मिठी सहज मिळत नाहीप्रत्येकाला जवळ मिठीत घेऊन त्यास शाबासकी देणे म्हणजे आपले नाते त्या मिठी प्रमाणे घट्ट करणे होय. माणूस कसा ही असो, कुणी ही असो पण शाबासकी दिल्याने परका ही आपला होऊन जातो. मिठी ही जितकी घट्ट तितका विश्वास जास्त बसला जातो. आपला माणूस आपल्याचसाठी लढणार हे जरी खरे असले तरी  आपली शाबासकी कमी पडली तर दुसऱ्याची त्या व्यक्तीवर मर्जी राहते. परकीय अशाच माणसाच्या शोधत असतात. एक एक फळ मोजून तराजूत त्याच वजन मोजल जात. एक जरी फळ कमी पडल तर पारड भरत नाही.
 आपल्या सैन्यात ही एक एक माणूस धरून हे स्वराज्य तयार होत आहे. यात एकेका माणसाला किंमत आहे. आणि यातला एक जरी त्यातून गाळला तर एकाच्या बदल्यात हजार सैन्याशी लढायला तयार व्हावं लागेल. म्हणून तोंडी कौतुकासोबत वस्तू भेट आणि सोबत मिठीची शाबासकी देणं एका राजाला शोभून दिसते. आपण बघता, आम्ही राजे आहोत. तुम्ही होते राजे आहात. 
आपलं नशीब काहीही असो, आपण आपल्या कर्तबगारी आणि हुशारीने आपलं हे स्वराज्य टिकवायच आहे. सोबत आपल्या आपलं सैन्य आहे जे या स्वराज्याला सांभाळून आहे. 
मेंढपाळाच्या मेंढ्यांना जंगलात जस कोल्ह्याचं भय असत तस इरादा ठरवून आलेला कोल्हा मेंढ्या तर हाणतोच पण पुढचा विचार करून मेंढपाळाला ही ठार करतो. राज्य आणि राजा यांचं ही असच असत. पर शत्रू फक्त मावळ्यांना मारून गप्प बसू शकत नाही तो एक तर मावळ्यांना तरी मारेल किंवा मावळ्यांच्या मानेला धाकाच्या सुऱ्याने धरून राजाला ही मारून टाकेल. 
अशात आपण जाणून असावे की कुणास मिठीत घ्यावे नी कुणास दूर खडे करावे. तुम्ही बघत असाल आम्ही जो तो येतो जातो त्यातल्या खास लोकांना जवळ उभे करतो, त्यांना गरज पडली तर पाठीवर शाबासकी देऊन धीर देतो, कोणती जीत मारली तर मिठीत घेतो, काही भेट वस्तू देताना अगदी अर्धा हात जवळ पुढे उभे राहण्यास परवानगी देतो. म्हणजे आम्ही त्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या पुढे असतो. तर असे काही नाही. पुढुन येणाऱ्या व्यक्तीच्या कमरेखालचे कापड त्याचा पोत, त्याचा रंग त्या रंगानुसार पडणारी सावली, आजूबाजूच्या व्यक्ती गोष्टी यांवरून त्या कापडावर होणार रंगाचा खेळ तो समोरून येताना आम्ही तपासतो. रंग फिरते झाले तर तो कोऱ्या अंगाने आला असे समजतो. जर का काही शस्त्र आत लपवीले असेल तर तो प्रकाश आणि रंगाची सावली त्या शास्त्राला लपवण्यात इतकी रंग बदलतात की आम्ही त्यास दुरून हात करतो. ही समज लगेच नाही येत. त्यासाठी हवी बारकाई. पाठीला काय शस्त्र लावले असेल किंवा माकड हाडाशी लपवलेलं छुप काही शस्त्र असेल तर माणसाच्या चालीतली लय बदलते. जी सहज समजत नाही पण बारकाईने बघितली तर टाचा उचलून चालताना ती व्यक्ती दिसते. त्याच्या खांद्याला आणि कमरेला घाम फुटतो. खांद्याला खाज सुटते जेणे त्याचे खांदे अलगद उडले जातात. पण ती खाज लपवण्यात तो माहीर माणूस, गळ्याला आलेला घाम पुसू शकत नाही. बाकी शरीर उघडे ठेवून तो आपल्याला दिलासा देऊ शकतो पण त्याच्या उघड्या शरीरावर आपण विश्वास ठेवून त्याचे जवळ जाणे नाही. कायम सोबत काही लोक उभे करणे. मागे तीन एक उजवीकडे, एक डावीकडे आणि एक बरोबर पाठीच्या मणक्याच्या रेषेत. दोन बाजूला उजव्या आणि डाव्या हाताला. आणि दोन दहा हात पुढे. पुढून येणाऱ्याला हे दोघे पहिले डोळ्यांनी तपासतील. त्यांच्या नजरेने तो माणूस निम्मा घाबरून जाईल आणि त्याचा निश्चय तिथेच अर्धा मरून जाईल. असेलच कुणी हापापलेला पैशासाठी तो हाती घेतलेल्या कामापोटी त्या दोघांना सोडून अजून आपल्या पुढे येईल. मग आपल्या शेजारचे दोन सोबती त्यांची तपासणी करतील. आणि मग आपण त्यांच्या जवळ जाण्यासाठी पावले उचलावीत. त्याच पावलाला साथ देत मागील तिघे ही आपली पावले उचलतील. आणि अशावेळेस एकूण सहा जणांची बारा पावले एकदम जमिनीला टेकताच पुढच्या माणसाची सगळी ताकदच गळून जाईल. आणि तो आपला माणूस असेल तर तो शस्त्रविना लांबूनच आपल्याशी बोलून चालता होईल. तेव्हा अशास जवळ बोलावून शाबासकी देणे, त्याची विचारपूस करणे भविष्यात आपल्या कामी त्यास आणण्यासाठी योग्य ठरते. हे बघा संभाजी, तुम्ही ही कुणास लवकर जवळ करू नये. केल्यास त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणे. लक्षात ठेवा एक नजरचूक खूप मोठी चूक ठरू शकते. बाकी तुम्ही तर आमच्याहून हुशार आहात. तरी कोणाजवळ लगेच जाणे नाही, कोणास लगेच जवळ घेणे नाही. कारण आपल्यातलेच कायम फुटत आलेले आहेत. आणि आपण आपल्यांना जवळ घेताना आपल्यानेच आपला अंत व्हावा इतकं दुर्दैव आपण आपल्यावर ओढवून घेण्याची वेळ आणूच नये. काय म्हणता ?
संभाजी महाराज : अगदी खरे आहे, महाराज. 
शिवाजी महाराज : महाराज ? आज आबासाहेब म्हणाला नाहीत ?
संभाजी महाराज : अस काही शिकताना तुम्ही आमचे गुरू असता, स्वराज्याचे महाराज असतात आणि आम्ही तुमचे मावळे असतो. म्हणून महाराज.
शिवाजी महाराज : बरे, चला एक फेरी मारून येऊ उन्हातून.
संभाजी महाराज : उन्हात ?
शिवाजी महाराज : सावल्या आणि उजेडात मित्ररंग आणि शत्रू सावली दाखवतो तुम्हास.
दोघे महालातून बाहेर गेले.

0 टिप्पण्या