तिचा होकार

 

त्याने आज ठरवलेलं स्वतःशी कित्येक दिवसातून कि, झाल गेल सगळ विसरून आता नवीन आयुष्य सुरु करायचं. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु झाले. बाहेर जगात वावरताना कित्येक आठवणी आणि विचारांना विचारामागे करून त्याचे दिवस असे एक एक करत जात होते. संपत होते. पण एकटेपणा तो जरा हि कमी झाला नाही. दिवसभर आठवल नाही तरी रात्री झोपताना एकटेपणा पांघरुणासोबत जवळ यायचा. जवळचा मोबाईल घेऊन डोळे दुखेपर्यंत त्यात काही न काही बघून झोपावं म्हंटल त्याने तरी डोळे मिटल्यावर पण तो एकटेपणा त्या शेवटच्या श्वासात जाणवून जायचाच. कारण त्याच्याच सारखा त्याचा श्वास एकटा. येताना एकटा आणि जाताना हि एकटा. 
त्याने शोध घ्यायला सुरुवात केली नव्या एका प्रेमाची. ज्यात प्रेम असेल. साथ असेल. सोबत आणि बरच काही असेल. शोध बराच चालू होता. महिना दोन महिना नाही, तर लगभग दोन वर्ष. काय होत नाही या एवढ्या दोन वर्षात ? आकडा फक्त दोन असला तरी सातशे दिवसाचं हे वर्ष कस काढल असेल त्याने त्याच त्याला माहित. शेवटी त्याच्या नशिबाला हि त्याची दया आली असेल. आणि त्या दयेसारखीच अचानक एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली. ती मुलगी सुंदर होती, छान दिसत होती, छान बोलत होती अस मी लिहील तर वेगळ अस काय ? प्रत्येक मुलगी हि सुंदरच असते. तशीच ती हि तशीच होती. आणि त्याला ती जास्त विचार न करता आवडली हि. आधी ओळख मग मैत्री, पुढे मैत्री आणखी घट्ट झाली. ते प्रेम नव्हत. पण तो तस समजून गेला. तिला मनातल बोलून गेला. सगळ सांगून बसला. तीही वेडी सगळ ऐकून घेऊन मग त्याला बघून हलकीशी हसली. 
ती हसली म्हणजे तिचा होकार याला वाटला. ती जवळ आली. त्याचा हात हातात घेत म्हणाली, तुला मिळेल माझ्याहून चांगली. आणि या एका वाक्यावर त्याने सगळ सगळ सांगितल कि तो किती काही करू शकतो तिच्यासाठी. आज उद्या आणि परवासाठी नाही फक्त तर आयुष्यभरासाठी. तिने ऐकून घेऊन पुन्हा त्याला समजावलं आणि प्रेम नको मैत्री बस म्हणून त्याच्या नात्याला आवर घातला. त्या बंधनाचा आवर त्याला नको होता. कारण त्याच प्रेम, त्याला सीमा नव्हती. आणि नेमक त्याला नको असलेली सीमा ती घालत होती. 
त्याच प्रेम खूप असून पण तिच्या कारणापुढे तो हरला. त्याने स्वतःला शांत केल. पण मन शांत नाही झाल. ती निघून गेली त्याला समजावून. जाता जाता तो तिच्यामागे गेला. तिने वळून एकदा त्याला बघितल. एक हसू चेहऱ्यावर आणल. तो खुश झाला आणि तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. आणि तिने हसून त्या कॉलवर बोलायला सुरुवात केली आणि.... तो जागेवरच थांबला. आधीच तुटलेल्या हृदयाला त्याने कस तरी या दोन वर्षात जोडून तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केलेली. पण तिला तर हव होत आख्ख अस हृद्य आणि ते नेमक त्याच्याकडे नव्हत. तो हरला. पण एक सांगु तिच्याकडे तर हृदयच नव्हत. ते केव्हाच कुणीतरी नालायक घेऊन गेलेला. तिच्या भावनांशी खेळून. आणि बिना हृदयाची ती अपेक्षा ठेवत होती आख्या हृदयाची.
खर प्रेम ओळखण तस..अवघडच.     

copyrighted@2021

 


0 टिप्पण्या