30 JUNE

 

भाग ०१

पावसाळ्याचे दिवस होते. तारीख तीस जून. कोर्टात बरीच गर्दी होती. कित्येक लोक बाहेरच्या आवारात पावसापासून वाचण्यासाठी आडोशात उभारलेले. कोर्टाबाहेर एक भल मोठ वडाच झाड होत त्या खाली गरम कणीस घेऊन एक माणूस गाडा लावून उभा होता. त्याच्याच शेजारी एकजण चाह्चा पीप घेऊन चहा विकत उभा होता. पाऊस एकसलग सकाळपासून पडत होता आणि सरळ आकाशातून जमिनीवर पडत होता. रस्त्यावर सामसूम होत चाललेला. रस्त्याच्या बाजूला थांबणाऱ्याची तोबा गर्दी होत चालली होती. पाऊस बाहेर असलेल्या लोकांना जाणवत होता. एकतर त्याचं अंग ओळ झालेलं त्यामुळे थंडी त्यांना जाणवत होत. कोर्टाच्या आत सगळे ए.सी. सुरु होते ते बाहेर पडणाऱ्या पावसामुळे बंद झालेले. त्यामुळे आतल्या गर्दीत माणसांनाच माणसांच्या गर्दीमुळे गरम व्हायला लागल होत. आकार नंबरच्या टेबलावर रजिस्ट्रार मोबाईलमध्ये फेसबुक उघडून त्यावर व्हिडीओ बघत बसलेला. त्याने कानात हेडफोन लावलेले. त्यामुळे व्हिडीओ बघून त्याचा तोच हासत होता. त्याच ते हसण बघत वडील म्हणाले, ‘अजिंक्य, पावसामुळे उशीर झाला का या मुलीला ? परत एकदा फोन लावून बघ बर लागतोय का?’

अजिंक्य : आता कॉल लावला तर तो शंभरावा असेल. इतके कॉल कोण करत ? आणि सगळे कॉल तुमच्या देखत लावलेत मी. मेसेज पण पाठवलेत. पण मोबाईलच बंद असेल तर काय उपयोग आहे या सगळ्याचा ?

वडील : तरी बघ, स्वीच ऑफ वैगरे झाला असेल. लाईट नसेल तिकड घरी तिच्या. तिला पण आहे ना काळजी तुझी. केला असेल तिने मोबाईल सुरु.

अजिंक्यने कॉल केला... बीप...बीप....बीप... आपण डायल केलेलं नंबर सध्या बंद आहे, कृपया थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा. आपने जिस....कट एकला कॉल.

वडिलांकडे बघत अजिंक्य, ‘नाही अजून हि नाही. आता काय करू मी सांगा ?’

वडील : चल आपण घरी जाऊन येता.

अजिंक्य : मी येतो जाऊन, तुम्ही थांबा.

वडील : नको मी हि येतो. या इथ थांबतील.

वडील आणि अजिंक्य उठले. दोन बायका तिथच बसल्या. अजिंक्य आणि वडील निघाले. अजिंक्यने छत्री उघडली आणि वडिलांना दिली. अजिंक्य थोडासा भिजत पार्किंगमध्ये गेला. बुलेटवर बसला. गाडी सुरु झाली. गाडीचा आवाज जसा आला तसा वडील बाहेरच्या बाजूला आले. अजिंक्य समोर आला. वडील बुलेटवर बसले. गाडी निघाली. दोघ हि शांत होते. जो काय तो आवाज पावसाचा फक्त. केव्हातरी आवडणारा पाऊस आज नकोसा झालेला. त्याचा तो आवाज तो ओलेपणा काही काही नको होत. रस्त्यावरून वाहत चाललेल्या पाण्यातून बुलेट दोन्हीबाजूला पाणी उडवत चालली होती.

वडील : तुमच काय बोलन झाल होत का अजिंक्य ?

अजिंक्य : आ ??? बोलन म्हणजे ?

वडील : भांडण वैगरे काय ?

अजिंक्य : अजिबात नाही. आज कसा भांडेन मी ? वाढदिवस आहे माझा.

वडील : तिचा शेवटचा कॉल कधी आलेला तुला ?

अजिंक्य : सकाळी सव्वा पाचला .

वडील : इतक्या सकाळी ?

अजिंक्य : हो.

शेजारून एक चारचाकी जोरात पुढ गेली, आणि पाणी अजिंक्य आणि वडिलांच्या पायावर उडल. अजिंक्यला राग आला. त्याने बुलेटच स्पीड वाढवल. वडिलांनी अजिंक्यच्या खांद्यावर हात ठवून घट्ट पकडल. छत्री मागे गेलेली. पाउस लागत होता वडिलाना. पण अजिंक्य रागात गाडी चालवत चारचाकीच्या बरोबरीला गेला. आणि जोरजोरात त्याने होर्न वाजवायला सुरुवात केली. त्या गाडीच्या काचा पावसामुळे बंद केलेल्या होत्या. पण थोड्यावेळाने गाडी चालवणाऱ्याला कलाल कि अजिंक्य त्याला बघत गाडी चालवतोय. त्याने गाडीचा वेग कमी केला आणि अजिंक्याने त्याला शिवी दिली आणि निघून गेला पुढे.

वडिलांनी छत्री निट धरली.

वडील : तू शांत. हो. होईल सगळ ठीक.

आणि अजिंक्यच लक्ष एका कॅफेकडे गेल.

भाग ०२

पाउस पडतच होता. कॅफेत बरीच जोडपी बसलेली होती. अजिंक्य भिजलेला. नशीब अंगावर जाकेट घातलेलं होत. पण डोक भिजलेल. त्याला त्याचे केस भिजलेले कधी आवडत नाहीत. आणखी केसं भिजायला नको म्हणून त्याने बुलेट कॅफेच्या समोर लावली. आणि पटकन तो आत गेला. आत गेल्यावर घरात गेल्याचा अनुभव आला. एकदम गरम वातावरण आतलं होत. तो आत एक नजर टाकतो. सगळे टेबल भरलेले. तेवढ्यात एक मुलगा त्याच्या जवळ येतो,

मुलगा : कितीजण आहेत ?

अजिंक्य : मी एकटाच आहे.

मुलगा : वर बसा.. आहे जागा. कोपर्यात एक सिंगल सीट टेबल आहे.

अजिंक्य केसातून हात फिरवत वर पायऱ्या चढून गेला. वर अंधारलेल होत जरास. त्याच लक्ष समोर गेल. एक मोकळा टेबल कोपऱ्यात होता. तो गेला. तिथ एकच खुर्ची होती. अजिंक्य जाऊन बसला. त्याने जाकेट काढून खुर्चीच्या बाजूला अडकवल. खिशातून मोबाईल काढला. भिजलेला तो. त्याने तो पुसला. बाजूला खिडकी होती. ती बंद होती पण त्यातून बाहेरच दिसत होत. अजिंक्यने खुर्ची खिडकीकडे तोंड करून फिरवली. आणि खिडकीतून बाहेरच बघत तो बसला. तेवढ्यात मुलगा तिथ ऑर्डर घ्यायला आला.

अजिंक्य : एक हॉट कॉफी. आणि बटर टोस्ट.

मुलगा : आणखी काही ?

अजिंक्य : नाही नको इतक बस.

मुलगा निघून गेला. तो खाली पायऱ्या उतरताना खालून दोन मुली वर येत होत्या. त्यांचा आवाज अजिंक्यला आला. पण त्याने दुर्लक्ष केल. तो खिडकीतून बाहेर बघत बसला. त्याचा मोबाईल वाजला. तो कॉलवर बोलत बसला. त्याच्या ऑफिसमधून आलेला कॉल होता. अजिंक्य बोलता बोलता खुर्चीवरून उठतो. आणि खुर्ची सरळ करून बाजूला सरकवतो. आणि चालत बोलयला लागतो. बोलता बोलता केसातून तो हात फिरवत होत. केस अजून हि ओलीच होती. त्याच बोलन झाल. आणि त्याने मोबिल खिशात ठेवला. आणि तो माघारी खुर्चीकडे यायला निघाला. तेवढ्यात खालून वर मुलगा त्याची ऑर्डर घेऊन आला. त्याला बघून अजिंक्य तिथच थांबला.

अजिंक्य : दे.

मुलगा : नको ठेवतो मी.

अजिंक्य : अरे असुदे रे.. इथल्या इथ घ्यायला कशाला तू येतो वर.

अजिंक्यने घेतल. आणि तो मुलगा खाली निघून गेला. अजिंक्य टेबलाकडे त्याच्या निघाला तेवढ्यात आवाज आला.

काय स्टुपिड आहे.. ऑर्डर न घेताच गेलाय खाली त्याला माहितीय ना आपण आलोय वर. मग कळत नाही का ? चल जाता का आपण दुसरीकडे ?

अजिंक्येने त्या आवाजाकडे लक्ष दिल. आणि पुन्हा तिकडून आवाज आला.

अरे अजिंक्य ? तू इकड ?

अजिंक्य : अग स्नेहल तू ? इथ ?

स्नेहल : हा. मला तू आहेस ते कळलच नाही. केवढा अंधार केलाय इथ. त्यात बाहेर रस्त्यावर लाईट नाहीत.

अजिंक्य : वर इथ अंधारच असतो. खास कपलसाठी आहे ना. खाली सगळ भरली मग येऊन बसलो मी पण वर. काय खाणार का मागवू का काय मी ?

स्नेहल : अरे नाही. मागवते मी पण तो बघ ना मुलगा गेला खाली काय न विचारता. तू बस ना इथ आमच्या इथ. एकटा कुठ बसतो.

अजिंक्यने हातातली ऑर्डर टेबलावर ठेवली. मोकळी खुर्ची मागे सरकवून त्यावर तो बसला. अजिंक्यने एक कॉल केला.

अजिंक्य : ऑर्डर घ्यायला वर पाठव ना.

कॉल कट झाला. आणि अजिंक्य कॉफीचा एक घोट पितो.

अजिंक्य : हि ?

स्नेहल : अरे ऑफिसमध्ये आम्ही सोबत काम करतो. हि ऐश्वर्या.

भाग ०३

अजिंक्य : हाय.

ऐश्वर्या : हाय.

तेवढ्यात स्नेहल बोलते, ‘तुला सांगितल होत ना आधी मी शोर्टफिल्म वैगरे बनवायची आमची टीम होती. त्याच्या स्टोरी हा लिहायचा. कमाल लिहितो एकदम. आम्हाला अवार्ड पण मिळालेले. पण नंतर जमलच नाही आम्हाला बनवायला. आम्ही स्गेल इथेच असायचो पुण्यात पण नमका हाच साताऱ्याला गेला. मग नाहीच जमल. काही नवीन लिहिलंयस का अजिंक्य ? ए, मला संग माझ्यात काय बदल झालाय का ?

अजिंक्य : झालाय ना. आजसारखी तेव्हा दिसत असतीस तर मेकअप कमी लागला असता.

ऐश्वर्या जराशी हसली. तिला बघून स्नेहल अजिंक्यकडे बघते.

अजिंक्य : छान दिसतेयस. पण मी आता लिहित नाही काही. सोडून दिलय. आता फक्त जॉब. बाकी काही करायला वेळ नाही.

स्नेहल : काय ? पागल आहेस का. का सोडल तू ?

अजिंक्य : लिहायला सुचाव लागत आणि काहीतरी सुचायला कुणीतरी असाव लागत. ज्याच्याकडे बघून लिहायला सुचत. ती व्यक्तीच नसेल तर काय लिहिणार ? आणि लिहिलेलं वाचणारे खूप असतील पण ती व्यक्ती नसेल तर लिहिलेलं सगळ वाया. आधीच आयुष्य वाया चाललंय जॉबमध्ये. अजून त्यात माझ्या फिलिंग वाया कशाला वाया घालवू ? त्या जपून ठेवल्यात कुणी भेटल तर तेव्हा उपयोगात येतील. म्हणून खूप दिवस झाले त्या फिलिंग्सच सेविंग करून ठेवलय.

स्नेहल : बट तू लिही यार पुन्हा. तू मला शायरी पाठवलेल्या माझ्या डायरीत आहेत अजून. माझा रायटर मित्र एकच आहेस. अधून मधून झाले काही मित्र मला बघून शायर कवी वैगरे. पण तुझ्यासारखा तूच. तू लिही पुन्हा यार.

खालून मुलगा ऑर्डर घेऊन आला आणि त्याने ते समोर टेबलावर ठेवल. स्नेहल आणि ऐश्वर्या घेतात. स्नेहल त्याला तिच्यातल थोड अजिंक्यला देते. अजिंक्य नको नको म्हणत होता तरी. तिने त्याला दिलच. आणि खायला लावल. त्या दोघान ऐश्वर्या बघत होती. अजिंक्यला कॉल आला. अजिंक्य कॉलवर बराच वेळ बोलत राहिला. बोलताना अधून मधून घास खात होता. इकडे स्नेहल आणि ऐश्वर्या एकमेकींशी बोलत खात होत्या. त्याचं खाऊन झाल. मुलगा आला. त्याला स्नेहलने तिघांचे पैसे दिले. अजिंक्य नको नको म्हणत होता पण तिने दिलेच आणि मुलाला सांगितल त्याच्याकडून घेऊ नकोस पैसे. तो मुलगा हि पैसे घेऊन गेला खाली. स्नेहल त्याला बाय म्हणते ऐश्वर्या हि हसते. अजिंक्य उठतो. आणि मोबाईल कट करून खिशात ठेवतो.

स्नेहल : खूप बिझी झालायस इतक्या दिवसांनी भेटून पण तुला बोलायला वेळ नाही. परत आलास पुण्यात तर कॉल कर.

अजिंक्य : ऑफिसमधून होता कॉल. झाल बोलून. बर बस कि बाहेर अजून पाउस आहे. अजिंक्य खिडकीतून बघतो बाहेर, आणि तो पण आहे. त्याला जाऊदे. आणि पावसाला पण.

स्नेहल : थांबले असते रे पण हिला घरी जायचं आहे. खूप वेळा झाला बाहेर आहे ती.

अजिंक्य : मी जाणार आहे रात्री घरी अकराला.

स्नेहल : सातारा ?

अजिंक्य : हम. म्हणून तर म्हंटल थांब.

स्नेहल त्याला बघते. स्नेहल त्याच्या बाजूची खुर्ची पुढे ओढते आणि बसते. त्याचा हात धरून त्याला पण ओढते आणि खुर्चीवर बसवते. त्यांना बसलेले बघून ऐश्वर्या पण बघत बसते. स्नेहल आणि अजिंक्य बोलत बसतात. ऐश्वर्या मोबाईलमध्ये काहीतरी वाचत बसलेली असते. अधून मधून त्या दोघांकडे बघून फक्त नाजूक हसत असते.

पाउस ओसरायला लागलेला. रस्त्यावर वर्दळ सुरु झाली. आणि मग स्नेहल आणि ऐश्वर्या निघाल्या. अजिंक्य हि तिकडच्या खुर्चीवर अडकवलेल जाकेट घेऊन त्यांच्या मागे गेला. बाहेर गेल्यावर स्नेहलने त्याचा हातात हात घेतला आणि बाय बोलली. ऐश्वर्या हि त्याला बाय बोलली. दोघी निघाल्या. अजिंक्य समोर बघतो. तो छत्री घेऊन उभारलेला मुलगा त्या दोघींच्या बरोबरीने पावल टाकत रस्त्याच्या दुसर्या बाजूने चालत होता. अजिंक्य बुलेट घेऊन त्या दोघींच्या मागे गेला. त्यांच्या शेजारी त्याने बुलेट थांबवली.

भाग ०४

अजिंक्य : सोडतो तुम्हाला चल.

स्नेहल : ट्रिप्सी ?

अजिंक्य : हो.

स्नेहल : चौकात पोलीस असतात प्रत्येक अजिंक्य.

अजिंक्य : पोलीस थांबलेले असतात आपल्याला थांबायचं नाहीये. बस.

स्नेहल : अजिंक्यच्या मागे बसली. आणि तिने ऐश्वर्याकडे बघितल. स्नेहल उतरली. आणि ऐश्वर्याला बसायला सांगितल. ती बसली. आणि तिच्या मागे स्नेहल बसते. बुलेट निघाली आणि अजिंक्य आरशातून बघतो. तो मुलगा तिथेच थांबलेला असतो.

अजिंक्य बुलते वळवतो आणि त्याच्या शेजारी नेऊन उभी करतो. तो मुलगा दुसरीकडे लक्ष फिरवतो.

अजिंक्य : ए दुर्लक्षित... हिला बघत होतास न ? शेजारी आहे बघून घे.

स्नेहल मागून उतरते. ऐश्वर्या पण उतरते. अजिंक्य बुलेट बंद करतो.

स्नेहल : मला नाही हिला बघतो. हिच्या मागे असतो हा.

ऐश्वर्या तिचा हात धरते.

ऐश्वर्या : जाऊदे. असल्यांकडे लक्ष नसत द्यायचं.

अजिंक्य : अस कस. तू नको देऊ मी देतो जरा. अजिंक्य जवळ गेला. त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तर तो मुलगा त्याला ढकलतो.

अजिंक्य : अरे भाई, मी काय केल पण नाही अजून तर तू मारायला सुरुवात पण केली ? मारायच आहे का तुला ? म्हणजे चुकी तू करणार आणि मारणार पण तूच. हिरो पण तू विलन पण तू. मग माझा रोल काय यात ? आणि मी बोलायला आलोय मारायला नाही.

तो चालयला लागतो. अजिंक्य त्याच्या मागे बोलत चालतो. पण तो वळून बघत नाही. स्नेहल बुलेटची चावी घेते काढून आणि अजिंक्य मागे चालते. ऐश्वर्या पण चालायला लागते.

अजिंक्यच्या डोक्यात जातो आता तो मुलगा. अजिंक्य त्यच्या शर्टला मागून पकडतो आणि त्याला ओढतो. तसा तो अजिंक्यच्या तोंडावर छत्री जोरात मारतो. अजिंक्यला एक क्षण काही समजतच नाही. नाकावर आणि गालावर ती छत्री लागते. नाकातून तर रक्त सुरूच झाल. अजिंक्यने मग जाकेट काढल. आणि स्नेहलला दिल आणि त्याला मुलाला मारायला सुरुवात केली. एका हाताने घटत त्याचा शर्ट धरून अजिंक्य एकामागे एक बुक्क्या त्याच्या नाकावर मारायला सुरुवात करतो. दोन तीन बुक्क्यातच त्याचा नाक आणि ओठ रक्तात भरत. त्याच्या हातातल्या छत्रीने तो अजिंक्यला अंदाजाने कुठे हि मारत असतो. स्नेहल त्याला अडवण्याचा प्रयत्न करते पण अजिंक्य ऐकत नाही. रस्त्यावर लोक जमा झालेले असतात. ऐश्वर्या तिथून निघून जाते. स्नेहलला स्नागून ती जाते. स्नेहल अजिंक्यला अडवायचा प्रयत्न करते. पण तो ऐकत नाही बघून मग ती पण त्या मुलाला मारायला सुरुवात करते. अजिंल्यच्या हातातून चमक येते. तो बाजूला होता. आणि डोळे मिटून हाताच्या बोटांची उघड-झाप करतो. आणि तेवढ्यात तो मुलगा एक जोरात लाथ अजिंक्य्च्या पोटात मारतो. आणि  अजिंक्य मागे पडतो. स्नेहल जोरात ओरडते आणि अजिंक्यला उठवते. तो मुलगा तोपर्यंत उठून पळून जातो. अजिंक्य उठून त्याच्या मागे पळत जातो आणि त्याला पकडतो. स्नेहल अजिंक्यची बुलेट चालवत त्यांच्यापाशी येते. अजिंक्य त्याला मारत असतो. आता त्या मुलाची पुरी ताकद संपलेली. अजिंक्य स्नेहलला कॉल करायला सांगतो. ती लावते. स्पीकरवर कॉल असतो. अजिंक्य त्याला सॉरी म्हणायला सांगतो तिला. तो म्हणतो. अजिंक्य त्याला सोडतो आणि स्नेहला घेऊन बुलेटवर बसतो. स्नेहल गाडी चालवते. अजिंक्य मागे बसून जाकेट घालतो आणि रूमला नाकाला धरून बसतो. रक्त येतच असतो. एका दवाखान्यापाशी स्नेहल बुलेट थांबवते. दोघ आत जातात. अजिंक्यला पट्टी लावली जाते. नाकात औषध लावलेले कापसाचे बोळे ठेवले जातात. काही औषध घेऊन अजिंक्य बाहेर येतो. मागून स्नेहल हि येते. दोघ काहीच बोलत नाही. अजिंक्य चावी मागतो. स्नेहल देते. अजिंक्य बुलेट सुरु करतो. स्नेहल मागे बसते.

स्नेहल : आपल्याला एकेठिकाणी जायचय होत ? जमेल यायला ?

अजिंक्य : कुठ ?

स्नेहल : ऐश्वर्याच्या घरी. 

   
Next Part released on 15th april 


1 Comments

Newest