Virtual Love


आजकाल प्रेमाची व्याख्या बदलून गेली आहे. मनावर केलेल्या मायेला प्रेम म्हंटल जायचं पण नंतर मनावर माया करता करता मनावरचा ताबा सुटून नंतर शरीरासोबत जे काही केल गेल त्याला प्रेम म्हणायची रीत सुरु झाली. त्या प्रेमाला बेडवर असे पर्यंत त्याचा अनुभव घेऊन त्यानंतर कित्येक दिवस-रात्री त्या घेतलेल्या अनुभवाच्या विचारात रमून जायची पध्दत रूढ झाली. जे प्रेम नशिबात हव अशी अपेक्षा ठेवत होते ते अशा प्रेमाला मिळवण्याचा हट्ट करायला लागले. सुरुवातीचे हे साधे हट्ट नंतर पेटून उठायला लागले. आपल आयुष्य हे जन्माला येऊन शिक्षण घेऊन त्या आधारे नोकरी करून मग नंतर लग्न करून मुलबाळ झाली कि संसारात रमून मग मरून जायचं. इतकस छोट आयुष्य असल तरी त्यात कित्येक क्षण जगावे लागतात. पण जेव्हा पासून मनाच प्रेम शरीरावर व्हायला सुरु झाल तेव्हापासून माणसाच्या डोक्यात हे शारीरिक प्रेम अति जास्त डोक्यात शिरत गेल. अलीकडे इंटरनेटचा वापर वाढत गेला आणि एकमेकांशी बोलायची सवय कुठेतरी कमी होत गेली. मनावरच प्रेम शरीरावर आल खर. पण इंटरनेटच्या या युगात बोलकेपणा आणि आपलेपणा कुठेतरी प्रत्येकातून हरवत गेलाय. आणि म्हणूनच अगदी नवरा बायको जरी एकमेकांसोबत समागम करून अलग झाले तरी त्या वेळात ते एकमेकांचे नसतातच. 

तिच्या मनात असतात बरेच विचार. त्याच्या मनात असतात बरेच विचार. यात प्रेम कुठेच नसत. आपलेपणा कुठेच नसतो. एकमेकांच्या कुशीतले ते दोघे शरीराने जवळ बिलगून असले तरी मन मात्र त्यांच खूप खूप दूर असत. इंटरनेटमुळे कुठून हि कुठेही पोहोचता येत. बोलता येत. अशात वेगवेगळ्या सोशल साईटमुळे अनोळखी लोकांशी ओळख वाढत जाते. आपल्या जवळच्याशी बोलून व्यक्त व्हायला कुठेतरी मन कचरत. आणि मग कुणा अनोळख्याशी तरी संवाद साधून मनातल सगळ काही बोलून आनंद मिळवणारे खूप आहेत सध्या. स्त्रिया शोधत असतात कित्येक असे पुरुष जे त्यांना समजून घेतील. जे त्यांना वेळ देतील. आणि पुरुष शोधत असतात अशा स्त्रिया ज्या त्यांच्यासाठी काहीही करतील निदान व्हिडिओ कॉलवर तरी. अशा सगळ्या आभासी जगात जगणारे आभासी अस प्रेम हि करून बसतात. म्हणजे पहिल्या आय लव्ह यु पासून सुरु झालेलं हे प्रेम, ऑनलाइन भावना व्यक्त करून आपापल्या घरी बेडवर झोपून समागमाचा अनुभव घेऊन एकमेकांप्रती वाढलेले प्रेम हि व्यक्त आणि वर सिध्द हि करत असतात. अशा या प्रेमाला खऱ्याचा जरा हि गंध नसतो. अशा या प्रेमात जे काही सगळ होत असत ते खऱ्या आयुष्यात आपल्या बायको किंवा नवऱ्यासोबत घडत नसत. याची खंत असते. जगातले प्रत्येक देश केव्हाच स्वतंत्र झालेत पण इंटरनेटमुळे व्यक्तिगत स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे. ज्याचा फायदा सगळेच घेताना दिसतात. 

माणूस म्हंटल कि त्याची आवड-निवड हि अलग असू शकते. असलेली आवड पुढे बदलू हि शकते. स्त्रीने लावलेलं नवऱ्याच नाव ती सोडून टाकत नाहीच. पण म्हणून ऑनलाईन सुरु असलेल्या प्रेमप्रकरणात ती नसते असहि नाही. तसच पुरुषाने प्रत्यक्ष जाऊन त्या स्त्रीशी समागम केला नसला तरी पुढची स्त्री त्याला आपल सगळ काही मानायला तयार होत असते. आभासी हि दुनिया आधी नव्हतीच खरी. पण ती आता खऱ्या दुनियेपेक्षा खरी होत चालली आहे. सकाळचा गुड मोर्निंग ते रात्रीचा गुड नाईट आणि मधल्या वेळातले कित्येक सारे मेसेज, फोटो, व्हिडिओ कॉल होऊन जातात कि एवढ्या सगळ्या वेळातला नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला थोडा हि वेळ देऊ शकत नाही. आणि दिला तरी तो मनापासून असेलच अस नाही. आभासी दुनियेत असे कित्येक प्रेमी युगुल जीवाच रान करून आपल हे आभासी प्रेम टिकवण्याच्या आणि वाढवण्याच्या नादात खऱ्या आयुष्यातल्या प्रेमाला आणि नात्याला कुठेतरी विसरत जात आहे. हे लक्षात न येणारी लोक हि खूप आहेत. 

सध्या आभासी हे अस प्रेम प्रकरण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सुरु आहे. आणि त्यात वावग काही आहे अस मला वाटत नाही. कारण जगासोबत चालताना आपण मागेच राहिलो तर कस बर चालेल ? आणि जगासोबत चालताना कुणी आपल्याला नावे ठेवली तर आपण लाजायचे का ? कारण आपल्याला बोलणारा हि तेच करत आहे.

पण एक मात्र नक्की, ह्या आभासी प्रेमाला खऱ्या प्रेमाची जरा हि सर नाही. हे नक्की आहे.       copyrighted@2020  

 

0 टिप्पण्या