त्याला वेळ नसतो

 

आपण एखाद्यावर प्रेम करतो. मनापासून. अगदी जिवापाड. बदल्यात कशाची अपेक्षा न करता. त्याची काळजी घेण. त्याच्याशी तास-न-तास बोलण ते हि मनात, त्याची वाट बघण, त्याचाच सतत विचार करणं आणि एवढ सगळ करून एक एक अख्खा दिवस त्याच्यासाठी वाया घालवायचा आणि बदल्यात मिळत काय ? तर त्याचा कोरडेपणा.

आपल्याशी बोलायला त्याला वेळ नसतो. बोलण झालच तरी काहीतरी कामाचच. भेट झाली तरी निमित्त फक्त. सगळ कस चुकून जुळून आलेल. ठरवून केलेलं माझ प्रेम फक्त. आणि ठरवलेलं कधी ठरवल्याप्रमाणे घडतच अस नाही ना. ज्या तुटलेल्या हृदयाला कुणाशी तरी जुळवून घेण्याचा प्रयत्न एक प्रेम करून केला तरी जगात कोण असत आपल्याशी जुळवून घेणार ? डोक्यात इतके सारे विचार असतात, घरातल्या परिस्थितीशी जुळवून घेताना जो काही ताण या मनावर येतो त्यातून बाहेरच्या जगात वावरताना जे काही हाल या हृदयाचे होतात त्यात दिवसातून एकदा सुख हव असत. ते सुख मिळत फक्त तिला बघून. आणि ते सुख हि रोज नसेल मिळणार तर काय अर्थ या एकतर्फी प्रेमाचा. प्रेम खर खोट हा विषयच नाही. प्रेम आहे. होत आहे. आणि रोज वाढत आहे पण सांगून सहज टाकण्यासारख हि नाहीये. प्रेम होत अगदी सहज पण ते सहज व्यक्त होता येत नाही, आणि व्यक्त झाल तरी पुढच्याला ते अगदी सहज समजत नाही. प्रेम आहे म्हणून नुसत दिवस कसे सरणार ? प्रेम नाही म्हणून मीच मला कस फसवणार ? नुसती कसरत ती मनाची आणि त्या हृदयाची. हाल यात माझ्या शरीराचे. ज्याला हवा आहे स्पर्श एक तिचा, का ? ते माहित नाही पण जितका तिला बघण्यात आनंद मिळतो त्याहून जास्त आनंद त्या स्पर्शात असेल अशी शा या मनाला आहे. तुटलेल्या हृदयाला आहे. आणि आनंद मिळवण्याचा हक्क जगात प्रत्येकाला आहे.

माझ प्रेम आहे ती, फक्त आवड नाही. कारण आवड नंतर बदलू शकते. प्रेम तेच आणि तसच राहत. त्याच त्या माझ्या एकतर्फी प्रेमाला सांभाळत मी असा अजून किती राहणार ? त्याला सोबत हवी आणखी एका हृदयाची. आधीच निम्म हे आयुष्य जगलो आहे अर्धवट परिवारात. आणि प्रेम हि मला असच पोसायच असेल अर्धवट तर कीव यायला लागेल माझी मला. मला फक्त सोबत हवी. प्रेम हव. आणि बाकी काही नको. जे काही असेल ते सगळ मी पूर्ण करेन तिच्यासाठी. तिने फक्त माझ एक प्रेम पूर्ण कराव. बाकी... तिची आठवण येते सारखी. उद्या पुन्हा भेट होईल त्याच नेहमीच्या वेळी. आणि माझ्यातल एक प्रेम आणखी वाढेल. स्वतःला त्रास करून घेण्यासाठी. तिची आठवण येतेय खरच खूप आत्ता पण...     

copyrighted@2021

0 टिप्पण्या