नवरा

तिला विचारताना विचार करा त्याचा. नवऱ्याचा. मला अस वाटत माणूस सुखी कधी राहू शकत नाही. कारण काही न काही त्याच्या अपेक्षा या असतात आणि एक अपेक्षा पूर्ण झाली कि त्याहून मोठी अपेक्षा तो करत राहतो. आणि जर अपेक्षा भंग झाला तर साहजिकच तो नाराज होतो. पण सुखी व्हायचं असेल तर महत्वाच नाही कि तुमच सुख कशात आहे? गोष्टीत , पैशात किंवा आणि कशात. सुख आपण मानु त्यात असत. आणि या आहे त्या परिस्थितीत जगताना बायकोला साथ हि हवी असते नवऱ्याची.

एका स्त्रीला हवा असतो असा साथीदार जो तिला लाखो –करोडो रुपये, बंगला, चारचाकी घेऊन देईल, तो मोठ्या पदावर काम करत असेल असा मुळीच नको असतो. तिला असा नवरा हवा असतो जो तिला समजून घेऊ शकतो. ती आनंदी असली तर तिच्या आनंदात सहभागी होऊ शकतो. तीची कधी कोणत्या कारणाने चिडचिड झाली किंवा मासिक पाळीमुळे तिला शारीरिक त्रास होताना तिची चिडचिड झाली तर तिला हसवून शांत करणारा नवरा हवा असतो. उगाचच बायको चिडली म्हणून तिला पाठ दाखवून बसणारा नवरा नको असतो.

तिला काय हव नको बघणारा. तिला हव्या असणाऱ्या गोष्टीतल निम्म तर नक्कीच नवऱ्याला मिळत असत. आई आणि बायको यात तस बघायला गेल तर काहीच फरक नसतो. आई जे काही करते ते आपल्यासाठीच असत आणि बायको हि तेच करते जे आपल्यासाठी असत. मग पुरुष म्हणून घेताना फक्त बेडवरच पुरुषार्थ गाजवण्यात अर्थ काय ? तिला वाटत नवऱ्याला समजाव माझ्या मनातल सगळ दुख. आनंदामागच कारण हि त्याला समजाव. माझा वाढदिवस लक्षात ठेवून त्यान मला गिफ्ट नाही पण जवळ घेऊन प्रेम कराव. लग्नाच्या वाढदिवसाला मला घेऊन बाहेर जेवायला जाव तेव्हा त्यान ऑफिसच कारण देऊन बाहेर पार्टी करून घरी येताना पार्सल आणू नये. लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला मोजत बसू नये. अस तिला कुठेतरी वाटत असत.

ज्या स्त्रीला नवरा नाही. तिला माहितीय कि काय सहन कराव लागत जगाच. जग ज्या नजरेन तिला बघत असत त्या नजरेन वेश्यांकडे हि आपण बघत नाही. तिच्या प्रत्येक वागण्याला मग ते चांगल असल तरी त्याला असभ्य समजून तिला टोमण मारणार हे जग. आसुसलेल असत तिच्या बंद घरात शिरण्यासाठी. तिच्या विचारांना समजून घेणार कोण नसत. रडू आल कधी तर जवळ घेणार कोण नसत. प्रेमान कोणीच नसत तू खूप छान दिसतेस म्हणायला. केस धुवून आल्यावर आरशासमोर उभ राहिल्यावर मागून कुठून तरी एक टक तिला बघणार कोणीच नसत. रात्रीला गाढ झोप कधी तिला लागत नाही. कोण कधी कोणत्या कारणाने येईल घरात, घराजवळ या भीतीने ती अख्खी-अख्खी रात्र जागत असते. हे पुरुषी जग तिला त्रास देत असत आणि एक स्त्रीच या अबला स्त्रीला नाव ठेवत असते. आणि म्हणतात काय तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजू शकते. मग का समजून घेत नाही अशा स्त्रीला? 

अशा या वेदनेत जगणाऱ्या स्त्रीला किंमत असते नवऱ्याची. नवरा दिसायला खास नसला तरी चालेल. पैसा नसेल त्याच्याकडे पुरेसा चालेल. चारचाकी नाहीये दुचाकी आहे चालेल. कुठे तरी बसायचच आहे ना.? मोठ घर नाहीये पण चार भिंती वर छप्पर आहे न मग बस झाल. पण नवऱ्याच मन खूप चांगल पाहिजे. प्रेमळ,कणखर,समजूतदार अस त्याच मन असाव आणि मला वाटत त्या नवऱ्याच मन पुरुषी नकोच. ठेवु दे नाव जगाने त्याला पण त्याच मन थोड हळव आणि बायली असाव. कारण तोच समजू शकतो बायकोला आपल्या. 

आणि अजून काय हव त्या होणाऱ्या बायकोला , नुकत्याच झालेल्या बायकोला , आणि जी वर्षानुवर्ष संसार करून जगतेय अर्धांगिनी बनून आपल्या सोबत. ? 

काहीच नकोय तिला एवढच हवी कि नवऱ्यान समजून घ्याव तिला. आर्थिक सुख नाही मानसिक सुख द्याव त्यान तिला. मानसिक सुख असेल तिला तर ती खूप काही करू शकते. बघा तिला पैसे द्या गिफ्ट द्या ड्रेस घ्या आणि एका रात्री नाही तर दिवसाच सकाळी तिला जवळ मिठीत घ्या प्रेमाने त्या गिफ्ट आणि ड्रेस पेक्षा ती मिठीत खूप आनंदी आणि तितकीच सुंदर दिसेल.....

Copyrighted@2020

 

0 टिप्पण्या