FIRST LOVE

हरवत चाललेली स्वप्न जेव्हा विचारात कधी सापडू लागतात, खर सांगतो मनाला खूप त्रास देतात. त्या स्वप्नांना पूर्ण न केल्याचा त्रास होतोच वरीस वर त्या स्वप्नांच्या वेळेचा काळ आठवू लागतो. त्या काळात कित्येक लोक अवतीभोवती असतात. त्या प्रत्येक व्यक्तीशी असलेल आपल नात आणि घालवलेला सोबतचा क्षण सगळ आठवायला लागत. मग एक एक गोष्ट आठवत बसल कि नको वाटतात ते सगळे विचार.

मी सगळ्यांना कधीच विचारामागे टाकल आहे. कित्येक क्षण असे मी वेळेसोबत विसरून गेलोय. म्हणून तर इथवर येऊन पोचलोय. पण त्या जुन्या सगळ्या विचारात तुझ्या आठवणी आहेत. ज्या विसरून जाण, अशक्य आहे मला. किती तो वेळ आपण सोबत घालवला आहे. कित्येक अंतर कापत आपण एकमेकांच्या अगदी जवळ आलेलो होतो. किती अशा गोष्टी आहेत ज्या फक्त तुला आणि मला माहित आहे. त्या कुणाला माहित नाहीत. आणि म्हणून तुला मिळवण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न केले कुणी मला मदत केली नाही. कुणाची सोबत मिळाली नाही. कारण कुणाला मी आपल नात सांगू शकलो नाही. आणि तुझ्या माझ्यातल सगळ कुणाला सांगाव इतक अस जवळच तु सोडून कुणीच झाल नाही.

मग वेळ जात गेला. आपण एकमेकांवेगळे होऊन मिनिट-मिनिट आणि मग वर्षे झाली. तू मला न विसरण्याची शपथ कधी एकदा घेतलेली मला आठवतेय चांगलीच. दिवस गेले आणि शपथ मोडून त्याची फक्त पुसट आठवण माझ्या जवळ राहिलीय. तू मात्र विसरून गेलीस. तू कुणा दुसऱ्यासोबत जगतेय मला बाहेरून कळाल आहे. चांगली गोष्ट आहे. तू खुश आहेस हे महत्वाच. सोबत तुला माझी नसली तरी चालेल मला. त्या नंतर बऱ्याच बातम्या तुझ्याबद्दल मला समजल्या. तुझ लग्न झाल. तुला एक मुलगा झाला. तू राहायला दुसरीकडे गेलीस. सगळ तुझ आपण ठरवलेलं तसच आयुष्य चालल आहे हे जाणून मी खुश झालो. पण आपण ठरवलेल्या आयुष्यात तुझ्यासोबत कुणी दुसरा आहे हे मला नाही झेपत. तुझ्यासाठी तो तुझा नवरा असला तरी त्याचे सगळे ह्क्क कित्येक वर्ष आधी तू मला दिले होतेस. ते हक्क तुझ्यावर मी आत्ता दाखवू शकतो का ?

आपल्यात अंतर आहे. खूप आहे. तू तुझ्या आयुष्यात खूप पुढे गेलीयस. बदलून गेलीयस. मी आहे तसाच आहे. जसा तुला मी आवडायचो. मी माझ्यात बदल नाही केला. कधी आलीस फिरून माझ्याकडे तर मी तुला तसाच तुझा अजिंक्य वाटावा म्हणून आहे तसाच आहे मी. तू विसरून गेलीस मला. पण मी रोज आठवण काढतो तुझी. सॉरी, तुला रोज तिकडे उचक्या लागत असतील. पण मी आठवण काढत नाही. कारण आठवण काढायला त्या व्यक्तीला विसराव लागत आणि मी तुला विसरलो नाहीये, अजून तरी. तू माझ्या लक्षात आहेस आणि म्हणून दिवसभरात कित्येकदा तू माझ्या लक्षात येतेस. असो. तू खुश आहेस. म्हणून मी खुश आहे. लोक तुला तुझ्या नवऱ्याची बायको म्हणतात. आणि मी हि मग कुणाला सांगायला जात नाही कि, तू माझी आहेस. लोकांच्या हो मध्ये माझा हो मिळवून मीही तुला त्याची म्हणतो. पण एक सांगू,

तुझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम मीच होतो. हे मात्र नक्की. जे मी लक्षात ठेवून आहे. आणि हे तुला विसरता हि येणार नाही. एवढ मात्र नक्की.


copyrighted@2020

0 टिप्पण्या