भाग ०५
अजिंक्य आणि प्रतीक्षा घरी आले. अजिंक्य आतल्या खोलीत जाऊन पुस्तक वाचत बसला. प्रतीक्षा त्याच्यासाठी चहा बनवते. थोड्यावेळाने चहा घेऊन प्रतीक्षाची आई अजिंक्यसमोर आल्या.
आई : अजिंक्य, हा घे चहा.
अजिंक्य : तुम्ही कशाला आणलात. मी आलो असतो. हाक मारायची ना.
आई : मलाच तुझ्याशी बोलायचं होत.
अजिंक्य पुस्तक बाजूला ठेवतो आणि त्यांच्या हातातला चहाचा कप घेत,
अजिंक्य : बोला ना.
आई : सरळ मुद्द्याच बोलते. थकला असशील ना तू. हे बघ मध्यंतरी काय झाल तुझ्यात आणि प्रतीक्षामध्ये हे मला माहित नाहीये. प्रतीक्षा हि मला काही बोलली नाही. पण जे काही झाल त्यातून त्या विषयाच स्वरूप मोठ होत हे मात्र नक्की. नवरा बायको म्हंटल कि असे वाद-विवाद होतातच. पण म्हणून एकमेकांपासून लांब राहण कितपत योग्य आहे ? अशात तुम्हाला बाळ होणार. आणि आत्ता बाळ नसल तरी आई जे बघते ऐकते सोसते ते सगळ बाळाला कळत असत. त्याच्यावर तुमच्या या वागण्याचा परिणाम होतोय हे प्रतीक्षाला कळत नाहीये, निदान तु तरी ऐकावस माझ.
अजिंक्य : मी तिला न्यायला आलेलो. पण तीच म्हणन आहे कि डिलिव्हरी इथेच करायची. म्हणून मग मी ठरवलय इथेच थांबायचं. चालेल न ?
आई : विचारतोस काय ? उलट बर झाल. तिला तुझी गरज आहे. आणि बाळाला पण.
आणि हो, जे काही तुमच्यात झाल असेल दोघ हि एकदा बोलून घ्या आणि विसरून जावा.
अजिंक्य : हो आई.
आई : तू तुझ लिखाणाच काम सुरु ठेव. मी कधी बोलेले नाही तुला पण तुझ्या लिहिलेल्या मालिका मी बघते. आवडत मला तुझ लिखाण. असाच अजून मोठा हो. प्रतीक्षाची काळजी घे. शेवटी तुम्ही दोघ आता माझीच मुल. सुखाने संसार व्हावा तुमचा इतकच वाटत.
अजिंक्य : अमित नंतर तिला मी साथ दिली आणि अमित आधीही तिच्यासाठी मी तिची वाट बघितली होती. तिच्यावर प्रेम आहे म्हणूनच. आता तिच्यासाठी कमी नाही पडणार. वाट्टेल ते करीन. ज्यादा काम करीन. आणि तिच्या ज्या काही इच्छा असतील त्यांना पूर्ण करेन. तुमचा आशीर्वाद असुदे.
आई : कायम आहेत. बर पी तू चहा. आहे मी बाहेर.
अजिंक्य : प्रतीक्षाला आत पाठवता का ?
आई : हो.
थोड्यावेळाने प्रतीक्षा आली. अजिंक्य चहा पिऊन पुन्हा पुस्तक वाचत झोपून होता. प्रतीक्षा त्याच्या शेजारी येऊन बसलेली. अजिंक्य तिला जवळ घेतो. प्रतीक्षा त्याच्या अंगावर हात टाकून डोळे मिटून झोपली. अजिंक्य तिच्या पोटावरून हात फिरवत होता. प्रतीक्षा शांत होती. तेवढ्यात सारा आत आली. अजिंक्यने पुस्तक बाजूला ठेवल आणि उजव्या हाताला साराला घेतल. सारा अजिंक्यशी बोलत बसली. आणि प्रतीक्षा शांत दोघांच बोलन ऐकत अजिंक्यचा स्पर्श अनुभवत होती.
भाग ०६
रात्री दीड वाजता. अजिंक्य पुस्तक वाचत बसलेला. प्रतीक्षा त्याच्या जवळ जाते. अजिंक्यच्या मागून गळ्यात हात घालून त्याच्या डोक्याला डोक टेकवून बसते.
अजिंक्य : काय झाल ?
प्रतीक्षा : मला केक खाऊ वाटतोय. तो पण ना डार्क चोकॉलेटचा.
अजिंक्य : आत्ता ?
प्रतीक्षा : हो.
अजिंक्य : इतक्या लेट अवघड आहे.
प्रतीक्षा : मला खूप इच्छा झालीय.
अजिंक्य एक एक नाव घेतो आणि प्रतीक्षा सगळ्याला हो हो म्हणते. अजिंक्य आत जाऊन ओव्हन प्री-हिट करायला ठेवतो. प्रतीक्षा आत येऊन त्याला मदत करायला लागते. पण तो तिला खुर्ची देऊन त्यावर शांत बसायला सांगतो. केकसाठी मिश्रण एकत्र करताना ती कशात काय आहे हे एवढच सांगत बसते. आणि अजिंक्य स्वतः सगळ ते मिश्रण करतो. दहा मिनिटांनी ओव्हनची बेल वाजते. अजिंक्य केकच मिश्रण केकच्या भांड्यात ओतून ते भांड ओव्हनमध्ये ठेवतो. आणि प्रतीक्षाच्या शेजारी खुर्ची ठेवून तिचा टेबलावरचा हात हातात घेऊन तिच्याकडे एकटक बघतो. तीही त्याला बघते. अजिंक्य नजर फिरवायला तयार नाही आणि प्रतीक्षा हि, पण तिलाच मग लाजायला होत आणि ती लाजून खाली बघते आणि तीची केसांची बट कानामागून पुढे डोळ्यांवर आली.
अजिंक्याने बोटांनी ती बट पुन्हा कानामागे सरकवली. आणि पाच हि बोट कानामागून मानेवर थांबली. अजिंक्यने दुसऱ्या हाताने खुर्ची तिच्याकडे सरकवून तिचा चेहरा स्वतःकडे ओढला. तिने डोळे मिटले. केकचा वास सुटला होता. आणि त्या वासाने तिला अजूनच कस तरी होत होत. थोडक्यात भुकेने आणि खायच्या इच्छेने उतावीळ झालेली प्रतीक्षा उठून अजिंक्यच्या मांडीवर येऊन बसते. अजिंक्यची केस कुरवाळत त्याला एकटक बघत होती ती. अजिंक्यही तिला पोटाला धक्का लागू नये अस मागे पकडून तिच्या छातीपाशी त्याचे ओठ फिरवत तिला जवळ घेत होता. थोड्यावेळाने, प्रतीक्षाला अवघडल्यासारख झाल तेव्हा अजिंक्याने तिला खुर्चीवर नीट बसवलं.
केक झाला का बघून तो पुन्हा तिच्या मागे येऊन तिच्या केसातून हात फिरवत तिच्या गालावरून ओठावरून गळ्यावरून आणि मग पोटापर्यंत हात फिरवत तिच्याशी बोलत राहिला. ती बोलत होती पण तीच सगळ लक्ष त्याच्या स्पर्शाकडे होत. त्याच्या स्पर्शाने तिचे श्वास थंड होत जात होते. बोलता बोलता शब्द अडकत होते. आणि काही वेळाने ओव्हनची बेल वाजली. अजिंक्यने जाऊन केक बाहेर काढला. प्रतीक्षा पटकन जाऊन त्याच्या शेजारी उभी राहिली. त्याने तो केक एका ताटलीत काढला. पण तिला दम निघेना तिने त्यात सुरी घुपसून तो केक कापला आणि एक घास खाल्ला. उरलेला अजिंक्यला भरवला. अजिंक्य किचन कट्ट्याला टेकून उभा होता त्याने प्रतीक्षाला जवळ ओढलं आणि दोघे हि तसेच केक खात राहिले. म्हणजे प्रतीक्षा स्वतः एक घास खाउन उरलेला त्याला भरवत होती. थोडा केक त्याने आई आणि सारासाठी बाजूला काढला. अजिंक्यने तो केक फ्रीजमध्ये ठेवला. तोपर्यंत प्रतीक्षा पाणी पिऊन झोपायला गेली. अजिंक्य सगळ आवरून भांडी घासत बसला. त्याच सगळ आवरून झाल तो बेडरूममध्ये गेला तर प्रतीक्षा शांत झोपलेली.
भाग ०७
दुसऱ्यादिवशी,
सकाळी अजिंक्य एका प्रोड्युसरला कॉल करत असतो. पण लागत नाही. मग दुसऱ्या एका प्रोड्युसरला कॉल केला पण त्याने कॉल कट केला.
अजिंक्य मेल चेक करायला लागतो आणि त्याला आठवत त्याला एका मालिकेची स्क्रिप्ट लिहून द्यायची होती. तीन एपिसोडची. त्याची अंतिम तारीख जवळ आलेली.
थोड्यावेळाने प्रतीक्षा आली.
अजिंक्य : ऐक मी आता मालिकेची स्क्रिप्ट लिहायला बसतोय. दिवसभर कशाला बोलवू नकोस. जेवण वैगरे काही नको. रात्री फक्त बारा वाजता ये माझ्याजवळ.
प्रतीक्षा : चालेल. माझा मोबाईल देतो का मला एक कॉल करायचा आहे.
अजिंक्य तिला मोबाईल देतो. ती बाहेरच्या खोलीत जाते. जाताना दार लावून घेते.
अजिंक्य कॉम्प्युटर सुरु करतो. अजिंक्य खिडकी उघडतो. आणि शर्ट काढून बेडवर टाकतो. खुर्चीवर येऊन बसतो. छातीशी बांधलेल्या पट्ट्या टोचत होत्या. अजिंक्यने सिगरेट पेटवली. आणि ओठांच्या एका कोपऱ्यात सिगरेट ठेवून धूर आत घेऊन ओठाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून धूर सोडत होता. अजिंक्य बारा तास स्क्रिप्ट लिहित होता. त्यात बऱ्याच सिगरेट ओढून तोंड अगदी सुकून गेलेलं. तरीही पाणी आणायला तो बाहेर गेला नाही. आणि प्रतीक्षाला माहित होत त्याच लिखाण सुरु असताना त्याला डिस्टर्ब केलेलं आवडत नाही म्हणून ती हि पूर्ण दिवस सारासोबत वेळ घालवत होती. रात्री साडे अकरा वाजता पंचेचाळीस एपिसोड लिहून झाले. त्याने प्रोड्युसरला कॉल लावला.
अजिंक्य : हेल्लो,
देशपांडे : बोला साहेब, कुठे आहात. आत्ता दिवस उगवला वाटत तुमच्याकडे ? पण आमच्या इथे तर रात्र झालीय. बाहेरच्या देशात आहात का ?
अजिंक्य : नाही, इथेच आहे पुण्याला. जरा बिझी होतो. आपली डेट संपत आलेली म्हणून स्क्रिप्ट लिहिली. पंचेचाळीस एपिसोड लिहिलेत. तुम्हाला मेल करावा त्या आधी कॉल करून सांगाव म्हणून कॉल केला.
देशपांडे : अरे वाह, ते ठीक आहे. पण आमच शुटींग केव्हाच सुरु झालय. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो टीव्ही सुरु करून बघा. मालिकेची जाहिरात पण सुरु झालीय पुढच्या महिन्यात एकवीस तारखेला आमची मालिका सुरु होतेय. साडे सात वाजता संध्याकाळी. त्यामुळे आता तुम्ही जे एपिसोड लिहिले आहेत ते डिलीट करा. आम्हाला नको ते. आणि ते कुणाला देऊ नका नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. बाकी काळजी घ्या. आणि मिळालीच दुसरी मालिका तर लिहा. आणि जमल तर ती तरी मालिका लवकर लिहून द्या. आणि त्या लोकांचे कॉल उचला. बाय.
अजिंक्यचा श्वास धीमा झाला. तो खिडकीपाशी उभा राहून सिगरेट ओढायला लागला. बारा वाजायला आता चार मिनिट राहिलेले. पण अजिंक्य लिखाणाच्या धुंदीत असला कि त्याला नियम कुणी मोडलेले आवडत नाही त्यामुळे प्रतीक्षा मोबाईलमध्ये रीमाइंडर लावून बसते. जेव्हा बरोबर बारा वाजतात ती अजिंक्यच्या खोलीच दार उघडून आत जाते. अजिंक्यच लक्ष नसत. ती त्याच्या मागे उभी राहते तरी त्याच लक्ष नसत. प्रतीक्षा त्याच्या खांद्याला धरून त्याला पूर्ण तिच्याकडे वळवते तर अजिंक्य ओल्या डोळ्यांनी तिला बघायला लागला आणि जेव्हा तिने त्याच्या गालावर हात फिरवून विचारल काय झाल तेव्हा डोळ्यात थांबलेले पाणी सरळ गालांवरून खाली यायला लागल.
भाग ०८
अजिंक्यने तिला काय झाल ते सांगितल. आणि तिने त्याला दोन फिल्म लिहायचे आहेत याची आठवण करून दिली तेव्हा अजिंक्य शांत झाला. अजिंक्य झोपला. प्रतीक्षाही त्याच्या बाजूला होती. अजिंक्य गाढ झोपला होता आणि तेवढ्यात त्याला आवाज आला. तो झोपेतून जागा झाला तर त्याने मागे वळून बघितल प्रतीक्षा झोपेत रडत होती. त्याने तिला उठवल आणि काय झाल विचारल, तिच्या पोटात दुखायला लागलेलं. अजिंक्यने तिला पाणी दिल पण तिला पिता येत नव्हत. तिला थोडस उठवून उशीला टेकवून बसवलं. डॉक्टरांना कॉल केला तेव्हा त्यांनी एक गोळी सांगितली ती द्यायला लावली. आणि उद्या सकाळी दवाखान्यात या अस सांगितल. अजिंक्यने प्रतीक्षाच्या आईला जाऊन उठवल आणि त्यांना प्रतीक्षाजवळ बसायला सांगून अजिंक्य चोवीस तास सुरु असणाऱ्या मेडिकलकडे गोळी आणायला निघाला. तिथून गोळ्या घेऊन तो घरी आला. प्रतीक्षाला गोळी दिली आणि तिच्या जवळच तो बसून राहिला. गोळी खाऊन पण ती बराच वेळ व्हीवळत होती. नंतर तासाभराने जेव्हा तिला झोप लागली तेव्हा प्रतीक्षाची आई जाऊन झोपली. पण अजिंक्य जागाच राहिला. पहाटे चारपर्यंत अजिंक्य जागा होता. डोक दुखायला लागल म्हणून त्याने जाऊन स्वतःला चहा बनवला. चहा बनवून तो आतल्या खोलीत आला. प्रतीक्षाला बघत त्याने एक एक घोट घ्यायला सुरुवात केली. पण प्रतीक्षाच्या काळजीने चहामध्ये नेमकी साखर कमी पडली. आणि कमी साखरेचा चहा त्याला आवडत नाही.
त्याने सिगरेट काढली. खिडकी जराशी उघडली आणि सिगरेट ओढत तो चहा प्यायला लागला. थोड्यावेळाने जेव्हा चहा आणि सिगरेट दोन्ही पिऊन झाल मग तो खिडकीतून बाहेर बघत बसला. बेडजवळ जाऊन तो झोपायला उशी घेतो तेव्हा त्याच लक्ष घड्याळात जात पाच वाजायला आलेले. त्याने उशीवर डोक टेकवल आणि तेवढ्यात प्रतीक्षा पुन्हा रडायला लागली. अजिंक्यने तिला उठवल तर तिला सहन होत नव्हत इतकं पोटात दुखत होत. अजिंक्यने तिला पाणी दिल. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचा हात फिरवून तिला नीट धरून बाहेरच्या खोलीत आणल. बाहेर तिला सोफ्यावर बसवून त्याने तिच्या आईला सांगितल. त्या बाहेर आल्या. अजिंक्य प्रतीक्षाला इनोव्हामध्ये बसवतो आणि पहाटेच दवाखान्यात घेऊन जातो. तिथे नाईट शिफ्टच्या नर्सने प्रतीक्षाला सलाईन लावल. आणि एका डॉक्टरने प्रतीक्षाला तपासून अजिंक्यला सांगितल डिलिव्हरी परवा ऑपरेशन करून करावी लागेल. अजिंक्यने होकार दिला. प्रतीक्षा रडत बसलेली. नर्स तिची समजूत काढत होत्या. डॉक्टर इंजेक्शन देऊन निघून जातात. थोड्यावेळाने नर्स हि जातात. तेव्हा अजिंक्य प्रतीक्षासोबत बोलत बसला. येणाऱ्या बाळाबद्दल अजिंक्य इतक बोलत होता कि त्याच हे प्रेम बघून प्रतीक्षाला बर वाटत होत आणि तीही सगळा त्रास विसरून त्याच्याशी बोलत बसली. बोलता बोलता ती केव्हाच झोपली. ती झोपली तेव्हा अजिंक्यने फिल्म प्रोड्युसरना कॉल लावला आणि दोन्ही त्या फिल्मबद्दल चर्चा केली. आणि तेव्हा त्याला कळाल त्या दोन्ही फिल्म्स त्याच्याकडून काढून घेतलेल्या त्याला न विचारता. आणि त्या अभिजित नावाच्या एका लेखकाकडे गेलेल्या. हा अभिजित कोण हे अजिंक्यला माहित नव्हत. पण पुन्हा त्याला टेन्शन आल आणि त्याला आता काय कराव समजत नव्हत. दुपारी जेव्हा प्रतीक्षाला जाग आली तेव्हा अजिंक्यच पडलेलं तोंड बघून प्रतीक्षाला समजल अजिंक्यला काही त्रास आहे. तेव्हा अजिंक्य तिला खोट सांगतो, त्याला प्रतीक्षा आणि बाळाची काळजी वाटतेय. कारण प्रतीक्षाच हे दुसर बाळ असल तरी अजिंक्यच ते पाहिलं बाळ होत.
भाग ०९
दिवस असा दवाखान्यातच गेला. अजिंक्यला प्रतीक्षाची काळजी वाटत होती. तिच्या पुढून तो एक सेकंदहि कुठे बाजूला गेला नव्हता. बाळ जन्माला येणार या विचाराने आनंद मिळत असला तरी ते येण्याआधी प्रतीक्षाला होणारा त्रास अजिंक्यला सहन होत नव्हता. संध्याकाळी जेव्हा तिला जरा बर वाटत होत तेव्हा डॉक्टर येऊन तिला एकदा तपासतात. परवा ऑपरेशन करावच लागेल सांगून ते निघून जातात त्यांच्याशी बोलायला अजिंक्य त्यांच्यासोबत बाहेर गेला. तिथून त्याने दवाखान्याची फी भरली. ऑपरेशनचे काही पैसे भरले. पैसे घेणाऱ्या एकीचे नाव आम्रपाली अस होत तेव्हा त्याला आम्रपाली लक्षात आली त्याने तिला कॉल लावला. तिच्याकडून बरीच त्याला माहिती मिळाली. अजिंक्यची मालिका ज्याच्या सोबत सुरु होणार होती त्याच खूप नाव होत इंडस्ट्रीमध्ये. आणि त्याच्या मालिकेला अजिंक्यने दुर्लक्ष केल. ऐन शुटींगच्या अधल्या दिवशी निघून गेला प्रतीक्षाकडे आणि तिकडे त्याच्यावर हल्ला झाला आणि तो दवाखान्यात भरती झाला. हे कुणाला माहित नव्हत. पण त्याला कुणी विचारल हि नाही. आणि त्याने दिलेल्या दग्यामुळे त्या प्रोड्युसरने त्याच्या ओळखीच्या जोरावर सगळ्यांना सांगून अजिंक्यला दिलेल्या फिल्म आणि मालिका काढून घेतल्या. त्याचे उरलेले पैसे हि न देण्याच्या धमक्या त्याने इतरांना दिल्या.
हे सगळ ऐकून अजिंक्यला काय कराव समजत नव्हत. इथून पुढे तर खरी कामाची त्याला गरज होती. आणि सगळी लागलेली लिंक त्याची तुटलेली. आम्रपालीकडून अभिजित या लेखकाचा नंबर अजिंक्यला मिळाला. अजिंक्याने आम्रपालीशी बोलन थांबवून अभिजीतला कॉल केला पण त्याने उचलला नाही. अजिंक्य निघून प्रतीक्षाजवळ आला. रात्री तिला जेवण आणून भरवल. स्वतः उपाशी बसला. आणि लवकर झोपला. प्रतीक्षा जेव्हा झोपली तेव्हा अजिंक्य उठून रात्रभर विचार करत बसला. परत कस काम मिळवायचं म्हणून त्याने खूप विचार केला. पण काहीच सुचत नव्हत. दुसऱ्या दिवशी घरी येऊन आवरून जेव्हा तो पुन्हा दवाखान्यात यायला निघाला त्याला एक डायरी त्याच्या गाडीत सापडली. त्याने उघडली आणि ती पूर्ण भरलेली. आणि तो गाडी घेऊन गेला एका पब्लिकेशन हाउसमध्ये. तिथे त्याने त्या डायरीतली गोष्ट पब्लिशरला सांगितली. ती ऐकून पब्लिशरने मंजुरी दिली आणि अजिंक्याच्या त्या गोष्टीच तीनशे पानांचं पुस्तक छापायला परवानगी मिळाली. अजिंक्य प्रतीक्षाला तिथूनच कॉल करून हे सांगतो ती खुश होते, निम्मा दिवस तिथेच सगळी कागदपत्र जमा करून आणि सगळ्या गोष्टी सांगून अजिंक्य एका ओळखीच्या माणसाला तिथे पुस्तक छपाईच्यावेळी थांबायला सांगतो. तिथून तो निघून दवाखान्यात येतो. तो दिवस असाच जातो. पण त्यात हि अजिंक्य प्रतीक्षा बरच काही बोलत असतात. आणि दुसऱ्यादिवशी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी प्रतीक्षालं बाळ होत. मुलगा.
थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर येऊन अजिंक्यला सांगतात मुलगा झाला आहे. आणि अजिंक्य आनंदाने आत जाऊन बाळाला हात लावून त्याचे मऊमऊ हात हाताळत असतो. प्रतीक्षा शांत झोपलेली असते. अजिंक्य तिच्या गालावर हात फिरवतो. प्रतीक्षा हलके डोळे उघडते. अजिंक्य गालात हसतो. आणि ती सुध्दा. ती अजिंक्यचा हात हातात हलका पकडते. अजिंक्य तिच्या हाताला घट्ट धरतो. प्रतीक्षा डोळे मिटते. अजिंक्य तिला ओठांवर कीस करतो आणि तिथेच बाळाला आणि प्रतीक्षाला बघत बसून राहतो. थोड्यावेळाने त्याने प्रतीक्षाच्या आईला कॉल करून सांगितल. त्या साराला घेऊन दवाखान्यात यायला लागल्या. अजिंक्य खूप खुश होता.
भाग १०
चार दिवस दवखान्यात गेले. जेव्हा प्रतीक्षाला घरी न्यायची परवानगी मिळाली. अजिंक्य तिला घेऊन घरी आला. लगेच तर साताऱ्यात तिला तो आणू शकत नव्हता. इकडे प्रतीक्षाची आई साराला सांभाळत होत्या. अजिंक्य प्रतीक्षाला काय हव नको एक एक मिनिट बघत होता. प्रतीक्षाला अधूनमधून अमितची आठवण येत होती. पण सारा झाली तेव्हा अमितला एवढ वेळ मिळाला नव्हता तिच्याकडे लक्ष द्यायला. पण अजिंक्यने पूर्ण वेळ फक्त प्रतीक्षासाठीच काढून ठेवलेला. अजिंक्य आता बदललाय ह्यावर प्रतीक्षाचा विश्वास पूर्ण विश्वास बसला होता. असच एकदा दुपारी अजिंक्य प्रतीक्षा बोलत बसलेले. साराला जवळ घेऊन अजिंक्य बसलेला. प्रतीक्षा बाळाला घेऊन झोपलेली.
अजिंक्य : मला माझ्या बाळाला म्युजिक कंपोझर बनवायचं आहे. तुझी काय इच्छा आहे.
प्रतीक्षा : मला काही ही झालेले चालेले आपल बाळ. फक्त त्याने तुझ्या सारख नाव कमवाव. तुला माहित नाही अजिंक्य, मी दाखवत नसले बोलून तरी मला खूप भारी वाटत तुझ्यासोबत फिरताना. खूप लोक तुला ओळखतात. त्या लोकांत तू असा वावरतोस कि तुला बघताना मला कोणी तू हिरो वाटतोस. बस असच नाव कायम टिकवून ठेव. आणि आता तुझ्या माझ्या संसारात आता दोन जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. प्लीज, आता पुन्हा मला सोडून कुणाकडे जाऊ नकोस.
अजिंक्य : नाही जाणार.
प्रतीक्षा : आपण एकदा ठरवलेलं नाव मुलीच आणि मुलाच नाव. आठवतय का ?
अजिंक्य : हो, मुलगी झाली तर साया आणि मुलगा झाला तर आदित्य.
प्रतीक्षा : आदित्य ठेवायचं ना ?
अजिंक्य : हो.
अजिंक्य प्रतीक्षाचा चेहऱ्यावरून हात फिरवतो, सारा अजिंक्यकडे बघून हसते.
सारा : मम्मी आणि बाळ दोघ कशी गुब्बू झालीत ना ?
अजिंक्य आणि प्रतीक्षा हसायला लागतात.
अजिंक्य : तूझी आणि माझी जोडी. तू नको जाऊ त्यांच्यात नाहीतर तू पण अशी होशील.
सारा हसून अजिंक्यला मिठी मारते. अजिंक्य तिला घेऊन बाहेरच्या खोलीत गेला. प्रतीक्षा बाळाला दुध पाजते. अजिंक्य सारासोबत भांडी कुंडी खेळत होता. प्रतीक्षाची आई टी.व्ही. बघत होत्या. अजिंक्यला कॉल आला.
अजिंक्य : हेल्लो ? कोण ?
अभिजित : कॉल तुम्ही लावलेला आठवडाभरापूर्वी.
अजिंक्य नंबर नीट बघतो,
अजिंक्य : अभिजित ?
अभिजित : हो. आपण ?
अजिंक्य : मी अजिंक्य भोसले.
अभिजित : बर मग ?
अजिंक्य : नवीन मालिका लिहिताय ना आपण ती मी लिहित होतो.
अभिजित : ओह, म्हणजे तो अजिंक्य तू आहेस का ? बर,बर काय काम होत ?
अजिंक्य : काही नाही ती स्टोरी माझी आहे. त्याची आयडिया पण माझी आहे. आणि ती लिहितोयस तू. मला न विचारता त्या स्टोरीचे हक्क तुला दिलेत. म्हंटल तुला आधी सांगाव, मी कोर्टात केस करणार आहे. त्यामुळे तयार राहा.
अभिजित : चालेल. करा हव ते.
अजिंक्य : बर. आणि एकेरी नाव नाही घ्यायचं माझ. अजिंक्य आदराने बोलायचं. आपण नवीन असतो. काम मिळाल कि हवेत असतो. असल्या कित्येक हवा घेतल्यात मी. सो, एकेरी बोलू नको.
अभिजित : मी बोलणार. आपले संबंध आहेत आधीचे.
अजिंक्य : हम ?
अभिजित : असावरीला ओळखतो ना ?
अजिंक्य : हम तीच काय ?
अभिजित : तिचा मी नवरा.
अजिंक्य : मग मी काय करू ?
अभिजित : काही नाही फक्त लक्षात ठेव. कोर्टात केस करायच्या आधी मी कोण आहे हे तुला सांगाव म्हंटल.
भाग ११
अजिंक्यने कॉल कट केला. बाळासोबत आणि प्रतीक्षासोबत अजिंक्यचा महिना गेला. खूप रमून गेलेला तो. कित्येक गोष्टी त्याच्या विचारामागे गेलेल्या. कित्येक आठवणी हरवून गेला. कित्येक व्यक्ती तो विसरून गेलेला. आता त्याच जग फक्त प्रतीक्षा आणि अजिंक्य इतकच झालेलं. लिखाण सुटून गेलेलं. या महिन्याभरात त्याला प्रतीक्षा आणि बाळाच करून साराचा लाड करून वेळ मिळाला कि, तो बाळाच साराच आणि प्रतीक्षाच स्केच करत होता. किमान वीस एक स्केच त्याने काढलेले. ते त्याने एका मोठ्या डायरीत जपून ठेवले. बघता बघता दिवस जात होते. प्रतीक्षाची तो काळजी घेत होता. पण आता पुन्हा साताऱ्याला येण भाग होत.
प्रतीक्षा अजिंक्य त्याचं बाळ आणि सारा साताऱ्याला आले. इकडे हि अजिंक्यचा पूर्ण दिवस घरची काम करण्यातच जात होता. त्यामुळे त्याच्या कामाकडे त्याच सगळ दुर्लक्ष झालेलं. रविवारी त्याला कॉल आला. तो पुण्यातल्या पब्लिकेशन हाउस मधून आलेला कॉल होता. अजिंक्यने आधी लिहिलेली पुस्तक फक्त त्याच्या नावावर चालली होती. पण जेव्हा त्याने पुण्यात असताना आत्ता पुस्तक पब्लिश करायला दिलेलं ते पूर्णपणे वाया गेल. ते पुस्तक शंभर लोकांनी पण वाचल नसेल. अजिंक्यसाठी तो अजून एक धक्का होता. पण तो धक्का घेऊन जगायला फुरसत नव्हती. पुन्हा काही दिवस तो ते सगळ विसरून गेला. प्रतीक्षाला सांगितलेल वचन मोडून अजिंक्यची सिगरेट सुरु होती. सिगरेट काय मोठ व्यसन नाही. अस त्याला वाटत होत. रात्री अजिंक्य दोन वाजता घराबाहेर आला. गाडीतून सिगरेटच पाकीट काढून तो रस्त्याने अंधारात चालत सिगरेट ओढत होता.
धूर पांढरा असून हि त्या अंधारात दिसत नव्हता. त्याची सावली ती काळी मग काय दिसणार होती तिथे ? खूप वेळ चालल्यावर त्याला समजेना इतका वेळ तो कसला विचार करतोय ? पुन्हा माघारी घराकडे वळला. घरी येऊन त्याने नवीन पुस्तक लिहायचं ठरवल. आणि पूर्ण रात्र जागून त्याने पुस्तक लिहायला सुरुवात केली.
पुढे मग दोन महिने त्याने दिवसभर सारा, प्रतीक्षा आणि बाळाकडे पूर्ण लक्ष देऊन रात्रीच पुस्तक लिहिण सुरु केल. दिवसातले फक्त दोन-तीन तास झोप घेऊन त्याच काम सुरु होत. पुस्तक लिहिण सुरु असल तरी ती समजूत काढलेली त्याने त्याचीच. सगळी काम हातून गेलेली. पुन्हा काम मिळण्याचा मार्ग त्याला मिळत नव्हता. मधल्या काळात त्याने एक हि ओळखीच्या व्यक्तीला कॉल करायचा सोडला नाही पण त्याला एक हि काम मिळाल नाही. काय कराव सुचत नव्हत. शेवटी त्याने त्याची स्विफ्ट, इन्होव्हा आणि बुलेट विकायचा विचार केला. हे तिन्ही विकून बँकेत असलेले पैसे थोडे काढून स्वतः एक मालिका सुरु करायचा विचार त्याला आला. आणि त्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. हा विचार त्याने प्रतीक्षाला त्याने सांगितला आणि तिने विरोध केला. पण त्याने तिच्या समोर “बर” म्हणून माघार घेतली. पण त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. दोन दिवसांनी त्याची आवडती बुलेट एका माणसाने विकत घेतली. प्रतीक्षाला खोट सांगितल कि, सर्विसिंगला दिलीय. तिला विश्वास बसला नाही पण अ-विश्वास दाखवून त्याला दुखावण तिला बरोबर वाटल नाही. मध्यरात्रीचा अजिंक्य बऱ्याच सिगरेट ओढत बाल्कनीत बसलेला तिला अलीकडे दोन तीन दिवस दिसत होता. आत्ता हि पावणे चार झालेले. खुर्चीच्या खाली बारा पेक्षा जास्त सिगरेटचे फिल्टर पडलेले. आणि हातात एक होती त्यातून धूर येतच होता. प्रतीक्षा त्याच्या जवळ गेली.
प्रतीक्षा : अजिंक्य..?
अजिंक्य : ( तिच्याकडे न बघता ) हम ?
प्रतीक्षा : काय झालय तुला ? मला वाटल होत आपल्याला बाळ झाल्यावर तू खुश होशील. पण तू इथ माझ्यापासून दिवसभर टेन्शन लपवून इतक्या रात्रीचा सिगरेट ओढत बसलायस. आपल बाळ तीन महीन्याच झालय. त्याच बारस करायचा विषय तू अजून काढला नाहीयेस. तू सगळ करतोयस आमच्यासाठी, ते आपलेपणाने वाटत नाहीये. कुठेतरी कामाला असल्यासारखं सगळ करताना जाणवतय मला. तुला तुझ काम करायला वेळ मिळत नाही याच टेन्शन आहे का ?
अजिंक्य : तुला आयुष्य जगायला काय लागत ?
प्रतीक्षा : खायला, रहायला, तुझी सोबत, प्रेम आणि आपली दोन मुल.
अजिंक्य : आणि श्वास ?
प्रतीक्षा : तो तर महत्वाचा आहे.
अजिंक्य : मी आर्टिस्ट आहे. कलाकार होण इतक सोप्प नाही. त्याची तारीफ, त्याच कौतुक हरकुणी करतात. पण ती तारीफ असते त्याच्या कलेची. कलाकाराच्या शरीराला किंमत अशी काहीच नाही. रोज मालिकेचे एपिसोड लिहायची, रोज काही न काही लिहायचं, पुस्तक लिहायची. सगळ रोजच्या रोज सुरु होत. आणि बदल्यात एक दिवस पुरणार नाही इतकी तारीफ मिळवून मी एक एक दिवस जगत होतो. तुझ प्रेम तुझी सोबत या गोष्टींनी मी जगत होतो. दिवस काढत होतो. पण श्वास जसा असतो तशी ती तारीफ मला जिवंत ठेवत होती. कलाकाराला तारीफ नसेल तर त्याचा जीव कोंडून जातो.
( अजिंक्य प्रतीक्षाचा हात धरतो ) मला आता श्वास घेण जमत नाहीये. माझ्या सगळ्या मालिका माझ्या हातून गेल्यात, दोन फिल्म्स पण दुसर्यांना दिल्यात. आणि मला इंडस्ट्रीत काम द्यायला बंदी घातलीय. आता मला सांग मी बिनधास्त राहून कसा जगू ?
प्रतीक्षा : हे सगळ कधी झाल ?
अजिंक्य : तीन महिने झाले असतील. जेव्हा मी पुण्याला आलो तुझ्याकडे तुला मनवायला. तेव्हा मी सगळी काम सोडून कुणाला न सांगता तुझ्याकडे आलो. आणि हे सगळ झाल. पण त्या एका गोष्टीने इतक सगळ होईल वाटल नव्हत. माझ्याकडे आता काम नाहीये. खरी गरज आत्ता होती. पैसे आत्ता हवे होते, सारा आणि आपल्या बाळाच्या भविष्यासाठी. पण माझ्याकडे आता काम नाही.
प्रतीक्षा : असुदे, बुलेट कुणाला दिली ?
अजिंक्य : विकली.
प्रतीक्षा : आणि मग आता ?
अजिंक्य : स्विफ्ट आणि इनोव्हा पण विकणार. पुन्हा जेव्हा पैसे यायला सुरुवात होईल तुझी तुला इनोव्हा नवीन घेऊन देईन.
प्रतीक्षा : हे सगळ विकून तू काय करणार ? आलेल्या पैशातून घर चालवणार का ?
अजिंक्य : नाही.
प्रतीक्षा : मग ?
अजिंक्य : मी नवीन मालिका सुरु करणार आहे.
प्रतीक्षा : कोणती ?
अजिंक्य : माझी ‘कुणीतरी’ ची गोष्ट मला न विचारता माझे त्यावरचे हक्क काढले त्यांनी आणि मालिका सुरु केलीय. पण त्याचे सगळे हक्क माझ्याकडेच आहेत हे ते विसरलेत. तीच गोष्ट घेऊन मी दुसरीकडे मालिका सुरु करणार आणि चालवणार.
प्रतीक्षा : तुझ ते पुस्तक ? छापायला दिलेलं झाल का छापून ?
अजिंक्य : नाही चालल. अजिंक्य उठून आतल्या खोलीत गेला आणि बेडवर जाऊन झोपला. प्रतीक्षा शांत त्याच खुर्चीत बसून राहिली.
भाग १३
प्रतीक्षाला मनात कसलीतरी भीती वाटत होती. ती भीती नेमकी कशाची होती, आणि का वाटत होती तिला कळत नव्हत. बाल्कनीतून समोर पूर्ण अंधार दिसत होता. समोर पुढे अपार्टमेंट होत्या पण इतक्या रात्री एवढ्या अंधारात त्या हि दिसत नव्हत्या. प्रतीक्षा खुर्चीवर बसून होती. पण वार एकाजागेवर बसून नसत. थंड वार बाल्कनीत ये-जा करत होतच.
प्रतीक्षाला जेव्हा बाळ झाल. त्याच्या दोन दिवस आधी अंजलीला बाळ झाल होत. जरी अजिंक्यने चार महिने झाल तरी स्वतःच्या बाळाच बारस केल नसल तरी अंजलीने दोन महिन्यातच बाळाच बारस केल होत. तिला मुलगा झालेला आणि त्याच नाव अजिंक्य ठेवायचं अस तिने ठरवलेलं पण ओंकारने नकार दिला. तेव्हा दोघांनी आदित्य हे नाव ठरवल. आदित्य हे नाव अंजलीनेच त्याला सुचवलेल. जे ओंकारलं आवडल.
इकडे दोन दिवसांनी अजिंक्यने बाळाच घरातल्या घरात बारस केल. ज्या बारश्याला आलेले पाहुणे होते, प्रतीक्षा आणि सारा. बाहेरच कुणी बोलवायला नको म्हणून अजिंक्यने प्रतीक्षाला सांगितलेलं.
बारस झाल. प्रतीक्षाला मोठ बारस करण्यापेक्षा अजिंक्यच टेन्शन कमी कस करता येईल यावर जास्त लक्ष द्यायचं होत. अजिंक्य मालिका लिहित होता. पण त्याला हवा तसा डायरेक्टर मिळत नव्हता. बुलेट नंतर इनोव्हा आणि मग स्विफ्ट पण विकली गेली. महिनाभर मलिका लिहिण्यात अजिंक्यचा वेळ जात होता. सोबत दिवसभर प्रतीक्षाला कामात मदत करून बाळाला सांभाळून त्याचे एक एक दिवस जात होते. महिना होत आला असेल आणि त्याला तो लिहित असलेली मालिका लिहावीशी वाटेना. म्हणून त्याने ती लिहायची थांबवली. नेहमीसारखा रात्री तो बाल्कनीत बसलेला. रात्री सव्वा तीन वाजलेले. हातात सिगरेट होती. ओठातून धूर बाहेर येत होता. बाजूला शांत बल्ब लावलेला. त्याचा प्रकाश पडत होता. पुढच्या काही मिनिटात वार सुटल, पावसाच वातावरण झाल आणि त्यात लाईट गेली. अंधार भूडूक झाला सगळा आणि अजिंक्यने मालिका लिहिलेल्या दोन डायऱ्या पायापाशी ठेवून त्याला सिगरेटच्या लायटरने आग लावली. आणि नवीन एक सिगरेट त्याच आगीत पेटवून ती तो ओढत बसला. डायऱ्या जळताना त्याचा धूर आणि वास थोडा आत खोलीत हि गेला. प्रतीक्षाला जाग आली. ती बाल्कनीत आली तर नेहमीसारखाच अजिंक्य विचारात हरवलेला दिसला, पण त्याने त्या डायऱ्या का जाळून टाकल्या हे उत्तर तिला मिळाल नाही. कारण तसा प्रश्न तिने त्याला केला नाही. तिने त्याला आत खोलीत बोलावल. अजिंक्य सिगरेट टाकून आतल्या खोलीत गेला. प्रतीक्षा बाल्कनीच दार लावून घेते. बाहेर बाल्कनीत डायऱ्या जळतच होत्या. अजिंक्यने सिगरेट ओढलेली म्हणून बाळापासून तो लांब झोपलेला. प्रतीक्षा सारा आणि बाळाच्या बाजूला उश्या लावून अजिंक्यच्या अंगावर हात टाकून झोपली. अजिंक्यच हृद्य धडधड करत होत. पण नेहमीपेक्षा जास्त वेगात. तिने त्याच्या छातीवर तसाच हात ठेवला. थोड्यावेळाने ती धडधड कमी झाली आणि तोपर्यंत अजिंक्यही झोपून गेलेला.
शेवटचा भाग | १४
दिवसेंदिवस अजिंक्य एकटा राहत होता. बराच वेळ प्रतीक्षा आणि बाळासोबत घालवत असला तरी प्रतीक्षा आणि त्याच्यात पहिल्यासारख बोलण होत नव्हत. आधीसारखी अजिंक्य प्रतीक्षाची तारीफ करत नव्हता. तिला बघून शायरी किंवा कविता अशी बनवत नव्हता. कधी प्रेमाने मिठी मारत नव्हता. आणि हे सगळ तो मुद्दाम करत होता अस काहीच नव्हत. जे घडत होत ते आपोआप घडत होत. त्याच्या मनावर होत चाललेल्या अनेक विचारांचे परिणाम त्याचा तो भोगत होता. आर्टीस्ट म्हणून जगताना कित्येक अशी कौतुक घेत तो पुढे पुढे जात होता. प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागत तो पुढे पुढे येत होता. कित्येक कॉल मेसेज यायचे. कित्येक ठिकाणी बोलवल जायचं. पण आज स्वतःचा मोबाईल त्याने बंद करून कित्येक महिने झालेले. त्याची पुस्तक वाचायला कुणाला वेळ नव्हता. नवीन त्याच पुस्तक जास्त चालल नाही. त्याच्या मालिका बंद पडलेल्या. आणि त्याच्या कथांवर सुरु असलेल्या मालिकेत त्याच नाव दिसतच नव्हत. सगळीकडून त्याची तारीफ बंद झालेली. प्रतीक्षा त्याच्या लिखाणाची कायम तारीफ करत असायची. पण ती हि दोन मुलांत हरवून गेलेली. ती त्यात पहिल्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेली. आणि अजिंक्यला त्या सगळ्या पहिल्या दिवसांची गरज होती.
अजिंक्य एकटा पडत चाललेला. पण त्याच घराकडे मुलांकडे आणि प्रतीक्षाकडे दुर्लक्ष अजिबात नव्हत. एका हिंदी फिल्मसाठी त्याला ऑफर आलेली. पण उद्या कॉल करतो असा पुढून आवाज आला. तो कॉल काही परत आलाच नाही. आपल्याला आता काम मिळेल कि नाही हे विचारच त्याने करायचे सोडून दिले. लिखाण सोडून आता संसार करायचा त्याने ठरवल. आणि त्यासाठी आता घर सोडून कुठतरी नोकरी करायची म्हणून त्याने नोकरी शोधायला सुरुवात केली. प्रतीक्षा त्याला खूप समजावते पण तो कुणाच ऐकण्याच्या तयारीत नव्हता. हा, त्याने कुणाच हि ऐकल असत. जर का ती त्याची तारीफ असती तर. पण प्रतीक्षा त्याला सल्ला देत होती. आणि त्याला तो सल्ला इतका महत्वाचा वाटत नव्हता. नोकरी शोधायला तो चालत नाहीतर रिक्षाने ये-जा करत होता. दिवसातून एकदाच जेवत होता. कॉम्प्युटर हि त्याने विकून टाकला.
आता साध आयुष्यच जगाव लागणार म्हणून त्याने स्वतःचीच समजूत घालून घेतली. दिवस जात होते. बाळाच बारस झाल त्यानंतर दोन महिने होत आलेले आता. पण बाळ झाल्याचा आनंद काय त्याच्या चेहऱ्यावर नव्हता.
मनापासून केल तर कोणत हि काम पूर्ण होत. अजिंक्य नोकरी शोधत होता पण मनापासून नाही. आणि म्हणून त्याला नोकरी हि मिळत नव्हती. कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात एक अशा जिवंत होती कि त्याला पुन्हा एखादी फिल्म किंवा मालिका लिहायला मिळेल. सिगरेट सुरूच होती. बंद केलेली सवय पुन्हा सुरु झालेली. आणि आता तर ती सवय वाढतच गेलेली. प्रतीक्षाला दिलेलं वचन पाळून त्याने दारू तरी अजून प्यायला सुरुवात केली नव्हती. बाळाच्या बारश्यानंतर अडीच महिने झाले असतील. त्याला एका मराठी वेब सिरीज लिहिण्यासाठी ऑफर आली. त्याने ती मंजूर केली. पूर्ण दोन दिवस लिखाण करून त्याने पूर्ण स्टोरी तयार केली. ती पाठवली. प्रोड्युसर लोकांना हि ती स्टोरी आवडली. आणि आता स्क्रिप्ट लिहायला अजिंक्य उद्या सकाळपासून सुरुवात करणार होता. रात्री दोन वाजता स्टोरीचा विचार करता करता सिगरेट ओढत तो खुर्चीवर बसलेला. आणि छातीतून जोरात कळ आली. अंगाची डावी बाजू पूर्ण थंड पडत गेली. प्रतीक्षाला हाक मारायला त्याने तोंड उघडायचा प्रयत्न केला पण नाही जमल. हातातून त्याच्या सिगरेट पोटावर पडली. तोंड उघड राहील पण छातीत दुखण्याच्या त्रासाने त्याने डोळे मिटून घेतले.
सकाळी प्रतीक्षाला अजिंक्य तसाच बेशुध्द दिसला. अम्ब्युलन्स जेव्हा सकाळी अजिंक्यला घेऊन दवाखान्यात गेली. डॉक्टरांशी बोलल्यावर प्रतीक्षाला कळाल कि अजिंक्यला पहिला HEART ATATCK आलाय.
समाप्त
“प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व ७वे लवकरच सुरु होईल.”
Copyrighted@2018-2020
31 Comments
पर्व सहावे चा पुडील भाग कधी येणार
ReplyDeleteएक दिवसाआड भाग प्रसिद्ध केला जाईल.
ReplyDeleteअजिंक्य प्रतिक्षाला परत घेऊन जायला आला, आणि प्रतिक्षाने पण वाद जास्त ताणून धरला नाही आणि दोघे पुन्हा एक झाले, खुप छान वाटले वाचून, लय भारी ��������
ReplyDeleteछान लिहिलंय,, ��������
Thank you.
Deleteपुढचा भाग कधी टाकणार पर्व 6 चा
ReplyDeleteएकदिवसाआड प्रसिद्ध होईल
Deleteत्याची लिंक मिळत नाहीए
DeleteWhatsApp me on 7558356426
Deleteएक दिवसाआड एक भाग टाकणार होतात मग का टाकत नाही ,दररोज चेक करतोय पण भाग के येत नाही
ReplyDeleteReply dya
Deleteप्रेमाची शप्पथ आहे तुला या कथेला एका वेबसाईटने माझी परवानगी न घेता प्रसिद्ध केले होते त्यामुळे पुढील भाग पोस्ट करायचे मी थांबवले. पण आता सुरळीतपणे पोस्ट होत जातील
Deleteखूप छान 👌👌
ReplyDeleteThank you
DeleteSir , mala notification kasa bhetal tumcha saglay part Ch , plz help me . Story kharch khop Chan aahe
ReplyDelete7558356426 whatsapp business no yala msg kra roj link miltil.
DeleteVery nice 👌👌👌👌
ReplyDeleteThank you
DeleteKhup chhaan hota ha bhaag pudhacha bhaag zalay ka post plz link patha a
ReplyDeleteEk divsaad ithe bagh post hot asto.. bhet det ja
Deletekhupch mast
ReplyDeleteThank you
DeleteKhup chhaan hota 9 bhaag. Mastach
ReplyDeleteThank you
Deleteसगळेच भाग खुप छान लिहिले आहेत 👌👌👌👌
ReplyDeleteThank you
DeleteKhupach chan story ahe
ReplyDeleteThank you !
ReplyDeleteMast aahe story khup chhaan
ReplyDeleteThank you
Deleteखुप सुंदर 👌👌 अजिंक्य ला एवढं tension असते तरी देखील तो अजिबात दुर्लक्ष न करता family कडे व्यवस्थित लक्ष देतो, हे वाचून खूप छान वाटले, एकदम छान कथा लिहिली आहे, 👌👌
ReplyDeleteThank you so much
Delete