आणि ऐश्वर्या.


मला भेटायला येणार होती ती. मी तयार होतो. ती तयार होऊन येणार होती. मला माझ्या प्रश्नांची यादी बनवायची होती. तिला जास्त माझ्याशी काही बोलायचं नव्हत. मला काळा रंग आवडतो. पण ती पिवळ्या रंगाच्या कपड्यात सुंदर दिसते. मला शांत परिसर आवडतो. अशा ठिकाणी बसायला आवडत. जिथे शांतता जरा हि नाही अशी ठिकाण तिची सगळी आवडती. मी अनलिमिटेड कॉल्स करू शकतो पण तिने मेसेज करून मला सांगितल भेटीच ठिकाण. दिवस तिच्या मर्जीचा, ठिकाण तिच्या आवडत, तिच्या सवडीने भेटणार होतो आम्ही या सगळ्यात मी, किंवा आमच काही नव्हतच. तरी मी भेटायचं कबूल केल.

ती आली. मला बघून तिची नजर एकच क्षण फक्त माझी झाली. पुन्हा ती तिथून निघेपर्यंत माझी होऊ शकली नाही. इकड-तिकडचा अंदाज घेत मग श्वासांना ताब्यात ठेवत हृदयाची धडधड कपड्यांच्या आतच लपवत विषयांना शब्दात शोधत दोघे बसून होतो. तिला काय विचारणार होतो मी कि, तू कशी आहेस ? तिच्या गालाला दोन्ही बाजूने सरकवत स्थित असलेले ओठ तिचा आनंद दिसत होता मला तो. मग माझी आठवण येते का तुला अस विचारून बघाव म्हंटल. आणि मी विचारल.

“तुला माझी आठवण येते का ग ?”

येते, रोज येते. पण सारखी नाही. कधी-कधी येते. पण आपण वेगळे झालो म्हणजे सगळ संपल अस नाही. तू आहेस माझ्या लक्षात पण आपल्या नात्याला भविष्य नव्हत. आणि भविष्यच नसेल तर त्या गोष्टीच आयुष्य कस निर्माण होईल ? माणसाला जस आयुष्य मिळत तस त्याला जोडलेलं देवाकरवी एक (नशीब) भविष्य असत. आपल्या प्रेमाला आपण आयुष्य देत होतो पण त्याला भविष्य नव्हत. आणि ते नंतर अर्ध्यात कुठे संपल्यावर होणारा त्रास सहन करण्यापेक्षा आधीच लांब झालो आपण ते एक बर झाल. हो ना ?

“याच उत्तर माझ्याकडे नाही.”

“का ?”

“तू सोडून बाकी या सगळ्या गोष्टींचा मी विचार तेव्हा हि केला नाही आणि अजून हि करायला मला वेळ मिळाला नाहीये.”

“चांगल आहे. करूच नकोस विचार.”

“मग आता काय करतेस सध्या तू ?”

वाटल होत नवीन काही शिकत असेल. कुठे तरी मन गुंतवत असेल. पुस्तक वाचत असेल. आईला कामात मदत करत असेल. गाडीवर फिरायला आवडत तिला, गाडीवर रोज फिरत असेल. अशा सगळ्या डोक्यात विचारांचा विचार करत मी तिच्याकडे बघितल आणि ‘ती’ मोबाईल वर काहीतरी लिहून पाठवते. एक क्षण थांबते आणि तिला मेसेज आला. आणि काय गाल अजून बाजूला झाले. मगापासून खुशितले ओठ दिसत होते आता ते विस्फारून दात हि दिसायला लागले. इतक तिला खुश ठेवणारा कोण असेल या विचारात पुन्हा मी नजर फिरवून विचार करायला लागलो.

ती हि मेसेज करण्यात गुंग झाली. जेव्हा तिला भान आल. तिने मला विचारल, मी निघू ?

“मी विचारातून बाहेर येऊन हम बोललो”

ती जागची उठली. मी हि. ती माझ्याकडे बघून उगीचच हसली. आणि निघून गेली. मला उगीचच अस हसू आल नाही. पण ती गेल्यावर डोळ्यात मुद्दाम अस पाणी आल्यासारखं झाल. ती गेली. मी घरी आलो.

तिचा डीपी बघितला आणि उगीचच हसलो. तेव्हा कुठ मनाला बर वाटल.  

copyrighted@2020

0 टिप्पण्या