RARE LOVE

मला वाटल नव्हत कधी इतकस असत हे प्रेम. जे पहिल्यांदा बघून मग वाढणार आकर्षण नंतर होणारी ओळख आणि मग पुढे वाढत जाणारी एकमेकांना भेटण्याची ओढ. ती ओढ आणि त्याला मैत्री नावाच्या नात्याची जोड मिळाली कि आतून जी घालमेल सुरु होते तिच्यात आणि माझ्यात त्याला प्रेम म्हणून मग समागमाच्या स्वप्नात जगत सत्यात कधीतरी समागम करून मग केलेल्या गोष्टीच्या बदल्यात एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न. हे आतच असत प्रेम. प्रयत्न एकमेकांसोबत राहण्याचा खूप तसा अवघड असतो. त्या मनाने समागमाचा प्रयत्न अगदी साधा सोप्पा राहतो.

कित्येक गोष्टी मनात असतात पण त्या सगळ्या मनात एकाबाजूला ठेवून फक्त आणि सगळ चांगल बोलून पुढच्याला आपण किती चांगल आहे हे दाखवण्याचा आभास असतो प्रत्येक प्रेमी युगुलाचा. प्रत्यक्षात मनाचा खरेपणा कळायला लागतो तो दुसऱ्या समागमानंतर. त्याआधीच सगळ आभासी असत. आभासी जगात जगणारा तो आणि ती कितीतरी खुश असतात. प्रेमात आनंद असतो नक्कीच असतो पण खऱ्या प्रेमात फक्त त्रास असतो. माझ पटत नसेल तर खऱ्या प्रेमाचा विरह झालेल्याला विचारा. असो, आभासी वातावरणात जगत-जगत जेव्हा खऱ्या आयुष्यातल्या कित्येक गोष्टींचा हिशोब ठेवून त्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न सुरु होतो. तेव्हा एकमेकांना वेळ पुरत नाही नाहीतर वेळच नसतो. एकमेकांच मन समजून घेणारे आता कुठ तरी कमी पडतात किंवा पूर्णपणे अनोळखीच होतात. एकमेकांचा सहवास हवा-हवासा वाटत असे पण तो आता नकोसा वाटतो किंवा मग कमी वाटतो.

त्याला ती सुंदर, तिला तो handsome वाटत असतो पण आता त्याला ती जराशी जाड आणि तिला तो जरा बारीक वाटायला लागतो. तिने घरून आणलेल्या पदार्थावर तव मारणारा तो आता त्याला ते खाऊस वाटत नाही. त्याने दिलेल्या वीसच्या कॅडबरीमध्ये तिला आनंद वाटत नाही. प्रत्येक भेटीत फिरायला जायची आवड असणारी ती दोघ आता शक्यतो भेटायच टाळतात काही कारण सांगून आणि भेटलेच तर मग एका खोलीत भेटून सोबत man न आणता समागमाचा आनंद घेतात. आणि आनंद हा मनाला मिळतो शरीराला नाही. आणि या दोघांची मन सोबत नसताना तो समागम तो कसला ?

पुढे मग विरह होत जातो. जो जाणवत असतो. जस कि सुरुवातीला एकमेकांना एकमेकांबद्दल प्रेम जाणवत असत अगदी तसच. जस प्रेम होताना  स्वतःवर ताबा राहत नाही. ते होत. आणि होऊनच गप्प बसत. प्रेमात केले जाणारे कित्येक प्रयत्न हे अवघड असतात पण ते माणूस म्हणून तो आणि ती दोघ हि जीव लावून करतात. तसाच हा विरह हा होत आहे हे जाणवत असत पण ते थांबवण्याचा प्रयत्न सोप्पा असून हि तो प्रयत्न करण जमत नाही. शेवटी विरह होतो. मग आठवणी, सवयी, त्रास हे सगळ सुरु होत आणि मग प्रेमातल खरेपण जाणवायला सुरुवात होते. पण उशीर होऊन काय होत ? काहीच नाही. आणि मग असा तो आणि ती खऱ्या प्रेमाचा अनुभव घेऊन मग कित्येक वेळा खोट्या प्रेमासोबत वेळ घालवतात. खर प्रेम म्हणूनच हल्ली फक्त सिनेमा, गाणी आणि गोष्टीत राहील आहे. पाणी, प्राणी, झाड यांसोबत खर प्रेम हि दुर्मिळ होत चालल आहे. हेच खर. हो ना ?

copyrighted@2020 

 0 टिप्पण्या