तिचा विषय

 

समोरासमोर दोघ. तिची बडबड तो मात्र शांत. तिच्या ओठांची इतकी हालचाल आणि तो मात्र गुपचूप हाताची घडी घालून बसलेला. तिच्या केसांची बट एकावर एक रेलून थकलेल्या अशा, एका वाऱ्याच्या शोधात होत्या. तीच बोलण क्षणभर थांबल जेव्हा, ते पण तिने त्याला प्रश्न केला एक तेव्हा, त्याने हो म्हणून एक सुस्कारा टाकला, त्या होकाराच्या वाऱ्याने तिची बट जागची हालली. ती बट खुश झाली. आणि तिला तिच्या प्रश्नाच उत्तर मिळाल म्हणून तीही खुश झाली. मग आणखीच लाडात येत ती अजून पुढे बोलायला लागली.

बोलता बोलता पायांना पाय लागले आणि तिने त्याकडे दुर्लक्ष केल. आणि त्याला त्या स्पर्शात पण आनंद मिळत होता. त्याने तिच्याकडे बघतील. त्या क्षणी ती थांबली. त्याने स्वतःच्या पायाकडे बघितल. आणि तिने हि. पुन्हा दोघांची नजर समोर झाली. आणि दोघांनी डोळ्यातच एकमेकांना हसून दाखवल. तिने पाय जरासा बाजूला केला. मग पुढे पुन्हा तिचा विषय सुरु झाला. बर अस बोलन सुरु असताना तो मात्र फक्त ऐकायच्या भूमिकेत होता. पुन्हा बोलता-बोलता तिचा पाय पायाला लागला. आणि ते आत्ता तिला जाणवल आणि तीच वाक्य अर्ध्यात अडकल. ती थांबली. तिने त्याच्याकडे बघितल आणि नजर फिरवून ती त्याच्यापासून लांब झाली. आणि मघापासुन नजर देऊन बोलणारी ती नजर तोडून बोलयला लागली. त्याला आता कसस झाल. तो सरकला तिच्याकडे. आणि तिची धडधड वाढली.

तिने विचारल काय झाल ? आणि तो गप्प बसून तिला बघत राहिला. तिने तिचा हात पुढे केला. त्याने तो गोरा हात बघून त्या खाली स्वतःचा हात अधांतरी धरला. तिने त्याला बघितल. त्याने तिला बघितल. आणि तो काहीच करेना मग तिनेच स्वतःचा हात त्याच्या हवाली केला. त्याने गोड हसून फक्त तिला एकवार बघितल. तिने लाजून नजरेला एकवार बाजूला केल.

तो : हा हात मी पहिल्यांदा घेतलाय....तुझा स्पर्श हा पहिलाच आहे. हातात हात हि खुण तशी जबाबदारीची आहे. हो ना ?

ती : हा असेल बहुतेक. मग ?

तो : का दिलास तुझा हात माझ्या हातात ?

ती : असच. तुझ्यावर विश्वास आहे म्हणून.

तो : हि जबाबदारी मला घेऊ देशील ? आयुष्यभरासाठी.

ती : जमेल तुला ?

तो : कळेल तुला.

दोघांची नजर एकमेकांत गुंतली. आणि दोघांतल अंतर आणखी कमी झाल. हातातले हात केव्हाच एकमेकांभोवती गेले आणि मग...

copyrighted@2021CONVERSATION

0 Comments:

Post a Comment