पाऊस आणि रोमान्स

 

हा रोजचा असा पाऊस. त्यात धुक आणि सोबत थंडी. मनात त्याचे विचार आणि तो जवळ नाही. मग उगीचच त्याला आठवत रहायचं. उगीचच त्याला कशात हि शोधायचं. आणि मग निवांत असताना त्याला अस अनुभवायचं. हाच तो रोमान्स.

पाऊस धो-धो आहे. त्याने तिची आठवण काढली. हिला इकडे उचकी आली. दोघांच संभाषण झाल, तत्क्षणी तिच्या घरी त्याचं भेटायच कबुल झाल. तो यायला निघाला. ती उतावीळ झाली. त्याला यायला अर्धातास उरला होता. तिच्यात त्राण उरल नव्हत. थंडी वाढत होती. तो भिजत येत होता. ती कान सगळे दाराकडे लावून होती. विजा मुद्द्दामहून वाजत होत्या. तो वेग वाढवेल तसा पाऊस त्याला अडवत होता. तिला तो स्पष्ट डोळ्यांसमोर दिसत होता. त्याला पावसामुळे पुढचच काय पण जवळचहि स्पष्ट दिसत नव्हत. ती स्वतःला स्पर्श करत होती. पाऊस त्याला स्पर्श करत होता. तीच अंग त्याच्या विचाराने ओल होत होत. तो मात्र सुक्या त्वचेच्या विचारात भिजत येत होता.

तिने स्वतःला आवरल होत. त्याचा भिजून अवतार झाला होता. तिचे गुलाबी फिकट ओठ रंगले होते. त्याचे दोन्ही पाय पूर्ण भिजून चिखलात भरलेले होते. ती आता गादीवर बसून गेली. त्याच्या गाडीच्या वेगाने हि तीस मिनिट अगदी सहज निघून गेली. वीज वाजली आवाज झाला. तिला वाटल ..............तो आला. ती पटकन उठली दरवाजा उघडला पण...... दारात पाण्याशिवाय काहीच नव्ह्र्त. तिने दार लावल. ती दारामागे टेकली. तो आला दारापुढे. अंधारऱ्या घरात पुन्हा प्रकाश झाला. वीज पेटली पण आवाज नाही आला. आवाज आला कडीचा तिने तो ऐकून सोडून दिला. पुन्हा आवाज आला तिने दार उघडल. तो होता तिने त्याला आत केल. आत जाऊन टॉवेल आणला. त्याने बूट काढून तिला स्वतःचा भिजलेला मोबाईल दिला. डोक पुसून-कपडे सावरून ती आणि तो मूक झाले. पाऊस एव्हाना वाढला होता. भरदिवसा अंधार झाला होता. वीज काय ती पडत होती. त्याला थंडी वाजत होती. जी तिलाही वाजत होती. दोघांना हि एकच वार बोचत होत. दोघांना हि एकच भावना येत होती. तो रोमान्स होता.

पायाचे तळवे थरथरणे त्याचे. त्याला नुस्त बघून अंग-अंग थरथर करणे तिचे. त्याने करावी का तिने करावी हि सुरवात. पण थंडी डाव साधत दोघांच्या अंगात शिरली.

त्याने तिचा चटकन हात धरला. तिने पटकन डोळे मिटले. त्याने फिरवली जीभ स्वतःच्या ओठांवरून. तिने नाकाऐवजी तोंडाने श्वास घेऊन ओठांना कोरड केल. त्याने तिच्या हाताला सैल केल. तिने अर्ध्या डोळ्यांनी त्याला बघितल. मग तो पुढे सरकला आणि अंधार झाला. त्याने तिच्या खालच्या ओठांना आपल्या ओठाने आधार दिला. हाताची पकड घट्ट झाली. तिने त्याच्या वरच्या ओठांना आधार देऊ केला. त्याची सगळी ताकद आता मनगट आणि मांड्यात आली. तिची सगळी ताकद छातीच्या टोकाशी आली. एक वीज आली. आणि प्रकाश झाला. तरी दोघांना एकमेकांचे चेहरे दिसेना.

ती त्या क्षणाला डोळे बंद ठेवूनच साठवत गेली. तो उघडे डोळे करून तिला डोळ्यात साठवत गेला. थंडी या दोघांच्यात इतकी पिघळून गेली. कि बाहेर इतका पाऊस होता तरी ह्या दोघांची दोन्ही अंग तपल्यासारखी वाटत होती. त्या सुरुवातीला त्याने तिला आपल्या ताब्यात केल. आणि तिने आपल प्रेम त्याच्या हवाली केल. माझ तुझ्यावर प्रेम आहे म्हणत त्याने तिला प्रश्न केला. माझ ‘हि’ तुझ्यावर प्रेम आहे म्हणत तिने त्याच उत्तर करून टाकल. पाउस हा पडतच होता आणि ती त्याचा हा असा विचार करत होती. विचारात तो तिचा नवरा होता. ती त्याची बायको होती. तो नवरा होता हा भूतकाळ होता. पण ती त्याची विधवा होती.............


copyrighted@2020

2 टिप्पण्या