एक तलफ

 


तो गाडी सुरु करतो. ती मागे अंतर ठेवून बसते. थोड अंतर पुढे गेल्यावर दोघातल अंतर कमी झाल. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिला काहीतरी बोलायचं होत. आणि त्याला काय बोलाव सुचत नव्हत. थोड्यावेळाने तिने त्याला सांगितल मला तू आवडतोस. त्याला हि ती आवडली होती. दिसायला गोरी सुंदर. त्याच्या खांद्याला लागेल एवढी उंचीची. त्याला हि सांगायचं होत कि तू दिसायला सुंदर आहेस. पण तो बोलला,

तो : तुपण सुंदर आहेस दिसायला पण तू मला आवडतेस हे कस बोलू ? आपली हि पहिलीच भेट आहे. या आधी तू माझ लिखाण वाचल आहेस. आणि बरीच लोक मला सांगतात कि माझ लिखाण वाचून त्यांना मी कसा आहे माझा स्वभाव कसा आहे हे समजल. आणि तू तर माझ बरच लिखाण वाचल आहेस. म्हणजे तुला हि मी कसा आहे याचा अंदाज आला असेल. आणि त्यामुळे मी तुला आवडत असेन. आणि ते तू बोलून हि दाखवलस पण मी तर तुला आज पहिल्यांदा बघतोय. भेटतोय. आणि आत्ता कुठ तुझ्याशी बोलायला लागलोय.

ती : आवड म्हणजे फक्त तू चांगला दिसतोस या अर्थाने नाही म्हंटले मी. मला तू आवडलास म्हणजे तुझी सोबत मला आवडेल.

तो : प्रेम खूप त्रास देत ग. मला त्रासाची सवय आहे. तुला झाला तर मला नाही आवडणार.

ती : मी नाही देणार तुला, कसलाच त्रास.

तो : लग्न होणार होत माझ एका मुलीसोबत. जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलेलं. पण तिला हवा होता फक्त सेक्स. जो कि केला नाही. आमच्या बऱ्याच भेटी झाल्या ज्यात आम्ही कीसच्या पुढे गेलो नाही. एका भेटीत तिने मला लग्नाची मागणी घातली. माझ्या हातून मंगळसूत्र घालून घेतल. माझ्या जवळ बसून रडून घेतल. आणि तिच्या त्या डोळ्यातल्या प्रेमाला बघून मी लग्नाला होकार दिला. माझ्या आयुष्यातला पहिला सेक्स तिच्यासोबत करण्यासाठी मनाची तयारी करायला मी पुढची एक भेट ठरवली. दिवस जात होते मी आणि ती हे जाते दिवस मोजत होतो. दोन दिवस राहिलेले आणि माझा अपघात झाला. मी झोपून होतो. तिच्याशी संपर्क तुटला. जेव्हा झाला तेव्हा तिला वेळ नव्हता. मला काय झाल हे तिला माहित नव्हत. जेव्हा कळाल तेव्हा मला आशा होती तिला माझी काळजी वाटेल. पण तिला वेळ नव्हता. मी बरा झालो. आणि मेसेज करायला तिला मोबाईल घेतला. बघितला तर मी ब्लॉक होतो. तिला मिळालेला कुणी ज्याने तिला लग्नाची मागणी घातलेली.

ती : मग ?

तो : माझ्या साध्या गाडीवर बसून दोघांसाठी महागडी गाडी घ्यायची स्वप्न ती बघायची. माझ्या वागण्यात जरा हि बदल नको सांगून स्वतः माझ्यासाठी मला आवडेल तशी वागायची. दिवस दिवस मी तिच्यासोबत मेसेज, कॉल, व्हिडीओ कॉल वर चोवीस तासातले एकोणीस वीस तास असायचो. झोप कमी आणि तिच्यासोबत जास्त असायचो. नोकरीची वेळ वेगवेगळी असायची तरी मी तिच्यासाठी नोकरीवर लवकर जायचो. आणि जाताना हि गाडीवर तिच्याशी बोलायचो. इच्छा नसताना पण नोकरीवर लवकर जायचो. इतक प्रेम कि मी माझ्या मम्मी नंतर एवढ प्रेम फक्त तिच्यावर केलेलं. आणि हे तिला हि माहित होत.

ती : मग ती का गेली ?

तो : पैसा. जो माझ्याकडे नव्हता पण येणारच नव्हता अस नाही. त्या पैशापायी तिने प्रेम डावलल. तिचा अचानक एकदिवस मला कॉल आला. आजपासून आपल रिलेशन संपल. मला नकोय आपल नात म्हणून तिने पुन्हा मला ब्लॉक केल. त्यानंतर सव्वा महिना सकाळी नोकरीवर जाताना आणि घरी येताना रोज गाडी चालवताना रडायचो. ती तिकडे ठीक होती मी मात्र रडून त्रास करून घेत होतो. अखेर मीपण ठरवल नाही रडायचं. त्या नंतर पण बरीच जण आली मला प्रेम देणारी. पण इच्छा नाही झाली. दोन वर्ष झाली आता एकटा आहे. एकटेपणा जाणवतोय. पण फिरून तिची आठवण येते जाते. एक तलफ तिच्या आठवणीची सगळ्या अंगाला किक देऊन जाते. मग शुध्दीत असून पण तिच्या विचारात हरवून जातो. मी आजपण तिच्यावर प्रेम करतो. आणि ती कुणा दुसऱ्यावर प्रेम करतेय. हरकत नाही. हा त्रास पुन्हा नको म्हणून सगळ्यांपासून मी लांब आहे. मला चुकीचा समजू नको. तुझ्या भावनेचा मी आदर करतो पण.

ती : पण सगळेच सारखे नसतात ना. मी देईन प्रेम इतक कि तिला हि तू विसरून जाशील.

आणि त्याने मोबाईल खिशात ठेवला. आणि दोन्ही हाताने गाडी चालवायला लागला. तिने मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि त्याला मागून घट्ट मिठी मारली. इतका वेळ दोघांच मोबाईलवर बोलण सुरु होत. त्याच्याकडे शब्द बरेच होते. लिहिण्यासाठी आणि तिला शब्द असून आवाज नव्हता. ती मुकी होती. इतका वेळ दोघ मेसेजवर एकमेकांशी बोलत होते. आणि त्याने न दिलेल्या उत्तरात होकार स्पष्ट होता. आणि म्हणूनच मेसेज करण थांबवून दोघ लांब फिरायला गेले. आणि तिने त्याला प्रेमाने मागून मिठी मारली. त्या स्पर्शाने त्याला हि बर वाटल इतक्या दोन वर्षांनी.    

copyrighted@2020

0 टिप्पण्या