प्रेमाची लुट

 

एखाद्याला परवानगी देऊन स्वतःला लुटू देण काय असत ? कुणाकुणाला कळत ? किंवा कुणाला माहित आहे का ? प्रेम सगळेच करतात कि या जगात, पण खर प्रेम करणारे किती असतात त्यात ? मोजायचे म्हंटले तरी मोजणी पूर्ण होईपर्यंत आधी मोजले गेलेले अलग झालेले हि असतात. खर प्रेम ते, सोबत राहील तर खर कसल ? खऱ्या प्रेमाला दूर होऊनच सिध्द व्हाव लागत. ज्या भेटीत केल्या जातात गोष्टी, शाब्दिक. त्या शब्दांना पुन्हा काय किंमत राहते का ? जेव्हा एकमेकांपासून वेगळ व्हाव लागत तेव्हा एकमेकांविषयी किंमत राहत नाही तर मग शब्द, वेळ, भावना यांच काय मोल असणार ? घालवलेला प्रत्येक क्षण जो मग जगापासून लपवून, मग काही काळाने बाहेरच्या जगात वावरत, आणि मग एकाच मिठीत होत राहणारी भेट, आणि  पुढे मग जे काही घडत जात, ते मग गरज न राहता आवड बनून जाते. माणसाची एक गोष्ट नैसर्गिक आहे कि, माणसाला जे जे काही आवडत ते ते नंतर त्याला आवडत नाही. मग जे काही दोघांत होत ते आवडीने होत असेल तर ते तरी किती काळ टिकणार ? खर प्रेम म्हणून जे त्यात केल जात ते कितपत खर आहे हे तपासून बघत कोण ?

ज्या स्वप्नांची यादी आपण मनात बनवून एकमेकांशी बोलून व्यक्त केलेली असते ती लिखित कुठे असते का ? त्या याद्या या तोंडून त्या तोंडी अगदी सहज जातात आणि एकमेकांपासून वेगळे जेव्हा हे दोघ होतात, तेव्हा त्या याद्या आपापल्या ताब्यात न घेता स्वतःजवळची कधी न पूर्ण होणारी यादी जपून ठेवणारे कित्येक आहेत या जगात.

अशा या याद्यांची यादी कितीतरी मोठी आहे पण हे सगळ जे काही घडत, ती एक गोष्ट फक्त, ते म्हणजे प्रेम आहे. पण तरी प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी खर प्रेम करायचं असत. प्रत्येकजण त्या खऱ्या प्रेमाच्या शोधात असतो. त्याला त्याच प्रेम मिळत हि. खर प्रेम हि प्रत्येक माणसाची गरज आहे पण जेव्हा गरज सहवासाने आवड व्हायला लागते त्यातल खरेपण निघून जात हे मात्र प्रत्येकाला समजत नाही.

खर प्रेम मुळात झालेलं कुणाला कळत नाही, आणि झाल तर ते पुढच्याला पटवून देईपर्यंत फार उशीर झालेला असतो. जग हे असच आहे. इथे खोट्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. त्याच खोटेपण माहित असताना हि. पण खऱ्याला सिध्द कराव लागत. आणि खऱ्याला खर म्हणणारी हि दुनिया नाही. प्रेम असून चालत नाही फक्त. ते सिध्द कराव लागत, मग जगाव, अनुभवाव, निभवाव आणि टिकवाव लागत. आणि मग हे सगळ केल्यावर जो काही वेळ मिळेल त्यात मग आवडीच्या गोष्टी प्रेमासोबत प्रेमाने केल्या तर ते खर प्रेम. पण अस होत नाही. आणि म्हणूनच “खर प्रेम प्रत्येकालाच मिळत नाही”. 

copyrighted@2020


0 टिप्पण्या