अनाहक

कधी न कुणाला समजलेला अजिंक्य, तिला समजून घेतो. जगात कुणी कुणावर करत नाही इतक तिच्यावर प्रेम करतो. स्वतःचा जीव एक मुठ इतकाच पण त्यात हि तो फक्त तिला जागा देऊन बसलाय. जितके रोजचे ठरलेले त्याचे श्वास आहेत त्याहून कित्येक श्वास तो तिला सकाळी बघून एका दमात घेऊन टाकतो. तिच्या एका नजरेत बसून बाकीचा पूर्ण दिवस जगून घेतो. स्वतः हसत नाही पण तिला हसवण्यासाठी कितीतरी जीवाच्या कराराने प्रयत्न करतो. ती जरा हि नाराज होऊ नये म्हणून तिच्या आसपासच्या लोकांना तिच्या बद्दल बरच काही सांगत असतो. स्वतः एक लेखक असून जगाला फक्त तिच्याच गोष्टी सांगत असतो. जग त्याच्या या गोष्टींची तारीफ करत असत आणि तो फक्त तिची तारीफ करण्यात व्यस्त असतो. ती आहे म्हणून तो आहे असा समज करून घेऊन तो रोज रोज एक एक दिवस जगत असतो.
किती मोठा दिवस असतो ना प्रत्येकाचा तो तिच्या तोंडून स्वतःच नाव ऐकून घेई पर्यंत वाट बघतो तिने एकदा नाव घेतल ‘अजिंक्य’ कि त्याचा दिवस पूर्ण होऊन जातो. प्रेम आहे ते त्याला माहित आहे तिला नाही. त्याला तिच्यावर प्रेम आहे खूप सार तिला आहे कि नाही माहित नाही. ज्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नाही ते करून पण तो खुश असतो. प्रेम-प्रेम म्हणजे काय असत ? जमेल तितका वेळ सोबत असण. कारण नसताना हि मन भरून हसण असत. काही झाल नसेल तरी काळजी करत बसण असत. एक हसू आणण्यासाठी कित्येक तरी त्यामागे प्रयत्नांची शर्त ठेवण चालू असत. यात स्पर्श कुठे हि नाही. ओठांचा ओठांशी मिलाफ व्हावा हि अपेक्षा ठेवण हि नसत. बस ते एक प्रेम आहे खर, हे खर प्रेम एवढच काय ते असण. आणि एवढ करून जेव्हा ती नजरेसमोरून काही काळ जाणार असेल तर तिच्या आठवणीत एकट राहण असत. 
अजिंक्य वाईट नाहीच कधी पण तिच्या नजरेत वाईट व्हायला त्याला आवडत नाही. पण, नजरेसमोर ती नसताना अजिंक्यचा एक एक दिवस सुरु होऊन संपणार कसा ?  आणि सुरु न झालेले दिवस कापून तो त्याच आयुष्य जगणार कसा ? या विचारात तो तिला प्रेम व्यक्त करण्याच्या नादात स्वतःला वाईट करून टाकतो. आणि त्यात खुश होऊन जातो. त्यात तो चुकला नक्की पण प्रेमात जे केल जात ते चूक किंवा बरोबर अस कुठ असत ?
आपण केल तर चूक आणि जगाने केल तर बरोबर असा नियम लिहिलेला कुठ आहे ? जिच्यामुळे आयुष्याला नवीन सुरुवात झाली त्या आयुष्याला संपवण्याचा विचार का करेल तो ? शेवटी तो त्याने आयुष्यातल हे प्रेम काही काळ नजरेआड करण्याचा प्रयत्न केला खरा पण चांगला अजिंक्य वाईट झाला त्याच काय ? त्याने केल जे तिला नको होत. त्याने केल जे त्याला हि नको होत. पण त्याने केल कारण तिच्या पासून स्वतःच मन बाजूला जाव म्हणून. तिला हि त्याची आठवण येवू नये म्हणून, स्वतःचा विचार करता करता, तिचा हि विचार अजिंक्य इतका करायला लागला कि जो विचार तिने कधीच केला नव्हता. आणि मग ती नाराज झाली. जितकी ती आजवर कधी झालीच नव्हती. मग झाली एक गोष्ट जी तिच्या ध्यानी नव्हती. आणि त्याने केली एक गोष्ट जी त्याच्या मनी नव्हती. रोज तिचा हसरा चेहरा बघून दिवस संपवण्याचा अजिंक्यचा जो क्रम होता. तो आज मोडला. ती गेली त्याला न बघता. आणि अजिंक्य राहिला आजच्याच दिवसात अडकून. तो पुन्हा पुढे जगेल कि नाही माहित नाही. पण, तिच्यावर त्याच प्रेम कमी झाल का ? 
जराही नाही. पण हे तिला समजेल का ? माहित नाही. प्रेमात सगळ माफ असत पण चूक सुधरायला पुन्हा ते आधीचे होतील का ? ठाऊक नाही. आणि जर आलेच कधी ते समोरासमोर तर तिच्या नजरेत अजिंक्य पुन्हा तोच असेल का ? आता ते वाटत नाही. 
अस हि अजिंक्य एकाला जीव लावला कि स्वतःच प्रेम दुसऱ्याला वाटत नाही. तिच्यासाठीच प्रेम तिलाच फक्त आणि तिच्यासोबतच राहील. जगात कुणी कुणावर करत नाही इतक प्रेम त्याच तिच्यावर आहे. हे तिला कधी कळेल का ? समजत नाही. 
तिला नाराज करून अजिंक्य तरी आता खुश होऊ शकेल कि नाही हे आता समजत नाही. चूक होते, पण त्याने चूक ठरवून केली त्याला ती माफ करेल अस आता वाटत नाही. शेवटी खऱ्या प्रेमाचा शेवट असतोच हि म्हण आठवायला लागते. खर प्रेम असेल तर त्याचा शेवट का होतो ? कळत नाही. आणि तिला ते जरा जरी समजल तरी त्याचा काही उपयोग असणार आहे ? माहित नाही. 
सगळ्या प्रश्नांची उत्तर ती घेऊन निघून गेली. न सांगता, एक नजर हि मागे वळून न बघता. आणि राहून गेल एक स्वप्न खर प्रेम करण्याच. जे पूर्ण होईल कि नाही......
माहित नाही...
copyrighted@2021


 

0 टिप्पण्या