फिक्र

 

 

एक दिवस जगता जगता अखेर दिवस संपल्याच दुःख प्रत्येकालाच होत. मला हि होत. पण आजसारखे आणखी असे कित्येक दिवस तुला बघण्यासाठी घालवण्याची माझी हि आत्तापासून तयारी आहे. तुझ्या एका हसऱ्या ओठांना बघून माझे ओठ नकळत हसरे होत असतात. एखाद्या आळस देणाऱ्या व्यक्तीला बघून आपल्याला हि आळस येतो तसच अगदी आहे माझ. तुझ हसण बघून मी हि खुश होतो. आणि ते एक हास्य दिवसभर माझ्या ओठांवर टिकून असत तुझ्या आठवणीसकट. तुझ्या श्वासांना मोजलयस ? मी मोजल आहे. प्रत्येक श्वास. तुझी माझी भेट होते जेव्हा तुझा फुललेला श्वास बघून माझ्या श्वासात मी बदल करतो. तुझ्या श्वाससोबत आत आणि बाहेर करायला लागतो आणि तिथून पुढे दिवसभर मी तुझ्या इतकेच श्वास घेतो. तुला खुश बघण्यासाठी मी काहीही करू शकतो. कारण मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. प्रेमात काहीही करतो माणूस. मी तर तुझ्यासाठी काहीही करू शकतोच आणि आता तर तुझ्या मी प्रेमात हि आहे त्यामुळे मग विचार कर मी तुझ्यासाठी किती आणि काय काय करेन ते.

तुझ्या त्या नाजूक बोटांना धरून प्रेम अनुभवू शकत नाही. पण त्यांना स्पर्शून बस तुझा नाजूकपणा अनुभवू शकतो. जितकी तू नाजूक आहेस तितकी तू मानसिक नाजूक नाहीस. खंबीर आहेस. तुझ्यात काही खास आहे. आणि तू स्वतः खास आहेस. हे जग सुंदर आहे वेगळ आहे. मला विचारशील तर मी सांगेन तू जगावेगळी आहेस. एकदम खास आहेस. एकदम स्पेशल. तुझ्या त्या छोट्याश्या डोळ्यात मी मला पूर्ण दिसत नाही. आणि जेवढा दिसतो तो हि स्पष्ट दिसत नाही. मला चष्मा आहे. आणि मी तो तुला बघताना घालत नाही. आणि म्हणून तुझ्या डोळ्यात मला मी स्पष्ट दिसत नाही पण अस हि, तुझ माझ्यावर अजून प्रेमहि नाही.

हे तुझे केस, आज खास मला वाटले, रोज थंडी वाजते तशी पण ती अंगाला फक्त लागते. तुझ्या जवळ आल्यावर जे काही तुझे केस तुज्यापासून अलग होत माझ्यासाठी आतुर झाले. त्या त्यांच्या हालचालीत जे वार तयार झाल ते माझ्या अगदी अंगात शिरलं. हा हसू येईल तुला असल माझ बोलन ऐकून पण माझ प्रेम सध्या काल्पनिक आहे. आणि काल्पनिक प्रेमाला कल्पना तर हवीच. तुझ मिळेल जेव्हा कधी प्रेम हे निसर्ग चक्र तुझ्या पायाशी आणून ठेवेन खास तुझ्यासाठी. कारण निसर्ग हा किती हि सुंदर असला तरी तुला मी काही दिवसात इतक बघितल आहे, कि तुझ्या इतक सौंदर्य मला या निसर्गात कोणत्या हि गोष्टीत दिसलेलं नाहीये. आणि असेल तर, मला ते जाणून घ्यायचं नाहीये. तुझ्या विरुध्द प्रतिस्पर्धी मला माझ फक्त प्रेम हव आहे. आणखी दुसरी कोणी नको.

तुला बघताना मी किती तरी प्रेम माझ्या डोळ्यात आणून त्या प्रेमाला तुझा चेहरा दाखवत असतो मी. तू जवळ नसताना तुला कितीतरी वेळा मनातून हाक मारत असतो. तू जवळ नसताना नेमक तुलाच सर्वात जास्त आठवत राहतो. तुझ्या विषयी ठरवून सुध्दा तुझा विषय टाळू नाही शकत. तुला माझ्या मनात शोधताना मी मला हरवून जातो. मी मग सकाळी हरवलेला असतो. आणि तुला बघून पुन्हा मग मी मला सापडतो. मी मला सापडतो. हरलेल्या, थकलेल्या अवस्थेत. आणि अशा अवस्थेत तुला मी आवडणार नाही ना ? म्हणून मग मी मला सुधारतो आणि पुन्हा तुझ्या समोर हाजीर होतो. पुन्हा मग नव्याने तुला बघून तुझ्या प्रेमात पडण आणि पुन्हा काही वेळाने तुझ्यापासून दूर होऊन त्याच केलेल्या प्रेमाला आठवत रडवेल होऊन जाण आता हल्ली रोजचच झाल आहे. कशात लक्ष लागत नाही. कुणी आवडत नाही. कशाशी घेणदेण उरलेलं नाहीये. सकाळ माझी दिवस तुझा. इतकच माझ आयुष्य मी बनवून टाकल आहे, माझ भविष्य तुला समजून. जास्त काही अपेक्षा नाही. पण कमी हि माझ प्रेम नाहीये. जीव लावला आहे तुझ्यावर. बस तो तसाच राहील. काळजी आहे मला तुझी. आणि काळजी आपली प्रेम असणाऱ्यावरच असते ना ?


0 टिप्पण्या