विलक्षण !


तुझ्या ओठांना न पकडता त्यांनी विस्कटून जावं दोन्ही गाल सारून. त्याला  तू हास्य म्हणावं आणि मी म्हणावं तू खूप सुंदर हसतेस. हे अस हसू उगीच येत नाही. मी काहीही बोलण्याने तुला हसू येत. तुला हसवता येत ही माझी कला असली तरी त्याला वाव तू हसून देतेस यात तुझंच कौतुक जास्त. मोकळ्या केसांना बांधून तू माझी नजर तुझ्या त्या वर उचललेल्या हातात अडकवून ठेवतेस. केव्हा ते हात केस बांधून खाली येतात तूला माहीत असत मला कळत नसत आणि मग तू पुन्हा केस मोकळे सोडतेस. त्या केसांचा जाच वाटतो तुला आणि मी म्हणतो हे मोठे केस शोभून दिसतात तुला. त्या केसांना तुझीच हौस भारी. मला मात्र त्या केसांना वाऱ्यावर हलताना बघून मौज वाटते.
गालाला तुझ्या उचलून, ओढून लाल अजून करण्यापेक्षा तूला नुसता हात लावला तर तू लाजून गाल लाल होतात. त्या लालीला मेकअपची सर नाही. अस ही तुला मेकअप करायला आवडत नाही. तरी मी तुला सुंदर म्हणतो यात तुझंच कौतुक भारी. गळ्यात घातलेली साधी चेन तुझ्याइतकी नाजूक दिसते. तुला जवळ ओढल तर तू मजबूत असतेस पण ती चेन तर नाजूकहुन नाजूक. तरी मी त्या चेनशी खेळत राहतो. तू ही नाजूक माझ्या मिठीत येतेस. त्या चेनीच्या खेचा-खेचीला मी खेळ म्हणतो पण ती चेन अलगद बोटात अगदी लाडात येऊन धरायची कला फक्त तुलाच जमते.
हातातली बांगडी तुझी सैल थोडी. पण हातातून लवकर निघेल तर ती बांगडी कसली ? त्या बांगडीचा रंग प्रत्येक ड्रेसला तुझ्या शोभून दिसतो. तुझ्या रंगाच्या आवडीचं मी कौतुक करतो. पण तुला कोणता ही रंग उठून दिसतो हे विलक्षण. तुझ्या नकट्या नाकावर चमकी कधी साडीसोबत नथ शोभून दिसते. नाकाला धक्का लागला तर नाक लाल बुंद होऊन जातं. तरी तू ती मिरवतेस. मी त्या नथीला माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो पण तू तुझे अलंकार कित्येक दिवस जसेच्या तसे जपून ठेवतेस यासाठी तुझं कौतुक व्हावं. मी म्हणेल ती पूर्व दिशा मानतेस तू. मी कायम खराच असतो अस नाही पण तू माझ्यावर खोटा विश्वास ठेवलायस अस ही नाही. तुझ्या माझ्यात अनोळखी नात असताना त्याच प्रेम झालं. कारण तू मला आपलंस केलं. मी तुला पहिल्यांदा प्रपोज केलं यात कसला दम आला ? तू मला तुझं मानलं यातच तुला मी मानतो.
कित्येक दिवस तू सोबत आहेस. हे दिवस कैक पण तू आणि मी एक आहे. एक होण्याला जगाचा विरोध असतो पण तुझी साथ ती, त्याला महत्व आहे. मी स्वप्न रंगवतो त्यात तू खुश असतेस. माझ्या त्या विचारशक्तीच कौतुक कसलं, ते खरं तर तुझ्यामुळेच होत असत. त्यासाठी तरी तुझं कौतुक होउदे.
अस म्हणतात सगळ्या स्त्रिया या सारख्याच असतात. मला आधी वाटायचं आणि आता मानतो. पण तू ही अशी आहेस विलक्षण की मला वाटत प्रत्येकाची प्रियसी आणि बायको ही अशीच असते.
विलक्षण !

Copyrighted@2020


0 टिप्पण्या