एकतर्फीएकटेपणाची भावना हि एक कल्पना आहे आणि खर प्रेम ? ते कोणी करतच नाही. सेक्स या एका गोष्टीसाठी लोक प्रेम करतात. खायला लागत म्हणून भाजी मंडईत जाऊन ती विकत घ्यायची. ती घरी जपून आणायची. त्याला शिजवून मीठ-मसाला घालून भाजी करायची. आणि मग त्याला खायचं. पुढे काय ? काहीच नाही. मला तू आवडतेस. मग एकमेकांची सवय एकमेकांना सवय लागते. मग एकमेकांच्या मनातून मन कधी साथीदाराच्या शरीराकडे आकर्षित होत कळत नाही. आणि मग किस, मिठी करत करत सुरुवातीला चेहऱ्यावरून कपड्याकडे बघताना कधी ते कपडे अंगावरचे उतरतले जातात कळत नाही. आणि होतो सेक्स. खरच का हे प्रेम ? म्हणजे सेक्स म्हणजेच जर का प्रेम असेल तर मी ऐकल होत ते पवित्र, शुध्द, सुंदर अस हे प्रेम नाहीच. मग ती प्रेमाची केलेली व्याख्या काल्पनिक आहे कि सत्य ? कळायला काही मार्गच नाही.  अस वाटत प्रेम कराव पण एकतर्फी. त्यात जितकी ताकद, खरेपणा आणि त्याग आहे तो दुतर्फी प्रेमात सापडत नाही. कित्येक अशा जोड्यांना बघितल कि प्रेमात त्यांच्या काही मोजकेच क्षण मिळतात. पहिल्यांदा बघन, बोलन, भेटन मग भेटतच जाण मग किस करायचं मग मिठी आणि मग सेक्स. आणि पुढे ? सेक्सवर सेक्स. गर्भपात आणि मग एकमेकांची किळस यायला लागली कि दूर व्हायचं. आणि एकमेकांची बदनामी करत प्रेमाला हि बदनाम करायचं. जे प्रेम महादेवाने सतीवर, श्री कृष्णाने केल होत राधीकेवर, रामाने सीतेसोबत, रांझाने हिर सोबत ज्यांनी प्रेमात आपल आख्ख आयुष्य पणाला लाऊन पुढच्या पिढीला प्रेमाचा अर्थ आणि आदर्श दिला त्याच प्रेमाला आपण हि करून प्रेम फक्त शरीराची गरज भागवण्यासाठी करतो ? आणि तसच हव असेल प्रेम तर ते कोठ्यावर मिळतच कि, शे-दोनशे रुपयाला.
प्रेम हे मानसिक आधारासाठी केल जात. पण नाही इथे लोकांची मानसिकताच इतकी नीच झालीय कि, प्रेमाने आता प्रत्येकाच्या मनात एकदम निच ( खालची ) जागा घेतली आहे.  बाकी मग अस वाटत प्रेम कराव एकतर्फीच..... 

Copyrighted@2019

0 टिप्पण्या