O P T I O N

जगात इथे प्रत्येक गोष्टीला ऑप्शन हा असतोच. मग ती वस्तू असो व्यक्ती असो किंवा प्रेम असो. स्वतःच अस अस्तित्व सिध्द करताना आपण कुठे कमी पडलो तर आपल्यालाला नजरेआड करून आपल्याऐवजी दुसरा ऑप्शन निवडणारी जगात प्रत्येक व्यक्ती असते. मी हि कधी कुणाचा ऑप्शन होतो आणि आता सध्या मी हि दुसरा ऑप्शन शोधतोय. ज्या प्रेमाला मी खर म्हणून ते सिध्द करत वर्ष तुझ्यासोबत घालवल. त्या वर्षभरात काय करायचं राहील होत ? जे जे करायचं होत सगळ केल. तुला गरज असताना तुझ्याशी तास-तासभर बोललो, तुला गरज नसताना हि तुला माझा वेळ दिला. तुला आवडणाऱ्या गोष्टी माझ्या आवडत्या केल्या. तुला न आवडणाऱ्या पण त्या मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी मी केव्हाच वापरायच्या बंद केल्या. तुझ्या आवडते पदार्थ माझ्या आवडते झाले. तुझ माझ बोलन कमी होत असल तरी इतर कुणाला हि मधल्या वेळेत मी मेसेज केला नाही. कुणाचे का माचे कॉल आले तरी ते मी उचलले नाही. कायम बिझी असणारा मी तुझ्या कॉलसाठी कायम फ्रीच राहिलो. तुझ्या आजारात डॉक्टरसारखा तुला सल्ला न देता नर्ससारखा तुझी काळजी घेत जगायचो. तुझ्या आनंदात सहभागी होऊन तुझ्या दुःखात सोबती होऊन तुला त्यातून बाहेर काढायला मदत करायचो. तुझी इच्छा असताना तुझ्या जवळ यायचो. माझी इच्छा मी मात्र मारायचो. तुझ्या एकूण एक आठवणीत मीच वावरायचो. नव्या आठवणी बनवताना मी मात्र कायम तुझ्या जवळ असेनच अस नाही व्हायचं. तरी मी खुश असायचो.

तुझ नशीब खराब म्हणून आधीचा सोबती तुला फसवून निघून गेला. तुझ्या भावनेशी खेळून तो तुझ्या शरीराची सगळी ओळख मनात ठेवून निघून गेला. पण मी मला नशीबवान समजायचो कि तू माझ्या आयुष्यात आहेस. त्याबद्दल कितीदा मी गणपतीपुढे पेढे ठेवले असतील. माझ काम करून वेळ घालवणारा मी, तुझ्या विचारात दिवस पुरेनासे झाले. मग रात्री तरी कशा पुरतील ? या न त्या गोष्टींनी तू सतत आठवत राहायची. इतके आपण पुढे गेलो होतो. काय करायचं राहील होत आता मी तुझ्यासाठी ? सगळ करून बसलेलो. उरलेलं फक्त लग्न करायचं. पण तुला काय झाल काय माहित. आधीच्या प्रेमाला आठवून तू माझी तुलना त्या मुलाशी केलीस आणि मी हि असाच नालायक बनेन अस तुला वाटल. मी तुला कितीदा तरी समजावलं. पण तुला नाही समजल. अखेर तू माझ्याशी बोलन कमी केलस. भेटायचो तेव्हा होणारा आपला किस अलीकडे तू अगदी जवळ पण उभी नाही राहायचीस. तुझ लांब जाणार मन बघून खूप त्रास व्हायचा. पण तुला समजावण्यासाठी मी किती ते प्रयत्न केले असतील ? मित्रांनी हि मला मदत केली पण त्यांना हि तू दाद लागू नाही दिली. शेवटी मित्र बोलले सोडून दे तिचा विचार. पण त्यांना काय माहित मी काय काय केलय तुझ्यासाठी. मला तुला बोलून दाखवायचं नाहीये. पण तरी जे केल ते सगळ मी स्वार्थापोटी केल अस नाही पण तुला माझ कुणी तरी मानत होतो म्हणूनच सगळ करत होतो ना ? माझ्या आईपेक्षा पण मी तुझ्यासाठी जास्त केल. आईपेक्षा जास्त तुला मी वेळ दिला. जितक दिवसभरात आपण एकमेकांशी बोलायचो एका दिवसच बोलन एवढ, मोजल तर इतक मी आईशी कधी बोललेलो आठवत नाही. इतक तुझ्यासाठी करून सुध्दा तुला तुझ्या मनावर विश्वास नाही. माझ्यावर विश्वास नाही. प्रेमावर आपल्या विश्वास नाही. शेवटी १५ ऑक्टोंबरला शेवटचा आपला कॉल झाला. मी वेगळा आणि तू मोकळी झालीस. आपल नात संपल. अलीकडे मला समजल कि मी जे तुझ्यासाठी केल ते सगळ तू हल्ली कुणा एकासाठी करतेयस. माझा ऑप्शन तुला मिळाला. पण त्याच्याकडून तुला खर प्रेम मिळत का नाही तुलाच माहित. पण जे तू त्याच्यासाठी करतेस ते माझ्यासाठी केल असतस तर ? असो, तू गेलीस मी एकटा पडलो. मित्रांच्यात जातो कधीतरीच आणि त्यांच्यासोबत सिगरेट ओढून परत घरी येतो. त्यांच्यात हि जास्त वेळ बसत नाही. बसलो तरी अधिसारख्या गप्पा मारत नाही. बाकी आता हा एकटेपणा झेपत नाहीये. आणि म्हणून मग मीही शोधतोय तुझ्या ऐवजीचा नवा एक “ऑप्शन”.         


copyrighted@2020

0 टिप्पण्या