WARNING..!

ब्लॉगवरील कोणतेही लेख कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावाने शेअर करू नये तसेच कोणतीही कथा किंवा त्यातले प्रसंग वा संवाद कोणत्याहि वेब मालिकेत, फिल्ममध्ये विनापरवाना वापरू नये तसे आढळल्यास 5,000,00 रुपयापर्यंतचा दंड कायदेशीररित्या भरावा लागेल,आणि/किंवा तीन वर्ष कैद होऊ शकते.

प्रेमाची शप्पथ आहे तुला ७वे पर्व

भाग ०१

प्रतीक्षाच्या डोळ्यात पाणी आल. तिने त्याला बघितल. रुबाबात कायम हातात सिगरेट नाहीतर मोबाईल घेऊन बसणारा कायम स्वतः हसणारा आणि सोबत जो कुणी असेल त्याला हसवणारा. आत्ता शांत पडून होता. हाताला लावलेलं सलाईन. छातीतला बांधलेल्या पट्ट्या त्यावर पडलेले रक्ताचे ओलसर डाग. चेहऱ्यावरच तेज सगळ निघून गेलेल त्याच्या. त्याला गरज होती पण प्रतीक्षा आत्ता काहीच करू शकत नव्हती.

एकदा भेटायचं ठरलेलं, हि गोष्ट कॉलेजला असतानाची होती. जेव्हा दोघांच भेटायचं ठरल होत, तेव्हा अजिंक्य तासभर आधीच प्रतीक्षाच्या घरासमोरच्या वडाच्या झाडाच्या पारावर मागच्या बाजूला येऊन बसलेला. तिथ अंधार असायचा. आणि तिथ कुणी फिरकायचं नाही. त्यामुळे कायम अजिंक्य आणि प्रतीक्षा तिथ भेटायचे. आणि कधी मिठी मारावीशी वाटलीच एकमेकांना तर वर पारावर चढून झाडाच्या खोडाला टेकून मिठी मारायचे. मग अगदी तिथून कुणी गेल तरी कुणाला हे दोघ दिसायचे नाहीत. आणि असाच भेटायचा बेत दोघांनी केलेला, आणि  नेमका हिवाळ्यात पाऊस पडला. तस सकाळपासून आभाळलेल. पण दुपार नंतर गारवा वाढला. कुठ तरी पाऊस पडतोय म्हणून इकडे पडणार नाही अस ठरवून दोघांनी भेटायचं ठरवल होत, पण सगळ फिस्कटल.

पाऊस आला आणि प्रतीक्षाला आईने बाहेर सोडल नाही. हातात तिने छत्री घेतलेली तरी. अजिंक्य केव्हाच तिथ पारावर येऊन बसलेला. छत्री घेऊन आलेला तो. बराच तास तो बसून होता. पण तो घरी गेला नाही. प्रतीक्षा त्याला दुपारी सांगून गेलेली कि मला उशीर झाला तरी मी येईन. मला तुला भेटायचं आहे. आणि त्या एका शब्दावर तो तिथ बसलेला. अजिंक्य तिथ बसलेला पहाटे सव्वा पाचपर्यंत. तेही जाग राहून. जेव्हा सकाळी नळातून बाहेर हवेचा आवाज यायला लागला. तेव्हा प्रतीक्षा दार उघडून झोपेत बाहेर आली. नळ बंद केला आणि तिथच डोळे चोळत उभी राहिली. तीच लक्ष गेल समोर तर झोपाळलेल्या डोळ्यांनी तिला अजिंक्य समोर दिसला पाठमोरा. क्षणात तिची झोप गेली. तिने आवाज न करता दाराला बाहेरून कडी लावली. आणि ती अजिंक्यजवळ गेली. अजिंक्य तिला बघून खुश झाला. जागेवरून उठला. आणि तिने केस एका बाजूला केले आणि ते गुंडाळून वर बांधले. दोघ एकमेकांना बघत राहिले. अंधारात.....अजिंक्यने दोन्ही हात बाजूला करून आळस दिला आणि तेवढ्यात प्रतीक्षाने त्याला इतक घट्ट जवळ घेतल कि, त्याचा आळस मधल्यामधी अडकला. पण रात्रभर थंडीत बसून तिच्या मिठीत जी गर्मी मिळाली. त्याने त्याला बर वाटायला लागल. प्रतीक्षाने अजिंक्यला बघितल. त्या तेव्हाच्या अजिंक्यला आत्ता अस झोपलेलं बघून तिच्या डोळ्यातून पाणी आणखी यायला लागल. जेव्हा अमित गेला तेव्हा अजिंक्य आणि प्रतीक्षा भेटले. आणि मग त्याच तिच्यावरच प्रेम बघून प्रतीक्षा सगळ सोडून जेव्हा त्याच्या दारात आली. त्याने कोणता हि एक प्रश्न न विचारता तिला आणि साराला घरात घेतल होत. तो खंबीर अजिंक्य आत्ता बेजीव होऊन पडलेला. तिने डोळे पुसले. डॉक्टर नव्हते. बहुतेक ते केव्हाच गेलेले. ती अजिंक्य जवळ जाऊन बसली. त्याच्या केसातून हात फिरवत ती त्याला एकटक बघत बसली. 

भाग ०२

प्रतीक्षा अजिंक्य जवळ दोन दिवस सलग बसून होती. अजिंक्य शुध्दीत आला नव्हता. प्रतीक्षाची नुसती धावपळ होत होती. बाळाला बघून दुध पाजून, साराच खायचं प्यायचं बघून अजिंक्यजवळ पण बसायचं. यात तीच तिच्याकडे लक्षच काही नव्हत. बाळाला गरज होती तिची पण ती दवाखान्यात त्याला आणू शकत नव्हती. बाळ दिवसभर रडत होत. जेव्हा प्रतीक्षा संध्याकाळी जायची घरी अजिंक्यला डबा आणायला तेव्हाच बाळ तिला बघून शांत व्हायचं. तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी डॉक्टर आले. त्यांनी अजिंक्यला बघितल. त्याला एक इंजेक्शन मांडीत दिल. आणि प्रतीक्षाला काही गोळ्या लिहून दिल्या.

डॉक्टर : मला नर्सकडून कळाल हे मोठे लेखक आहेत.

प्रतीक्षा : हो.

डॉक्टर : मी पहिल्यांदा ऐकल यांच नाव. मला इथून वेळ मिळत नाही. आणि वाचन तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे याचं मी काही वाचल नाही.

प्रतीक्षा : बर.

डॉक्टर : बर, हि औषध आणून ठेवा. दुपारी डोस द्यावा लागेल. आणि हे इंजेक्शन उद्यासाठी लागेल ते हि आणून ठेवा संध्याकाळीपर्यंत.

प्रतीक्षा : रोज येतात ते आले डॉक्टर नाहीत का ?

डॉक्टर : हा ते मुंबईला गेलेत मोठ एक ऑपरेशन आहे. त्यामुळे या पेशंटला मला बघायला सांगितल आहे.

प्रतीक्षा : ठीक आहे मी आणून ठेवते औषध.

डॉक्टर निघून गेले. आणि हळू हसण्याचा आवाज आला. प्रतीक्षा मागे वळून बघते. अजिंक्य निम्मे डोळे उघडून हसतो. प्रतीक्षा पटकन त्याच्या शेजारी जावून बसते. त्याच्या केसातून हात फिरवत विचारते,

प्रतीक्षा :  कस वाटतय अजिंक्य ?

अजिंक्य : आजपर्यंत मला न ओळखणार कधी कुणी भेटल नाही. आणि माझा इलाज होतोय अशाकडून ज्याला मी कोण आहे हे माहितच नाही. आणि हे मला समजल्यावर मला कस वाटत असेल काय वाटत तुला ?

प्रतीक्षा : तू नको ना विचार करू या कशाचा.

अजिंक्य : मी जिवंत आहे फक्त तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मनात जगायची एक इच्छा आहे म्हणून आत्ता पुन्हा डोळे उघडलेत वाटत माझे. प्रतीक्षा एक सांगू का ?

प्रतीक्षा : काय अजिंक्य ?

अजिंक्य : माझ तुझ्या खूप प्रेम आहे. जगात कुणी कुणावर करत नाही इतक प्रेम आहे तुझ्यावर. मला तुझी साथ हवीय कोणत्या हि गैरसमजा शिवाय. मी चुकलो पण माझ्यापासून लांब होऊ नको. मी जे जगलो ते माझ्या मुलांना नको आयुष्य. बिनबापाच आयुष्य मला माझ्या बाळाला आणि साराला नाही द्यायचं.

प्रतीक्षा : शs.. तू शांत पडून रहा मी आहे. कायम तुझ्यासोबत आणि तुझीच आहे म्हणून आपण वेगळे होऊन पण पुन्हा अमित गेल्यानंतर पण एकत्र आलो. हेच आपल नशीब आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस. आपल आयुष्य एक आहे. तू शांत राहा. नको कसले विचार करू. झोप मी आहे. अजिंक्यने तिला जवळ घेतल. आणि प्रतीक्षाने त्याचा ओठांना आपल्या ओठात घेतल. आणि अजिंक्याच्या डोळ्यातून पाणी आल. ते बघून प्रतीक्षा हि ओल्या डोळ्यांना घेऊन खिडकीपाशी गेली. आणि बाहेर बघायला लागली अजिंक्यकडे पाठ करून.  

भाग ०३

अजिंक्य तिच्याकडे बघतो. प्रतीक्षा पाठमोरी डोळे पुसत उभी असते. तो स्वतःच्या हातातली सलाईनची सुई काढायला जातो पण तेवढि ताकद नसते त्याच्यात. तो प्रयत्न करतो पण नाही जमत.

अजिंक्य : प्रतीक्षा...

प्रतीक्षा मागे वळून बघते, आणि त्याच्या जवळ जाते.

प्रतीक्षा : काय ?

अजिंक्य : मी आहे ठीक, तू घरी जाऊन ये.

प्रतीक्षा : नको. इथ आत्ता कोण नाहीये तुझ्याजवळ. आणि नेहमीचे डॉक्टरपण नाहीयेत इथ.

अजिंक्य : हो, पण बाळाला भूक लागली असेल. वरच दुध पिऊन त्याच पोट नाही भरणार. आणि भरल तरी अंगाला नाही लागणार. तू जा. माझ्यापेक्षा त्याला गरज आहे तुझी. आणि साराला पण करमत नसेल. तिला पण थोड खायला घाल आणि मग ये ना. मी आहे. काळजी करू नको.

प्रतीक्षा : घरी आई आहे अजिंक्य. इथ कुणी नाहीये.

अजिंक्य : मी आहे. तू जा. हव तर जास्त वेळ नको थांबू पण घरी जाऊन ये.

प्रतीक्षा : नक्की जाऊ ?

अजिंक्य : हो.

प्रतीक्षा निघाली. अजिंक्यच्या चेहऱ्यावरून एकदा हात फिरवला आणि निघाली.

अजिंक्यने डोळे मिटून घेतले. तो झोपून गेला. प्रतीक्षा घरी आली. तिने बाळाला तीच दुध पाजल. साराला खायला देऊन बाळाला झोपवून ती आईला मदत करून तिने चहा आणि बिस्कीट खाल्ल फक्त. आणि अजिंक्यसाठी जेवणाचा डबा भरून ठेवला. आतल्या खोलीत जाऊन तिने कपाट उघडल. त्यातले काही बॉक्स उघडून पुन्हा कपाट बंद केल आणि तिने एक कॉल केला.

प्रतीक्षा : हेल्लो, आनंद जोशी बोलतायत का ?

आनंद : हो, आपण ?

प्रतीक्षा : प्रतीक्षा अजिंक्य भोसले.

आनंद : म्हणजे रायटरच्या मिसेस का ?

प्रतीक्षा : हो.

आनंद : बोला ?

प्रतीक्षा : तुम्हाला नवीन मालिकेसाठी स्टोरी पाहिजे का ?

आनंद : पाहिजे तर आहे. पण अजिंक्यची नको.

प्रतीक्षा : का ? त्याच्या मालिका तुम्हाला हि माहित आहेत किती फेमस होतात.

आनंद : हो माहित आहे. पण त्याची स्टोरी घेतली तर माझ्या बाकीच्या दोन मालिका बंद करून टाकतील इंडस्ट्रीतली माणस. आणि एका स्टोरीसाठी दोन मालिकांचा तोटा नाही सहन करून चालणार मला.

प्रतीक्षा : बर मग मी पैसे लावते, तुम्ही फक्त मालिका बनवा आणि प्रसिद्ध करा.

आनंद : अहो, पैसे तुम्ही लावला तरी मालिकेच्या स्टोरीला अजिंक्य सरांच नाव लागेलच ना. दुसऱ्या कुणाच्या नावावर मालिका सुरु करायची असेल तर सांगा लगेच करू काम सुरु. पैसे पण मी लावतो. स्टोरी तुमची नाव फक्त दुसऱ्याच.

प्रतीक्षा : नको, सॉरी. नाव लागल तर अजिंक्यचच लागायला हव.

आनंद : मग माझ्याकडून काहीही मदत होऊ शकत नाही.

प्रतीक्षा : बर.

कॉल कट झाला. त्यानंतर तिने दोन आणखी नंबर शोधले तीन-चार वेळा कॉल लावून बघितला पण लागला नाही. तिने काही बॉक्स घेतले आणि ती एका ज्वेलर्समध्ये गेली.

भाग ०४ 
प्रतीक्षाने सोबत नेलेले बॉक्स तिथे नेऊन त्यातले सगळे दागिने मोडले. जे दागिने अमितने तिला लग्नावेळी बनवलेले. आणि काही दागिने अजिंक्यने तिला घेऊन दिलेले. त्याचे सगळे मिळून आठ लाख झाले. सोन तपासून मग त्याचे पैसे मिळणार तोपर्यंत थोडासा वेळ लागणार होता. प्रतीक्षा बसली. पण तिला शांत बसवेना. तिने मोबाईल घेतला आणि एका प्रोड्युसरला कॉल केला पण त्याने तो उचलला नाही. “जेव्हा गरज असते आपल्याला कुणाची, नेमकी कुणाला आपली गरज नसते”. हेच खर. आता काय कराव या विचारात ती शांत बसून होती. आणि तिला एकजण आठवला. तिने लगेच कॉल केला. 
प्रतीक्षा : हेलो, मुळे काका. मी प्रतीक्षा बोलतेय.
प्रतीक्षा : प्रतीक्षा ? हा बेटा बोल. किती दिवसांनी फोन केलायस.. ? कुठे आहेस ? कशी आहेस ? 
प्रतीक्षा : मी बरी आहे काका. तुम्ही कसे आहात ? आणि काकी ? 
मुळे : आम्ही दोघ हि टुणटुणीत आहोत. बोल काय काम काढलस काकाकडे ?
प्रतीक्षा : काका, अजिंक्यने एक घर घेऊन दिलेलं बघा मला आठवतय का ? आजूबाजूला जमीन होती मध्ये घर होत बघा. तुमच्या ओळखीचे ते पटवर्धन होते त्यांच ते घर होत. आठवतय का ?
मुळे : हा, आल-आल लक्षात त्याच काय ?
प्रतीक्षा : विकायचं आहे मला. लवकरात लवकर.
मुळे : का ? अग अस घर आणि आसपास मोकळी जागा असल नाही ग भेटत. ते पण भरल्या शहरात. काही गरज आहे का पैशाची तुला. मी करतो न मदत. बेटा तुझ्या मुलीला भविष्यात होईल ते घर. नको विकुस.
प्रतीक्षा : तिच्यासाठीच नवीन घर घेतेय इकड पुण्यात. फक्त मला लवकरात लवकर पैसे हवेत. जो कुणी तयार असेल त्याला लगेच विकता येईल. कागद तयार आहेत. 
मुळे : मला सांग तुला कितीची नड आहे ?
प्रतीक्षा : वीस तीस लाख.
मुळे : इतके ? 
प्रतीक्षा : हो.
मुळे : मी काही मदत करू का ?
प्रतीक्षा : तुम्ही विचारल हेच खूप आहे काका. पण तुमची मदत मला पुन्हा करावी लागेलच ना परत. त्यापेक्षा तुम्ही माझ घर विकून दिल तर बर होईल.
मुळे : मला दोन दिवस दे मी बघतो.
प्रतीक्षा : चालेल. मी कॉल करेन तुम्हाला परत काका.
मुळे : हो...हो काहीच हरकत नाही. काळजी घे.
कॉल कट झाला. 
भाग ०५ 
आणि समोरून एकीने तिला बोलवल. प्रतीक्षा गेली. पैसे आणि पावती घेऊन ती तिथून घरी आली. घरी येऊन तिने पैसे ठेवले. बाळाला बघितल. एवढ्या वेळात डबा भरून ठेवलेला गार झालेला. तिने पुन्हा गरम करून डबा भरला. आणि ती निघाली. तेवढ्यात बाळ रडायला लागल. इतक रडायला लागल कि ते रडायचं थांबतच नव्हत. आई खेळवत होत्या. सारा हि त्यात काही तरी प्रयत्न करत होती. पण बाळ ऐकायलाच तयार नाही. शेवटी प्रतीक्षाने त्याला आईकडून स्वतःजवळ घेतल तेव्हा ते शांत झाल. अजिंक्य तिकड एकटा होता. आणि इकडे बाळ ऐकायला काही तयार नव्हत. शेवटी प्रतीक्षाने डबा आणि बाळ दोन्ही सोबत घेतल. आणि ती दवाखान्यात आली.   
अजिंक्य खिडकीकडे एकटक बघत बसलेला. प्रतीक्षा आल्याच समजल तस त्याने बघितल तर ती आणि बाळ दिसल. अजिंक्य उठायचा प्रयत्न करत होता. पण त्याला जमत नव्हत. डाव्या बाजुच सगळ बेजीव झाल्यासारखं शांत झालेलं. उजव्या हातात सुई होती त्यामुळे तिकडून काही हालचाल करता येत नव्हती. तेव्हा मग प्रतीक्षा पटकन पुढे जाऊन डबा बाजूला ठेवते. आणि बाळाला घेऊन अजिंक्यच्या जवळ बसते. अजिंक्य बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो. आणि बाळाला ते जाणवत. डोळे बारीक उघडून ते बघत तर समोर प्रतीक्षा दिसते. दोन्ही हाताची हालचाल करून ते जणू प्रतीक्षाला विचारात असाव कि बाबा कुठे आहे ? प्रतीक्षा बाळाला अजिंक्यसमोर धरते. आणि बाळ अजिंक्यला बघत. अजिंक्य त्याला बघून हलका हसतो. बाळ पण बारीक डोळ्यांनी अजिंक्यला बघून  हसत. आणि तोंडाने बारीक आवाज काढत जणू त्याला हाकच मारत. 
प्रतीक्षा बाळाला मग मांडीवर झोपवून एका हाताने थोपटवत हळू हळू एका हाताने डबा उघडून अजिंक्यला भरवत राहते. या सगळ्यात बाळ झोपून जात. अजिंक्यच जेवण होत. आणि अजिंक्यला गोळ्या देऊन ती बाळाला घेऊन घरी निघून जाते. जाताना मोकळा डबा घेऊन जाते. बाळ झोपलेले त्याला तसच आत झोपवून ती पुन्हा बाहेर आली. 
दवाखान्यात येताना वाटेत तिला कॉल आला. 
प्रतीक्षा : हेलो ?
माणूस : हेलो, प्रतीक्षा बोलतायत का ?
एकजण : हो..आपण ?
एकजण : मी गौरव. मला समजल आपल्याकडे मालिकेसाठी स्टोरी आहे. अजिंक्य सरांची. मला त्यांची स्टोरी घ्यायला काही हरकत नाही. पैसे मी लवतो. मला फक्त चांगल्या स्टोरीची गरज आहे. 
प्रतीक्षा : कुठून बोलताय आपण ?
गौरव : मुंबई. 
प्रतीक्षा : आपल बजेट काय असणार आहे एका एपिसोडच ?
गौरव : पाच ते सहा लाख. 
प्रतीक्षा : बर, आणि बाकी स्टार कास्ट नवीन घेणार आहात कि जुनी ?
गौरव : दोन्ही मिक्स. 
प्रतीक्षा : स्टोरी द्यायला माझी हरकत नाही पण तुम्ही अजिंक्यच्या आधीच्या मालिका बघितल्या आहेत का ? त्याच्या मालिकांची क्रेज माहित आहे का ?
गौरव : हो. माझी इच्छा होती त्यांच्या स्टोरीवर काम करायची. ती बहुदा आता पूर्ण होईल.
प्रतीक्षा : अजिंक्यच्या कामात बराच रिकामा वेळ निघून गेलाय. यात तो पुन्हा नव्याने सुरु करतोय. त्याच आता नाव कमी झाल किंवा त्याच्या स्टोरीची ती क्रेज चालली नाही तर मला चालणार नाही. तुम्ही एक तर तुमच बजेट वाढवा किंवा जुनी स्टार कास्ट घेऊन मलिका बनवत असाल तर सांगा.
गौरव : आमची आधीची एक मालिका होती ती अर्ध्यात बंद करावी लागली होती. कमी टी.आर.पी. मुळे. दोन वर्षानंतर आम्ही आता ठरवल आहे आता उतरायचं तर चांगलच घेऊन. पण आधीच्या मालिकेत लॉस झाला त्यामुळे आत्ता जास्त पैसे लावता नाही येणार. हा पण प्रमोशन जोरात करू.
प्रतीक्षा : तुम्ही निम्मे लावा मी निम्मे लावते पैसे चालणार आहे का ?
गौरव : मग तर काहीच हरकत नाही. 
प्रतीक्षा : चालेल. मग एक मिटिंग घेऊन पुढच ठरवूयात. 
गौरव : मी शनिवारी येणारे पुण्यात तेव्हा भेटू.
प्रतीक्षा : चालेल. 
कॉल कट झाला. प्रतीक्षा दवाखान्यात आली. 


     

copyrighted@2020
sponsored by marathmoli europyatra.

 

request, please donate for poor kids by writholic.

 


9 Comments