तुझा विचार


प्रेमात शिकण्यासारख काय असत माहित नाही. कोण-कोण काय-काय शिकत ज्याच्या त्याच्या प्रेमातून ते हि मला माहित नाही. मी माझा मी एकलकोंडा. जगाचा समाजाचा विचार सोडून असा एकटा पडलोय. जगाची पर्वा नाही मला. जगाचा विचार नाही मला. आहे तो विचार फक्त तुझा. आहे ती पर्वा फक्त तुझी. हा असतीस जवळ तू तर घेतली असती तुझी काळजी. केला नसता तुझा इतका विचार. पण काय करणार तू जवळ नाहीस. तू माझी नाहीस. तुझ माझ्यावर प्रेम नाही. आपल्यात आता काही नाही. रोज समोर दिसणारी आता चुकूनसुध्दा समोर येत नाहीस. तुझ्या मनाला जरा हि काही वाटत नाही. तुझ्या डोळ्यात अख्ख्या शरीरातलं पाणी साठलेलं असायचंकाही हि झाल तरी तू रडायची. आता आपण वेगळ झालोय तर जरा हि तू रडत नाहीस तू आता माझा विचार करत नाहीस. मी मात्र करतो विचार तुझा. माझा विचार करण सोडून दिलय केव्हाच मी. गाडीवर माझ्या मागे बसून माझ्या पोटाला घट्ट आवळून बसायचीस. कधी कानाला चावायचीस. रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्या मुलीने माझ्याकडे बघितल तर माझ्यावर चिडायचीस पण नंतर. आधी तिच्या देखत माझ्या जवळ सीटवरून सरकायचीस. मग ती मुलगी दुसरीकडे बघायला लागली कि मला ओरडायचीस. इतकी तू पझेसीव. आता कुठे गेल्या त्या तुझ्या फिलिंग प्रेम-प्रेम सतत तो पाढा वाचणारी तू प्रेमाला त्या विसरलीस कोणी दुसरा आला तुझ्या आयुष्यात म्हणून पण एक सांगू जगात माणसाला काहीही होवो.अगदी त्याची स्मृती हि जावो. पण त्याची बोलीभाषा आणि त्याच पहिलं प्रेम तो कधीच विसरू शकत नाही. आणि हे सत्य विधी लिखित असून हि तू प्रेम विसरल्याच नाटक करतेस कबिल-ए-तारीफ आहे हे तुझ नाटक. असो... तू तुझ्या मार्गाने चालली आहेस. मी का मध्ये येऊ. मान्य आहे मी तुझ्या मागे लागलो. तुझ प्रेम मिळवण्यासाठी काय नाही केल. तुही माझ्यावर प्रेम केल. मला प्रेम दिल. ते सांभाळत मी माझ्या मार्गाने तुला घेऊन एका स्वप्नाकडे चालत होतो. पण तू त्या मार्गावरून मला बाजूला केल. मी हि तुझ्यावर विश्वास ठेवून मार्ग बदलला. वेळ गेली. मार्ग तो बंद झाला. तुझ्यासाठी नवा एक मार्ग खुला झाला आणि.....तू सोडून गेलीस मला. कुणा दुसऱ्याकडे. अन आता मी तुझ्याकडे येऊ शकतो ना माझ्या स्वप्नांना मी पूर करू शकतो. बस मग काय आता एकटा पडलोय. लोक नाव ठेवतात मला. हसतात माझ्यावर. आपल्या प्रेमावर. आपल प्रेम खोट होत अस सहज बोलून जातात. राग येतो मला पण आपलच नाण खोट पडल तर काय करणार. गप्प बसून सहन करतो फक्त. ऐकून घेतो. पण एक सांगू अजून हि तुझी खूप आठवण येते. जितकी तेव्हा यायची. जेव्हा तू म्हणायचिसमी घरी जाते आता उद्या भेटू आणि मी त्या एका भेटीसाठी अख्खी रात्र जगायचो आणि तुझी आठवण काढत बसायचो.जिथे असशील तिथे काळजी घे स्वतःची. कारण मला तुझ्या आठवणीत अजून बरेच दिवस जगायचे आहेत. तुला जरास जरी काय झाल तरी मी मग मेलोच समज....
Copyrighted@2020

4 टिप्पण्या

  1. खुप सुंदर सर लेख वाचताना अस वाटत कि कथा आपल्या समोर घडतीय का खुप मस्त सर ब्लॉग खूप मस्त आहे आभारी आहोत आम्ही सर

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर सर लेख वाचताना अस वाटत कि कथा आपल्या समोर घडतीय का खुप मस्त सर ब्लॉग खूप मस्त आहे आभारी आहोत आम्ही सर

    उत्तर द्याहटवा