कासव

                           

तुझ आणि माझ काल बोलण झाल. तू तुझ्याबद्दल सांगितल. मी माझ्याबद्दल बोललो. बराच बदल झालेला आहे आपल्या आयुष्यात. पण तरीही एकटेपणा तुझ्या बोलण्यात मला जाणवला. आणि माझ्यातला एकटेपणा तुला हि समजला असेल. तू नाहीस म्हणून मी आनंदी आहे अस नाही. मी नाही म्हणून तुही सुखी आहेस अस हि नाहीस. एकमेकांशिवाय जगू शकणार नाही आपण, अशी वाक्य आपण जी बोललेली कधी, ती वाक्य खोटी ठरली. तू आणि मी वेगळे झालो खरे पण काल आपल बोलन झाल अन समजल जिवंत असलो तरी सुखी नाहीये. बरच काही बदललं आजुबाजूच पण त्या बदलाचा आपल्यावर काही उपयोग झालेला नाहीये. तू एक एक दिवस जगून तुझा संपवतेयस आणि मी हि माझा दिवस पुढे ढकलतोय. तुला गरज आहे कुणाची ( किंवा माझी ). मला गरज आहे फक्त तुझी. पण हि गरज शब्दात बोलून दाखवण्यासारखी वेळ सध्या नाहीये. इतक मोकळेपणाने बोलण्यासारख आपल्यात नात आता कोणत नाहीये. त्यामुळे तू गप्प मी गप्प. अस हि आपण आवाजात बोलतच नव्हतो. मेसेज ते आपले. त्यात कसली भावना आणि आवाज ? सगळी एकदम कल्पना. कल्पनेत तुझ्याशी बोलल्यासारख वाटतय. मेसेज सगळे मी स्टार करून ठेवलेत. तीन लोकांसाठीच लिमिट असल तरी फक्त तुझ्या एका नंबरला पिन केल आहे. तुझा कधीही पुन्हा मेसेज येईल म्हणून सकाळपासून नेट सुरूच आहे.

तू आणि मी लग्न करणार होतो. हि झाली कल्पना. तेव्हा ती सत्यात उतरणार होती. पण त्याआधीच आपण वेगळे झालो. त्या वेगळे होण्यामागचे कारण ना तुला माहित ना मला. पण झालो. त्याला आता वर्ष झाल. पण, आता पुन्हा तू माझ्या आयुष्यात आलीस. मेसेज केलास. माझ्याशी बराच वेळ बोललीस. आणि मी हे सगळ वर्ष विसरून गेलो. तू नसताना मी खूप एकटा होतो. एक कासव मी विकत आणल. आणि मी त्याच्यावर प्रेम करायला लागलो. माहितीय मला, माणसाच प्रेम आणि प्राण्याचं प्रेम वेगळ असत पण तरी ते कासव सकाळी झोपेतून उठेपासून रात्री झोपेपर्यंत त्याच सगळ बघून, दिवस घालवत राहिलो. कासव..... म्हणजे अति घाबरट प्राणी. त्याला हात लावला कि मी त्याचे ते हात पाय तोंड आत घेऊन लपून बसायचं. कित्येक दिवस तो तसच वागायच. कासवाच्या कवचावर हात फिरवला कि त्या हाताच्या स्पर्शातून त्याला प्रेम समजत. आणि हळू हळू त्याला ते समजायला लागल. आता ते कासव माझ्यासोबत पांघरुणात झोपत. माझ्या जवळ येऊन मला प्रेमाने बघत. माझ्या स्पर्शाला आपलेपणाने समजून घेत. आणि बदल्यात ते हि रात्री बिनधास्त माझ्या जवळ येऊन झोपत. कधी झोपेत माझ्या अंगाखाली आल तर माझ्यावर चिडत नाही. आता वर्ष होत आल. आम्ही दोघ एकत्र असतो. माणसापेक्षा जास्त जीव मी आता त्या कासवावर लावला आहे.

ते हि माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या जवळ येत. मला हात लावून देत. मी नसलो तर खाण्यासाठी वाट बघत. इतका विश्वास एक कासव माझ्यावर ठेवू शकत तर तू का ठेवू शकली नाहीस ? हा प्रश्न कायम मला पडतो. तुझ माझ रिलेशन होत फक्त सहा महिने आणि कासव माझ्यावर विश्वास ठेवून आहे मोजून एक वर्ष. खरच माणसापेक्षा प्राणी चांगले असतात. जीव लावला तर तोडत तरी नाहीत. काळ मी बेडवर झोपून तुला मेसेज पाठवत होतो. कासव मोबाईलची स्क्रीन बघत होत. त्याला काय कळत त्यातल ? पण नंतर ते फिरून माझ्याकडे एकटक बघत होत. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते शांत झोपलं. आणि मी तुझ्या आठवणीत हरवून बसलो. आपण एकमेकांपासून दूर आहे म्हणून नाही तर तुला माझी गरज आहे म्हणून. पण पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवावास वाटत नाही. आणि माझ्यात आता पुन्हा जिव लावायची ताकद उरली नाहीये.        

copyrighted@2020

0 टिप्पण्या