प्रेम_हे

 

 तिच्या त्या कित्येक बालिश मागण्यांना पूर करण्याचा प्रयत्न त्यान केला.  पण तिचा बालिश पणा अजून हि नाही गेला. उलट वाढतच गेला. ती सांगायची नेहमीच त्याला तुला असाच लाड करावा लागेल माझा नाहीतर मी सोडून जाईन तुला. त्याला तेव्हा मज्जा वाटायची गरज तिला हि आहे माझी अशी त्याची समज असायची. पण एकटा असताना विचार त्याला यायचा खरच का तिचा त्रास होईल मला ? ती आहे बालिश आणि मी किती समंजस वाटत राहायचं त्याला . पण खरी समंजस तीच होती कारण ८० च्या सिल्क कॅडबरी ची आवड असणारी त्यान आणलेल्या ५ च्या १० च्या कॅडबरीत पण आनंदी व्हायची. पण त्याला ते कळलच नाही. पुढच्या तिच्या स्वप्नांना आपण पूर करू शकत नाही या विचारांनीच त्यान तिच्याशी भविष्याच बोलन केल नाही. वेळ गेला काळ गेला तो तसाच होता ती तशीच होती. त्याला बायको आणि १ मुलगी आहे आणि तिला नवरा दोन मुल आहेत. आज हि तो कधी चक्कर मारतो तिच्या घर जवळून ती अगदी तशीच आहे. नवऱ्या सोबत दुकानात जाऊनभली मोठी कॅडबरी दाखवते आणि तो तिच्या हाताखाली बोट दाखवून २० ची कॅडबरी घेतो. अजून हि ती तिला आवडलेल्या ड्रेस ला दुकानाच्या बाहेरूनच बघून विंडो शॉपिंग करते. कधी कधी चलताना दगड उडवते. केसांना मोकळ सोडून असच हमे तुमसे प्यार कितना गाण्याला गुणगुणत असते. आणि तो .........

तो आपला खोटी समजूत काढून जगत असतो कि मी किती समंजस आहे तिच्या शिवाय जगतोय झुरत आणि ती किती सुखात आहे.....वेड प्रेम.

Copyrighted©2020

0 टिप्पण्या