Cake Shop

 

भाग 01

मोबाईलची रिंग वाजते.....

निशा : हॅलो, हा बोल ना स्नेहल.

अजिंक्य : हॅलो. हॅप्पी बर्थडे निशु. बर्थ डे तुझा आहे पण रात्री अकरा पन्नास पासून माझी झोप उडालीय.

निशा : ओह, थँक यु स्नेहल..मला वाटलं विसरलीस तू मला. किती दिवस झाले तुझा कॉल नाही मेसेज नाही. आत्ता केला नसतास ना कॉल तर तुला ना मी बघितलच असत. कसा रे तू अजिंक्य ? कालपासून हा तुझा सतरावा कॉल आहे बर्थ डे विशसाठी. तू झोपला नाहीस मला झोपू दिल नाही. सकाळपासून फ्रेंड्सचे कॉल आले बरेच पण तुझा आला नाही. मला वाटलं तू रात्री जागलास म्हणून सकाळी झोपलास.

अजिंक्य : असा कसा झोपेन ? तुझ्या घराजवळ नसलो तरी तुझ्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न सुरु असतो माझा. आई आहेत का आसपास ?

निशा : होआई असली आसपास कि तू माझी स्नेहल, प्रियाली, स्वप्नाली आणि कोणी नसलं कि तू माझा बाबू असतोस. आत्ता पण आई होती जवळ, पण गेली आतल्या खोलीत. बोल तू. कधी भेटायचं आपण ?

अजिंक्य : बरोबर तीन वाजता. तुझ्या घराच्या खालच्या चौकातल्या रातराणीच्या झाडाजवळ. तिथं मी येईन गाडी घेऊन तुपण ये. पण चालत ये. आणि...

निशा : आणि ?

अजिंक्य : आणि तुला माहीतच आहे.

निशा : काय रे.

अजिंक्य : काय रेSSSSरे...? हे चांगलं आहे. आधी सांगायचं. आणि परत माहित नसल्यासारखं बोलायचं. 

निशा : मज्जा करतेय रे. आहे लक्षात. आणि मीच बोललेय ना तुला. माझ्या बर्थ डे च गिफ्ट तू मला नाही मी तुला देणार. डोन्ट वरी मी विसरेन कशी. पण ऎक ना अजिंक्य.

अजिंक्य : काय ?

निशा : होईल ना नीट सगळं ? जमेल न आपल्याला ?

अजिंक्य : प्रयत्न तर करू आणि जवळ आलो कि होईल सगळं आपोआप.

निशा : होका ? बरीच माहिती आहे तुला.

अजिंक्य : नाही ग अस काही. पण माझं  मत सांगतोय. जमेल आणि नाही जमलं तरी काही हरकत नाही. 

निशा : पण तू माझ्याशीच लग्न करायचं. कारण मी आज तुझी झाले तर मला नाही पुन्हा जमणार दुसऱ्या कुणाचं होणं. मी एक्साईटेड आहे पण, तितकीच घाबरली पण आहे. पण माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. 

अजिंक्य : तुझा हा विश्वास मी वाढवेन, जपेन पण तोडणार नाही. कधीच.

निशा : थँक्स.

अजिंक्य : काय अग परक्यासारखं थँक्स बोलतेस.

निशा : असच रे.

अजिंक्य : ऐक ना निशु, आय लव्ह यु...

निशा : आय..... हा ऐक ना स्नेहल मी नंतर तुला कॉल करते. मग बोलू मला जरा आवरायचं आहे.

अजिंक्य : अग ऎक तर..हॅलो...

कॉल कट झाला.

अजिंक्यने मोबाईलच बटन दाबून नाराज होऊन स्क्रीन ऑफ केली आणि क्षणात पुन्हा स्क्रीन ऑन झाली. स्क्रीन वर मेसेज दिसला आय लव्ह यु अजिंक्य टू.. सॉरी आई आली एकदम बाहेर. दुपारी तू म्हणशील तेवढ्या वेळा म्हणेन. बट आत्ता सॉरी.


भाग 02

मोबाईलची रिंग वाजली.

अजिंक्य : बोल राज.

राज : कॅफे बुक केलाय. दुपारी होईल डेकोरेशन. शुभम आणि प्रशांत थोड्या वेळाने जातील तिथं. 

अजिंक्य : तू कधी जाणारेस दवाखान्यात ?

राज : पप्पा येतायत घरी. ते आले कि लगेच जाणारे. पप्पाना घरी सोडलं कि लगेच मी तिकडं कॅफेवर येईन. वहिनींना भारी सरप्राईज असेल. तू सांगितलं तस वॉल डेकोरेशन असेल. पूर्ण खोलीत फुगे असतील वर-खाली. मध्ये एक टेबल त्यावर केक आणि केक कापला कि, सुरी बाजूला ठेवल्यावर वरून तू घेतलेली सिल्व्हर रिंग वहिणींच्या समोर येईल. ती तू त्यांना घातली कि मग सगळ्या लाईट बंद होतील. भिंतीवर प्रोजेक्टरने तुझे आणि वहिणींचे सगळे फोटो म्युझिकवर प्ले होतील. ती व्हिडिओ संपली कि, तू त्यांना घेऊन शेजारच्या खोलीत जा. तिथे पूर्ण अंधार असेल. मध्ये दोन मोठ्या मेणबत्त्या सुरु असतील. त्या प्रकाशात ठेवलेले वहिणींचे  आवडते पदार्थ असतील. ते खाऊन झालं कि, तिथून डावीकडे एक जिना आहे तिथून वर जायचं. वर एक खोली आहे. फुल सेंटेड असेल ती रुम. प्रोटेक्शन पण ठेवलंय उशीखाली. मग तुमचं झालं कि कॉल करायचा मला. मग मी येतो प्रदीपची स्विफ्ट घेऊन. मग वहिनी, तू, मी आणि प्रशांत आपण जाऊन फिल्मला. आणि मग नंतर त्यांना सोडू घरी. ओके का ?

अजिंक्य : तू सगळं ठरवलंय तर मी काय करायचं ?

राज : बस का ? मित्रासाठी काहीपण. तू फक्त एक काम कर, प्रशांतला अर्धातास आधी कॉल करूनल वहिनींना कोणता केक आवडतो तो आणायला सांग. बर ऎक पप्पा आलेत. जातो. प्रशांतला सांग फक्त केक आणायला.

अजिंक्य : चालेल, जा आणि ये लवकर तिकडं. 

राज : येस. बाय.

अजिंक्य : बाय.

कॉल कट झाला. अजिंक्य आरशासमोर गेला आणि त्याने शर्ट काढला. कपाटाच दार उघडून त्याने पांढरा शर्ट बाहेर काढला. तो घालून त्याची बटन लावत तो विचारात हरवला. सगळे कपडे बदलून त्याने केसांना वॅक्स लावलं आणि केस नीट सावरून त्याने सेंट फवारला आणि त्याने गाडीची चावी घेतली. बाहेर येऊन त्याने गाडी सुरु केली. तो निघाला फ्लॉवर डेकोरेटरकडे. तिथं जाऊन त्याने अजिंक्य लव्हज निशा नावाचा फुलांचा बदाम करायला सांगितला. तो बदाम होण्यासाठी दोन तास लागणार होते. त्याने पैसे दिले आणि प्रशांतला सांगून तो बदाम झाल्यावर कॅफेत न्यायला सांगितलं. तिथून तो निघाला पेट शॉपकडे. वाटेत त्याने कानात हेडफोन लावले. आणि निशाला कॉल लावून तो गाडी चालवायला लागला.

अजिंक्य : निशु, काय करती तू ?

निशा : अग काही नाही, आवरतेय मी माझं. फ्रेडन्स येणारेत ना इकडे बर्थडे सेलिब्रेट करायला माझा. 

अजिंक्य : आई आहेत वाटत, पण अजून दोन-तीन तास आहेत ना.

निशा : हो ते असेच जातील. कळणार पण नाही.

अजिंक्य : होका.

निशा : होना. गेली आई बाहेर. मला ना आज तुला भेटायचं म्हंटल तर कस तरी होतंय. पहिल्यांदा आपण भेटलो होतो ना तेव्हा पण अस वाटलं नव्हतं इतकं अस काहीतरी होतंय.

अजिंक्य : मला पण तसच होतय. आणि आजच होईल अस, नेक्स्ट टाईम करू तेव्हा नाही अस काही वाटणार. आणि अस हि कधी ना कधी पहिली वेळ हि असतेच. आज आपल्यात जे होईल त्याने आपल्यातलं अनोळखीपण सगळं संपून जाईल.

निशा : मला तू माझा झालेला हवा आहेस. त्यामुळे मला काहीही करावं लागलं तरी चालेल. आत्ता जे होतय किंवा वाटतय ते पण जगून घेईन तुझ्यासाठी पण ऎक ना.

अजिंक्य : काय ?

निशा : प्रोटेक्शन ?

अजिंक्य : डोन्ट वरी आहे सगळं.

निशा : नक्की ना

अजिंक्य : माझ्यावर विश्वास आहे ना ?

निशा : हो.

अजिंक्य : मग झालं तर तुझा विश्वास कधी मी तोडणार नाही. सगळं व्यवस्थित होईल. घाबरू नकोस जास्त. त्याबद्दल विचार कर म्हणजे रोमँटिक विचार कर. म्हणजे मजा येईल.

निशा : नको, आत्तापासूनच. तिथं आले कि बघू. ऎक ना अजिंक्य....

भाग 03

अजिंक्य : आय लव्ह यु टू...

निशा : काय रे यार तू, मला बोलूच देत नाही. 

अजिंक्य : अग अस पुढच्याच्या मनातलं ओळखायला येणं पण खूप मोठी गोष्ट आहे..

निशा : हा. तेपण आहे. तू कुठं आहेस ?

अजिंक्य : आहे बाहेर जरा. घरात बसलं तर करमेना म्हणून म्हंटल बाहेर फिरून यावं. वेळ पण जाईना त्यात. म्हणून बाहेर आलोय.

निशा : काळजी घे, जास्त उन्हात फिरू नकोस. नाहीतर मला भेटायला आल्यावर स्किन डार्क झालेली दिसेल. आपल्याला फोटो पण काढायचेत.

अजिंक्य : कोण आलं नाही का अजून घरी ?

निशा : म्हणजे ?

अजिंक्य : काही नाही.

निशा : सांग ना.

अजिंक्य : अग म्हणजे खरी खरी स्नेहल आली नाही का तुला भेटायला ?

निशा : येतीय.

निशा : आली वाटत. बेल वाजतीय. 

अजिंक्य : बर ऐक तू कर एन्जॉय. मी जरा गाडी चालवतो. पुढे पोलीस असतात चौकात. अडवतील उगीच.

निशा : हा नीट जा.

निशा कॉल कट करून दाराजवळ गेली. दार उघडलं तर दारात एक माणूस पार्सल घेऊन उभा होता. तिने ते घेतलं. त्याने दिलेल्या कागदावर सही केली आणि ती पार्सल घेऊन दार लावून आतल्या खोलीत आली. तिला मागच्या महिन्यात आवडलेलं एक ब्रेसलेट जे साधं एफ. सी. रोडला आवडलेलं. अजिंक्यने तेव्हाच त्याचा फोटो काढलेला आणि जसच्या तस त्याने चांदीच बनवून घेऊन ते तिला पार्सल केलेलं आजच्या दिवसासाठी खास.

तिने ते हातात घातलं आणि एक फोटो काढून त्याला पाठवला. आता अजून काय बोलायचं ? तिच्या मनात शब्दांऐवजी अजिंक्यसाठी प्रेम आणखी वाढलेलं.

अजिंक्य पेट शॉपमध्ये गेला. तिथं त्याने निशाला आवडतात म्हणून दोन गोल्डफिश घेतले. आणि एक मांजराच  पिल्लू घेऊन तो तिथून पायलच्या घरी गेला. पायल निशाच्या घराजवळ राहायची. पायलला मासे आणि मांजराच पिल्लू देऊन तो निघून गेला. थोड्या वेळातच निशाच्या घराचं दार वाजलं. पायल आत आली. पायलला घेऊन निशा आतल्या खोलीत गेली. पायलने पहिलं तिला दोन गोल्डफिश असलेली पाण्याची पिशवी दिली. आणि निशाने लागलीच हातात ती पिशवी घेऊन पायलला थँक्स बोलली. घरात एक फिश पॉट पडून होतात त्यात तिने लगेच पिशवी उघडून ते दोन मासे त्या पॉटमध्ये सोडले. आणि इतका वेळ बास्केटमध्ये झोपलेलं मांजराच पिल्लू म्याव म्याव करायला लागलं. आणि पायलने बास्केटला उघडण्याआधी निशा बास्केट उघडते आणि ते पिल्लू घेऊन लाडाने उचलून त्याला जवळ घेत होती. किती तरी वेळ ती त्या पिल्लासोबत बसून पायलला पूर्ण विसरून गेली. नंतर जेव्हा ते पिल्लू तिच्या मांडीवर शांत बसलं तेव्हा निशा पायलचा हात धरते. आणि थँक्यू म्हणते. आणि पायल पर्समधून एक मोठी कॅडबरी काढते आणि तिला देताना बोलते, हे फक्त माझ्याकडून.

निशा : आणि हे ?

पायल : तुझा तो.

निशा : खर ?

पायल : हो. मगाशी देऊन गेला माझ्याकडे. आवडलं का ?

निशा : आवडला का काय.. खूप खूप जाम आवडलं.

पायल : सांगते मी त्याला मग मेसेज करून.

निशा : नको मी सांगते नंतर.

पायल : बर सांग पण नक्की सांग.

निशा आणि पायल दोघी त्या पिल्लासोबत वेळ घालवतात.

भाग 04

पायल निशाची नजर चुकवून अजिंक्यला मिसकॉल देते. निशाची आई घरी येऊन पुन्हा बाहेर जाते. जाताना निशाला सांगते मला यायला तासभर लागेल तोपर्यंत कुठे बाहेर जाऊ नकोस.  आई जाते. निशा आत येऊन पिल्लासोबत खेळत पायलशी बोलत असते.

पायल : लकी आहेस तू.

निशा : का ?

पायल : अजिंक्य खूप भारी आहे.

निशा : हो. आमचं ठरलंय लग्न करायचं पुढच्या वर्षी.

पायल : नक्की कर. खूप भारी होईल. 

निशा : कुणाला सांगू नकोस तुलाच सांगतेय फक्त. पण आज आम्ही दोघ एकत्र टाईम स्पेंड करणार आहे. खूप जवळ येऊ आम्ही आज. तो माझ्यासाठी खूप करतो. आज मी करेन त्याच्यासाठी त्याला हवं ते. खूप प्रेम करतो तो माझ्यावर. काल रात्रभर तो कॉल मेसेज करून बर्थडे विश करतोय. सकाळी पण थोडा वेळ झोपून पुन्हा काय काय मला सरप्राईज देतोय. एवढं कोण करत आजकाल ? आणि तो नुसतं वस्तू देऊन नाही मन लावून प्रेम करतो माझ्यावर. हा माझा दुसरा बर्थडे आहे आमच्या रिलेशन मधला. याआधी तर माझं कुणाशी काही नव्हतं तुला माहितेय. उशिरा का होईना पण अजिंक्य मिळाला मला. आणि मला इच्छा पण नाही कुणाच्यात. दोन वर्षात त्याच माझ्यावरच प्रेम एक अंश पण कमी झालं नाहीये. उलट रोज वाढत जातंय. मी खूप हॅप्पी आहे. माझ्या एवढ्या फ्रेंड्समध्ये एक तूच माझी बेस्ट आहेस. म्हणून तुला सांगितलं.

पायल : आणि मीच राहणार तुझी बेस्ट. 

निशा : थँक्स पल्लू.

दाराची कडी वाजली.

निशा : दार उघडतेस का ?

पायल : मी बघते या पिल्लाला तू बघ जा. 

निशा पिल्लू पायल कडे देऊन बाहेर आली. तिने दार उघडलं आणि दारात अजिंक्य. तिच्या हृदयाची धडधड अशी काही सुरु झाली कि हृदय आता फक्त बाहेर यायचं बाकी होत.

अजिंक्य पुढे सरकला. निशा मागे सरकली. अजिंक्य अजून तीन पावलं पुढे सरकला. निशा मागे तेवढीच सरकली. अजिंक्यने अंदाजाने हात मागे घेऊन दार लावलं आणि कडी लावली. पायलला माहित होत कोण आलंय. तिनेच त्याला मिसकॉल दिलेला. गिफ्ट तिच्याकडे देताना अजिंक्यने तिला सांगितलेलं घरी कोणी नसेल तर मिसकॉल दे. पण जेव्हा आई येऊन पुन्हा गेली तेव्हा तिने त्याला मेसेजच करून सांगितल कि आई नाही घरी एक तास म्हणून. पायाल आतलं दार हळूच लावून घेते. बाहेर अजिंक्य आणि निशा समोरासमोर उभे. अजिंक्य तिला फक्त बघत होता. ती खूप सुंदर दिसत होती. इतकी कि,  इतकं सुंदर या जगात अजून काही असेल का या विचारात तो होता. तिचे ते घारे डोळे. एका बाजूला सोडलेले केस, घातलेला रेड वेलवेट कलर वनपीस, मारलेला गोड सेंट, आणि गोऱ्या रंगावर केलेला फिकट मेकअप. ते सौंदर्य आणि ते बघण्याची मजाच काही औरच होती. अस सौंदर्य दुसऱ्या कोणत्या मुलीत असेल अस अजिंक्यला वाटत नव्हतं. अजिंक्य आपल्याकडे अस बघताना बघून निशा लाजेने कधीच पाघळली होती. अजिंक्यने तिचे दोन्ही हात हातात घेतले. आणि आत्ता कुठे काही क्षणापूर्वी ताब्यात आलेली हृदयाची धडधड पुन्हा सुरु झाली. 

निशा त्याच्या डोळ्यात बघायला लागली. शोधायला लागली. आणि अजिंक्यने फक्त एक स्माईल दिली. मग तिने त्याच्या हातातून उजवा हात सोडवून त्याच्या दाढीवरून हात फिरवला. तो हात तसाच गालावरून हनुवटीवरून ओठांवर आला. त्याच्या मिशीची दोन्ही कडेची टोक तिने उचलली. आणि त्याच्या जवळ जाऊन तिने त्याच्या जवळ स्वतःला घेतलं. मग त्याच्या ओठांना स्वतःच्या ओठात पकडलं.

भाग 05

त्याने तिला जवळ आणखीच ओढलं. हाताने तिला मारलेली मिठी घट्ट आणि बंद डोळ्यांना सैल करत त्याने डोळे उघडले. तिने तिच्या सैल पापण्या घट्ट दाबून घेतल्या. आणि त्याच्या ओठांना आणखी जोरात ओठात पकडल. अजिंक्यवर पूर्ण अंग झोकून दिल तिने. आणि अजिंक्य मागे सरकत दाराला टेकूनच उभारला. अजिंक्य तिच्या पाठीवरून हात फिरवत होता ती त्याच्या केसातून हात फिरवत होती. मिनीटभराच्या नंतर दोघ थांबली. दोघांचे श्वास गुदमरलेले. जेव्हा श्वास घेऊन झाले, निशा ओल्या ओठांना पुसते. जराशी उरलेली लिपस्टिक बाजूला फिस्कटली. आणि अजिंक्यने तिला जवळ ओढून तिच्या त्या फिस्कटलेल्या लिपस्टिक वरून ओठ फिरवत पुन्हा तिच्या ओठांना स्वतःच्या ओठात ओढून घेतलं. निशाही हरवून गेली. अजिंक्यने तिला फिरवलं. आणि तिला मागून मिठी मारून तिच्या केसांना एकबाजूला करत तिच्या मानेवर ओठ फिरवले. तिथून वर येत त्याने कानाला ओठात पकडलं. ओलसर झालेल्या त्या उजव्या कानावर फुंकर मारली. त्यामुळे तर निशाच्या अंगावर काटा आला. आणि तिने अजिंक्यचा हात जो तिच्या पोटाला घट्ट धरून होता त्या हातावर ठेवला आणि हळू आवाजात आय लव्ह यू म्हणाली. आणि अजिंक्य तिला अजून स्वतःत ओढत आय लव्ह यू टू म्हणाला. मिठी सुटली आणि अजिंक्यने तिची केस धरले. ती थांबली. त्याच केसांनी तिला मागे ओढलं. आणि ती फिरून त्याच्या मिठीत आली.

निशाचा मोबाईल आतल्या खोलीत होता त्यावर तिच्या आईचा कॉल आला. पायलने तो उचलला. ती बोलली.  आणि आईचा निरोप सांगायला ती बाहेरच्या खोलीत आली. निशा आणि अजिंक्य दोघे एकमेकांत हरवलेले बघू तिला काय करावं सुचत नव्हतं. ती पुन्हा आत गेली. आणि तिने अजिंक्यला कॉल केला. अजिंक्यने मोबाईल घेतला. आणि कुणाचा कॉल आलाय बघणार तेवढ्यात निशा त्याच्या हातून मोबाईल घेते आणि कॉल कट करते आणि अजिंक्यला जवळ ओढून घेते. कॉल कट झाला म्हणून पायल शेवटी बाहेर आली आणि तिने निशाला हाक मारली. अजिंक्य आणि निशा दोघे दचकले. आणि दोघ बाजूला झाले. अजिंक्य केसातून हात फिरवतो. निशा पायल जवळ जाते.

निशा : काय ?

पायल : आई येतीय. सामान घेऊन दारात रिक्षा येईल आता. अजिंक्य तू जा लवकर.

निशा त्याच्याकडे बघते. अजिंक्य दार उघडतो. आणि मागे वळून तिला एकदा बघतो. आणि निघून जातो. निशा दारात जाऊन त्याला बघते. निशाला पायल पाणी आणून देते. थोड्यावेळानी आई आली. रिक्षातुन सामान काढून निशा घरात ठेवते. पण सगळा वेळ ती अजिंक्यच्याच विचारातच होती. इकडे अजिंक्य कॅफेवर जाऊन बघतो सगळी सजावट झाली का ते. राज अजून हॉस्पिटल मधून आला नव्हता. बाकी दोघे तिथं काम करत होते. अजिंक्य तिथंच बसून संध्याकाळीची फिल्मची तिकीट बुक करतो. आणि निशाला कॉल करतो. पण तिच्याकडे तिच्या मैत्रिणी आलेल्या आणि तीच चार्जिंग संपत आलेलं म्हणून तिने मोबाईल चार्जिंगला लावलेला. अजिंक्यने दोन कॉल केले आणि नंतर व्हाट्सअप उघडलं तेव्हा त्याला तिचा मेसेज दिसला. की मी मोबाईल चार्जिंगला लावतेय.

अजिंक्य तिथंच थांबून मित्रांना सजावटीसाठी मदत करायला सुरुवात करतो. आनंदी वातावरण होत सगळं पण बाहेर सगळं ढगाळलेलं. पाऊस पडणार होता. आणि अशा पावसात प्रेम करायला कुणाला आवडणार नाही ? अजिंक्य पावसाची वाट बघत होता. आणि निशाची पण.

बराच वेळ सजावटीमध्ये गेला. सजावट झाली आणि अजिंक्य प्रशांत आणि शुभम तिघ त्याच कॅफेत खात बसले. खात असताना प्रशांतला घरून कॉल आला. प्रशांत काही वेळासाठी घरी गेला. शुभमला गाडी चालवता येत नव्हती. तो प्रशांत सोबत तिथे आलेला. अजिंक्य आणि शुभम दोघे बसले खात. थोड्यावेळाने राजचा कॉल आला. त्याने सांगितलं येताना तो उशिरा येईल जरा. पाऊस पडत होता आणि त्यामुळे त्याला वेळ लागेल.  इकडे प्रशांत ही पावसामुळे घरीच अडकला. आणि त्याचा अजिंक्यला कॉल आला.

 


Copyrighted@2018
(कथेतील कोणताही भाग किंवा संवाद परवानगी शिवाय सोशल साईट, ब्लॉग-वेबसाईट किंवा मालिका फिल्म्समध्ये लिहू किंवा दाखवू नये. अन्यथा आर्थिक दंड भरावा लागेल)


2 टिप्पण्या