असावरी

 

डोळ्यावर एक तो नेहमीचा जडपणा. पिवळसर पडलेली बुबुळ. विस्कटलेले केस. अंगात घातलेला शर्ट अंगाभोवती जरा हि नीट न बसलेला. खिशात पाकीट पण त्यात पैसे नाही. पायात चप्पल पण दोन बोटांच्या मधे त्या चपलीचे बंध एकसारखे प्रत्येक पावलाला जाचत होते. टाचा असल्या चपलीने सुजलेल्या. हात असे बेढब झालेले. अंगाला असा वेगळाच वास येत होता. शेजारून कुणी गेल तर तो वास थेट डोक्यात शिरावा असा. ऐकता बोलता येत होत पण तरी कुणाशी हि हातवारे करून बोलणार. कुणी विचारलं तरच चहा घेणार, एखादा वडापाव घेणार. कुणी नाही विचारल तर तसा दोन दोन दिवस उपाशी बसणारा. स्वतःची खायची हालत बेहत्तर आणि त्यात रस्त्यावरच एक गावठी कुत्र सोबत घेऊन कुत्र्याला रोज काहीही करून खायला घालणारा.

या आठ वर्षात किमान हजार एक वेळा त्या घरासमोर जाऊन आला. पण दाराला कुलूप बघून उघड दार बघायला पुन्हा पुन्हा येणारा तो त्याच कुणी नाही अस नाही. आई, भाऊ, बहिण, वडील होते. भाव-बहिणीपेक्षा हा मोठा म्हणून कायम समजून घेण लहानपणापासून त्याच्यात तो गुण होताच. आणि साहजिकच तो मोठा असल्यामुळे त्याच्याकडे आई वडिलांचं दुर्लक्ष होत. वयात आल्यावर पण भाऊ आणि बहिणीसाठी कित्येक गोष्टी समजून घ्यायला लागल्या. ज्या गोष्टी त्याला हव्या होत्या त्या सगळ्या त्याच्या भावाला बहिणीला मिळाल्या. मग आतून एकटेपणा जाणवायला सुरु झाला. बाहेरच ठीक होत पण जेव्हा घरातून अशी वागणूक मिळते ती मनाला सहन नाही होत. लोक म्हणतात घरचेच आहेत समजून घ्यायचं पण किती समजून घेणार ? आणि अपेक्षा तर आपण घरातल्यांकडूनच ठेवतो न ? आणि त्याचाच अपेक्षा भंग होत असेल तर माणूस तुटतोच आतून.

अशात मग शोध सुरु होतो बाहेरच्या जगात अशा व्यक्तीचा जी आपल्याला हव्या त्या वस्तू नाही निदान प्रेम देईल. आपल्याला समजून घेईल. असाच शोध त्याने घेतला. आणि जास्त काही शोध न घेता एक ती, त्याच्या आयुष्यात आली. जिने तीन वर्षात त्याला इतक प्रेम दिल कि त्याच्यासाठी तीच सगळ काही होती. उरल होत आता एक होण. शरीराने आणि मानाने केव्हाच ते एकत्र आलेले पण समजासाठी अस नात म्हणजे फक्त एक लफड असत. लग्न करून समाज मान्य एक नात बनवन बाकी होत. त्यात हि घरच्यांनी त्याला विरोध केला. त्यातून नैराश्य आल. घरातल्या प्रत्येकाला समजावता-समजावता वेळ जात राहिला. तीच लग्न झाल. आणि ह्याला धक्का बसला.

पुढे मग नोकरीच्या बहाण्याने तिला ज्या गावात दिलेलं तिथे हा गेला. नोकरी केली. छोट्या एका खोलीत राहायला लागला. एकवेळ जेवायला लागला. सकाळी जेवल्यावर रात्री भूक लागणारच. ती भागवण्यासाठी सुरुवातीला सिगरेट आणि चहा ची सवय आणि मग कमी पैशामुळे बिडी आणि चहा आणि मग फक्त बिडी आणि मग तर दोन दोन दिवस उपाशी रहाण आल. नोकरी गेली. दुसरी मिळेल हि इच्छा मेलीच. राहती खोली सोडावी लागली. भाड नाही भरलं म्हणून सगळ त्याच सामान मालकाने जप्त केल. अंगावरच्या कपड्यावर त्याने महिनाभर शोध घेऊन तीच घर शोधलं आणि पुढे आठ वर्ष तो तिच्या घरापाशी जात राहिला. त्या घराला कुलूप हे होतच. ती तिथ नव्हतीच पण ती मनात नव्हती अस नव्हत ना. त्या एका विश्वासावर तो रोज तिथ येत जात होता. इकडे घरी त्याचा पत्ता नाही लागला म्हणून मृत घोषित करून त्याचा मृत्यूचा दाखला पण एका फाईलीत लागलेला.

हल्ली त्याला आता ती कधी भेटणारच नाही हा विश्वास बसायला लागला. आणि त्याने पूर्ण खाण पिण सोडून दिल. बस आता मराव हि इच्छा मनात धरून. ती कुठेय ? कशी आहे ? काहीच माहित नाही पण ती जशी आधी होती दिसायला, वागायला आणि परिस्थितीने ती तशीच अजून त्याच्या मनात होती. आणि आत्ता त्याच्या या गरीब अवस्थेत त्याच्या मनातली ती त्याला शोभत नव्हती म्हणून त्याने ठरवल संपवाव हे सगळ. म्हणून त्याने सगळ खाण पिण सोडून दिल. आणि त्याने आज आपले डोळे मिटले. “तिच्या आठवणीत”.

copyrighted@2020

0 टिप्पण्या