kiss

valntines stetus kiss day stetus

अलीकडेच, हल्ली दोन-तीन आठवडे झाले असतील तुला मी पूर्ण विसरलो. तुझ माझ प्रेम. प्रेमात घालवलेला सगळा वेळ मी विसरून गेलो. मागच्या आठवड्यात मोबाईल अपडेट करताना काहीतरी झाल आणि सगळा मोबाईल रिकामा झाला. त्यात तुझे सगळे फोटो गायब झाले. तुझा नंबर ‘बायको’ नावाने सेव्ह होता तो पण गेला. पुन्हा सेव्ह करावा म्हंटल पण जाऊदे, अस हि नंबर सेव्ह करून तुझा डीपी कुठे दिसणारे मला ? आणि तू थोडीच मला कॉल करणारेस ? तुझ्यासाठी केलेल्या शायऱ्या त्याही whatsapp वरून डिलीट झाल्या. कागदावर लिहिलेल्या काडीपेटीने काल जाळून टाकल्या. तू दिलेल्या गिफ्ट्सना मी आमच्या इथल्या शेतात फेकून दिल. गाडीवरून फिरताना कोणत्याही मुलीचे केस, डोळे, ओठ बघून आता तुझा भास होत नाही. कुणाचा ड्रेस सारखा दिसला तरी तुझी आठवण होत नाही. रात्री झोपताना तुझा माझा किस मला आठवत नाही. ओठ गरम झाले होते परवा. तू किस केला होतास तेव्हा जसे गरम झालेले माझे ओठ एकदम तसेच पण तापाने. आजारी होतो पण तुझी गरज वाटली नाही. मी माझा बरा झालो. रोज-रोज असाच मला माझी एकट्याची सवय लावत करत रोज डे आला. तिथून पुढे आठवडाभर डे सुरूच राहिले. दुसऱ्यांचे बदलणारे स्टेट्स आणि किस डे चे फोटो बघताना फेसबुकवर तुझा फोटो दिसला. खुश दिसत होतीस तू. अस म्हणतात फोटो काढताना माणसाला हसावंच लागत. आजकाल तर कॅनडीडचा जमाना आहे. तुझा आणि त्याचा तो कॅनडीडच फोटो होता. आणि तरीही तू त्यात खुश दिसत होतीस. तुला खुश बघून माझे ओठ विस्फारले. पण डोळ्यात जस पाणी साचायला लागल ओठ विस्कटायला लागले. पुन्हा सगळ्या गोष्टी डोक्यात यायला लागल्या अगदी पहिल्या किस पासून आणि......


0 टिप्पण्या