भाग ०१
पावसाळ्याचे दिवस
होते. तारीख तीस जून. कोर्टात बरीच गर्दी होती. कित्येक लोक बाहेरच्या आवारात
पावसापासून वाचण्यासाठी आडोशात उभारलेले. कोर्टाबाहेर एक भल मोठ वडाच झाड होत त्या
खाली गरम कणीस घेऊन एक माणूस गाडा लावून उभा होता. त्याच्याच शेजारी एकजण चाह्चा
पीप घेऊन चहा विकत उभा होता. पाऊस एकसलग सकाळपासून पडत होता आणि सरळ आकाशातून
जमिनीवर पडत होता. रस्त्यावर सामसूम होत चाललेला. रस्त्याच्या बाजूला थांबणाऱ्याची
तोबा गर्दी होत चालली होती. पाऊस बाहेर असलेल्या लोकांना जाणवत होता. एकतर त्याचं
अंग ओळ झालेलं त्यामुळे थंडी त्यांना जाणवत होत. कोर्टाच्या आत सगळे ए.सी. सुरु
होते ते बाहेर पडणाऱ्या पावसामुळे बंद झालेले. त्यामुळे आतल्या गर्दीत माणसांनाच
माणसांच्या गर्दीमुळे गरम व्हायला लागल होत. आकार नंबरच्या टेबलावर रजिस्ट्रार मोबाईलमध्ये
फेसबुक उघडून त्यावर व्हिडीओ बघत बसलेला. त्याने कानात हेडफोन लावलेले. त्यामुळे
व्हिडीओ बघून त्याचा तोच हासत होता. त्याच ते हसण बघत वडील म्हणाले, ‘अजिंक्य,
पावसामुळे उशीर झाला का या मुलीला ? परत एकदा फोन लावून बघ बर लागतोय का?’
अजिंक्य : आता कॉल
लावला तर तो शंभरावा असेल. इतके कॉल कोण करत ? आणि सगळे कॉल तुमच्या देखत लावलेत
मी. मेसेज पण पाठवलेत. पण मोबाईलच बंद असेल तर काय उपयोग आहे या सगळ्याचा ?
वडील : तरी बघ, स्वीच
ऑफ वैगरे झाला असेल. लाईट नसेल तिकड घरी तिच्या. तिला पण आहे ना काळजी तुझी. केला
असेल तिने मोबाईल सुरु.
अजिंक्यने कॉल केला...
बीप...बीप....बीप... आपण डायल केलेलं नंबर सध्या बंद आहे, कृपया थोड्यावेळाने पुन्हा
प्रयत्न करा. आपने जिस....कट एकला कॉल.
वडिलांकडे बघत
अजिंक्य, ‘नाही अजून हि नाही. आता काय करू मी सांगा ?’
वडील : चल आपण घरी
जाऊन येता.
अजिंक्य : मी येतो
जाऊन, तुम्ही थांबा.
वडील : नको मी हि
येतो. या इथ थांबतील.
वडील आणि अजिंक्य
उठले. दोन बायका तिथच बसल्या. अजिंक्य आणि वडील निघाले. अजिंक्यने छत्री उघडली आणि
वडिलांना दिली. अजिंक्य थोडासा भिजत पार्किंगमध्ये गेला. बुलेटवर बसला. गाडी सुरु झाली.
गाडीचा आवाज जसा आला तसा वडील बाहेरच्या बाजूला आले. अजिंक्य समोर आला. वडील
बुलेटवर बसले. गाडी निघाली. दोघ हि शांत होते. जो काय तो आवाज पावसाचा फक्त.
केव्हातरी आवडणारा पाऊस आज नकोसा झालेला. त्याचा तो आवाज तो ओलेपणा काही काही नको
होत. रस्त्यावरून वाहत चाललेल्या पाण्यातून बुलेट दोन्हीबाजूला पाणी उडवत चालली
होती.
वडील : तुमच काय
बोलन झाल होत का अजिंक्य ?
अजिंक्य : आ ???
बोलन म्हणजे ?
वडील : भांडण वैगरे
काय ?
अजिंक्य : अजिबात
नाही. आज कसा भांडेन मी ? वाढदिवस आहे माझा.
वडील : तिचा शेवटचा
कॉल कधी आलेला तुला ?
अजिंक्य : सकाळी
सव्वा पाचला .
वडील : इतक्या सकाळी
?
अजिंक्य : हो.
शेजारून एक चारचाकी
जोरात पुढ गेली, आणि पाणी अजिंक्य आणि वडिलांच्या पायावर उडल. अजिंक्यला राग आला.
त्याने बुलेटच स्पीड वाढवल. वडिलांनी अजिंक्यच्या खांद्यावर हात ठवून घट्ट पकडल.
छत्री मागे गेलेली. पाउस लागत होता वडिलाना. पण अजिंक्य रागात गाडी चालवत
चारचाकीच्या बरोबरीला गेला. आणि जोरजोरात त्याने होर्न वाजवायला सुरुवात केली.
त्या गाडीच्या काचा पावसामुळे बंद केलेल्या होत्या. पण थोड्यावेळाने गाडी चालवणाऱ्याला
कलाल कि अजिंक्य त्याला बघत गाडी चालवतोय. त्याने गाडीचा वेग कमी केला आणि
अजिंक्याने त्याला शिवी दिली आणि निघून गेला पुढे.
वडिलांनी छत्री निट
धरली.
वडील : तू शांत. हो.
होईल सगळ ठीक.
आणि अजिंक्यच लक्ष एका कॅफेकडे गेल.
भाग ०२
पाउस पडतच होता. कॅफेत
बरीच जोडपी बसलेली होती. अजिंक्य भिजलेला. नशीब अंगावर जाकेट घातलेलं होत. पण डोक
भिजलेल. त्याला त्याचे केस भिजलेले कधी आवडत नाहीत. आणखी केसं भिजायला नको म्हणून
त्याने बुलेट कॅफेच्या समोर लावली. आणि पटकन तो आत गेला. आत गेल्यावर घरात
गेल्याचा अनुभव आला. एकदम गरम वातावरण आतलं होत. तो आत एक नजर टाकतो. सगळे टेबल
भरलेले. तेवढ्यात एक मुलगा त्याच्या जवळ येतो,
मुलगा : कितीजण आहेत
?
अजिंक्य : मी एकटाच
आहे.
मुलगा : वर बसा..
आहे जागा. कोपर्यात एक सिंगल सीट टेबल आहे.
अजिंक्य केसातून हात
फिरवत वर पायऱ्या चढून गेला. वर अंधारलेल होत जरास. त्याच लक्ष समोर गेल. एक मोकळा
टेबल कोपऱ्यात होता. तो गेला. तिथ एकच खुर्ची होती. अजिंक्य जाऊन बसला. त्याने
जाकेट काढून खुर्चीच्या बाजूला अडकवल. खिशातून मोबाईल काढला. भिजलेला तो. त्याने
तो पुसला. बाजूला खिडकी होती. ती बंद होती पण त्यातून बाहेरच दिसत होत. अजिंक्यने
खुर्ची खिडकीकडे तोंड करून फिरवली. आणि खिडकीतून बाहेरच बघत तो बसला. तेवढ्यात
मुलगा तिथ ऑर्डर घ्यायला आला.
अजिंक्य : एक हॉट
कॉफी. आणि बटर टोस्ट.
मुलगा : आणखी काही ?
अजिंक्य : नाही नको
इतक बस.
मुलगा निघून गेला.
तो खाली पायऱ्या उतरताना खालून दोन मुली वर येत होत्या. त्यांचा आवाज अजिंक्यला
आला. पण त्याने दुर्लक्ष केल. तो खिडकीतून बाहेर बघत बसला. त्याचा मोबाईल वाजला.
तो कॉलवर बोलत बसला. त्याच्या ऑफिसमधून आलेला कॉल होता. अजिंक्य बोलता बोलता
खुर्चीवरून उठतो. आणि खुर्ची सरळ करून बाजूला सरकवतो. आणि चालत बोलयला लागतो.
बोलता बोलता केसातून तो हात फिरवत होत. केस अजून हि ओलीच होती. त्याच बोलन झाल. आणि
त्याने मोबिल खिशात ठेवला. आणि तो माघारी खुर्चीकडे यायला निघाला. तेवढ्यात खालून
वर मुलगा त्याची ऑर्डर घेऊन आला. त्याला बघून अजिंक्य तिथच थांबला.
अजिंक्य : दे.
मुलगा : नको ठेवतो
मी.
अजिंक्य : अरे असुदे
रे.. इथल्या इथ घ्यायला कशाला तू येतो वर.
अजिंक्यने घेतल. आणि
तो मुलगा खाली निघून गेला. अजिंक्य टेबलाकडे त्याच्या निघाला तेवढ्यात आवाज आला.
काय स्टुपिड आहे.. ऑर्डर
न घेताच गेलाय खाली त्याला माहितीय ना आपण आलोय वर. मग कळत नाही का ? चल जाता का
आपण दुसरीकडे ?
अजिंक्येने त्या
आवाजाकडे लक्ष दिल. आणि पुन्हा तिकडून आवाज आला.
अरे अजिंक्य ? तू
इकड ?
अजिंक्य : अग स्नेहल
तू ? इथ ?
स्नेहल : हा. मला तू
आहेस ते कळलच नाही. केवढा अंधार केलाय इथ. त्यात बाहेर रस्त्यावर लाईट नाहीत.
अजिंक्य : वर इथ
अंधारच असतो. खास कपलसाठी आहे ना. खाली सगळ भरली मग येऊन बसलो मी पण वर. काय खाणार
का मागवू का काय मी ?
स्नेहल : अरे नाही.
मागवते मी पण तो बघ ना मुलगा गेला खाली काय न विचारता. तू बस ना इथ आमच्या इथ.
एकटा कुठ बसतो.
अजिंक्यने हातातली
ऑर्डर टेबलावर ठेवली. मोकळी खुर्ची मागे सरकवून त्यावर तो बसला. अजिंक्यने एक कॉल
केला.
अजिंक्य : ऑर्डर
घ्यायला वर पाठव ना.
कॉल कट झाला. आणि
अजिंक्य कॉफीचा एक घोट पितो.
अजिंक्य : हि ?
स्नेहल : अरे ऑफिसमध्ये आम्ही सोबत काम करतो. हि ऐश्वर्या.
भाग ०३
अजिंक्य : हाय.
ऐश्वर्या : हाय.
तेवढ्यात स्नेहल
बोलते, ‘तुला सांगितल होत ना आधी मी शोर्टफिल्म वैगरे बनवायची आमची टीम होती.
त्याच्या स्टोरी हा लिहायचा. कमाल लिहितो एकदम. आम्हाला अवार्ड पण मिळालेले. पण
नंतर जमलच नाही आम्हाला बनवायला. आम्ही स्गेल इथेच असायचो पुण्यात पण नमका हाच
साताऱ्याला गेला. मग नाहीच जमल. काही नवीन लिहिलंयस का अजिंक्य ? ए, मला संग
माझ्यात काय बदल झालाय का ?
अजिंक्य : झालाय ना.
आजसारखी तेव्हा दिसत असतीस तर मेकअप कमी लागला असता.
ऐश्वर्या जराशी
हसली. तिला बघून स्नेहल अजिंक्यकडे बघते.
अजिंक्य : छान
दिसतेयस. पण मी आता लिहित नाही काही. सोडून दिलय. आता फक्त जॉब. बाकी काही करायला
वेळ नाही.
स्नेहल : काय ? पागल
आहेस का. का सोडल तू ?
अजिंक्य : लिहायला
सुचाव लागत आणि काहीतरी सुचायला कुणीतरी असाव लागत. ज्याच्याकडे बघून लिहायला
सुचत. ती व्यक्तीच नसेल तर काय लिहिणार ? आणि लिहिलेलं वाचणारे खूप असतील पण ती व्यक्ती
नसेल तर लिहिलेलं सगळ वाया. आधीच आयुष्य वाया चाललंय जॉबमध्ये. अजून त्यात माझ्या फिलिंग
वाया कशाला वाया घालवू ? त्या जपून ठेवल्यात कुणी भेटल तर तेव्हा उपयोगात येतील. म्हणून
खूप दिवस झाले त्या फिलिंग्सच सेविंग करून ठेवलय.
स्नेहल : बट तू लिही
यार पुन्हा. तू मला शायरी पाठवलेल्या माझ्या डायरीत आहेत अजून. माझा रायटर मित्र
एकच आहेस. अधून मधून झाले काही मित्र मला बघून शायर कवी वैगरे. पण तुझ्यासारखा
तूच. तू लिही पुन्हा यार.
खालून मुलगा ऑर्डर
घेऊन आला आणि त्याने ते समोर टेबलावर ठेवल. स्नेहल आणि ऐश्वर्या घेतात. स्नेहल
त्याला तिच्यातल थोड अजिंक्यला देते. अजिंक्य नको नको म्हणत होता तरी. तिने त्याला
दिलच. आणि खायला लावल. त्या दोघान ऐश्वर्या बघत होती. अजिंक्यला कॉल आला. अजिंक्य
कॉलवर बराच वेळ बोलत राहिला. बोलताना अधून मधून घास खात होता. इकडे स्नेहल आणि ऐश्वर्या
एकमेकींशी बोलत खात होत्या. त्याचं खाऊन झाल. मुलगा आला. त्याला स्नेहलने तिघांचे
पैसे दिले. अजिंक्य नको नको म्हणत होता पण तिने दिलेच आणि मुलाला सांगितल
त्याच्याकडून घेऊ नकोस पैसे. तो मुलगा हि पैसे घेऊन गेला खाली. स्नेहल त्याला बाय
म्हणते ऐश्वर्या हि हसते. अजिंक्य उठतो. आणि मोबाईल कट करून खिशात ठेवतो.
स्नेहल : खूप बिझी झालायस
इतक्या दिवसांनी भेटून पण तुला बोलायला वेळ नाही. परत आलास पुण्यात तर कॉल कर.
अजिंक्य : ऑफिसमधून
होता कॉल. झाल बोलून. बर बस कि बाहेर अजून पाउस आहे. अजिंक्य खिडकीतून बघतो बाहेर,
आणि तो पण आहे. त्याला जाऊदे. आणि पावसाला पण.
स्नेहल : थांबले
असते रे पण हिला घरी जायचं आहे. खूप वेळा झाला बाहेर आहे ती.
अजिंक्य : मी जाणार
आहे रात्री घरी अकराला.
स्नेहल : सातारा ?
अजिंक्य : हम.
म्हणून तर म्हंटल थांब.
स्नेहल त्याला बघते.
स्नेहल त्याच्या बाजूची खुर्ची पुढे ओढते आणि बसते. त्याचा हात धरून त्याला पण
ओढते आणि खुर्चीवर बसवते. त्यांना बसलेले बघून ऐश्वर्या पण बघत बसते. स्नेहल आणि
अजिंक्य बोलत बसतात. ऐश्वर्या मोबाईलमध्ये काहीतरी वाचत बसलेली असते. अधून मधून त्या
दोघांकडे बघून फक्त नाजूक हसत असते.
पाउस ओसरायला
लागलेला. रस्त्यावर वर्दळ सुरु झाली. आणि मग स्नेहल आणि ऐश्वर्या निघाल्या.
अजिंक्य हि तिकडच्या खुर्चीवर अडकवलेल जाकेट घेऊन त्यांच्या मागे गेला. बाहेर
गेल्यावर स्नेहलने त्याचा हातात हात घेतला आणि बाय बोलली. ऐश्वर्या हि त्याला बाय
बोलली. दोघी निघाल्या. अजिंक्य समोर बघतो. तो छत्री घेऊन उभारलेला मुलगा त्या
दोघींच्या बरोबरीने पावल टाकत रस्त्याच्या दुसर्या बाजूने चालत होता. अजिंक्य बुलेट
घेऊन त्या दोघींच्या मागे गेला. त्यांच्या शेजारी त्याने बुलेट थांबवली.
भाग ०४
अजिंक्य : सोडतो
तुम्हाला चल.
स्नेहल : ट्रिप्सी ?
अजिंक्य : हो.
स्नेहल : चौकात पोलीस
असतात प्रत्येक अजिंक्य.
अजिंक्य : पोलीस
थांबलेले असतात आपल्याला थांबायचं नाहीये. बस.
स्नेहल : अजिंक्यच्या
मागे बसली. आणि तिने ऐश्वर्याकडे बघितल. स्नेहल उतरली. आणि ऐश्वर्याला बसायला
सांगितल. ती बसली. आणि तिच्या मागे स्नेहल बसते. बुलेट निघाली आणि अजिंक्य आरशातून
बघतो. तो मुलगा तिथेच थांबलेला असतो.
अजिंक्य बुलते वळवतो
आणि त्याच्या शेजारी नेऊन उभी करतो. तो मुलगा दुसरीकडे लक्ष फिरवतो.
अजिंक्य : ए
दुर्लक्षित... हिला बघत होतास न ? शेजारी आहे बघून घे.
स्नेहल मागून उतरते.
ऐश्वर्या पण उतरते. अजिंक्य बुलेट बंद करतो.
स्नेहल : मला नाही
हिला बघतो. हिच्या मागे असतो हा.
ऐश्वर्या तिचा हात
धरते.
ऐश्वर्या : जाऊदे.
असल्यांकडे लक्ष नसत द्यायचं.
अजिंक्य : अस कस. तू
नको देऊ मी देतो जरा. अजिंक्य जवळ गेला. त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तर तो
मुलगा त्याला ढकलतो.
अजिंक्य : अरे भाई, मी
काय केल पण नाही अजून तर तू मारायला सुरुवात पण केली ? मारायच आहे का तुला ?
म्हणजे चुकी तू करणार आणि मारणार पण तूच. हिरो पण तू विलन पण तू. मग माझा रोल काय
यात ? आणि मी बोलायला आलोय मारायला नाही.
तो चालयला लागतो.
अजिंक्य त्याच्या मागे बोलत चालतो. पण तो वळून बघत नाही. स्नेहल बुलेटची चावी घेते
काढून आणि अजिंक्य मागे चालते. ऐश्वर्या पण चालायला लागते.
अजिंक्यच्या डोक्यात
जातो आता तो मुलगा. अजिंक्य त्यच्या शर्टला मागून पकडतो आणि त्याला ओढतो. तसा तो
अजिंक्यच्या तोंडावर छत्री जोरात मारतो. अजिंक्यला एक क्षण काही समजतच नाही.
नाकावर आणि गालावर ती छत्री लागते. नाकातून तर रक्त सुरूच झाल. अजिंक्यने मग जाकेट
काढल. आणि स्नेहलला दिल आणि त्याला मुलाला मारायला सुरुवात केली. एका हाताने घटत
त्याचा शर्ट धरून अजिंक्य एकामागे एक बुक्क्या त्याच्या नाकावर मारायला सुरुवात
करतो. दोन तीन बुक्क्यातच त्याचा नाक आणि ओठ रक्तात भरत. त्याच्या हातातल्या
छत्रीने तो अजिंक्यला अंदाजाने कुठे हि मारत असतो. स्नेहल त्याला अडवण्याचा
प्रयत्न करते पण अजिंक्य ऐकत नाही. रस्त्यावर लोक जमा झालेले असतात. ऐश्वर्या
तिथून निघून जाते. स्नेहलला स्नागून ती जाते. स्नेहल अजिंक्यला अडवायचा प्रयत्न
करते. पण तो ऐकत नाही बघून मग ती पण त्या मुलाला मारायला सुरुवात करते.
अजिंल्यच्या हातातून चमक येते. तो बाजूला होता. आणि डोळे मिटून हाताच्या बोटांची
उघड-झाप करतो. आणि तेवढ्यात तो मुलगा एक जोरात लाथ अजिंक्य्च्या पोटात मारतो. आणि अजिंक्य मागे पडतो. स्नेहल जोरात ओरडते आणि
अजिंक्यला उठवते. तो मुलगा तोपर्यंत उठून पळून जातो. अजिंक्य उठून त्याच्या मागे
पळत जातो आणि त्याला पकडतो. स्नेहल अजिंक्यची बुलेट चालवत त्यांच्यापाशी येते.
अजिंक्य त्याला मारत असतो. आता त्या मुलाची पुरी ताकद संपलेली. अजिंक्य स्नेहलला
कॉल करायला सांगतो. ती लावते. स्पीकरवर कॉल असतो. अजिंक्य त्याला सॉरी म्हणायला
सांगतो तिला. तो म्हणतो. अजिंक्य त्याला सोडतो आणि स्नेहला घेऊन बुलेटवर बसतो.
स्नेहल गाडी चालवते. अजिंक्य मागे बसून जाकेट घालतो आणि रूमला नाकाला धरून बसतो. रक्त
येतच असतो. एका दवाखान्यापाशी स्नेहल बुलेट थांबवते. दोघ आत जातात. अजिंक्यला
पट्टी लावली जाते. नाकात औषध लावलेले कापसाचे बोळे ठेवले जातात. काही औषध घेऊन
अजिंक्य बाहेर येतो. मागून स्नेहल हि येते. दोघ काहीच बोलत नाही. अजिंक्य चावी
मागतो. स्नेहल देते. अजिंक्य बुलेट सुरु करतो. स्नेहल मागे बसते.
स्नेहल : आपल्याला
एकेठिकाणी जायचय होत ? जमेल यायला ?
अजिंक्य : कुठ ?
स्नेहल : ऐश्वर्याच्या घरी.
भाग ०५
ऐश्वर्याच्या
घराबाहेर बुलेट थांबली. स्नेहल ऐश्वर्याला कॉल करून बाहेर बोलवते. ऐश्वर्या बाहेर
येते. अजिंक्य नाकाला धरून बसलेला असतो.
ऐश्वर्या : खूप
दुखतय का ?
अजिंक्य : अ...ह... ( मान नाही अशी करत )
ऐश्वर्या : या ना आत
दोघ.
अजिंक्य : नको.
जायचं आहे मला.
स्नेहल : तू घरी का
आलीस ?
ऐश्वर्या : मला भीती
वाटली. ते सगळ बघून. मला नाही असली सवय काही बघायची. आणि माझ्यासाठी कुणी अशी
भांडण केली नाहीयेत. मला भीती वाटली.
स्नेहल : हो अग पण
गरज होती तुझी. अजिंक्यला लागलेल इतक. त्याची गाडी दुसरीकडे होती. त्याला दवाखान्यात
घेऊन जायचं होत. ते केल मी नीट पण तू पोचलीस का घरी बघाव म्हंटल. म्हणून आलो आम्ही
दोघ.
ऐश्वर्या : अजिंक्य.
खर सांग दुखतय का ?
स्नेहल : त्याला
लागत नसत. आधीपण केलीत अशी त्याने भांडण. प्रतीक्षासाठी. कुठ गेली रे ती तुझी आयटम.
अजिंक्य : जे गेले
त्यांच्यासोबत त्यांचे विचार पण गेले. सोड ना.
स्नेहल : ती गेली पण
तुला बदलवून गेली ना. आधी तू असा शांत नव्हतास, किती बोलयचास. किती हसायचास. मला तर
बोर झाल तर पहिला तू आठवायचास.
अजिंक्य : परत त्या
मुलाने त्रास दिला तर सांग हिच्याकडे. अस हि मी परवा परत येणारे इकड.
ऐश्वर्या : हो.
स्नेहल : मी काय
बोलतेय ?
अजिंक्य : निघायचं ?
स्नेहल : बर चल.
ऐश्वर्या : अजिंक्य .....
अजिंक्य : ( बुलेट
सुरु करत ) हम ?
ऐश्वर्या : तुझा
नंबर देतोस का ?
अजिंक्य : हि देईल.
स्नेहल : मला नाही
वाटत तो परत येईल मुलगा. पण येऊ पण शकतो. काय माहित. ट्राय मारणारी पोर गाडीवरून
मागे येतात आणि जातात. हा इतक्या पावसात पण मागे येत होता. ते पण चालत. प्रेम
वैगरे नसेल न त्याच तुझ्यावर ? दिसायला तर भारी होता.
ऐश्वर्या : असल तर
असल. मग काय करू मी ? मला नाही इच्छा प्रेम बीम करायची.
अजिंक्य : प्रेम
करणारे प्रेम व्यक्त करण्याआधी आणि व्यक्त केल्यानंतर त्रास देत नाहीत. आणि प्रेम
बीम न करून कुणाच चांगल चाललेल दिसत नाही.
ऐश्वर्या : आणि
प्रेमात असलेले पण कुठ सुखात असतात. रोज भांडण, संशय, सेक्स कीस हेच सगळ सुरु असत.
अजिंक्य : त्यांच्या
प्रेमात खऱ्या अपेक्षा असतात. आणि नेमक खर प्रेम ते राहून जात.
स्नेहल : खर बीर
काही नसत प्रेम. चुतीयापा आहे सगळा. बी.सी. फ्री फिजिकल व्हायला प्रेम करतात आजकाल
सगळे.
अजिंक्य : नाही.
प्रेम देवाने पण केलेलं. जी गोष्ट देवाने म्हंटली, केली, त्या प्रत्येक गोष्टीला
आपण करतो मानतो. मग जे प्रेम स्वतः देवाने केल तेच माणूस हि करतो मग ते प्रेम वाईट
कस काय असेल ? माणूस वाईट असतो. प्रेम कधीच नाही. लक्षात ठेव.
स्नेहल : तुझ्या
प्रतीक्षाला मिळाल खर प्रेम. मला नाही ना मिळाला माझ्या बी.एफ. कडून. त्यामुळे
माझ्यासाठी प्रेम फालतू आहे.
अजिंक्य : न मिळालेल्या गोष्टीला मिळवायचं असत. पण माणूस एकाच प्रयत्नांत हरून जातो आणि न मिळालेल्या गोष्टीसाठी रडत तरी बसतो नाहीतर बदनामी तरी करत बसतो. रडतराव घोड्यावर अख्खी जग दुनिया आहे. मग काय प्रेमाला बदनाम करायचं इतकच सुरु आहे जगात. मीपण शोधतोय खर प्रेम. नाही मिळाला. देऊन बघितल पण बदल्यात नाही मिळाला पण म्हणून मी बदनामी करत नाही प्रेमाची. कारण जी गोष्टच क़्वालिटी असते तिची कितीपन बदनामी केली तरी तिची क़्वालिटी डाऊन होत नाही.
भाग ०६
ऐश्वर्या : बरोबर
आहे. पण फसवणूक झाली प्रेमात तर विश्वास नाही न बसत पुन्हा.
अजिंक्य : आपल आयुष्यपण
फसवणूकच आहे ना. देवाने केलली माणसासोबत एक फसवणूक. आयुष्य दिल पण मृत्यु हि दिला.
पैसा श्रीमंती दिली पण त्याला ठराविक कालावधीत अनुभवण्यासाठी माणसाला वय दिल. हि
पण फसवणूकच आहे ना. तरी हि त्याकडे दुर्लक्ष करून मानून जे आहे त्यात सुखात जगत आहे. मग हि प्रेमात
झालेली क्षुल्लक फसवणूक आयुष्यभर घेऊन काय जगायची ?
स्नेहल : रायटर हे
भारीय.
अजिंक्य : इथ
प्रत्येकजण प्रेमात फसत असतो. फसवत असतो. फसवणारे स्वर्थी असतात. आणि फसवणूक करून
घेणारे मूर्ख असतात. त्यामुळे आपण ना मूर्ख व्ह्यःक ना स्वार्थी आपण फक्त माणूस
म्हणून प्रेम रक्त राहायचं. नशिबात असलेल प्रेम मिळत. नक्की. मिळत. आणि खर प्रेम
कुणाला मिळत इथ ? कुणालाच नाही. प्रेम करून बघव मनापासून एकदम खर. नाही मिळत. बाकी
आवड, निवड, छंद, सोबत, सहवास म्हणून करून बघितल तर त्या लोकांची पोर आज शाळेत
कॉलेजला जाताना दिसतात पण खर प्रेम करून बघितल तर आठवणी शिवाय काहीच नसत
त्यांच्याकडे.
ऐश्वर्या : हे... पटल
मला.
अजिंक्य : स्नेहल
चल. तुला सोडून जातो मी घरी.
ऐश्वर्या : चहा पिता
का ?
अजिंक्य : अं....म माझा
पण तोच विचार होता.
स्नेहल : चालतय. चला..
ऐश्वर्या : आलेच मी.
एक मिनिट.
अजिंक्य : गाडी लाऊ
का इथ ?
ऐश्वर्या : हा लाव.
ती निघून गेली आणि
परत बाहेर आली.
अजिंक्य आणि स्नेहल
सोबत चालत होते. ऐश्वर्या स्नेहाच्या बाजूने चालत होती. तिघे चहाच्या गाड्यापाशी
जाऊन चहा पीत असतात. आणि परत बारीक पाउस सुरु झाला. तिघ पण एका आडोशाला जाऊन उभे
राहतात. स्नेहल अजिंक्यसोबत बोलत होती. अजिंक्य हि तिच्याशी बोलत होती. ऐश्वर्याचा
चहा पिऊन झाला. ती पैसे देऊन पुन्हा या दोघांपाशी येते.
स्नेहल : स्मोक ?
अजिंक्य : हम.
स्नेहल जाऊन दोन
सिगरेट आणते. आणि अजून दोन चहा तीन चहा आणते. एक चहा ऐश्वर्याला देते. ती नको
म्हणते तेरी स्नेहल तिला प्यायला लावते.
अजिंक्य आणि स्नेहल
सिगरेट ओढत चहा अधून मधून पीत बोलत असतात. पुन्हा ऐश्वर्या एकटी पडली.
अजिंक्यच लक्ष
तिच्याकडे जात.
अजिंक्य : बोलायला
आवडत नाही का तुला ?
ऐश्वर्या : आवडत..खूप.
अजिंक्य : मग मी आहे
म्हणून बोलत नाहीयेस का ?
ऐश्वर्या : अस काही
नाही. काय बोलणार मी. आजच आपली ओळख झालीय ना. आणि तुम्ही खूप दिवसांनी भेटलाय मग कशा मी मधे बोलू म्हणून.
आणि ऐकतेय न मी तुमच. बोला तुम्ही.
अजिंक्य : शांत
बोलणारी लोक बोलकी लोक शोधत असतात. नजरेने. आणि अति जास्त बोलणारी लोक शोधात असतात
त्या लोकांच्या जे त्यांना मिठीत घेऊन जवळ शांत करतील.
स्नेहल : वाह. जुना
वाला अजिंक्य सापडला मला.
अजिंक्य : अजिंक्य
कायम नवीनच असतो. तुला माहीतेय ना. अजिंक्य त्याची संपलेली सिगेत खाली पाण्यात
टाकतो.
भाग ०७
अजिंक्य स्नेहलकडे
बघतो. ती त्याला बघते. स्नेहल त्याचा हात धरते. आणि अजिंक्य हात सोडवून पुढे जातो
आणि चहाचा कप त्या माणसाला देतो. स्नेहल आणि ऐश्वर्या मागून लगेच येतात.
स्नेहल : काय झाल अजिंक्य
?
अजिंक्य : चल पाउस
कमी झालाय. तुला सोडून मग मी पण जाईन साताऱ्याला.
आणि अजिंक्यच हे
बोलून झाल्यावर स्नेहलकडे लक्ष गेल. ती त्यालाच बघत होती. अजिंक्य ऐश्वर्याकडे एक
नजर टाकतो आणि स्नेहलकडे बघत बोलतो.
अजिंक्य : ‘एखाद्याचा
सहवास आवडायला लागला कि, त्याची सोबत संपायला लागते.’ मग ज्या सहवासाने आनंद मिळत
असतो नंतर त्याच आठवणीत फक्त त्रास मिळत राहतो. स्नेहल खूप कष्टाने मी सगळ मागे
सोडून मुलींपासून लांब ठेवतोय स्वतःला. आता पुन्हा तेच नकोय. आणि मला माहित आहे
तुला काय खूप पोर मिळतील. तशा मला अतुझ्याक्डून आठवणी मिळतील पण तू आणि मी
एकमेकांना योग्य नाही. मी कुणासाठीच योग्य नाही. माझ्या आयुष्यात मी पाहिलं प्रेम
केल मनापासून केल खर केल ती मला सोडून गेली. इतरांसारखं मी तिला नाही सोडल. तिने
सोडल मला. म्हणजे माझ्यातच काहीतरी दोष आहे. आणि दोष असलेला जोडीदार कुणला हवा असतो
?
स्नेहल : काय झाल
अजिंक्य ?
अजिंक्य : निघायचं ?
तीघ चालायला लागले. ऐश्वर्याच्या
घराकडे तिघ निघाले.
ऐश्वर्या : दुखतय का
तुला अजून ?
अजिंक्य : लागलय तर
दुखणारच पण दुर्लक्ष करायचं. जे नको असत त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं ना, कि हव
असलेल बरच अस काही मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. हाडावर लागलय त्यामुळे दुखेल एक
दोन दिवस पण थांबेल एवढ काही नाही. तुला त्रास झाला नाही हे महत्वाच आहे. कधी काय
लागल तर सांग मला.
ऐश्वर्या : हो.
अजिंक्य : स्नेहल, मी
परवा येणार आहे पुण्यात, भेटशील ?
स्नेहल त्याचा हात
धरते आणि हो बोलते.
अजिंक्य : काय झाल
आहे का ?
स्नेहल : सांगेन
परवा.
अजिंक्य : चालेल.
म्हणजे मला आता भेटावच लागेल तुला.
स्नेहल : हो.
ऐश्वर्याच घर आल. ती
दोघांना बाय म्हणून निघून गेली. जाताना आठवणीने अजिंक्यचा नंबर घेऊन ती घरात गेली.
अजिंक्यने बुलेट सुरु केली. स्नेहल मागे बसली. आणि गाडी तिच्या घराकडे निघाली.
तिला घरी सोडून अजिंक्य साताऱ्यात आला. बराच उशीर झालेला. भिजला पण होता तो. त्याने
एक सिगरेट ओढली आणि ती अर्धीच संपली होती तोच त्याने ती विझवली आणि तो झोपला. सकाळी
जाग आली आणि टेक मोठा आळस दिला तसा त्याच अंग दुखायला लागल. नाक दुखायला लागल.
बेडवरच बसून होता तो. त्याने तोंडावरून हात फिरवला. केसातून एकदा हात फिरवला आणि
सिगरेट पेटवली. ओठात ती सिगरेट ठेवली आणि त्याने मोबाईल हातात घेतला. तर त्यावर
दोन मिसकॉल आलेले. आणि दोन मेसेज आलेले. त्याने ते बघितले.
“हाय. मी ऐश्वर्या.
कसा आहेस ? पोचलास का नीट ?”
“सॉरी माझ्यामुळे
तुला त्रास झाला खूप. सॉरी म्हणून पण काहीच होणार नाही. काळ माफी मागणार होते तुझी
पण स्नेहल पुढे बोलयला जमल नाही.”
अजिंक्य मेसेज
पाठवतो.
अजिंक्य : माफीची
गरज नाही. त्रास होत असेल तर तो सहन कधीच करायचा नाही. त्याला नडायच. आणि मी नसतो
तर आणखी दुसर कोणी आल असत तुझ्या मदतीला, एवढ काही नाही. नको वाईट वाटून घेऊन. माझ
काय बर होईल. तू तुझी काळजी घे.
आणि थोड्याच वेळात ऐश्वर्याचा मेसेज आला.
भाग ०८
ऐश्वर्या : तो मुलगा
मला ओळखतो आणि मी पण त्याला. त्याच माझ्यावर प्रेम आहे अस तो खुपदा बोलला आहे मला.
मी खुपदा त्याला समजावलं पण ऐकत नाही. आणि अलीकडे तो आता मी जाईल तेथे येत असतो.
बर झाल तू त्याला मारल परत तो येणार नाही.
अजिंक्य : मग काल का
सांगितल नाहीस मला ?
ऐश्वर्या : भीती
वाटली मला.
अजिंक्य : तू का
नकार दिलास त्याला ? दुसर कोणी आहे का आयुष्यात तुझ्या ?
ऐश्वर्या : नाही.
त्याच लग्न झालेल आहे. तरी तो माझ्या मागे लागलाय. प्रेम म्हणजे काय फक्त भेटन
बोलन एवढच नसत ना. वयाने मोठ असून नुसत चालत नाही. बुध्दीपण हवी ना. बालिश आहे तो.
मला नाही आवडत. असे लोक. आणि मी कधी कुणावर प्रेम केल नाहीये. घरी असल चालत नाही
काही. त्यामुळे खर प्रेम वैगरे मला कळत नाही पण बोलण्यातला खरेपणा एक मुलगी म्हणून
मला समजतो लगेच मुलाच्या डोळ्यात बघून. बालिश आहे तो. आणि माझ मला मत आहे मी नाही
म्हंटले तर त्याने मान्य करायला हव होत. पण तो मागेच लागला आहे. पण तुझ्यामुळे तो
आता गप्प बसेल.
अजिंक्य : ठीके. बाय.
काम आहे मला बोलू नंतर.
अजिंक्यने मोबाईल
चार्जिंगला लावला. आणि तो अव्र्याला लागला. आवरून त्याने मोबाईल घेतला फाईल घेतली
आणि तो ऑफिसमध्ये गेला. तिथ काम करून संध्याकांळी येताना पाउस पडत होता. घरी
येताना तो चहा प्यायला थांबला. चहा सोबत त्याने सिगरेट पेटवली. सिगरेट ओढत ओढत तो
मोबाईल बघतो. त्याला ऐश्वर्याचे मेसेज आलेले असतात. “तुला वेळ मिळाला कि कॉल करशील
का ?”
अजिंक्याने पुढचे मेसेज वाचलेच नाहीत आणि त्याने कॉल केला. कॉल बिझी लागला. अजिंक्यने कॉल कट केला. तिथून तो घरी गेला. घरी जाऊन तो त्याच काम करत बसला. पाउस सुरु होता. लाईट गेली. आणि मोबाईलला चार्जिंगपण नव्हत. अजिंक्य खिडकीतून बाहेर बघत सिग्र्रेत ओढत बसतो. नंतर त्याच तो अंधारात छोटीशी एक मेणबत्ती लावून जेवण बनवतो. ते बनवून झाल्यावर तो जेवतो. भांडी घासतो. आणि झोपतो. ऐश्वर्या त्याला कॉल करते पण मोबाईल बंद असतो. सकाळी पहाटे पाउस थांबलेला असतो पण थंडी पडलेली असते. रात्री खिडकी उघडीच राहिलेली असते. वार आत येत असत आणि अनागाव्र त्याच्या पांघरूनच नसत. त्या थंडीने त्याच नाक खूप दुखायला लागत. आणि झोपेतच तो नाकाला दाबून धरून झोपलेला असतो त्या दाबामुळे त्याच्या नाकातून रक्त यायला लागत. ओठाला ओलसर लागत त्याला. रक्ताचा उग्र वास यायला लागला तसा तो जागा होतो. खोलीत लाईट पंख सगळ सुरु असत. खिडकी उघडी असते. तो उठतो. आणि हात चेहऱ्यावर फिरवणार तर त्याच्या हाताला रक्त लागेल दिसत. तो उठून आरशात बघतो तर नाकापासून सगळ तोंड त्याच रक्ताने भरलेलं असत.
भाग ०९
अजिंक्यने आरशात
बघितल आणि तो आतल्या खोलीतल्या बेसिनजवळ गेला आणि चेहऱ्यावर पाणी मारल. आणि चेहरा
पुसला. समोर लावलेल्या डोल मोठ्या आरशात त्याल तो दिसला. रक्त पुसलं गेलेलं. त्याने
हातातला कापड बाजूला ठेवल आणि आणि त्याच्या हातावर रक्त ओघळल. त्याने समोर आरशात
बघितल समोर त्याला तोच दिसला. अजिंक्याने नळ सुरु केला आणि त्या खाली डोक धरल आणि
डोक्यावरून पूर्ण पाणी जात होत. अजिंक्यने वर बघितल. छत्री मागे गेलेली.
वाऱ्यामुळे उलटी झालेली. त्याने आरशातून मागे बघतील वडील हि भिजत होते. त्याने बुलेट
बाजूला थांबवली. त्यांनी छत्री निट केली. आणि पुन्हा ते निघाले.
अजिंक्य पूर्ण
विचारत हरवलेल्या जुन्या. पाऊस वाढलेलाच होता. आणि अजिंक्य त्यात जोरात वाट काढत बुलेट
चालवत होता. आणि समोर दोन पोलीस उभे होते त्यांनी त्याला हात केला आणि अडवल.
अजिंक्य बुलेट बाजूला उभी करतो. पोलीस त्याला लायसन्स मागतात. अजिंक्य खिशात हात
घालतो. आणि लायसन्स सोडून त्याला सगळ सापडत. भिजलेले पैसे. भिजलेली घराची चावी.
काही महत्वाची कागद. टिपण भिजलेली. भिजलेल आधारकार्ड. त्याचा आणि तिचा भिजलेला आयडी
साईज फोटो. त्याने पोलिसांकडे बघून नाही खुणावल. आणि पोलिसांनी त्याची चावी घेतली.
अजिंक्य त्यांना पैसे द्यायला बघतो पण ते घेत नाहीत. पोलिसांची करेन काही वेळात
तिथून जात असताना हे पोलीस त्या क्रेनमधल्या पोलिसांना कॉल करून इकडे बोलवतात. आणि
बुलेट घेऊन जायला सांगतात. आणि तसच होत. अजिंक्य मग वडीलांना रिक्षात बसवून पुन्हा
माघारी कोर्टात पाठवतो.
अजिंक्यला ते छत्री
देतात. अजिंक्य छत्री घेऊन पुढे चालत जायला लागतो. पाउस खूप तर होताच पण चारी
बाजूने अंगाला लागत होता. छत्रीमुळे डोक भिजत नव्हत फक्त बाकी सगळ अंग केव्हाच
भिजून गेलेलं. तो चालत होता. बराच चालला. एव्हाना दीड किलोमीटर झाले असतील. गाडीवर
काही वाटत नाही पण चालताना ते एक किलोमीटर अंतर पण अंगातला सगळा दम काढून टाकतो.
अजिंक्यचा मोबाईल वाजला. आणि त्याने पटकन खिशातून काढला आणि कानाला लावला. हेल्लो.
हेल्लो बरच केल, पण समोरून आवाज येत नव्हता. कॉल आईचा होता. पण पुढून आवाज येतच
नव्हता. त्याने परत कॉल केला पण तसच. नंतर त्याला समजल मोबाईल पूर्ण भिजलाय. आणि
स्पीकरमध्ये पाणी गेलय. त्याने मोबाईल पुसायला शर्ट वर मोबाईल फिरवला पण एक हि भाग
कोरडा असा नव्हता. त्याने मोबाईल खिशात ठेवला. तो भर भर चालायला लागला. खितल्या मोबाईलच्या
एकामागे एक किती रिंग वाजल्या अंदाजे पाच.
मोबाईल वाजत होता.
अजिंक्यने दुर्लक्ष केल. नंतर त्याने बघितल किमान दोन तासानंतर. तिचा कॉल होता.
त्याने कॉल लावला.
अजिंक्य : हेल्लो. काय ग ? काय काम होत का ?
ती : हो. म्हणजे
नाही. कसा आहेस विचारायला कॉल केलेला. कसा आहेस ? कामात होतास का ?
अजिंक्य : मी ठीक
आहे. आणि सतत विचारायची गरज नाही. होईल ते बर. मी काय खूप मोठ काम नाही केल. सो.
नको काळजी करू. काळजी घेणारा असेल कुणी तर हे शरीर लवकर उभारी धरत नाही. तू विचारल
नाहीस तर उद्या पण बारा होईन. पण अस रोज विचारलस तर महिना जाईल बर व्हायला.
ती : अस का बोलतोयस ?
अजिंक्य : खर ते
बोलतोय. सवयी बेकार असतात माणसांच्या. माणसापेक्षा प्राणी बरे. प्रेम केल आपण तर
प्रेमच देतात बदल्यात. माणूस फक्त त्रास देतो. प्रत्यक्ष तरी नाहीतर आठवणीत येऊन.
जाऊदे. मी आहे ठीक. कामात आहे. नंतर बोलू का ?
ती : माझ काही चुकल
का ? अजिंक्य. इतका का चिडला आहेस माझ्यावर. मला माहित आहे तुला कुणीतरी फसवलय. पण
सगळ्या मुली वाईट नसतात ना.
अजिंक्य : चांगल्या
तरी कुठ असतात ? आणि मुलीच नाही सगळ्याच लोकांचा मला प्रॉब्लेम आहे.
ती : मनात राग ठेवून
कस तुझ कुणाशी पटेल ?
अजिंक्य : मी ठीक
आहे माझ्या आयुष्यात.
ती : हा असा ?
अजिंक्य : हो. तुला
हि आवडलाच होता न कुणीतरी. माहितीय मला. ओळखतो मी माणस. नुस्त त्यांच्या डोळ्यात
बघून.
ती : हम. पण आवड वेगळी
प्रेम वेगळ असत.
अजिंक्य : आवडी
शिवाय प्रेम नसत. प्रेम हे काम नाही छंद आहे. छंद प्रत्येक माणसाला जोपासायचा
असतो. पण प्रत्येकाला जमत नाही. प्रयत्न सगळेच करतात पण प्रत्येकाला जमत अस नाही
ना.
ती : मला नाही झाल
कधी कुणावर प्रेम. कारण प्रेम करण्याआधी मला खर प्रेम आणि खोट प्रेम यातला फरक
शोधायचा आहे.
अजिंक्य : प्रेम खर
खोट नसतच कधी. ते फक्त असत.
ती : हो, पण जी
गोष्ट असते त्याच अस्तित्व असत ना ?
अजिंक्य : हो आहे
ना. प्रेमच अस्तित्व पूर्वी पासून आहे.
ती : ते अस्तित्व
तरी मला स्म्जुडे. अनुभवू देत.
अजिंक्य : अनुभव एक
तर शहाण करत माणसाला नाही तर पार वेड करत. त्यापेक्षा अशा अनुभवाच्या नादाला न
लागलेलं बर.
ती : तुला आहे वाटत
अनुभव.
अजिंक्य : हो.
भाग १०
ती : मग शहाण केल
तुला का वेड.
अजिंक्य : वेडा तर
आधीपासून होतोच. शहाण केल. पण आठवणींच्या तत्रासाच या काही होऊ शकत नाहीये. आणि
म्हणून एक समजल मला कि अनुभवाच्या नादी आता पुन्हा लागायचं नाही.
ती : तुझ प्रेम खर
होत का ?
अजिंक्य : हो. एकदम
खर आणि खूप सार.
ती : खर प्रेम मिळतच
म्हणतात आपल्याला मग तुझ प्रेम तुला का मिळाल नाही ?
अजिंक्य : ज्या
गोष्टी आपल्या नसतात त्याचाच मोह माणसाला असतो. इतका कि त्यासाठी माणूस काहीही करू शकतो. मोजता येणार नाहीत इतक्या
उंचीची स्वप्न बघू शकतो. पण मिळवू शकत नाही. असच असत प्रेम. जी व्यक्ती नशिबातच नसते
त्याच व्यक्तीवर जीवापाड प्रेम होऊन बसत. मग आख्ख आयुष्य त्या व्यक्तीला आपल्या
आयुष्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होतो पण. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात पण प्रेमात
देवाचा काहीही संबंध येत नाही. जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टीतच देवाचा संबंध
येतो. प्रेमात फक्त आपण एकटे असतो. एक आपण आणि आपल फुटक नशीब.
ती : अस काही नाही.
कित्येक लोकांना मिळत त्यांच त्यांना प्रेम.
अजिंक्य : पुरावा
आहे का त्यांच्याकडे ? कि त्यांना मिळालेलं ते त्याचं प्रेम पाहिलं प्रेम आहे ?
ती : म्हणजे ?
अजिंक्य : दोघ
एकमेकांच्या प्रेमात असतील तर ती आवड दोघांची पहिलीच असेल अस असत का ? त्याला
तिच्या आधी बऱ्याच मुली आवडल्या असतील. तिला हि काही मुल आवडली असतील. शाळेत त्याला
सातवी आठवीपासून स्वतःच्या वर्गातल्या दोन तीन मुली आवडल्या असतील. बाजूच्या
वर्गातल्या मुली. न त्याह्च्याहून मोठ्या दहावीतल्या उंच गोऱ्या मुली आवडलेल्या असतील.
तिला हि तेव्हाच आवडले असतील तब्येतीने ठीक असलेली दहावीतली मुल. दादागिरी करणारी
टपोरी पोर. त्यानंतर कॉलेजला हि तसच. नंतर मग ऑफिस. आवड जपणारा माणूस असतो. त्याला प्रत्येक ठिकाणी तो किंवा ती आवडत
असतेच. आणि मगाशी बोललो मी तस आवड नसेल तर प्रेम होतच नाही. मग प्रेमात पडण्याआधी
जर इतक्या आवडी होऊन गेल्या असतील माणसाच्या तर माणूस त्याला पाहिलं प्रेम कस काय
म्हणू शकतो ? आणि जे प्रेम यशस्वी झाल्याच्या खुशीत असतात ते त्या प्रेमाची ख़ुशी
साजरी करताना आधी इतक्या आवडी न मिळाले अपयशाची टीप का गाळत बसत नाही ? मला कळत
नाही.
ती : आं.....?? हा
तर मी कधी विचार केलाच नव्हता. पण काहींची असतात नां अशा गोष्टी, ज्याचं पाहिलं
प्रेम असत आणि त्याचं मिलन हि होत. त्यांच्याबद्दल काय ?
त्यांना कधी आधी कोण
आवडलेलं नसत. एकमेकांना बघून ते प्रेमात पडतात न एकत्र हि येतात त्याचं काय ?
अजिंक्य : नशीब... .
ती : म्हणजे ?
अजिंक्य : जगात इतके
लोक आहेत पण त्यात देव काही मोजकेच आहेत. तसच त्या देवाने काही मोजक्याच लोकांच्या
आयुष्यात प्रेमासाठीच नशीब लिहून ठेवलेलं आहे.
ती : अस काही नसत.
तुझे विचार वेगळे आहेत. म्हणजे मला पटल तुझ. पण प्रेम प्रत्येकच खोट असत किंवा ते
मिळत नाही अस तुझ मत आहे हे पटल नाही.
अजिंक्य : अंगाला
लागल मला तर तू रोज विचारतीयस कसा आहे मी, जे दिसतय. त्याबद्दल आपुलकी दाखवली जाते
साहजिकच. पण हृद्य लावून बघ कुणावर आणि मग तुटल कि कॉल कर. एक शब्द बोलून दाखव
माझ्याशी, नाव बदलेन मी. बर ठेवू का कॉल ? मला ऑफिसमधून कॉल येतोय.
ती : हो. काळजी घे.
यावर पुन्हा बोलायला आवडेल मला.
अजिंक्य : काळजी घे
तू पण.
कॉल कट झाला आणि खिशातल्या मोबाईलची रिंग वाजायची बंद झाली आणि अजिंक्य भानावर आला. आणि तो रस्ता पार करण्यासाठी गाड्या सिग्नल पाशी थांबायची वाट बघत थांबला.
भाग ११
सिग्नलच्या खांबावर
उलट्या पावलाने अंक चालत होते. अजिंक्य त्यांना मोजत होता. पाउस सुरूच होता.
गाड्यांचे हॉर्न वाजतच होते. खिशातला मोबाईल पुन्हा वाजला. अजिंक्यने मोबाईल हातात
घेऊन बघितला, पुणे पोलीसांचा मेसेज आलेला. बुलेट जप्त केली होती त्याचा दंड भरून
गाडी घेऊन जा. अजिंक्य मोबाईल खिशात ठेवतो. सिग्नल सुटला गाड्या हि जागच्या
सुटल्या. आणि मग अजिंक्यच्या लक्षात आल. सिग्नल सुरु होता तेव्हाच रस्त्याच्या
पलीकडे जायला हव होत. त्याच डोक चालत नव्हत. ऐश्वर्याच्या विचारात हरवलेला तो.
ऐश्वर्या आणि अजिंक्यच आज लग्न होत. कोर्टात.
स्नेहलमुळे पुण्यात झालेली ऐश्वर्या आणि अजिंक्यची ओळख. स्नेहलला अजिंक्य आवडत होता पण तिच पहिल रिलेशन संपलेलं म्हणून तिला आधार हवा होता. बस, प्रेम वैगरे ह्या गोष्टी वातावरण आणि ठराविक माणूस बघून होत नाही. आत्ता कोण सोबत नाही म्हणून ती सोबत शोधायला माणसाला प्रेम होत नाही. इतक सहज अजिंक्यने स्नेहलला सांगून तिच्या प्रेमाला नकार दिला होता. आणि तो तिला मान्य हि झाला. जी भावना मनातच नाही त्या भावनेला प्रेम म्हणून ती अजिंक्यची सोबत मिळवत होती. पण अजिंक्य तिला अशी हि सोबत देणारच होता एक मित्र म्हणून. ऐश्वर्या आणि अजिंक्यच ज्या दिवशी प्रेमाबद्दल कॉलवर बोलण झाल त्याच्या दोन दिवसानंतर अजिंक्य पुण्याला गेला होता. तेव्हा स्नेहलला तो भेटला होता. तिच्या घरी. तेव्हा तिने तिच्या मनतल सांगितल होत. तेव्हा अजिंक्याने तिला समजावलं आणि तिने ते मान्य केल. पण जेव्हा अजिंक्य जायला निघाला तेव्हा तिने त्याला मला एकदा मिठीत घे म्हणून सांगितल. अजिंक्यने तिला मिठीत घेतल. अलगद तिच्या पाठीवर त्याचा हात होता पण तिच्या ताकदीने त्याला जवळ ओढलं होत.
Sponsered Ad
आणि जेव्हा अजिंक्य
त्या मिठीतून बाजूला जायच्या प्रयत्नात होता तिने त्याच्या केसात हात नेऊन त्याच्या
केसांना घट्ट पकडल आणि त्याच्या ओठांना स्वतःच्या ओठांत घ्यायचा प्रयत्न सुरु केला
आणि अजिंक्यला ते आवडल नाही. जी गोष्ट होणार नाही हे त्याने तिला आत्ताच काही
वेळापूर्वी सांगितल होत तीच गोष्ट ती जबरदस्ती करत होती. अजिंक्यने तिला बाजूला
केल. आणि आतल्या खोलीत जाऊन त्याने फ्रीजमधली थंड पाण्याची बाटली घेतली. पाणी पिऊन
त्याने मागे बघितल स्नेहल तिथच दारात होती. त्याने तिला बाटली दिली. तिने ती हातात
घेतली आणि परत अजिंक्यजवळ यायला लागली. ‘मला परत इथ येताना विचार करायला लागेल
स्नेहल. कंट्रोल कर.’ अस अजिंक्यच्या तोंडून ऐकल्यावर स्नेहल बाजूला झाली.
अजिंक्यने बेडवरचा मोबाईल उचलला आणि तिला जातो म्हणून निघून गेला. स्नेहल अत्ल्य्च
खोलीत शांत उभी होती. बुलेट सुरु झाली. मोठा आवाज झाला गाडीचा आणि हळू हळू गाडी
लांब गेल्याच ऐकू यायला लागल. जेव्हा तो आवाज पूर्ण बंद झाला तशी स्नेहल रडायला
लागली. आपल्याकडून काय झाल हे तिला समजत नव्हत. रडता रडता तिला तिचाच राग आला. तिने
अजिंक्यला मेसेज पाठवला माझ चुकल. सॉरी.
पावणे चार झालेले
अजिंक्यच काम जे होत ते सकाळी झाल होत. जाता जाता स्नेहलला भेटून जाव म्हणून तो स्वतःची
वाट बदलून तिच्याकडे गेलेला पण आजची भेट काही खास नव्हती. तेवढ्यात अजिंक्यचा
मोबाईल वाजला. त्याने हेडफोन खांद्यावर होता तो कानाला लावला.
अजिंक्य : कोण ?
ऐश्वर्या : मी
ऐश्वर्या... बोलतेय. कुठ आहेस अजिंक्य ?
अजिंक्य : पुणे.
साताऱ्याला चाललोय.
ऐश्वर्या : सांगितल
नाहीस मला आलायस ते इथ.
अजिंक्य : कामात
बिझी होतो. आणि नंतर स्नेहलला भेटलो आता उशीर झालाय चाललोय.
ऐश्वर्या : बर जरा
पण वेळ नाही का ?
अजिंक्य : भेटायचं
का ?
ऐश्वर्या : हो पण
तुझी इच्छा असेल तरच.
अजिंक्य : स्नेहलच्या
इथेच आहे, पोचतो तुझ्या घराच्या इथ पंधरा मिनिटात.
ऐश्वर्या : हो ये
नीट.
अजिंक्य : हो.
आणि अजिंक्य तिच्या घराजवळ पोचला. घरी आज तिच्या कोण नव्हत. त्यामुळे ती बाहेर आली आणि दाराला कुलूप लावल. आणि अजिंक्यकडे बघून गोड हसत आली. अजिंक्यच्या बाजूला उभी थांबून अजिंक्यला ती विचारणार तेवढ्यात अजिंक्यच बोलला ‘आहे मी ओके नाही त्रास होत आणि हि जखम होईल बरी’ आणि आपल्या मनातल याला कस कळाल या विचारात ती त्याला बघत होती.
भाग १२
अजिंक्य : काय झाल ?
ऐश्वर्या : काही नाही का
रे ?
अजिंक्य : काहीतरी विचार
करतीयस तू. हम ?
ऐश्वर्या : अरे नाही.
स्नेहलला भेटलो असतो ना. तिला बोलवून घेऊ का ?
अजिंक्य : नको.
ऐश्वर्या : का ?
अजिंक्य : नको. तुला भेटायला
आलोय न मी ? मग हा माझा वेळ तुझ्यासाठी आहे फक्त. त्यात ती नको.
ऐश्वर्या : तुमच भांडण
वैगरे झालय का अजिंक्य ?
अजिंक्य : आमच्या
वागण्याकडे तुझ एवढ लक्ष का आहे ? आम्ही बी.एफ जी.एफ नाहीये. आमच्यात तसल काही
नाहीये. आणि जी गोष्ट नाही त्याबद्दल बोलयला आणि ऐकायला मला आवडत नाही. उगीच मला
राग येईल तुला मी काहीतरी बोलेन नको प्लीज.
अजिंक्यने बुलेट सुरु
केली. आणि तिने पटकन चावीने गाडी बंद केली.
ऐश्वर्या : सॉरी अरे. मला
तस नव्हत म्हणायचं. तुम्ही चांगले मित्र आहे आणि मी मित्र म्हणूनच बघते. पण तू असा
चिडचिडा झालायस. आणि तू आत्ता तिच्याकडूनच आलायस म्हणून मला काळजी वाटली म्हणून
बोलले.
अजिंक्य : तुझ सॉरी ठेव
तुला. दुसरी गोष्ट काळजी मी दाखवतो लोकांना. मला तू दाखवू नकोस. धार्जीन नाही. काळजीच
प्रेम कधी होत ना समजत नाही. आणि प्रेम झाल तर मझ्यावर फक्त खर्च प्रेम होऊ शकत
कोणत्याही मुलीला आणि खर प्रेम नशिबात नसत कुणाच्या. अजिंक्यच्या पण.
ऐश्वर्या : अरे अस नसत
रे. चहा ?
अजिंक्य : खूप गरज आहे.
ऐश्वर्या : लास्ट टाईम
पिलेला तिथ प्यायचा का ?
अजिंक्य : नको, आल कमी
साखर जास्त होती त्यात. तेव्हा सिगरेटमुळे चव जास्त लागली नाही. डोक दुखतय माझ
चांगला हवाय चहा. एक आहे ठिकाण मस्त. पण लांब आहे जरा. उशीर होईल परत यायला.
ऐश्वर्या : चल
म्हणून लगेच त्याला न
विचारता मागे बसली. त्याने बुलेट सुरु केली. आणि ते निघाले. वाटेत बराच वेळ
अजिंक्य शांत बसून होता. ती मागून पुढे जाणाऱ्या गाड्या बघत अजिंक्यच्या मागे गाडीवर
बसलेली. अजिंक्यच लक्ष आरशातून मागे गेल.
अजिंक्य : ऐश्वर्या.....?
ऐश्वर्या पुढे सरकली आणि
अजिंक्यच्या खंद्या जवळ कान केला.
अजिंक्य : सॉरी..
ऐश्वर्या : काय ?
बुलेटचा आवाज आणि गाड्यांची
वर्दळ तिला ऐकू गेल नाही. त्याने आरशातून मागे बघितल आणि गाडीचा वेग कमी केला.
अजिंक्य : सॉरी. मला असा
राग नाही येत. पण चुकून झाल सॉरी.
ऐश्वर्या : अरे असुदे. मला
नाही काही वाटल.
अजिंक्य : नाही ग आपली
आत्ताच ओळख झालीय मला एवढा चिडायचा तुझ्यावर हक्क नाही सॉरी.
आणि तेवढ्यात पुढून एक
माणूस इंडिकेटर न दाखवता उजवीकडे वळून गेला आणि अजिंक्यने कचकन ब्रेक दाबला. आणि त्याला
शिव्या दिल्या. अचानक दबलेल्या ब्रेक मुले ऐश्वर्या घाबरली आणि नकळत पुढे सरकली
गेली आणि अजिंक्यच्या कमरेला तिने घट्ट धरल.
ऐश्वर्या : असुदे गेला
तो.
अजिंक्यने पुन्हा गाडी पुढे
घेतली. ऐश्वर्याच हृद्य अजून थरथरत होत तिचा हात अजून अजिंक्यच्या कमरेलाच होता.
भाग १३
गाडीचा वेग वाढत चालला
होता. तिच्या हृदयावर तिचा ताबा मिळत नव्हता. पण अस गाडीवरून वेगाने रस्त्यावरून
जाण तिला आवडल होत.
ऐश्वर्या : लास्ट आपला
कॉल त्यावर झालेलं तुझ बोलन आणि मगाशी बोलला ते त्यावरून मला अस जाणवतय तू
जिच्यावर पण आधी प्रेम केल आहेस ते खूप आणि खर केलयस.
अजिंक्य : मग ?
ऐश्वर्या : मला पण करून
बघायचं आहे. खर प्रेम.
अजिंक्य : आणि ?
ऐश्वर्या : फील घ्यायचा आहे
खऱ्या प्रेमाचा. कस असत ते बघायचं आहे. त्या प्रेमाच्या जगात जगायचं आहे.
अजिंक्य : आणि ?
ऐश्वर्या : आणि ? काहीच
नाही.
अजिंक्य : या दोन चार
गोष्टींच्या अनुभवासाठी आयुष्य पणाला लावायला वेद लागल आहे का तुला ? सुंदर दिसतेस
चांगला जॉब करतेस तर मग लग्न कर आणि नवऱ्यात प्रेम शोध. त्याच्यावर प्रेम कर.
ऐश्वर्या : अस कस ? तो
आधी चार जणींशी प्रेम करून आला असणार त्याला अनुभव असणार सगळा आणि मी मठ्ठ
त्याच्यासोबत राहणार त्याला काय अर्थ आहे ? आणि आई सांगते ना आई बाबाची गोष्ट खर
प्रेम लग्नानंतर कळायला समजायला वेळ लागतो. आणि पूर्वी तशी परिस्थिती होती. कपल
सोबत जास्त असायचं. आजकाल मोबाईल मुळे जवळीक नाहीये जास्त. मग मला संग खर प्रेम
समजायला आणि व्हायला आयुष्य जाईल माझ असच.
अजिंक्य : मग ?
ऐश्वर्या : माझी इच्छा
आहे लग्नाआधी खर प्रेम काय असत ते बघायचं आहे. तू केल आहेस ना रे मला सांग ना. खर प्रेम
झाल कि कस समजायचं ?
अजिंक्य आरशातून तिच्याकडे
बघतो. आणि मग त्याला जाणवत तिचा हात अजून त्याच्या कमरेलाच आहे. त्याने पाठ ताठ केली
आणि ऐश्वर्याला आठवल तिचा हात...
तिने पटकन मागे घेतला.
अजिंक्य : जेव्हा आपल्या
सोबतचा लांब जातो. तेव्हा खर प्रेम झालेल असत. लांब गेल्यावर प्रेम ते समजत कळत.
पण. ते परत मिळत नाही. आणि मिळणार नसत म्हणूनच त्याचा शोध आपल्या मनाला लागलेला
असतो.
ऐश्वर्या : मग मला बघायचं
आहे. कुणाला तरी जवळ करून त्याच्यापासून लांब व्हायला. आणि मग जो शोध लागेल खर्या प्रेमाचा
त्याच पेटंट घेऊन नवर्यावर प्रेम करयला आवडेल मला खरच.
अजिंक्य : कर. मिळेल तुला
नक्कीच कुणीतरी. ब्लेस यु.
ऐश्वर्या : बघू आता.
अजिंक्याने गाडी एका
बाजूला थांबवली.
ऐश्वर्या गाडीवरून उतरली.
ऐश्वर्या : पोचलो ?
अजिंक्य : नाही पुढे आहे
पण त्याच्याकडे सिगरेट मिळत नाही. इथल्या टपरीतून घ्यायला लागते.
ऐश्वर्या : एक सांगू.
चिडणार नसशील तर.
अजिंक्य : काय ?
ती त्याच्याकडे बघत होती.
त्याने सिगरेट घेतलेल्या खिशांत ठेवल्या.
ऐश्वर्या : तू सिगरेट ओढत
नको ना जाऊ.
अजिंक्य गाडीवर बसला.
गाडी सुरु झली त्याने दुर्लक्ष केलेलं बघून ऐश्वर्या नाराज होऊन त्याच्या मागे
बसली. आणि आता जरा त्याच्यापासून अंतर ठेवून बसली.
गाडी निघाली. चहाच्या गाड्यापाशी दोघ पोचले. तो गदा डोंगरावर होता. तीह काही खुर्च्या होत्या. त्यावर बसून अजिंक्य ऐश्वर्याला बाजूला खुर्ची सरकवतो. ती त्यावर बसते. आणि समोर डोंगरामागे दुसऱ्या बुडणाऱ्या सूर्याला बघत होते. एक मुलगा चहा घेऊन त्यांच्यासमोर आला. आणि त्यांनी ते घेतले. ऐश्वर्या एक घोट पिते आणि अजिंक्यकडे बघते. अजिंक्य खिशात हात घालतो. आणि मोबाईल धरून दुसऱ्या खिशात ठेवतो. आणि खिशातली सिगरेट. ती तशीच रहाते. चहा पूर्ण दोघांचा पिऊन झाला तरी.
भाग १४
अजिंक्य समोर बघत होता सूर्य अजून डोंगराआड जायला बाकी होता. एरवी सूर्य
काही मिनिटात खाली खाली सरकत डोंगरामागे जायचा पण आज सूर्य जरा रेंगाळत होता.
तिथल्या तिथे.
अजिंक्य : सूर्य, रोज किती दुर्लक्षित असतो. रोज तो असतो, पण आपण ऊन म्हणून
उन्हाळा म्हणून त्याच असण अगदी सहज नजरेआड करतो. तो नसला तर काय होणारे हा असा
आपला विचार किती मूर्खपणा आहे ना. तो आहे म्हणून आपण जगतोय. पण आपण विसरून जातो
किंवा विसरतो. मुद्दामहून.
पण हे अस कधी लांब येऊन त्या सूर्याला बघितल तर किती ते त्याच्या
सौंदर्यावर प्रेम येत. रोज रोज बघता आल तर या सुद्र्याला असा एक विचार येतो. काही
गोष्टी असतात. त्या जात नाहीत कुठ. बस आपण त्यांकडे बघायचं सोडून दिलेलं असत. पण
त्या गोष्टी नकळत जेव्हा समोर येतात तेव्हा आणखी जास्त प्रेम त्या गोष्टींवर येत.
ऐश्वर्या : हो.
अजिंक्य : काही आठवणी काही व्यक्ती अशाच असतात. ज्या सोबत नसतात. पण त्या
असतात मनाच्या एका कप्प्यात. त्यांना आपण विसरून गेलेलो नसतो. किंवा त्या व्यक्ती
त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आपल्या आठवणी पण हरवलेल्या नसतात. बस आपण त्यांच्याकडे
बघायचं सोडून दिलेलं असत. त्रास होईल मनाला म्हणून. पण कधीतरी नकळत ती व्यक्ती
त्याच्या आठवणी अशा मनात येतात. त्यांना थांबवण जमत नाही याच त्या मनाला. आणि मग
एक एक आठवण आठवत बसताना त्या व्यक्तीवर इतक प्रेम होत ना काय सांगू ? त्या आठवणींच
सौंदर्य बघून पुन्हा नव्याने प्रेमात पडल्याचा भास होत असताना ओठांवर आलेल हलक हसू
आणि डोळ्यात जमलेले अश्रू हे अस एक मिश्रण आहे ज्यांच्या चेहऱ्यावर हे मिश्रण
दिसत, खर प्रेम करणारी ती व्यक्ती नक्कीच असते. तू म्हणाली होतीस खर्या प्रेम
बद्दल ऐकायचं आहे तुला, अअ..राधिका... तीच नाव. ओळखीच आमच्या प्रेम झाल. प्रेम
कधीच एका नजरेत होत नाही. ज्यांना होत ते खोटारडे आहेत. एका नजरेत फक्त आकर्षण
तयार होत. आकर्षण त्या व्यक्तीच्या जवळ जायला प्रयत्न करत राहत. या प्रयत्नात ओळख
होते, मैत्री होते आणि मग सहवास वाढत जातो. सहवास मग वाढत जातो आणि ते आकर्षण संपत
जात. जिथ आकर्षण संपत तेव्हा मग प्रेम सुरु होत. जे आणखी आणि आणखी खर होत जात. आमच
हि असच झालेलं. इतक सहज सोप्प. पण खूप भावनांच्या गुंत्यात सहज झालेलं प्रेम. जस लवकर
झाल ते उशिरा समजल आणि उशीर जिथ होतो तिथ तो वेळ आपला नसतो. ते आपल नशीब असत. आणि
माझ्या नशिबात खर प्रेम अजिबात नव्हत. तिला मला जेव्हा खर प्रेम झाल. आमची जात
आमची आवड, आमच नशीब, आमची पुढची स्वप्न सगळ सगळ वेगळ आहे हे जाणवल समजल आणि मग
लांब होण्यात तिला योग्य वाटल. मी तिला अडवलं होत पण तिला त्रास होताना बघून मग
मीही तिला मग पुन्हा त्रास नाही दिला.
ती आणि मी वेगळे झालो खर. पण माझ्या मनातून ती गेलेली नाहीये. आणि मी ? हि
गेलो नसेन. खात्री आहे. एक एक क्षण तिला मी माझा दिला तिला. प्रत्येक गोष्ट तिला
दिली जी तिला ही होती. प्रत्येक सुख तिला देताना मी माझ्यासाठी पुढे खूप सार दुःख
तयार करतोय हे माहित असून पण मी केल तिच्यावर प्रेम. इतक कि या जगात कुणी कुणावर
करत नाही. मला तिच्यावर कमी प्रेम कार्याला जमल नाही. आणि तिला माझ्यावर खर प्रेम
शेवटपर्यंत करायला जमल नाही. शेवटी ती मोकळी झाली आमच्या नात्यातून.
ऐश्वर्या : आता कुठे असते ?
अजिंक्य : माहित नाही.
ऐश्वर्या : तिला भेटण्याचा प्रयत्न केलास परत ?
अजिंक्य : नाही. कारण ती आणि तिच्या आठवणी मनातून अजून गेल्याच नाहीयेत
त्यामुळे माझ मन जागेवर आहे. आणि म्हणून मग तिच्या आठवणीत मी ठीक आहे.
ऐश्वर्या : दुसरी कोणी आली नाही का तुझ्या आयुष्यात ?
अजिंक्य : मुलाच्या आयुष्यात मुली येतात ?
ऐश्वर्या : हो.
अजिंक्य : अजिंक्य, जात असतो मुलींच्या आयुष्यात. खर प्रेम द्यायला.
ऐश्वर्या : तुझे डोळे ?
अजिंक्यने डोळे पुसले. आणि खिशातून सिगरेट काढून पेटवली.
भाग १६
अजिंक्य : प्रेमाची
सुरुवात मैत्रीनेच होते. बर ते सोड. मज्जा केली मी मनावर घेऊ नकोस. सध्या मी
माझ्या कामात आहे. प्रेम करायला वेळ नाही मला आणि प्रेम करून कामाचा वेळ कुणाला
द्यायला तर अजिबातच मला वेळ नाहीये. निवांत झोपून घालवलेल्या वेळच वाईट वाटत नाही
मला. पण प्रेमात असा वेळ घालवला तर फार त्रास होतो. कारण झोपून बर तरी वाटत. पण
प्रेमातून उठल ना कि सगळ्या आयुष्याचा अंधार झालेला असतो.
ऐश्वर्या : प्रेम का
करायचं हे हि तूच बोलतो. आणि प्रेम करायचं पण नाही हे पण तूच बोलतोस. तू तुझ्या
मतावर ठाम का नसतोस ? प्रेम इतक वाईट आहे का ? कि जे केल्याने एवढ काही बदलत ?
अजिंक्य : प्रेम
वाईट नाही.
ऐश्वर्या : मग प्रेम
करणारे वाईट असतात का ?
अजिंक्य : प्रेम
करणारे पण वाईट नाही. बस त्या प्रेमात जो वेळ जातो न आपल्या आयुष्यातला तो वाईट
असतो. तो भरून निघत नाही. परत मिळत नाही. आणि कुणाकडे मागता पण येत नाही. माझा
अनुभव जो आहे प्रेमाबद्दल, प्रत्येकाला आला असेल अस नाही. पण प्रेम सगळ्याचं सारखच
असत. कोण प्रेम करून एकमेकांशी लग्न करून दोन वेगवेगळ्या बेडवर झोपत का ?
ऐश्वर्या : नाही..
अस कस होईल.
अजिंक्य : तेच तर
मला सांगायचं आहे ना. प्रेम कर खोट काही का असेना, शेवटी सेक्स नसेल तर प्रेम
पूर्ण नाहीच. आणि प्रत्येकाला प्रेम पूर्ण करायचंच असत. जो अर्धवट प्रेमाच्या
प्रयत्नात असतो तो हिरो किंवा हिरोईन फक्त पिक्चरमध्ये असतात. बाकी पूर्ण प्रेम हे
करावच लगत. प्रत्येकाला. त्यातून सुटका नाही. कारण जन्म मृत्यू जसा कन्फर्म आहे
आपला इथ तस पूर्ण प्रेम करण्याचा हि नियम आहेच. बाकी ते किती जणांसोबत आणि किती वेळा
करायचं ते ज्याच्या त्याच्या हातात आहे.
ऐश्वर्या : मग आता तू
पुन्हा प्रेम करणारच नाही का ?
अजिंक्य : नो....एकदा
केल प्रेम. त्यात त्रास झाल. सहन केला. विसरून ते दिवस गेलो. आठवणी नाही. त्यासाठी
प्रयत्न सुरु आहेत. त्यात नव्या प्रेमाची भर नकोच. ऐश्वर्या...
ऐश्वर्या : हम?
अजिंक्य : कॉफी
मिळेल का मला ? चहा पिऊन जळजळतय.
ऐश्वर्या : हो. मी
तुला विचारणारच होते... चहा पिणार का म्हणून.
अजिंक्य जागचा उठून उभा
राहिला. आणि जर्किंग काढून त्याने सोफ्यावर ठेवल. आणि खिडकीतून बाहेर बघत बोलला “आता
छातीतून रक्त नाही चहा येईल”
ऐश्वर्या : किती
पितोस चहा दिवसात ?
अजिंक्य : काय होतो
पंधरा सोळा कप.
ऐश्वर्या : ये न
किचन मध्ये बोलत बोलत करते कॉफी. एवढा पितोस.. जेवतोस का नाही मग ? मी एक कप पिला
चहा तर तास दोन तास भूक लागत नाही मला.
अजिंक्य : खातो.. कि.
ऐश्वर्या दुध तापवत
ठेवते. अजिंक्य तिच्या पासून लांब उभा असतो.
ऐश्वर्या : खर सांगू
मला पण चहा आवडतो पण घरात आई बाबांना कॉफीच आवडते मग मला हि कॉफीच प्यायला लागते.
बट बाहेर आले कि पिते चहा.
बोलता बोलता ती सानशीने
(पक्कड) दुध शेगडीवरून कट्ट्यावर ठेवल. आणि सानशी बाजूला करताना तिचा धक्का लागला
आणि दूधाच गरम पातेल तिरक झाल. गरम दुध तिच्या हातावर सांडल. तिने हात पटकन बाजूला
केला. अजिंक्य पटकन तिच्या जवळ गेला. त्याने तिचा हात घट्ट धरला. दुसऱ्या हाताने नळ
सुरु करून स्वतःचा हात ओला केला आणि तिच्या हाताला पुसला. तिला दुखत होत. तिच्या
डोळ्यातून पाणी येत होत. त्याने दोन तीन वेळा त्याच्या ओल्या हाताने तिच्या
भाजलेल्या हाताला थंड केल. तो तसाच तिला घेऊन बाहेरच्या खोलीत गेला. तिला सोफ्यावर
बसवलं. त्याने तिला जखमेवर लावायची क्रीम आहे का विचारल. तिने नकार दिला. तिला
दुखत होत. तो पटकन बाहेर गेला. समोर एक मेडिकल होत. तिथ तो गेला. तिथ गर्दी होती.
तरी त्याने दोन मिनिट थांबून एक क्रीम घेतली. आणि त्याचा मोबाईल वाजला. त्याने
उचलला आणि कानाला लावला.
अजिंक्य : हेल्लो
बोल काय झाल ?
ऐश्वर्या : घेतलीस
का क्रीम ?
अजिंक्य : हो.
ऐश्वर्या : अरे
प्रोब्लेम झालंय.
अजिंक्य : काय ?
ऐश्वर्या : नको. तू
ये ना घरी. लवकर प्लीज.
अजिंक्य : काय झाल ?
भाग १७
अजिंक्य : अरे यार..
आलोच वेट त्रास होतोय का ?
ऐश्वर्या : हो आणि
माझ्याकडे pad नाहीये. आणायचं आहे मला तू ये ना लवकर घरी.
अजिंक्य : मी आणू का
?
ऐश्वर्या : नको आणते
मी. तू ये.
अजिंक्य : त्यात काय
एवढ. कोणत हवय मला सांग.
तिने सांगितल
अजिंक्यने ते घेतल. मेडिकलवाला त्याच्याकडे एक नजर बघतो. अजिंक्य दुर्लक्ष करून
निघून जातो. अजिंक्य घरी येतो. ऐश्वर्या सोफ्यावर झोपलेली असते. अजिंक्यला बघून ती
उठायला लागते. अजिंक्य दार लावतो आणि तिला हाताला क्रीम लावतो. आणि pad तिला देतो. ती ते घेऊन बाथरूममध्ये जाते. तो किचन
मध्ये जाऊन कट्ट्यावर काढून ठेवलेली कॉफी आणि साखर घेऊन कॉफी बनवतो. आणि दोन कप
कॉफी घेऊन तो बाहेर आला. आणि बाथरूम मधून ऐश्वर्या आली.
ऐश्वर्या : अरे तू
का बनवली मी बनवली असती..
अजिंक्य :
माझ्यामुळे झालय एक तर. तुला उगीच कॉफी करायला सांगितल. आधीच हा पिरेड आलाय त्याचा
तुला त्रास होत असेल आणि ते भाजल ते पण दुखेल.
ऐश्वर्या : हो ते
दुखतय. पण मला पिरेड आला कि पहिले दोन दिवस खूप त्रास होतो. सहन होत नाही.
अजिंक्य : हा
म्हणूनच बनवलीय मी कॉफी. पिऊन घे म्हणजे बर वाटेल. ऐश्वर्या बसली. अजिंक्य तिच्या शेजारी
बसला. अजिंक्यने तिला कप दिला. उजव्या हाताला तिला भाजेल्ला तळातला. तिच्या लक्षात
आल नाही तिने कप धरला आणि तो तिच्याकडून निसटणार तोच त्याने तो पकडला आणि तिच्या
डाव्या हातात दिला. ती कॉफी प्यायला लागला. बाहेर बारीक पाऊस सुरु होता. अजिंक्य
कॉफी पटपट पितो आणि कप पुढे टेबलावर ठेवतो. ऐश्वर्या हळू हळू पीत होती.
अजिंक्य : थंड होईल
न पी लवकर. आणि आराम कर.
ऐश्वर्या : मला
उलट्या हाताने नाही पिता येत.
अजिंक्य : बर उजव्या
हातात धर कप मी आधार देतो. तिने उजव्या हातात कप धरला आणि अजिंक्यने कपाला खालून
हात लावला आणि ती प्यायला लागली कॉफी. कॉफी पिऊन झाली. अजिंक्य दोन्ही कप घेऊन आत
किचनमध्ये गेला. कप धुवायला लागला. बाहेरून ऐश्वर्या नको धुवू वैगरे ओरडत होती पण
अजिंक्य कट्टा पुसून कॉफी नीट झाकून ठेवून कप कट्ट्यावर पालथे घालून हात रुमालाला
पुसत बाहेर आला. आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसायला जाणार तोच ती म्हणली इथे बस
ना.
अजिंक्य उठून तिच्या
जवळ बसला.
अजिंक्य : खूप त्रास
होतोय का ग ?
ऐश्वर्या : हो. तुला
कसलं माहित ?
अजिंक्य : मघापर्यंत
किती बोलत होतीस. आता पूर्ण चेहरा उतरला आहे. वाटेल बर. नको काळजी करू.
तिच्या डोळ्यात पाणी
साचल.
अजिंक्य : काय झाल ?
ऐश्वर्या : पिरेड
नेहमीचाच असतो. पण आज तू मला कॉफी बनवून दिलीस माझ्यासोबत बसला आहेस. बर वाटतय
मला.
अजिंक्य : आहे मी...
बस शांत.
आणि मी आहे या शब्दाने ती पाघळली आणि तिने तीच डोक अजिंक्याच्या खांद्यावर टेकवल. अजिंक्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून जवळ घेतल. ती तिचे हात पोटावर दाबून धरून ती अजून अजिंक्यकडे सरकली. आणि डोळे मिटून बसली. अजिंक्य तिच्या केसांवर हात फिरवत शांत होता. दोघांत शांतता होती. ती थोडीशी कण्हत होती. आणि बाहेर पावसाचा आवाज येत होता.
भाग १८
ऐश्वर्या : अजिंक्य..
अजिंक्य : हा ?
ऐश्वर्या : सॉरी.
अजिंक्य : का ?
ऐश्वर्या : मी ते
मेडिकलमधून आणायला लावलं तुला म्हणून.
अजिंक्य : शु...श..तू
नको म्हणालीस मी आणल. आणि सॉरी नको मला तुझ.
ऐश्वर्या : का ?
एवढी मी परकी आहे का ?
अजिंक्य : मिठीत
आलेली मुलगी कोणती परकी असते का ?
ऐश्वर्या : नाही. मग
मी कोण आहे ?
अजिंक्य : तुझ्या
विचारात जे पहिलं येईल. ती तू.
ऐश्वर्या : अम्म्म्म..
अजिंक्य : नो...विचार
केला तर खूप येतील विचार. आणि विचार केलेलं उत्तर खर कस असेल ? विचार करू नको. आणि
आत्ता तरी नकोच बर वाटत नाहीये ना. पिरेड मध्ये जास्त विचार नसतो करायचा. तू फक्त
शांत बसून राहा.
ऐश्वर्या : हो. तू आहेस
तो पर्यंत राहीन शांत.
अजिंक्य : आणि मग ?
ऐश्वर्या : माहित
नाही. पण एकटी असेन. आणि खूप जास्त विचार. पिरेडमध्ये त्रास तर होतोच मला. पण विचार
खूप येतात. आणि विचार आले कि सगळ पुढच मागच आठवत आणि परत त्रास होतो.
अजिंक्य : मग या
वेळेस अस काही करणार नाहीयेस तू ओके ?
ऐश्वर्या : प्रयत्न
करेन.
अजिंक्य : करच. या वेळेस.
दर महिन्यात त्रास होतो न तुला ? या महिन्यात कमी होईल. बस माझ ऐक.
ऐश्वर्या : बस हा एक
महिना ? त्यातले दोन दिवस ?
अजिंक्य : अस काही
नाही. जो पर्यंत आहे तुझ्या संपर्कात तोपर्यंत तरी घेईन तुझी काळजी.
ऐश्वर्या : का नंतर
कुठ जाणारेस ?
अजिंक्य : मी कुठ
जात नाही. अजिंक्य इथेच असतो बस दिवस बदलतात तसे सहज लोक माझ्या आयुष्यात सहज जातात
निघून. आता सवय झाली आहे. त्यामुळे आल्यागेलेल्यांचा विचार नाही करत मी. बस जे
सोबत आत्ता असतात त्यांच्याशी चांगल वागतो.
ऐश्वर्या : मी तशी
नाही अजिंक्य.
अजिंक्य : सगळे असच
बोलतात. मी तशी नाही. तसा नाही. पण वेळेसोबत सगळ बदलत. आणि त्या माणसाच मन, वागण,
आवड, निवड सगळच. असो.
ऐश्वर्या : म्हणजे तू
मला इतरांच्या यादीत बसवलस का ?
अजिंक्य : नाही. पण तू
त्या यादीत जाशील अस काही वागू नकोस. बस. आता हा विषय इथच बंद. शांत डोळे मिट आणि
बस.
ऐश्वर्या त्याच्या
जवळ आणखी सरकली. आणि लाईट गेली. तिने अजिंक्यचा हात धरला. अजिंक्य हि तिचा हात
पकडतो. आणि दुसऱ्या हाताने डोक्याला धरतो. आणि डोळे मिटून घेतो. पावसाचा आवाज सुरुच
आहे.
भाग १९
ऐश्वर्या : अजिंक्य,
तुला भीती नाही वाटत अंधाराची ?
अजिंक्य : नाही.
त्याला काय भ्यायचं.
ऐश्वर्या : बर झाल तू
आहेस नाहीतर माझ काय झाल असत माझ ?
अजिंक्य : मग इतर
वेळेस काय करतेस तू ?
ऐश्वर्या : आई बाबा
असतात. पण ते नसले कि मी दाराला कडी लावते आणि बाहेर पायरीवर बसते मोबाईल आणि
छत्री घेऊन.
अजिंक्य : अवघड आहे.
एवढ घाबरून कस चालेल ?
ऐश्वर्या : चालत
तेवढ. भीती असतेच न कशाची न कशाची माणसाला.
अजिंक्य : ज्या
गोष्टीत रस नसतो न माणसाला त्या गोष्टीची भीती माणसाला वाटते. तुला वाटतय का आता
बर ?
ऐश्वर्या : हम..
थोडस.
अजिंक्य : हम.
ऐश्वर्या : आधीची जी
होती तुझी. तिने खूप त्रास दिलाय न तुला अजिंक्य ?
अजिंक्य : नाही. मी
करून घेतो.
ऐश्वर्या : का ?
अजिंक्य : त्याशिवाय
लिहायला कस सुचेल ? लिहायला त्रास लागतो. आणि मला त्रास कोण देईल अस वाटतय का ?
ऐश्वर्या : नोप..
तुझ्यासोबत राहायला आवडेल कुणाला पण.
अजिंक्य : अस काही
नाही, पण मी कुणाशी वाईट वागत नाही. मग माझ्याशी पण कोण वाईट वागत नाही. माझा तो
फायदा आहे बट एक लॉस आहे कि माझ मन मोकळ होऊन जात आणि मग लिहायला सुचत नाही.
ऐश्वर्या : मग तू
रिलेशनमध्ये होता तेव्हा काय लिहायचा कि नाहीस ?
अजिंक्य : प्रयत्न
केलेला पण जमल नाही. आणि आता तिच्या आठवणीत प्रयत्न करतो कमी लिहायचा पण ते हि जमत
नाही.
ऐश्वर्या : कंटाळा
नाही येत तुला सतत तिचा विचार करून. तिच्याबद्दल लिहून ? आणि ती वाचते का तुझ
लिहिलेलं ?
अजिंक्य : नाही.
ऐश्वर्या : मग
लिहितोस का ?
अजिंक्य : माझ्यासोबत
राहून तिला मी समजलो किती मला माहित नाही. पण मला ती किती कळाली हे जगाला मला
सांगावस वाटत.
ऐश्वर्या : त्याचा
फायदा काय ?
अजिंक्य : काहीच
नाही.
ऐश्वर्या : मग नको
विचार करू अजिंक्य इतका तिचा. तू त्या विचारात एकटा पडत चालला आहेस. तुझा एकटेपणा
बोलण्यातून जाणवतो. तू विचार जास्त करतोयस. सिगरेट ओढतोयस त्यात. चहा आहेच आणखी.
किती त्रास देशील शरीराला तुझ्या. ती तिकड निवांत जगत असेल कुणासोबत आणि तू असा इथ
झुरतोयस.
अजिंक्य : सवय झालीय
आता.
ऐश्वर्या : सवयी
बदलता हि येतात अजिंक्य. बाय द वे, नाव काय होत तीच ?
अजिंक्य : प्रतीक्षा.
ऐश्वर्या :
नावासारखच तिने वाट बघायला लावली तुला.
अजिंक्य : आयुष्य
अजून खूप आहे.
ऐश्वर्या : नाहीरे
अजिंक्य अस नसत. ती तीच जगतेय टू अजून तिच्या आठवणीत मागेच राहिलायस. नको त्रास
करून घेऊस. काय वाटल तर आता मी आह ना. माझ्याशी बोल. मी ऐकेन तुझ.
अजिंक्य : हम.
ऐश्वर्या : खरच
सांगतेय.
ऐश्वर्याने त्याचा
हात अंधारातच घट्ट धरला. तिचा श्वास फुलाला. अजिंक्यने तिच्या डोक्यावरचा हात घट्ट
करत तिचा चेहरा अंदाजाने त्याच्याकडे वळवला. आणि अंधारात पण स्पष्ट दिसत असल्यासारखं
दोघांनी एकमेकांच्या ओठांना एकमेकांच्या ताब्यात देऊन टाकल.
Next Part released on 14th june.
7 टिप्पण्या
Thank you for reading...!
उत्तर द्याहटवाLove you all.
Wowww Very Nice... Waiting for next part 😍
उत्तर द्याहटवाThank you so much shahjeen❤
हटवाAajacha part ter mast ach vatala,plz.share next part fast
उत्तर द्याहटवाThank you so much.
हटवाMst❤❤
उत्तर द्याहटवाThank you so much❤
हटवा