिनिट सोबत राहण्याची धडपड तिची कायम असते. आणि मला ती दिसते.

प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यु म्हणन नसत. तर एकमेकांना समजून घेऊन एकमेकांसाठी जगण असत. एकमेकांच्या आठवणीत झुरणं, एकमेकांना चिडवण, एकमेकांना तारीफ करून फुलवण, एकमेकांना आठवत राहून आठवणी सांगून रडवण. प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहण. आणि कित्येक स्वप्न अलग आहेत म्हणून दोघांच्या मनाशी मिळती-जुळती स्वप्न आधी पूर करणं म्हणजे पण प्रेमच आहे ना?

सुरुवातीला तिच्या आवडी निवडी सांगताना तिच्या आवाजात जितका जोर असतो तितकीच शांतता माझ्या आवडी ऐकताना तिच्यात असते. प्रत्येक माझी गोष्ट ऐकून ती सगळ काही लक्षात ठेवते. एक वेळेस गुगल असिस्टंट माफी मागून पुन्हा मला माझ्याबद्दलच्या गोष्टी विचारेल पण ती,,,ती एक हि गोष्ट विसरत नाही. इतक सगळ लक्षात ठेवून ती वावरत असते सगळ विसरल्यासारखी. आणि जेव्हा जेव्हा वेळ येते मला ती आठवण करून देत असते. आणि मग स्वतःची आवड बाजूला करून मला काय आवडत याचा विचार मनात करून नेमक तस वागत राहण्याची सवय ती तिला लावून घेते. कित्येक गोष्टीना ती सहज डोळ्यांआड करते. सहज कित्येक गोष्टींसाठी कष्ट घेऊन ती मला आनंद देत असते. कित्येक सारे विचार ती विसरून फक्त माझा विचार करत असते. कित्येक गोष्टींचा त्याग करून ती मला कोणत्याच गोष्टीसाठी त्याग करावा लागणार नाही याची काळजी घेत असते. खूप प्रेम करून पण मनात तसच साठवून ठेवते. खूप काही बोलायचं असून देखील माझ फक्त ऐकत असते.

प्रत्येक मुलगी हि, बहुदा अशीच असते. जिला प्रेम हव असत मनासारखं पण प्रेमात पडल्यावर ती त्याला हव तसच प्रेम करत असते. त्याच्या आवडी जपत असते. त्याचे कौतुक करत असते. त्याला प्रेम देत असते. आणि त्याला आवडेल अस वागून स्वतःत बदल करत असते. स्वार्थसाठी बदलणाऱ्या लोकांच्या दुनियेत ती फक्त माझ्यासाठी इतक्या वर्षांच्या असलेल्या सवयी ती बदलते. खर प्रेम म्हणजे काय असा विचार केला तर मग जाणवत कि खर प्रेम म्हणजे, जे ती माझ्यावर करते.  

 copyrighted@2021


2 टिप्पण्या