corona : कोरोना

corona virus. corona virus people deth. corona virus world. corona virus news. corona update. corona medicine. corona info.
corona

भाग ०१

प्रियांका सकाळी आठ वाजल्यापासून निखिलला व्हिडीओ कॉल करत होती. निखिलच इंटरनेट बंद होत. काल रात्री सहाला ऑफिसला गेलेला निखिल आज सकाळी सव्वा सातला येऊन झोपला. झोपायच्या आधी त्याने प्रियांकाला मेसेज केला होता पण तेव्हा तीच इंटरनेट बंद होत. त्यामुळे तो लगेच झोपला. प्रियांका आणि निखिल दोघ भारतातले. दोघ हि कॉम्प्युटर इंजिनिअर. पण दोघ वेगवेगळ्या देशात नोकरीला. दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या वेळा आणि त्यामुळे दोघांच्या नोकरीच्या वेळा वेगळ्या. ती नोकरीवरून घरी आली कि याला नोकरीला जायला एक तास उरलेला असायचा. मग त्या एका तासात आवरत-आवरत कपाटातला शर्ट शोधण्यापासून, बाथरूममध्ये दात घासत-घासत अंघोळ करून पुन्हा कपडे घालून चहा बनवून चहा पिऊन ऑफिसच्या कॅबमध्ये बसून ऑफिसपर्यंत व्हिडीओ कॉल वर बोलत-बघत तो एकदा आत ऑफिसमध्ये गेला कि मग प्रियांका झोपायची. आणि हा त्याच काम सुरु करायचा. तो सकाळी आला कि हि कामाला जायची तयारी करायची. त्याच्यासारखंच कॉलकरून सगळ ती स्वतःच आवरून ऑफिसला जायची. दोघांच्यात अंतर खूप होत. पण व्हिडीओ कॉलमुळे जवळ असल्याचा अनुभव त्यांना रोज येत असायचा. नुसत्या साध्या कॉलपेक्षा व्हिडीओ कॉल जिवंत वाटायचा त्यांना.

दोघ एकाच कॉलेजला बारावीपर्यंत शिकले. पुढे तिने कॉम्प्युटर इंजिनिअर व्हाव अस तिच्या वडिलांना वाटल म्हणून तिने ते शिक्षण सुरु केल. लागलीच निखिल पण तेच शिक्षण घ्यायला त्याच कॉलेजमध्ये आणि तिच्याच वर्गात जाऊन बसला. तिला हि तेच हव होत. डिप्लोमा तीन वर्षात होऊन गेला. त्याचा शेवटच्या वर्षी एक विषय मागे राहिला. ती पास झाली. पण त्याच्यासाठी तिने एक वर्ष उशिरा डिग्री शिकायला सुरुवात केली. त्या एका वर्षात त्याने राहिलेला विषय सोडवून टाकला. इतकी सवय इतक एकमेकांबद्दल प्रेम आणि या प्रेमाला कोणताही विरोध नसल्यामुळे दोघ खुश होते. आधी प्रेम मग काळजी आणि कधी तरी किस आणि मिठी या पुढे दोघांनी हि न जाण्यासाठी स्वतःच्या मनाला आवर घातलेला. डिग्री करत करत दोन वर्ष संपून गेले. आत्ता पर्यंतच आयुष्य कस हि करून एकमेकांसोबत, एकमेकांजवळ राहता-फिरता-येता येत होत. हव ते निवडता येत होत. पण प्रत्येक वेळी अस होणार नाही हे त्यांच्या लक्षात आल नाही. आणि ते आणून देणार हि कुणी नव्हत. कारण त्याचं प्रेम प्रकरण कुणालाच माहित नव्हत. आणि ते बाहेर फिरत असताना मित्र मैत्रीण जसे असतात तसे वागत. त्यामुळे त्यांच्या सोबतच्या मुला-मुलींना पण कधी यांच्यावर संशय यायचा नाही. डिग्री झाली. दोघ पास झाले. नोकरीसाठी कॉलेजमध्ये जॉब्सचे कॉल्स आले. खूप कमी मुलांची निवड झाली त्यात हे दोघ हि होते. त्या खुशीत दोघांनी इंटरव्हिव झाला कि एका कॅफेत भेटायचं ठरवलेलं. त्याप्रमाणे कॉलेजच्या बाजूला असलेल्या एका कॅफेत प्रियांका जाऊन बसली. खुश होती ती. एक कॉफी पीत-पीत ती निखिलची वाट बघत होती. निखिलला वेळ लागला. तो येताना दिसला तेव्हा प्रियांका अजूनच गालात खुश होत गेली. निखिल तिच्या समोर बसला.
प्रियांका : काय झाल ?
निखिल : मिळाला. तुला ?
प्रियांका : हो. मिळाला.
निखिल : कुठ ?
प्रियांका : वुहान.
निखिल : चीन...? जाणारेस ?
प्रियांका : हो. तुलापण मिळाला का चीनमध्ये ?
निखिल : नाही.
प्रियांका : काहीही.. आता मस्करी करू नकोस. सगळ्या कंपन्या चीनमधल्या आलेल्या.
निखिल : हो. पण त्यांच्या ब्रांच दुसरीकडे पण आहेत. आणि मी पण दुसरीकडे लागलोय.
प्रियांका : कुठे ?
निखिल : इटली.
प्रियांका : तू जायचं नाही.
निखिल : का ? मग तूपण जाऊ नकोस.
प्रियांका : चालेल. नाही जात मी. तू पण जायचं नाही. केल तर आपण एकत्रच काम करायचं.
corona virus. corona virus people deth. corona virus world. corona virus news. corona update. corona medicine. corona info.
भाग ०२
निखिल : बर. मग आपण भारतातच काम करू.
प्रियांका : नाही. बाहेर जाऊ. पण एकत्र. वेगवेगळ नाही.
निखिल : मग ह्या मिळालेल्या नोकरीच काय ?
प्रियांका : नकार देऊ.
निखिल : आणि ?
प्रियांका : त्यांना सांगू आम्हाला एकत्र घ्या किंवा मग आमची संधी दुसऱ्याला द्या.
निखिल : अस करतील ते ?
प्रियांका : मी प्रिन्सिपलशी बोलते. तूला चालणार असेल तर. म्हणजे तुला जर माझ्यासोबत नोकरी हि नाकारायची असेल तरच. कारण मला तर तुझ्या इथेच पाहिजे नोकरी नाहीतर नको. कुठेच नको.

ती जागची उठली. वेटर तिथे आला.
वेटर : चहा, कॉफी ?
प्रियांका : नको. मगाशी पिली त्याचे पैसे.
पैसे देऊन तिने निखिलचा हात धरला आणि ती त्याला घेऊन कॉलेजमध्ये गेली. प्रिन्सिपल काही लोकांशी बोलत होते. ते दोघ बाहेर वाट बघत उभे राहिले. प्रियांका विचारात हरवलेल्या स्थितीत भिंतीला टेकून उभी होती. निखिल तिच्याकडे पंधरा मिनिट तसाच बघत असतो. शेवटी तो बोलायला लागतो.
निखिल : या नोकरीसाठीच केल होत ना आपण इंजिनिअरिंग ?
प्रियांका : हो. दोघांनी केल तरी पण दोन वेगळ्या नोकर्यांसाठी नाही.
निखिल : हो पण सगळच आपल्या मर्जीने होईल अस नाही ना ?
प्रियांका : इतके वर्ष  होत आलाच आहे ना आपल्या मर्जीने. मग माघार का घ्यायची आपण ?
निखील : हो पण पुढचा कॉल कधी येईल माहित नाही. तोपर्यंत आपल्या घरी होणारी घरातल्यांची अस्वस्थ मन त्याच काय करायचं ? किती दिवस आपण त्यांना सांगत राहायचं मिळेल नोकरी म्हणून ? वर आजूबाजूचे त्यांना विचारतील पोर हुशार होती चांगले मार्क पडायचे आणि तरी नोकरी नाही. म्हणजे दोष पुन्हा आपल्या घरातल्यांना. सगळी केलेली मेहनत आपल लोकांच्या टोमण्यामुळे वाया जाईल. माझ ऐक. दोन वर्ष करू आपण काम.
प्रियांका : नाही.
निखिल : ऐक तर, दोन वर्ष काम करू बाहेरच्या देशात. अनुभव घेऊ. बाहेर राहायची सवय लावून घेऊ. आणि मग दुसरी नोकरी बघू एकाच देशात. एकाच कंपनीत. हा ?
प्रियांका : ३६५ आणि ३६५...७३० इतके दिवस लांब राहायचं का ?
निखिल : १८२५ दिवस पाच वर्ष काढलेच ना आपण. कसे गेले समजल का तरी तूला ?
प्रियांका : नाही.
निखिल : हा मग ?
प्रियांका : पण तू तेव्हा सोबत होतास. आता जेव्हा नोकरी करू तेव्हा नसशील.
निखिल : कोण म्हंटल अस.
प्रियांका : मीच. मला वाटल, मला आठवण आली तुझी, मला तुझी गरज असली तर तू येऊ शकणारेस का ?
निखिल : होओओओ....!
प्रियांका : तू माझी उगीच समजूत काढू नकोस. नाही येऊ शकणार तू. माहितीय मला. आणि आत्ता का आपल्यात दुरावा वाढला तर लवकर तो नाही भरून निघणार.
निखिल : काहीपण कसा ग तू विचार करतेस ? काही ना काही पर्याय निघेलच ना. बर दोन वर्ष जे काय आपण काम करू त्यात वर्षभरामधे महिनाभर सुट्टी हि असेल. वर्षातून एकदा महिनाभरासाठी भारतात येऊ इथे फिरू.
प्रियांका : नाही. वर्षात एक भेट ? वेडा आहेस का ?
corona virus. corona virus people deth. corona virus world. corona virus news. corona update. corona medicine. corona info.
भाग ०३
निखिल : का काय झाल ?
प्रियांका : कळेल तुला. आत्ता मी अशी समोर आहे ना म्हणून काय वाटत नाहीये. मी नसले ना कि कळेल. मग तेव्हा मला नको सांगू रोमिंग प्लस इंटरनशनल कॉल करून, कि मिस यु. तेव्हा मी काही ऐकून घेणार नाही तुझ.
निखिल : का ?
प्रियांका : तुला माझ ऐकायचं नसेल तर मी का ऐकून घ्यायचं तुझ. तेही जे मी आत्तापासूनच तुला सांगतेय कि पुढे काय होईल. सो मी नाही ऐकून घेणार. त्यासाठी एकच पर्याय आहे.
निखिल : काय ?
प्रियांका : आपण नको जायला.
निखिल : आणि नोकरी ?
प्रियांकाचा मोबाईल वाजतो.
प्रियांका : हेल्लो, पप्पा.

: मिळाली ना नोकरी बेटा ? मी पेढे आणि जिलबी आणून ठेवलीय. शेजारचे पण विचारत होते, आई पण तुझी वाट बघत बसलीय बेटा तू कधी येतेयस घरी ? ऐक मीच कॉलेजमध्ये येतो. प्रिन्सिपल, तुमचे सगळे सर त्यांना पण द्यायला हवेत ना पेढे. तू थांब कॉलेजमध्येच मी आलोच.
तिने मोबाईल खिशात ठेवला.
निखिल : काय झाल ?
प्रियांका : पप्पा न्यायला येतायत मला. त्यांनी जिलबी, पेढे आणलेत वाटायला.
निखिल : पण तुला नोकरी मिळालीच नाहीये ना ?
प्रियांका : आ ?
निखिल : आपल्याला नोकरीच मिळाली नाही मग पेढे कोणत्या कारणाचे ?
प्रियांका : ते येतील आता थोड्यावेळात इथे.
निखिल : हा मग ?
प्रियांका : मी तुला कॉल करते घरी गेल्यावर. मला पप्पांना समजावून सांगितल पाहिजे. मला नोकरी मिळाली नाही ते. काहीतरी घरी जाता-जाता कारण बनवते आणि घरी जाऊन आईला आणि पप्पांना सांगते.
निखिल : चालेल आणि प्रिन्सिपल सरांना भेटायचं आहे ना ?
प्रियांका : नाही आता नको. त्यांना भेटत बसलो आपण तर पप्पा येतील आणि तेपण त्यांना भेटतील आणि मग पुढचा सगळा प्लान संपलाच. नको. मी जाते पप्पांसोबत घरी. उद्या रविवार आहे. उद्या नाही पण परवा आपण लवकर येऊन प्रिन्सिपल सरांना भेटू. ओके ?
निखिल : हो. कारण फक्त भारी शोध. कारण तेच कारण मी माझ्या घरी पण वापरेन बहुतेक.
प्रियांका : हो.
दोघ प्रिन्सिपल सरांच्या केबिनच्या बाहेर उभे होते. तिथून ते कॉलेजच्या बाहेर येऊन थांबले. लांबून प्रियांकाला तिचे वडील दिसले. प्रियांका निखिलला बाय करून त्यांच्यासोबत निघून गेली.
घरी गेली तेव्हा दारात आई उभी होती. आईचे ते डोळे बघून प्रियांकाला काही सुचत नव्हत. वाटेत पप्पा हि खुश होते. त्यांना तिचा गर्व वाटत होता. आणि त्या खुशीत ते तिच्याशी घर येईपर्यंत काही बोललेच नाहीत.
ती आत आली. आईने जाऊन ग्लासात पाणी आणल आणि तिला दिल. उन्हातून तिचे वडील पण आलेले पण त्यांना पाणी आणायचं त्या विसरून गेल्या.
corona virus. corona virus people deth. corona virus world. corona virus news. corona update. corona medicine. corona info.

भाग ०४
आई बाबा तिच्यासमोर उभे होते. तिने पाणी पिऊन घेतल. त्या पाणी प्यायच्या वेळात तिने मनात एक कारण हि ठरवून टाकल.
आई : कुठे मिळाली तुला नोकरी पिया ?
बाबा : हे बघ अगदी पुण्या-मुंबईला असेल तरी चालेल. पण नोकरी लागली म्हंटल कि तू एवढी मेहनत घेतलीस याच सार्थक झाल अस होईल. आणि तू दोन वर्ष वैगरे नोकरी करून अनुभव घेतलास कि मग बघू पुढे लग्नाच. इतक्यात घाई नको.
आई : अहो, आत्ता लग्नाचा विषय नको. पिया सांग ना कुठे लागली नोकरी तुला ?
तेवढ्यात शेजारचे जोडपे आले. त्यांनी पण तोच प्रश्न तिला केला. त्या चौघांचे प्रश्न ऐकून प्रश्न विचारताना झालेली तोंड आणि डोळ्यात दिसणार प्रेम बघून तिने मनात ठरवलेलं कारण सांगायला तोंड उघडल खर पण तिला नाही जमल.
प्रियांका : वूहानमध्ये.
आई : ते कुठ आहे ?
प्रियांका : चीनमध्ये. चीनमध्ये मिळालीय नोकरी मला.
आई : काय ?
बाबा : खर कि काय ?
प्रियांका : हो.
बाबा शेजारच्यांकडे बघत,
बाबा : आमच्या अख्ख्या खानदानात हि पहिली आहे भारताबाहेर नोकरी करणारी. पोरीने नाव काढल माझ्या.
शेजारचे : लोक म्हणतात न एकच असाव पदरी मुल पण ते हे अस असाव. आई बापाच नाव काढणार असाव.
प्रियांका : बाबा.
बाबा : काय ग ? बर मला सांग कधी जाव लागणार आहे तुला तिकड ? म्हणजे मला बँकेतून एफ.डी. सेविंग्ज सगळ काय असेल ते सगळ जमा करून ठेवायला हव. परत तुला कपडे, मेकअपच सामान, आणि बाकीच्या वस्तू पण घ्याव्या लागतील. कमी वेळ असेल न बेटा आपल्याकडे ? परत घाई नको.
प्रियांका : पुढच्या महिन्यात. दोन तारखेला ऑफिसवर बोलावल आहे. त्यांच्याकडूनच रूम वैगरे मिळणार आहे. पण एक आठवडा आधी मला तिथ जाव लागेल. रूमपासून थोड्या अंतरावर त्यांची मेस असेल. आणि आणायला सोडायला त्यांची कॅब कार असेल.
पगार भारताच्या रुपयानुसार सत्तर हजार आहे. पण बाबा मला नाही जायचं.
आई : का ?
प्रियांका : मला तुम्हाला सोडून नाही जायचं कुठे.
आई : अस कस बाळ चालेल. इतकी चांगली बाहेरच्या देशात नोकरी मिळावी अस आपण स्वप्न पण बघितल नव्हत आणि देवाच्या कृपेने मिळालीय नोकरी तर तू नकार देतेयस. एक काम कर तू जरा शांत बस मी तुला खायला बनवून देते. अहो, ऐका गुलाबजाम घेऊन या साखरेचे, पियाला आवडतात ना मग तिलाच खाऊ दे सगळे. तिच्यापूरतेच आणा. आजपासून ती इथे आहे तोपर्यंत तिचे सगळे उरले सुरले लाड पुरवून टाकू.
बाबा : मनातल बोललीस.
शेजारचे आणि बाबा एकदमच बाहेर गेले.
आई आत जेवण बनवायला लागली. प्रियांका घराबाहेर गेली आणि ज्या दुकानात बाबा होते तिथ जाऊन तिने गुलाबजाम घेतले आणि येताना बाबांशी बोलायला लागली.
प्रियांका : बाबा, मला एक सांगायचं आहे तुम्हाला.
बाबा : बोल ना मग. विचारतेस काय. खूप खुश आहे मी तुझ्यावर तू म्हणशील तर आत्ता तुला हव ते घेऊन देतो. बोल तू फक्त. काय हवय का तुला ?
प्रियांका : बाबा. मान्य आहे मला कि मी एवढी मेहनत केली इतके चांगले मार्क्स पाडले. त्यामुळे मला हि नोकरी मिळाली. तुम्हाला मी एकटीच आहे. आईला आणि तुम्हाला वाटायचं कायम एक मुलगा पण असावा पण तुम्ही माझ्या नंतर पुन्हा प्रयत्न केला नाहीत. पण मला मुलासारखच वाढवलत. पण बाबा मुलगा कधी घर सोडून जात नाही ना हो अस आपल्या आई बाबाला.  
corona virus. corona virus people deth. corona virus world. corona virus news. corona update. corona medicine. corona info.
भाग ०५
बाबा : नाही. पण मुलाला आपल्या आई बाबासाठी मोठ व्हाव लागत. कर्तबगार व्हाव लागतच ना ? कर्तबगार केव्हाही होता येत नाही. त्यासाठी एकच संधी देव देतो. ती साधली तर आयुष्याच सोन होत नाही तर मग काहीच उपयोग नाही. तुझ्या हातात आहे संधीच सोन करायचं कि आमच्यासाठी इथे थांबायचं. तू इथे थांबलीस तर आम्ही म्हातारे व्हायच थांबणार नाही. वेळ जात राहील. दिवस निघुन जात राहतील. आज चीनला जात नाहीस. पण नंतर लग्न करून दुसऱ्या घरी जावच लागेल. आता मुलगा काय इथलाच मिळेल अस नाही ना. मिळाला दुसऱ्या गावातला तर तिकडे तर जावच लागेल न तुला ? तेव्हा अस म्हणून चालणार नाही न तुला कि मी लग्न करते पण आई बाबा सोबतच राहते. हेच आयुष्य आहे बाळा. आयुष्यात जे मिळवशील ते एकदाच मिळत जात एवढच लक्षात ठेव. मग ते आयुष्य असो किंवा हि अशी विदेशातली नोकरी. तुला लहानपणापासून बाहेरचे देश बघायची आवड आहे. मग आता तू नोकरी करत हव ते बघू शकतेस. तिथ राहू शकतेस. हव ते करू शकतेस अस असताना तुला फक्त आमचच कारण आडव येतय का ? नाही म्हणजे, मला तर वाटत नाही कि आमच्या काळजीपोटी तू तुझ लहानपणापासूनच स्वप्न आमच्यासाठी ते स्वप्न जगण सोडून द्याव.
प्रियांका : बाबा, मला नाही लपवता येत तुमच्यापासून काही. आणि मला लपवायचं पण नाहीये. मला तुमच्यापासून लांब नाही राहायला जमणार. पण,
बाबा : पण कोणतीही गोष्ट तिच्यातल सातत्य आपल्याला त्या गोष्टीची सवय लावून जातेच. तुला हि सवय लागेल. आणि तू तिकडे गेलीस तर आम्ही पण येऊ ना ग तिकडे. आम्ही तरी कुठ ग महाराष्ट्र सोडून गेलोय फिरायला बाहेर ? लग्न झाल्यापासून कुठेच नाही. तुझ्या निमित्ताने हिला दाखवेन तिकडच फिरवून. तिला पण बर वाटेल.
प्रियांका : हो बाबा पण, मला तुम्ही जसे सोबत हवे आहात आई जवळ पाहिजे तस.
अमम तसच. बाबा एक सांगायचं होत तुम्हाला.
बाबा : बोल.
प्रियांका : निखिल.. माहितीय ना तो मी. म्हणजे त्याला पण नोकरी मिळालीय.
बाबा : अरे वाह.. कुठे ?
प्रियांका : इटली.

बाबा : तुझ्या आईचा आवडता देश. आम्ही लग्न केल होत तेव्हा नव नव नाविन्य होत. ती हे हव ते हव म्हणायची मी आपल तिला हो म्हणून समजूत काढायचो. पण तिने मला तेव्हा खुपदा बोलून दाखवल कि तिला बाहेर जायची कधी संधी मिळाली तर इटलीला तिला जायचं होत. इटली-मिलान ते सगळ बघायचंय तिला.
प्रियांका : हा. त्याला तिथे नोकरी मिळालीय. आणि मला वूहानला.
बाबा : मग ?
प्रियांका : बाबा आमच एकमेकांवर प्रेम आहे.
बाबा : कधीपासून ?
प्रियांका : कॉलेजपासून. पण आम्ही ठरवून सगळ शिक्षण शिकलो. स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी प्रयत्न केले आणि आता नोकरी मिळवली. पण दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळाली.
बाबा : बेटा मी समजू शकतो. आईला माहित आहे का हे ?
प्रियांका : नाही तुम्हालाच सांगितल. बाबा आम्ही अजून त्या गोष्टी केल्या नाहीत. त्याने त्याच्या मनाला कायम आवरत घेतल माझ्या भावनांचा विचार करून. आणि पुढे हि नाही करणार. आमच प्रेम खर आहे. बस तुमची परवानगी हवीय. आम्ही लग्न करू तुम्ही होकार दिलात तरच. तुमच्या मनाविरुद्ध नाही काय करायचं मला बाबा.
बाबा : तुझ्या भावना समजू शकतो मी पिया. आणि तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. तुम्ही तुमच्यातला पोरकटपणा बाजूला ठेवून तुमच ध्येय आधी गाठलं. आणि मग हे प्रेम वैगरे जपण्याचा जो प्रयत्न केलात यातच तुमचा खरेपणा जाणवला. पण मला आधी तुझ्या आईला समजावून सांगितल पाहिजे. ते माझ्यावर सोपव. ऐक तू त्याला उद्या दुपारी बोलव घरी. दुपारी नको नाहीतर रात्रीच बोलाव जेवण वैगरे करूनच त्याला जाऊदे. जरा जास्त वेळ राहिला घरात तर तो नेमका कसा आहे हे मला समजेल.
प्रियांका : खरच बोलवू  बाबा त्याला ?
बाबा : हो नक्की. पण आत्ता काहीच घरी बोलू नकोस. मला तिचा अंदाज घेऊ दे मग मी वेळ बघून सांगेन तिला सगळ.
प्रियांका : मी त्याला सांगते उद्या यायला.
बाबा : आता चल लवकर नाहीतर आई दोघांना शोधायला बाहेर येईल जेवण बनवायचं सोडून.
दोघ घरी निघाले. 
corona virus. corona virus people deth. corona virus world. corona virus news. corona update. corona medicine. corona info.
 भाग ०६
घरी येऊन तिघांनी जेवण वैगरे केल. जेवण झाल्यांनतर प्रियांका निखिलला कॉल करून उद्या घरी ये अस सांगते.
निखिल : पियू आपल्याला आत्ता नोकरीच टेन्शन असताना तू हे अजून का वाढवलस ?
प्रियांका : तू काय म्हणाला होतास ? मी जे कारण ठरवेन तेच कारण तू तुझ्या घरी सांगणार. मग आता गपचूप माझ ऐकायचं. उद्या तू यायचं घरी. बाबांना आणि आईला भेटायचं माझ्या. आणि इतक्या कमी वेळात मला हेच एक कारण सुचल. कारण खोट खोट अस अजून किती खोट बोलून जाणार आपण इथून ? आणि खोट्याने भल काहीच होत नाही. आणि बरोबर आहे ते म्हणतात ते. खोट बोलून आपण आपल प्रेम लपवून ठेवल असत पण नोकरीसाठी आपल्याला लांबच जाव लागल असत.
निखिल : तुझ्या बाबांना हे तू सांगून आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे का नोकरी ?
प्रियांका : अस कुठ म्हणतेय मी. पण मार्ग मिळेल. ते सांगतील काय करायचं ते. तुला माहितेय का ? इटली माझ्या आईचा आवडता देश आहे. लग्न झाल्यापासून तिला तिकडे जायचंय अस बाबा मगाशी सांगत होते मला. उद्या येशील ना नक्की ?
निखिल : हो. पण ऐक ना.
प्रियांका : आता काय ?
निखिल : आय लव्ह यु.
प्रियांका : आय लव्ह.
बाबा : अग पिया, काय करतेस चल जरा बाहेर जाऊन येत.
प्रियांका : हो बाबा. चला.
तिने कॉल कट केला.
दोघे गाडीवरून जात होते.
प्रियांका : कुठ चाललोय आपण ?
बाबा : तस तर आपण चाललोय मंडईत पण खर तर चाललोय दुसरीकडेच.
प्रियांका : कुठे ?
बाबा : त्याचा पत्ता तुलाच माहितेय.
प्रियांका : म्हणजे ?
बाबा : निखिलच्या घरी जातोय आपण.
प्रियांका : काय ? मी त्याला बोलावल आहे उद्या.
बाबा : हो म्हणूनच आत्ता चाललोय आपण. तो उद्याची तयारी उद्या सकाळपासून सुरु करेल. आत्ता नेमका तो जस वागेल तोच खरा तो असेल.
प्रियांका : पण बाबा.
बाबा : आईला मी सांगितलय तुझ्या. तिला तो पसंत आहे.
प्रियांका : बाबा पण त्याच्या घरी माहिती नाही काहीच.
बाबा : मी बोलणी करतो.
प्रियांका : बर. इथून डावीकडे चला.
दोघ निखिलच्या घराच्या दारात पोचले. दार वाजलं गेल. दार आतून उघडल गेल.
निखिल : काका तुम्ही ?
प्रियांका : भेटायला आलेत तुला.
बाबा : कोण आहे घरी ?
निखिल : आई आहे.
बाबा : वडील ?
निखिल : ते मुंबईत असतात कामाला.
प्रियांका : आत येऊ का ?
निखिल सॉरी, सॉरी या ना.
तिघे आत गेले. दोघ सोफ्यावर बसले. निखिल आत जाऊन आईला घेऊन बाहेरच्या खोलीत येतो.  
भाग ०७
निखिल : आई, हे प्रियांकाचे बाबा.
नि.आई : नमस्कार. आज पहिल्यांदाच आलात घरी. काय काम काढलत ?

पि.बाबा : काम म्हणजे जरा म्हत्वाचच होत. प्रियांकाला ओळखत असाल तुम्ही बहुदा ?
नि.आई : हो. एक दोनदा आली होती घरी. प्रोजेक्ट होता त्यांचा कॉलेजचा तेव्हाच. तेव्हाच तिला बघितल होत.
पि.बाबा : प्रियांका आणि तुमचा निखिल दोघ एकमेकांवर प्रेम करतात. आत्ता नाही खूप आधीपासून. माझ्या मुलीने पण मला आज सांगितल मुलांनी चुकीच पाऊल न उचलता आपली इभ्रत चव्हाट्यावर न आणता शिक्षण पूर्ण केल. उगीच बाकी मुलांसारख प्रेम प्रेम करत शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही केल. म्हणून मी तुमच्याकडे निखिलचा हात मागायला आलोय. सरळ सांगतो हेच काम आहे तुमच्याकडे.
नि.आई : निखिल याबद्दल मला काहीच बोलला नाही.
पि.बाबा : नसेल बोलला. घाबरला असेल. किंवा तुमचा नकार येईल किंवा विरोध होईल म्हणून बोलला हि नसेल. पण आता मीच दोघांच्या वतीने सांगायला आलोय अस समजा. प्रियांका पास झालीय आत्ता. नोकरी पण लागलीय तिला. बाहेरच्या देशात. दोघ एकमेकांना समजून घेतील. बस अजून आणखी काय हव ? तुम्हला काय वाटत तुम्ही दिलखुलासपणे सांगा. नुस्त मीच बोलत चाललोय.
नि.आई : अस काही नाही. कस आहे, आत्ता घर माझ्या क्लासेस मधून येणाऱ्या पैशावर आणि हे बाहेर नोकरी करतात त्यावर चालत. अगदी खाऊन पिऊन काही गरजा भागवून याच शिक्षण हि पूर्ण करता आल. अशी आपली मध्यम वर्गीय स्थिती आहे आमची. पण कमतरता, काटकसर किंवा मन मारून जगन वैगरे अशी जीवन शैली नाही आमची. प्रियांका सारखी मुलगी आमच्या घरी सून म्हणून आली तर मला तर हरकत काहीच नाही. सुंदर आहे. दोघ प्रेम करतात म्हणजे निखिलची आई म्हणून ती मला हि समजून घेईल. माझी काळजी घेईल. पण. आम्ही आहोत तो पर्यंत आम्ही कमवतो त्यात निखिलला प्रियांकाला सांभाळू पण हा कधी आपल्या पायावर उभा होईल माहित नाही. याला अजून नोकरी नाही. लग्न झाल्यावर आम्हला किंवा याला नाही पण तुमच्या मुलीला कुणी विचारल नवरा काय करतो तर घरी असतो अस तिला तरी सांगायला आवडेल का ? प्रत्येकाला आपल मुल प्यार असत. पण मला उगीच खोटी स्तुती आणि कौतुक करायला आवडत नाही. शिक्षिका आहे मी त्यामुळे खऱ्याची बाजू मला बोलन गरजेच वाटत म्हणून सांगते. याला नोकरी लागली कि त्या नंतर सहा महिन्यांनी आपण यांच्या लग्नाचा विचार करू.
पि.बाबा : म्हणजे तुमची या लग्नाला किंवा यांच्या प्रेमाला परवानगी आहे ?
नि.आई : हो.
प्रियांका : मी बोलू ?
नि.आई : बोल.
प्रियांका : याला नोकरी नाही म्हणून तुम्ही आमच लग्न लांबवताय. हो ना. एक सांगायचं होत.
नि.आई : काय ग ?
प्रियांका : मला चीनमध्ये नोकरी लागली आहे आणि निखिलला इटलीला.
नि.आई : काय ? निखिल तू मला सांगितल नाहीस ?
प्रियांका : सॉरी आई,पण आम्ही वेगवेगळ्या देशात जाऊन राहणार म्हणून आम्ही ठरवल होत हि नोकरीची संधी नाकारून भारतात एकाच ठिकाणी नोकरी शोधायची. पण हि संधी छोटी नाही. भारताबाहेर नोकरी लागण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी घरी बाबांना सांगितल हे सगळ. तेच काहीतरी मार्ग काढतील म्हणून. ते इथे मला घेऊन आले. आमच्या दोघांची बोलणी करायला. हे मला माहित नव्हत. पण, निखिलला सुध्दा नोकरी लागली आहे.
नि.आई : अस असेल तर मग ह्यांच्याशी बोलून काही दिवसात तुमचा साखरपुडा करायची तारीख ठरवते.
प्रियांका : आई, आम्हला पुढच्या दोन आठवड्यांनी जायचं आहे. नोकरीला.
नि.आई : इतक्या कमी वेळात ?
प्रियांका : हो.
नि.आई : मग तर मला ह्याला बोलावून घ्यायला हव आज आणि बोलून सगळ ठरवायला हव.
पि.बाबा : हो.
निखिलची आई उठून आत गेली. आत जाऊन त्यांनी साखर आणली.
नि.आई : आत्ता काहीच गोड नाही घरी पण आमचा होकार समजा. तुम्हाला संध्याकाळी ह्यांचा काय उत्तर आहे सांगते कॉल करून.
पि.बाबा : हो हरकत नाही. आम्ही वाट बघतो.

प्रियांका निखिलच्या आईच्या पाया पडते. आणि बाबांसोबत घरी निघून जाते. निखिलची आणि आणि निखिल मिळालेल्या नोकरीवर आनंदाने बोलत बसतात.
corona letest, update corona, corona counts

भाग ०८
संध्याकाळी निखिलचे बाबा आल्यावर घरी बोलण झाल. निखिलने प्रियांकाचे फोटो मोबाईलमध्ये त्यांना दाखवले. त्यांचा होकार आला. त्यांनीच मग स्वतः प्रियांकाच्या वडिलांना कॉल करून होकार कळवला. तासभर झालेल्या बोलण्यात संघनमताने साखरपुडा येत्या रविवारी करू अस ठरल. आज शनिवार होता. मोजून सात दिवस उरलेले. लग्न हे दोघ जेव्हा सुट्टीसाठी सहा महिन्यांनी भारतात येतील तेव्हा करायचं ठरल.
बाबांनी प्रियांका आणि तिच्या आईला हि गोष्ट सांगितली. ती खुश झाली. रात्री उशिरापर्यंत प्रियांका आणि निखिल बोलत बसलेले. जरी इतक्या वर्षांची ओळख जवळीक सहवास असला तरी लग्न होणार या विचाराने दोगःन्त पुन्हा अनोळखीपणा तयार झाला. पुन्हा नव्याने एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न सुरु झाला. रात्री दीड वाजता प्रियांका बोलता बोलता झोपली. आणि ती झोपली हे निखिलला पंधरा मिनिटांनी समजल. मग त्याने कॉल तो तसाच सुरु ठेवला. आणि तो झोपून गेला.
सकाळी, निखिल प्रियांकाच्या घरी आला.
त्याची खातिरदारी अगदी योग्य केली गेली. त्याला हव ते प्रियांकाचे बाबा आणि आई देत होते. आपल्यापेक्षा जास्त लाड निखिलचे होताना बघून प्रियांकाला हि बर वाटल. थोड थोड दोघांनी खाऊन निखिलने प्रियांकाला सोबत बाहेर घेऊन जायची परवानगी मागितली. आणि दोघे बाहेर गेले.
निखिल तिला एका दुकानात घेऊन गेला. तिथे तिला जसा ड्रेस हवा तो घेऊन दिला. दोघ मग असेच रस्ता दिसेल तिकडे गाडीवर फिरत होते. बराच वेळ गाडी चालवल्यावर त्याने गाडी थांबवली. आणि ती गाडी आता प्रियांका चालवायला लागली आणि मागे निखिल बसला. तिला मागून कमरेला धरून हळू हळू हात वर नेताना गाडी हेलकावे खायला लागली. आणि आता आपण दोघ हि पडणार या पटकन आलेल्या विचाराने त्याने हात दोन्ही तिच्या खांद्याला घट्ट धरले. आणि गाडी पुन्हा नीट चालायला लागली.
तिने गाडी बाजूला थांबवली.
निखिल : काय झाल ?
प्रियांका : तूच चालव.
निखिल : का ?
प्रियांका : लग्न करायचंय ना नीट दोन पायांवर उभ राहून ?
निखिल : हा मग ?
प्रियांका : तू माग बसून अस काही वागलास तर दोघांचे पाय गळ्यात येतील. म्हणून म्हंटल तूच चालव.
निखिल बारीक तोंड करून गाडीवर बसला. प्रियांका मागे बसली. रस्त्यावरून एखाद दुसरी गाडी दिसत होती. जेव्हा पूर्ण रस्ता मोकळा दिसला तेव्हा तिने निखिलच्या पोटाला घट्ट पकडत घट्ट मागून मिठी मारली. त्याच्या कानाला चावत-चावत त्यावर जीभ फिरवत उजव्या हाताने त्याच्या हनुवटीला स्वतःकडे ओढत तिने त्याला किस करण सुरु केल. गाडी सरळ जात होती. ती त्याला कीस करत होती. कीस करून झाल्यावर तिने त्याला मागून घट्ट मिठीत घेतल आणि त्यःच्या मानेला कीस करून तसच काही वेळ डोळे मिटून बसली.
निखिल : काय झाल ?
प्रियांका : उ..हु... आपण आता कुठ चाललोय ?
निखिल : तुला एक घड्याळ घेऊ.
प्रियांका : का ?
निखिल : असुदे.
प्रियांका : बर. ऐक ना.
निखिल : काय ?
प्रियांका : आय लव्ह यु,
निखिल : आय लव्ह यु टू माय फ्युचर बायको.
प्रियांका गालात हसते आणि गाडी त्यांची पुढे जाते. एका शो-रूममध्ये ते जातात. निखिल तिला एक घड्याळ घेतो.
ते घेऊन निखिल तिला घरी सोडतो. आणि स्वतःच्या घरी जातो. 
coronavirus uk.coronavirus symptoms.coronavirus india.
भाग ०९
घरी येऊन प्रियांका बाबांना  निखिलने घेतलेला ड्रेस आणि घड्याळ दाखवते. मग आतल्या खोलीत जाऊन निखिलसोबत बोलत बसते. दुपारी दीड वाजता आई बोलावून कंटाळते तेव्हा ती जेवायला घेते.
आता,
बारा वाजून गेलेले. आणि प्रियांकाचे निखिलला पाचशे बावीस मिसकॉल येऊन गेलेलं. निखील शांत झोपलेला. तिला काय कराव समजत नव्हत. त्याच्यापर्यंत पोचण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे कॉल. दुसर काहीच नाही. तिने पुढे अजून कॉल करण सुरु ठेवल. रूमची बेल जोरात वाजणारी होती. आणि ती वाजवली एका वेटरने. दुपारच जेवण तो घेऊन आलेला. सलग तीन चार वेळा बेल वाजल्यावर त्याला जाग आली. डोळे चोळत तो दार उघडतो. दार उघडल आणि वेटरने त्याला ते जेवनाच पार्सल दिल. निखिल ते पार्सल घेऊन दार लावताना वेटर त्याला सांगतो, आजपासून तीन दिवस मेस बंद असेल.
निखिल : का ?
वेटर : माहित नाही मला. पण बंद आहे. आणि त्याला खोकल्याची ढास आली. निखिल आत जाऊन त्याला पाणी आणून देतो. तो ते पाणी पितो आणि निघून जातो. निखिल आत येऊन अंघोळ वैगरे करून मग जेवण घेऊन बसतो पुढ्यात आणि मोबाईल बघतो. सहाशे एक मिस्डकॉल.
तो पटकन प्रियांकाला कॉल लावतो.
निखिल : हेल्लो ? पिया ? काय झाल तुला इतके कॉल ?
प्रियांका : तू बरा आहेस का ?
निखिल : हो.
प्रियांका : बाहेर जायचं नाही कुठ. समजल. दार लावून बस.
निखिल : हो पण झाल काय ?
प्रियांका : टीव्ही सुरु करून बघ. वूहानला आणि इटलीला कोरोना व्हायरसची साथ पसरलीय.
निखिल : ते काय असत आता ?
प्रियांका : तू बाहेर जाऊ नकोस प्लीज. सकाळपासून पाचशे लोक मेलेत इथे.
निखिल : मी नाही जात कुठ. आणि नाही जाणार. मी तर झोपणारे आता परत. जेवतोय आता.

प्रियांका : जेवण आणून दिलय ना ?
निखिल : हो.
प्रियांका : तू जाऊ नकोस बाहेर.
निखिल : तुझा आवाज का असा झालाय ?
प्रियांका : तुझ्या टेन्शनने मला अंगातून जीव गेल्यासारखं झालंय. मोबाईल कधी सायलंट ठेवत नाहीस आज कसा ठेवलास.
निखिल : सकाळी कसली तरी व्हिडीओ फेसबुकवर सुरु झाली. ते आवाज पूर्ण बंद करायला गेलो ते पूर्ण आवाज बंद होऊन मोबाईल पण सायलेंटवर झाला. सॉरी.
प्रियांका : आम्हाला सुट्टी मिळालीय एक तीन दिवस.
निखिल : आम्हाला अजून काही सांगितल नाहीये. मी जाईन संध्याकाळी.
प्रियांका : नाही जायचं.
निखिल : अजून एक आठवडा पण झाला झाला नाही नोकरी लागून. दंड भरावा लागेल मला. पहिला पगार तरी नीट पूर्ण येऊ दे.
प्रियांका : मी देईन तुला कमी पडले तर. पण तू जायचं नाही.
आधी,
साखरपुड्याच्या आधल्या दिवशी जवळचा एक हॉल प्रियांकाचे बाबा ठरवतात. दोन्ही घरातले दहा दहा लोक येऊन दोघांचा दुसऱ्या दिवशी साखरपुडा झाला. अगदी साडे तीन तासात सगळे जमून साखरपुडा उरकून हॉल रिकामा करून निघून गेले. लग्न झाल्यासारखं प्रियांका निखिलच्या घरी राहायला गेली. निखिलच्या आईला जेवण बनवायला मदत केली. जेवण वाढून भांडी घासून वैगरे एखाद्या सुने सारख सगळ रुटीन त्या दिवशी तिने पूर्ण केल.
corona update. corona medicine.casa corona. Coronavirus disease.Coronavirus disease 2019 - World Health Organization.www.who.int.Coronavirus Update (Live).Corona Renderer.coronavirus uk.coronavirus symptoms.coronavirus india.
भाग १०
रात्री दोघ बाल्कनीत कॉफी पीत खुर्चीवर बसलेले.
निखिल : लवकर लवकर सहा महिने संपायला पाहिजेत हे.
प्रियांका : का ?
निखिल : लग्न करू लवकर.
प्रियांका : पण लग्न झाल तरी जवळ राहण जमणार नाहीये. किमान दोन वर्ष तरी.
निखिल : हो पण हा अनोळखीपणा अजून जगायची इच्छा आहे माझी. तुला कस वाटतय ?
प्रियांका : शब्द नाहीत. पण काहीतरी वेगळ वाटतय. मगाशी मी आत आईंना मदत करत होते तेव्हा तू मला मागून हळूच कमरेला धरल. खूप वेगळा स्पर्श जाणवला मला तुझा. अनोळखी नव्हता पण सवयीचा पण नव्हता. हा आणि हे असे प्रत्येक तुझे स्पर्श अनुभवायचे आहेत मला. मला पण वाटतय लवकर लग्न व्हाव आपल.
निखिल : मला वाटल नव्हत तू इकडे रहायला येशील आज इकडे.
प्रियांका : हो. आता वेळ कमी आहे आपल्याकडे. आहे तेवढा वेळ सोबत घालवायचा आणि त्याच्या आठवणीत सहा महिने काढून मग लग्न करून पुन्हा त्या आठवणी पुढे वर्षभर जपून ठेवत-जगत एकत्र भारतात रहायला यायचं. बस. एक आयुष्य आहे. एकावर प्रेम केल त्यालाच नवरा बनवून त्याच्यासोबत जगून घ्यायचं एवढ एकच स्वप्न आहे माझ. आणि म्हणून मला वाटत कि खूप नाही माझी स्वप्न एकच आहे. त्यामुळे ते पूर्ण करण अवघड नाही पण सोप्प हि तितक नाही. तुझी साथ असेल तर हे स्वप्न होईल माझ पूर्ण.
निखिल : तुझ स्वप्न माझी जिद्द आहे समज. आणि हि जिद्द मी पूर्ण करणार. तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण एक एक आठवण बनवत उतरत्या वयात तुझ्यासोबत बोलत जगायचेत मला. तोपर्यंत मोबाईलच्या पुढच काहीतरी यंत्र आलेल असेल पण त्यात रमून दोन्हीकडे दोन तोंड करून बसण्यापेक्षा एकमेकांच्या मिठीत बसून या आत्ताच्या सगळ्या दिवसांची आठवण काढत जगायला मला आवडेल. काय म्हणतेस ?
प्रियांका : हे असले विचार पण प्रेमच आहे. हेच जपायचं-जगायचं आहे आपल्याला.   
दोघांची कॉफी पिऊन झाली. त्याने दोन्ही कप घेतले आणि तो किचनमध्ये ठेवून पुन्हा खोलीत येतो. प्रियांका बाल्कनीतून पुढे बघत असते. रात्रीच थंड वार तिच्या सुटलेल्या केसांना हवेत खेळवत होत. तिला तस बघून निखिल तिच्यामागे उभा राहून तिला मागूनच मिठी मारतो.
प्रियांका : काय झाल ?
निखिल : तुझ्याशिवाय करमणार नाही तिकडे.
प्रियांका : मला पण. पण जाव लागेल. उद्या एकत्र येण्याठी आज काहीतरी कराव लागेल. इतके वर्ष अभ्यास केला आता त्याच चीज होतय तर त्यात कुठलेच वेगळे विचार नकोत. त्रास होईल पण सवय होईल आणि सवय लागली कि सगळ ओके होईल.
निखिल : सवय लागेल. पण तुझ्यापासून लांब जायची सवय नाही लावायची मला. कारण ती पुन्हा सुटणार नाही.
प्रियांका : सवय मी सोडेन.
निखिल : सवय सुटत नाहीत कधी आणि म्हणून मी लावून नाही घेणार.
प्रियांका : मग विषयच येत नाही कसला.
प्रियांका वळून निखिलकडे बघते. आणि त्याला मिठी मारते.
निखिल तिच्या केसांना बाजूला करत गरम ओठांनी तिच्या थंड कानाला स्पर्श करत तिला अजून जवळ ओढत आसपासच वार गरम करत तिच्यावर प्रेम करत होता. कित्येक वर्ष दोघ एकमेकांच्या मनाला ताब्यात ठेवून होते. आता ताब्यात मन राहिना. उद्या परत कधी नोकरीला गेल तर हा स्पर्श परत मागून पण मिळणार नव्हता. तिने त्याच्याकडे बघितल.
निखिल : काय झाल ?
प्रियांका त्याच्या ओठांना ओठात पकडून त्याच्या मिठीत अजून घट्ट झाली.
दोघ बाजूला झाले. त्याने तिच्या हाताला धरल. दोघ आत खोलीत आले. निखिल बाल्कनीच दार लावून घेतो. आणि तिला जवळ घेऊन बेडवर झोपतो.
थोड्यावेळाने..... 
World Health Organization.www.who.int.Coronavirus Update (Live).Corona Renderer.coronavirus uk.coronavirus symptoms.coronavirus india.
भाग ११
त्याचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईल बघितला. तीन मेल आलेले त्याला. जे त्याच्या नवीन नोकरीच्या ठिकाणावरून त्याला आलेले. त्याने ते आनंदाने प्रियांकालाला वाचून दाखवले. तिन्ही मेल वाचून झाल्यावर त्याने प्रियांकाकडे बघितल. तिच्या डोळ्यात सगळ पाणी भरलेलं. निखिल तिला जवळ घेत तिच्या डोळ्यातल्या पाण्याला पुसत तिच्या ओठांना कीस करत तिला जवळ ओढून घेतो.
निखिल : तुला अजून मेल आला नाही ना ?
प्रियांका : नाही. मला जाऊ वाटत नाहीये तुझ्यापासून लांब.
निखिल : मला पण. पण तूच म्हणालीस ना पर्याय नाही. मग ? मी माझ्या मनाची तयारी करतोय आणि तू अस बोलून मला न जाण्यासाठी प्रवृत्त करतीयस. मी जाऊ नको का सांग एका मिनिटाच्या आत त्याला मेल करतो. मला जमणार नाही हि नोकरी तू फक्त सांग काय करू मी.
प्रियांका : जायचं आहे आपण.
निखिल : आता याच विचाराव ठाम रहा. ऐक ना. मी मगाशी तुला कीस करताना विचार करत होतो.
प्रियांका : कसला ?
निखिल : हाच कि, तू तिकडे मी दुसरीकडे आपण आपण बोलायचं कस, किंवा आपल्यातल अंतर जास्तीत जास्त कस मी करायचं ? कारण किती हि बोललो मेसेजवर तरी भेटायची इच्छा होणार. आणि मला वाटत आता तर एकमेकांपासून लांब राहण मुश्कील होईल.
प्रियांका : हो.
निखिल : हो कीस मिठी ठीक होत पण आता सगळच झाल आपल्यात आणि या नंतर आता सतत इच्छा होईल तुला माझ बनवण्याची.
प्रियांका : मला पण.
निखिल : म्हणूनच मी विचार करत होतो आणि मला एक सुचल.
प्रियांका : काय ?
निखिल : आपल्या दोघांची वेळ नक्कीच वेगवेगळी असणार आहे.
प्रियांका : बरोबर दोन्ही देशांच्या वेळा वेगळ्या आहेत.
निखिल : हा. दोन्ही देशांच्या वेळा वेगळ्या आहेत. दोन्ही कंपन्यांच्या नोकरीच्या वेळा पण वेगळ्या असतील. ते काहीही असल तरी पूर्ण आराम आपण घ्यायचा. तिकडे आपली काळजी घ्यायला आपल्या घरचे नसणार. त्यामुळे आपल्यालच आपल नीट बघव लागेल. नोकरीला जायच्या आधी आणि आल्यावर अस दोन्ही वेळत आपल्याला कितीही वेळ मिळेल. बहुदा दोन तास चार तास किंवा अर्धा तास नाहीतर पंधरा मिनिट पण मिळतील. तर त्या वेळात आपला मोबाईल पूर्ण चार्ज पाहिजे. नेट स्पीड फुल पाहिजे. जिथ नेट नसेल पुरत त्या कोपऱ्यात चुकून पण फिरायचं नाही.
प्रियंका : आणि ?
निखिल : आणि अस तयारीत थांबून आपण व्हिडीओ कॉल करायचा रोज. न चुकता.
प्रियांका : डन.
निखिल : खर ?
प्रियांका : हो.
निखिल : पण अजून आहे ऐक.
प्रियांका : काय ?
निखिल : जश्या परीस्थित असू आपण त्या परीस्थित उचलावा लागेल कॉल.
प्रियांका : हो का ? काहीही सुचत बर का तुला.
निखिल : हो मग. कीस करता-करता इतक सुचल मला. तारीफ करायची सोडली माझी निदान उत्तर तरी हो दे.
प्रियांका : तुला होकारच पाहिजे ना ?
निखिल : हो.
प्रियांका : मग माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी माझा हो आहे.
निखील तिला जवळ घट्ट घेतो. दोघ झोपतात.
Corona Renderer.coronavirus uk.coronavirus symptoms.coronavirus india.
भाग १२
दोन आठवड्यांनी दोघ आपापल्या नोकरीसाठी भारत सोडून गेले. पहिला दिवस दोघांचा वेगळ्या देशात. भाषा हवा निसर्ग वस्तू सगळ नवीन आणि वेगळ. प्रियांका तिच्या रूममधून बाहेर आलीच नाही. ती खिडकीतून खाली रस्त्यावर बघत होती. बरीच गर्दी होती. एकसारखी दिसणारी चीनी लोक बघून तिला हसू येत होत. पण आजूबाजूचा निसर्ग मोठ्या मोठ्या इमारती बघून तिला भारी वाटत होत. पण आई बाबांची आठवण येत होती. स्कायपे सुरु केल पण निखिल ऑफलाईन दिसत होता. तो पोचला आहे कि नाही तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. फेसबुकवर खूप मेसेज तीने करून ठेवले. गुगल ड्यूओ वर पण मेसेज आणि ऑडीओ मेसेज पाठवून ठेवले. मन अस बैचेन झालेलं तीच. आई बाबांशी बोलून तीच झालेलं पण तरी निखिल सोबत बोलन न झाल्यामुळे तिला करमत नव्हत. खिडकीतून खाली बघत बघत तिचा डोळा लागला. निखिल इकडे पोचला. त्याने समान खोलीत टाकल. सोबत आणलेला एक पदार्थ त्याने फोडला आणि खात खात त्याने पहिला प्रियांकाला व्हिडीओ कॉल लावला.
रिंग वाजली तशी प्रियांका दचकून जागी झाली. तिने कॉल उचलला.
प्रियांका : अरे कुठ आहेस किती वाट बघितली मी तुझी.
निखिल : अर्धा मिनिट झालाय फक्त मला इथे रूमवर येऊन. ये हे खायला.
प्रियांका : मी पण आणलेलं खायला. पण तुझा कॉल नाही झाला मग नाही इच्छा झाली खायची.
निखिल : मग आता खाऊन घे चल.
प्रियांका : हो.
तिने खायला सुरुवात केली. दोघ एकमेकांशी बोलत खात अडीच तास बसले. निखिल तर पायातून बूट काढायचा पण विसरून गेलेला. तोंड धुवायच वैगरे सगळ तो विसरून गेला.
अडीच तासाने मग त्याला आठवल आणि त्याने प्रियांकाला सांगितल आणि तेव्हा मग तिने ओरडून त्याला आवरायला सांगितल. दोघांचा व्हिडीओ कॉल बंद झाला. निखिल घाई गडबडीत कसा तरी अर्ध्यातासात बाथरूमच्या बाहेर आला. व्हिडीओ कॉल करून प्रियांकाशी बोलत कपडे घालत त्याच आवरण सुरु होत. त्याच झाल्यावर तीन आवरायला निघाली. पण निखिलच्या हट्टामुळे ती तसाच सुरु व्हिडीओ कॉल सुरु ठेवून मोबाईल आत बाथरूममध्ये घेऊन गेली. तीच आवरून झाल. ती बाहेर आली. बऱ्याच वेळानंतर इकडे निखिल मोबाईलला चार्जर लावून सोफ्याला टेकून बसलेला. तिकडे प्रियांका चार्जर मोबाईलला लावून बेडवर झोपलेली. तरी दोघांच एकमेकांना बघन आणि त्याचं बोलन सुरूच होत. संध्याकाळी तीच जेवण तिच्या रूमवर आल. त्याच्याइकडे जेवायची वेळ अजून व्हायची होती. तो तिच्याशी बोलत बसला. तीच जेवण झाल नंतर त्याच जेवण येत आणि तो जेवून घेतो. रात्री बोलता बोलता प्रियांका झोपून गेली. आणि निखिल कॉल कट करून झोपून गेला.
दिवसभर व्हिडीओ कॉलवर बोलन-बघन आणि रात्री झोपण हे असच दोघांच आठवडाभर सुरु होत. उद्या नोकरीचा पहिला दिवस होता दोघांच्या. प्रियांकाला आधी नोकरी होती तिने उठून आवरून निखिलला कॉल केला पण त्याने उचलला नाही. म्हणून तिने त्याला एक व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवली ज्यात त्याने पहिला दिवस आहे तर कस वागायचं काय करायचं वैगरे अस सगळ सांगितलेलं. आणि शेवटी आय लव्ह यु म्हणून पाठवल. ती निघून गेली नोकरीवर.
ति आत गेली तेव्हा तिची तपासणी झाली. आणि तिला मोबाईल जमा करायला लावला. तेव्हा तिने परवानगी घेऊन निखिलला कॉल लावला. त्या कॉलने निखिल उठला पण बोलता येणार नाही अस तिने त्याला सांगितल्यावर त्याची झोपच उडाली. तो उठून बसला. आणि ती मोबाईल जमा करून आत गेली. 
भाग १३
तीन दिवस असाच दिनक्रम सुरु होता. त्यात त्यांना एकेकाची आठवण गरज अस दोन्ही वाटत असल तरी व्हिडीओ कॉलवर एकमेकांना बघून वरवर खुश व्हायला लागत होत. तीन दिवस असे पटकन नाही म्हणता येणार पण परक्या देशात तरी निघून गेले सहज. सहा महिने पण असेच जातील अशा विचारात दोघ तात्पुरते खुश होऊन जात होते. चौथ्या दिवशी सकाळी प्रियांका उठून आवरून बसली. मोबाईल हातात घेतला. निखिलला मेसेज करावा म्हणून तिने मेसेज टाईप केला आणि तेवढ्यात तिला मेल आला. आजपासून तीन दिवस ऑफिस बंद आहे. त्याच कारण होत. काल रात्री कोरोनानावाच्या व्हायरसने एका रात्रीत शेकडो लोकांना त्रास झाला आहे. वूहान शहरात पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे. आणि हा व्हायरस हवेतून होत असल्याने सर्व ऑफिस तीन दिवस बंद ठेवण्यात येत आहे. प्रियांकाला समजेना नक्की काय प्रकार आहे हा ? तिने टीव्ही लावला. आणि टीव्हीवर बातम्या सुरु होत्या फक्त वूहान शहराच्या. ती घाबरली. तिला समजेना काय कराव भीतीने तिने सगळ्या खिडक्या लावल्या. आणि तिने निखिलला कॉल लावला.
निखिल झोपलेला. त्याने कॉल उचलला नाही. थोड्यावेळाने ऑफिसमधल्या एका मुलीचा तिला कॉल आला. तीसुध्दा दोन दिवस आजारी होती. प्रियांकाची ती सिनियर होती. ऑफिस बंद आहेत तर घरून काही मेल्स तिला पाठवण्याच काम प्रियांकाला दिल. प्रियांका काही मेल्स पाठवून पुन्हा निखिलला कॉल करण सुरु करते. तिला काय कराव सुचत नव्हत. तिने खूप साधे मेसेज, ऑडीओ मेसेज, व्हिडीओ कॉल केले पण त्याच इंटरनेटबंद असल्यामुळे काहीच संपर्क झाला नाही. थोड्यावेळाने वात बघून तिने अंघोळ केली. पाणी जरा कमी गरम होत. बाहेर आल्यावर तिला शिंका सुरु झाल्या. सगळ आवरून तिने पुन्हा निखिलशी बोलता येत का यासाठी प्रयत्न सुरु ठेवला. तिने त्याला मेसेज मध्ये इथ काय झालाय या बाबत लिहयला घेतल. आणि दार वाजलं. दारात अंतराळवीरांसारखे सूट घालून तीन लोक आले. ज्यांनी तिची तपासणी एका छोट्या मशीनने केली. आणि हिरवी लाईट लागली. आणि तिला त्यांनी मास्क घातला. अंगात घालायला एक सूट दिला. आणि तिला गाडीत बसवून घेऊन गेले. प्रियांकाचा मोबाईल घरीच राहिलेला. तो मेसेज लिहिलेला पाठवायचा राहूनच गेला. तिच्या रुमच्या दाराला कुलूप लावण्यात आल. तासाभराने निखिल उठला आणि त्याने तिचे मेसेज बघितले. काय झाल त्याला समजल नाही. त्याने खूप प्रयत्न केला पण तिचा मोबाईल वाजत होता पण ती उचलत नव्हती. बहुतेक ती लवकर आज गेली नोकरीला म्हणून तो त्याच आवरून कामाला गेला. ऑफिसला गेल्यावर तिथे हि काहीतरी कुजबुज सुरु होती. आणि नंतर त्याला समजल वूहानला कोरोना सारखा रोग झालाय. त्याला काही सुचेना त्याने तिथूनच प्रियांकाशी बोलायला संपर्क केला पण नाही जमल. त्याने तिच्या ऑफिसला कॉल केले पण सगळे बंद लागत होते. मग ती जिथे राहत होती तिथे कॉल केले पण तिथून त्याला चुकीची माहिती मिळाली, कि प्रियांका भारतात गेलीय.
निखिल काही न विचार करता भारतात यायचं तिकीट बुक करतो. उद्या दुपारी विमान होत. तो घरी येऊन बैचेन असा बसला. तिच्या घरी कॉल केला पण कुणी उचलला नाही. पुन्हा त्याने केलाच नाही. रात्री जेवण घेऊन वेटर आला. ते जेवण निखिलने परत पाठवल. आणि तसाच उपाशी झोपला. 
भाग १४
दुपारी विमान असताना निखिल सकाळीच विमानतळावर जाऊन पोचला. तिथून पण त्याचे प्रियांकाला मेसेज सुरु होते. पण एव्हाना तिचा मोबाईल इंटरनेट सुरु असल्याने बंद पडलेला. याचे मेसेज जात होते पण रिप्लाय येत नव्हता. दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी विमान निघणार होत. पण अचानक घोषणा झाली कि भारताने बाहेरून येणारी विमान कमी केली आहेत. आणि चीन मधून बरीच पर्यटक इकडच्या देशात आल्याने निम्मी विमान रद्द केले आहेत. आता पहिल्यांदा सगळ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल आणि मगच त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात येईल. कोरोना निगेटिव्ह असलेले सध्या विमानाने पाठवल जाईल त्यांना पण ज्यांना कोरोना आहे त्यांना खास विमान त्यांच्या देशातून बोलावल जाईल. प्रत्येक प्रवाशांना अंतर राखून उभ केल गेल. प्रत्येकाची तपासणी सुरु झाली. तपासणीसाठी खास यंत्र नव्हत. पण जे होत त्याने तपासणी अगदी रेंगाळत केली जात होती. रात्री अकरा वाजता निखिलची तपासणी झाली त्यात तो निगेटिव्ह असल्याच समजल आणि त्याला रात्रीच्या बाराच्या विमानाने भारतात पाठवल. निखिल भारतात येईपर्यंत प्रियांकाच्या आठवणीत रडत होता.
इकडे प्रियांकाला औषधोपचार सुरु केले. तिने खूप विनवण्या केल्या पण कोणीच तिचा संपर्क निखिलसोबत करून दिला नाही. त्या एका गोष्टीने ती अजूनच आजारी पडत गेली. तिची एका रात्रीत बिघडती तब्येत बघून तिला अतिदक्षता विभागात हलवलं. सकाळी पर्यंत शेकडो अजून आजारी लोक तिथे आले. आता प्रियांका जवळ कमी डॉक्टर उबलब्ध होते. नर्स आली तरी प्रियांका त्यांना कॉल लावून देण्यासाठी विनवणी करत होती. पण कोणीच त्यांचा मोबाईल तिच्या हातात द्यायला तयार नव्हत.
निखिल दिल्लीत पोचला. प्रियांकाचे वडील निखिल आणि प्रियांकाच्या लग्नाच्या पत्रिकेचे नमुने बघायला गेले. तिथे त्यांना दोन डिझाईन आवडल्या. दोन्हीचे फोटो प्रियांकाच्या आईला पाठवले. आईंनी जी पसंद केल तीच प्रियांकाच्या बाबांना हि आवडलेली. ठरल. तिशीच पत्रिका करायला त्यांनी दिल्या. सातशे पत्रिका बनवायला सांगून पहिले काही पैसे दिले. तिथून ते घरी यायला निघाले.
दिल्लीत निखिलची तपासणी केली. आणि त्याला कोरोना झाल्याच समजल. त्याला दिल्लीतल्या एका सरकारी दवाखान्यात दाखल केल. त्याच समान आणि त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्याच्यावर उपचार सुरु झाले. प्रियांकाच्या वडिलांना दुपारी त्यांच्या मित्राचा कॉल आला. त्यांनी सांगितल चीनमध्ये खूप लोक मरायला लागलेत. कोरोना आजार झाल्याने असे लोक मरत आहेत. प्रियांकाचे बाबा घाबरले. त्यांनी टीव्ही लवला आणि बातम्यां लावल्या आणि त्यांना श्वास घेणच अवघड झाल. जिथ प्रियांका होती तिथच हा रोग पसरलेला. त्यांनी प्रियांकाला कॉल करण सुरु केल. पण मोबाईल बंद होता. त्यांना काही कराव सुचेना. त्यांनी निखिलच्या घरी भेट दिली आणि सगळेच दुःखात बसून होते. काय हालचाल करावी त्यांना सुचेना. मग त्यांनी निखिलला कॉल सुरु केले पण त्याचा हि मोबाईल नुसता वाजत होता पण प्रतिउत्तर काहीच नाही.
इकडे प्रियांकाचा उपचार सुरु असताना तिच्यावर गोळ्या काहीच असर करत नव्हत्या. त्यात तिला निखिलशी बोलायचं होत तेच नेमक तिला मिळाल नाही. आणि शेवटी डॉक्टर थकले. आणि दुसऱ्याच दिवशी प्रियांकाचे श्वास थांबले. तिला चीन सरकारच्या गाडीतून इतर मृत लोकांसोबत नेऊन एका मोकळ्या ठिकाणी पुरल. तीच सामान आणि मोबाईल सगळ जाळून टाकल. आणि भारत सरकारला मृत भारतीय लोकांची लिस्ट मेलने पाठवली. संध्याकाळी पर्यंत प्रियांका नसल्याच इकडे सर्वांना कळली. तिला शेवटच बघता हि आल नाही. या दुःखाने अजून सगळे गहिवरले.
प्रियांकाचे बाबा तर प्रियांकाचा तिने परवा पाठवलेला रात्रीचा फोटो बघत रडायला लागले. ते दुःख सोसतो तो पर्यंत दुसरी बातमी घरी पोचली. निखिल दिल्लीला आहे. दवाखान्यात. सगळे लागलीच दिल्लीला निघाले. रस्ता संपता संपेना. दुपारी सगळे दिल्लीला पोचल्यावर त्यांना निखिलला भेटू दिल नाही. सगळ्यांनी एकदा त्याला लांबून एक क्षण एवढच बघितल. कुणाला काही खायची सुध्द नाही कुणाला काय बोलाव याच भान नाही. शेवटी प्रियांकाचे बाबा यांच्या छातीत दुखायला लागल म्हणून त्यांना तिथेच उपचार सुरु केले. रात्री पर्यंत त्यांना बर वाटल. तीन दिवस तिथेच राहून झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना निखिल बर झाल्याचा त्यांनी निरोप सगळ्यांना सांगितला. सगळे आनंदी होते पण प्रियांकाच्या दुःखात आनंद दाखवू शकत नव्हते. चौदा दिवस भेटण मुश्कील होत. चौदा दिवसाची वाट बघता-बघता पुढच्या तासाभराने अचानक निखिलचे हि श्वास थांबले.
आणि त्याला हि कुणाला न भेटू देता बाहेर नेण्यात आल.
आणि दोघांच लग्न तसच राहील...... दोन्ही कुटुंब पुन्हा गावाला आले. प्रियांकाचे बाबा पत्रिका छापायचं रद्द करतात. फक्त दोन पत्रिका छापून त्यातली एक स्वतःकडे आणि एक निखिलच्या घरी देऊन टाकतात.

समाप्त.                                                                                                                     या कथेचे सर्व अधिकार लेखकाच्या स्वाधीन आहेत. कथा शेअर करण्यास सक्त मनाई आहे. असे केल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंड भरपाई म्हणून भरावा लागेल.

2 टिप्पण्या