तिच्याबद्दल लिहायला लागलो कितिला जे जे हव ते ते मी केल. केल म्हणजे करण्याचा प्रयत्न केला. ह्या नुसत्या म्हणायच्या गोष्टी असतात कि, मी सगळ केल. पण भौतिक परीस्थिती आणि आर्थिक परिस्थितीमुले कुठे तरी सीमा हि येतच राहते. पण जे आहे त्यात जास्तीत जास्त मिळवून देणे किंवा मग आहे त्या पेक्षा अधिक असल्याचा बहाणा करून आपल्या साथीदाराला खुश ठेवून आपल प्रेम वाढवत राहण्याचा हट्ट म्हणजे पण एक प्रकारचा प्रयत्नच. मी असे इत्येक प्रयत्न केले तिला खुश करायला. आणि तिने ती ख़ुशी एखाद बक्षीस मिळाल्यासारख आनंदाने स्वीकारलं. प्रत्येक वेळेस.

दोघ एकमेकांना आम्ही पूरक होतो. आमचे विचार सारखे. आमची स्वप्न एक. आमची आवड सारखी. आमची ध्येय हि सारखी. काय अस वेगळ नव्हतच. आणि वेगळेपणा कशात आढळला तर आम्ही एकमेकांसाठी तो बदलून एकमेकांसारख पुन्हा होऊन जायचो. ती दूर मी दूर. पण जवळ होत एकमेकांच मन. ज्यात वधत होत एक प्रेम. अस म्हणतात लांब राहिल्याने प्रेम वाढत, फुलत, ते मन प्रेमासाठी अधिक झुरत आणि मग झुरणार मन अधिक प्रेम करू लागत. अगदी जीव तुटेपर्यंत. पण कितपत ? झुरणार प्रेम जीव तुटेपर्यंत प्रेम करायला लागत आणि मग जीव तुटतोच. प्रेम संपतच. आणि उरतात आठवणी. त्या आठवणीच काय करायचं असत ? एकमेकांची आवड निवड सारखी असताना आठवणी मात्र दोघांकडे सारख्या प्रमाणात नसतात. दोघ एकमेकांना पूरक असतात पण या आठवणीत जाणवणारा फरक तो भरून काढावासा दोघांना हि वाटत नाही. दोघ लागतात वेगवेगळ वागू. सारखेपणा जातो कुठल्या कुठे मागे.

ज्या प्रेमासाठी सार जग सारख करून टाकलेलं असत दोघांनी. तेच दोघ त्याच जगाला वेगवेगळ्या नजरेने बघू, जगू आणि शोधू लागतात. प्रेमात होणारा प्रकार जरा वेगळा आहे. पण तितकाच खरा आहे. अस म्हणतात सौंदर्याला वाईटाचा शाप असतो. प्रेम इतक ते सुंदर असत कि त्याला हि हा शाप लागतोच. प्रत्येकाच्या खऱ्या प्रेमाला असा शाप लाभलेलाच असतो. तो आधीमधी, पुढे मागे कधी ना कधी लागतोच. तेव्हा मग होणारी या मनाची हालत कुणाला समजते ? ज्याच त्याला सहन कराव लागत. तिला नवीन प्रेम मिळाल. जस बाजारात नवीन दुकान सुरु झालेलं असत. त्या नव्या दुकानाची रोषणाई बघून त्या दुकानात प्रवेश करावासा वाटतोच नक्की पण, राहूदे... तिच्याबद्दल लिहायला लागलो हल्ली कि मला बर वाटत लिहून पण ती वाईट भासते प्रत्येक लेखातून. जितके वाटते तितकी ती नव्हती आणि नाही. पण तिच्या दूर जाण्याने जो त्रास मला होतो त्याच मी काय कराव हे समजत नाही. खूप आठवण येते तिची खूप पण....    

copyrighted@2020   

0 टिप्पण्या