मी : प्रेमात हरवून
बसण्याला वेडेपणा म्हणत असतील तर जगात खूप आहेत असे वेडे. पण त्यांचा विचार सोडून
तू फक्त मला बोलणी लावतीयस. मी कुठे कमी पडलो का प्रेमात ?? मी तुझा सोडून आणखी
कुणाचा विचार करत हि नाही. तुझ्यासाठी मनात असलेली सगळीच्या सगळी जागा दिलीय आता
आणखी कुणी त्यात यायचा प्रयत्न केला तर तो या जन्मात तरी शक्य नाही. काय केल नाही
मी ? सकाळी उठल्यावर पहिला मेसेज तुला. बाथरुमध्ये जाताना बाथरूममध्ये अंघोळ
करताना. बाथरूम मधून बाहेर आल्यावर प्रत्येक मिनिटाला मेसेज केला तुला. का तर त्या
एका मिनिटात पण तू माझ्याविना एकटी पडू नयेस म्हणून. कपडे घालून नाष्टा करताना देवाची
पूजा करून पुढे दिवा आणि अगरबत्ती लावताना पण एका हातात अगरबत्ती आणि एका हातात
मोबाईल धरून त्या देवाकडे दुर्लक्ष करून तुझ्या बोलण्याकडे लक्ष दिल.
देवाला कधी हात
जोडले नाहीत. पण तुझा आजचा दिवस चांगला जावो म्हणून कायम मनातून देवाला सांगितल.
तिथून ऑफिसला जाताना उशीर व्हायचा तरी लांबच्या रस्त्याने ऑफिसला जायचो कारण तिथ त्या
रस्त्यावर वर्दळ कमी असायची आणि त्या कमी वर्दळीच्या रस्त्यावरून जाताना तुझ्याशी
मी बोलायचो. ऑफिसमध्ये सी.सी.टीव्ही होते. तरी तुझ्याशी बोलायचो. नोकरी काय हजार
मिळेल. तुझ्यासारखी मिळणार नाही या विचारात तिथला हि वेळ मी ऑफिसला कमी तुला जास्त
द्यायचो. सकाळी डब्यात काय आहे सांगितल असताना पण दुपारी जेवताना तुला व्हिडीओ कॉल
करून डबा दाखवून तुला बघत जेवायचो. जेवण झाल कि थोड चालण्याच्या बहाण्याने कॉल वर
तुझ्याशीच बोलायचो. तुझ्याशी बोलता याव म्हणून सगळ्यांपासून बाजूला बसून रोज एकटा
डबा माझा मी खायचो. पुन्हा चालून आल्यावर काम सुरु करायचो. आणि तुला मेसेज करण हि
सुरु करायचो. संध्याकाळी ऑफिसवरून निघालो कि पुन्हा तुला कॉल करून घरी जायचो. घरी
जाऊन आवरून पुन्हा तुलाच मेसेज करायचो. रात्रीपर्यंत हेच सगळ करून तुला आजचा
मेन्यू सांगून जेवण करायचो. जेवण झाल कि टेरेसवर तुझ्याशी बोलता याव म्हणून वर
जायचो. उन्हाळा, थंडी ठीक पण तुलाही हे माहितीय पावसाळ्यात पण छत्री घेऊन मी भिजत चाललो आहे.
रात्री तुला एक
वाजता झोप यायची, मला दिवसभर कॉम्प्युटर समोर बसून डोळ्यांना त्रास व्हायचा तरी मी
तू झोपेपर्यंत जागा राहायचो. आणि आईला मदत व्हावी माझी म्हणून लवकर उठायचो. तुला
पिरेड्स आले तर तू इतकी त्रासात असायचीस कि तुझ्या जवळ नसताना पण मी तुझी काळजी घ्यायचा
प्रयत्न करायचो. तुझ्यासोबत मी पण दोन तीन पर्यंत रात्री जागायचो. तुझ्या त्या
भरलेल्या डोळ्यांना आणि पोटाला आवळलेल्या हाताला बघून मी हि आजारी असायचो. पण मी
असायचो. प्रत्येक तुझ्या गोष्टीत. प्रत्येक तुझ्या आनंदात प्रत्येक तुझ्या दुःखात म्हणजे घरात काय झाल, तुला कोणी ओरड्ल आणि तुला वाईट वाटल तर आणि प्रत्येक
तुझ्या वेळेच्या मिनिटात आणि सेकंदात मी, मी, मी. फक्त मीच होतो. मग आज अस काय झाल
कि मी आज तुला नको आहे. आज म्हणजे आजपासून नको आहे.
काय चुकल माझ ? सांग
मला. सुधारेन मी ती चूक. एक संधी दे. पण कारण दे. प्रेम आहे हे. केलय मी फक्त. तू
आहेस एवढच मी मानलय फक्त. मला माहित नाही आणि मी विचार हि कधी केला नाही कि आपल
प्रेम आपल्यासोबत आपल्यासमोर आपल्या आयुष्यात नसेल तर काय होईल. तू म्हणशील तर
आत्ता मी माझ आयुष्य संपवतो. मी जातो तुझ्या आयुष्यातून पण तू माझ्या आयुष्यातून
जावू नकोस. मी बदलेन. जे तू सांगशील तसच करेन. बस मला सांग काय माझ चुकल...?
ती : तुझ्यावर मी..
प्रेम केल हेच चुकल माझ. मी नव्हत सांगितल माझ्यावर प्रेम कर. मला प्रपोज कर.
माझ्यासाठी तुझा वेळ घालव. जे झाल ते बस झाल. आता इथून पुढे नको.
मी : पण का ?
कॉल कट झाला.
आणि ती मनात बोलते....
“इतक प्रेम आता सहन होत नाही”.
copyrighted@2021
2 Comments
Wowww Sooo Nice
ReplyDeleteThank you....
Delete