एक होती ती, हा तीच ती, जिचा जीव होता
माझ्यावर. जिच प्रेम होत माझ्यावर. जिच सगळ आयुष्य माझ्याशी जोडलं गेलेलं. त्या
आयुष्यासोबत तीच नशीब आणि तीच भविष्य जोडलं गेलेलं. एक श्वास माझा फुलला तर तिला
धाप लागे. माझ्या त्रासाच, दुःख तिला व्हायचं. तिचा दिवस सुरु व्हायचा माझ्या
पहिल्या मेसेजने. तिची रात्र संपायची माझ्याशी बोलून. पूर्ण दिवस काय मग मी आणि
तीच. (फक्त).
या अशा कित्येक गोष्टींशी आणि गोष्टींनी
माझ्याशी जोडली गेलेली ती अचानक तुटली. माझ्याशी तिची सगळी जवळीक तुटली. तुटलेल्या
त्या नात्याने मी किती तुटून गेलोय आतून हे तिला कळालच नाही. कोणी तिला माझ नाव विचारल
तर तिला ते आठवलच नाही. हा इतका परकेपणा ना कधी तिच्यात होता न माझ्यात. नाही
आमच्या आयुष्यात. तरीही हा आता परकेपणा घेऊन फिरताना मी या जगात परकाच आहे.
जिच्यासाठी आख्ख एक जग विसरून गेलो आणि या जगात वावरताना फक्त तिलाच बघून चालत
राहिलो. आज ती नाही मग हे जग तरी मला त्यांच समजेल कस ? एक ओळ ती, “माझ तुझ्यावर
प्रेम आहे” म्हणण्यात लावलेला मी सहा महिन्याचा वेळ, एकमेकांपासून लांब व्हायला एक
सेकंद, अममम...एक क्षण हि पुरला नाही. ज्या गोष्टींची, इतकी बेरीज करत करत एक
पूर्ण आयुष्य स्वप्नांत रंगुवून ठेवल अशा चित्राला तिने पसंती दिली नाही. आणि या
जगाला कधी कळलच नाही कि, मी किती उत्तम चित्रकार आहे.
अस हि चित्रकाराला आजकाल कुठ किंमत
आहे ? तरी हि मी काय कमी कलाकार नाही. तिच्या आई वडिलांनी त्यांच्या आवडिच तिला एक
नाव दिल. त्यात त्यांनी एवढ अस काय केल ? मी...हो मीच तिच्या एका नावावर हजार
शायरी, कवितेत कित्येक नाव लिहून ठेवली तिची आणि लोक तिला ओळखतात तिला, तिच्या आई
वडिलांनी ठेवलेल्या त्या नावाने. माझ्या कवितेतल्या नावांना ओळखतात फक्त मी आणि माझ्या
वहीची पानं. जी पानं हि हल्ली कमी होत चालालीयत.
रोज तिच्या आठवणीत सिगरेट ओढताना
त्याची राख तिच्याचसाठी लिहिलेल्या कवितेंच्या वहीच्या पानात भरून मी ती पानं
चुरगाळून टाकून देतो रस्त्यावर कुठे हि. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या वेगाने ती
पान फिरतात रस्त्याने कुठेही. जगासाठी तो असले कचरा खरा, पण ती पानं पण बहुदा तिला
शोधत असतील. खात्री आहे मला. आता हल्ली लिहायला सुचत नाही. सुचल तरी लिहावस वाटत
नाही. माझ इतक मोठ घर नाही कि तिच्यासाठी कितीही लिहील तरी त्याला घरात जागा
मिळेल. मला आठवण येते तिची अगदी रोज, पण रोज मी मला त्रास करून घेऊ शकत नाही. आधीच
तिच्यासोबत कित्येक दिवस घालवले, आणि आता त्या दिवसांच्या आठवणीत कित्येक दिवस
गेले आणि अजून हि जात आहेत. मला जगायचं होत इतरांसारखं खूप खूप वर्ष. वर्ष होतात
तयार एक एक दिवस बनून. गेलेले तुझ्यासोबतचे दिवस आणि नंतरच्या आठवणीतले दिवस मी
मोजले नाहीत कधी कारण ते खूप आहेत आणि खूप दिवसांचे मिळून खूप वर्ष होतात हे मला
माहित आहे. माझ आयुष्य इतक्या वर्षांनी कमी झाल आहे. आणि माझ्याकडे आता कमीच वर्ष
उरलेत. ठरवून पण तिला विसरता येत नाही. अडवून मनाला हि रोखता येत नाही. लिहितो मग
असाच तिच्याबद्दल कितीतरी. तिची आठवण येते पण, हा झाला एक माझा प्रश्न ज्याला आता
कोणताच पर्याय नाही...
0 टिप्पण्या