True Love


कधी कधी आजूबाजूला दिसायचा तो. तो फक्त मलाच बघायचा. हे मला जाणवत होत. कळत होत. पण प्रेम या गोष्टीपासून मीच लांब राहिलेले. एकदा मला त्याने रस्त्यात अडवलं. आणि त्याच्या मनातलं मला अगदी कळवळून सांगितलं. त्याचे डोळे आणि तो आवाज ऐकून मला त्याच्या डोळ्यात माझ्यासाठीच प्रेम दिसलं. मी विचार केला नाही. मी होकार दिला. पण प्रेम म्हणजे काय किंवा ते करतात कस. निभावतात कस काहीच माहिती नव्हती मला. ती जबाबदारी त्याने घ्यायची ठरवली. एकमेकांना नंबर देऊन झाले. मोबाईलवर बोलणं सुरु झालं. मी सकाळी इंटरनेट सुरु केलं तर सगळ्यात आधी त्याचा गुड मॉर्निंगचा मेसेज असायचा. उठलीस का, काय करतेस, आवरलस का, जेवणार कधी, तुझी आठवणी येतेय आय लव्ह यु सारखे मेसेज त्याचे मला खूप आवडायला लागले. प्रत्येक गोष्टीला माझ्यासोबत आहे तो माझ्या अशी जाणीव मला व्हायला लागली. दोन चार वाक्य झालं कि आय लव्ह यु आणि आय मिस यु म्हणून मला त्याच्या प्रेमाने त्याच्या जवळ ओढत होता. मला हि ते आवडत होत. मी वहावत गेले. त्याने एकदा मग मला भेटायला बोलवलं. आधी खूप वेळ आम्ही बाहेर फिरलो. मी त्याला विचारलं नाही आपण आता कुठे आहोत कुठे चाललोय. मी फक्त त्याच्यासोबत ते क्षण जगत होते.  गाडीवर तो आणि मी होतो. आणि गाडी एका अपार्टमेंटपाशी थांबली.
मला उतरायला सांगून त्याने तो हि उतरला. मी त्याच्या मागे त्या अपार्टमेंटमध्ये गेले. पायऱ्या चढून एका घरात गेले. घरात कुणी नव्हतं. मी बेडवर बसलेले. तो माझ्या शेजारी येऊन बसला. माझ्याकडे बघत माझा हात हातात घेतला. मग खांद्यावर हात ठेवून हात जर वर सकरवत, माझ्या गालाला धरून माझं तोंड त्याच्याकडे फिरवून त्याने मला किस केलं. मी पहिल्यांदाच हे सगळं करत होते. हे सगळं आवडण्यापेक्षा भीती वाटत होती. त्याहून जास्त डोळ्यासमोरून आई बाबांचे चेहरे फिरायला लागले. मी लांब झाले. पण त्याने मला जवळ ओढून पुन्हा जवळ घेतलं. माझ्यावर विश्वास ठेव. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तू आत्ता नाही जवळ आलीस तर मी समजेन तुझं माझ्यावर प्रेमच नाही. अस बोलल्यावर मला त्याच वाईट वाटलं. आणि मी माझ्या छातीवरची ओढणी बाजूला केली.त्या नंतर असच कित्येकदा आम्ही जवळ आलो. फक्त खऱ प्रेम होत म्हणून. सुरुवातीला मला न्यायला यायचा. मी घरात जाईपर्यंत मला बघत बसायचा. मग गाडी सुरु करून निघून जायचा. कधी काय खाऊ वाटलं म्हंटल तर लगेच गाडी घेऊन दारात हजर व्हायचा आणि मला ते आणून द्यायचा. माझ्या मैत्रिणींना माहित होता तो. आणि त्यांना हि कौतुक वाटायचं त्याच. मी हि खूप खुश होते. कारण तो इतकं माझ्यासाठी करायचा. माझ्यावर इतका जीव लावायचा. पण नंतर नंतर त्याच्यात बदल होता गेला. मी त्याला माझा समजत गेले आणि तो मला गृहीत धरायला लागला. मला न्यायला येणारा आता मला मेसेज करून ठिकाण सांगून बोलवायला लागला. मला सोडायला यायचा पण गाडीवरून उतरले मी कि, बाय म्हणून निघून जायचा. आधीपेक्षा जास्त आता बिझी व्हायला लागला. प्रेम मागणारा जबरदस्ती करायला लागला. कधी माझी इच्छा नसलि तर माझ्यावर हात उचलायचा. मी सहन करत गेले कारण या सगळ्या वागण्याला तो खर प्रेम म्हणायचा. 
त्या नंतर आमच्यात फक्त प्रेम करणारी मी होते. आणि प्रेम मिळवणारा फक्त तो. ऐकणार मी होते सांगणारा तो. मार खाणारी मी होते अन मार देऊन पुरुषार्थ दाखवणारा तो होता. मी सहन करत गेले. अशात मला दिवस गेले. म्हणून मी त्याला सांगितलं. त्याने मला भेटायला बोलावलं. मी गेले. त्याने माझ्या हातात गोळ्यांचा पाकीट दिल. आणि सांगितलं या खा. मूल बाळ वाढवायची हि वेळ नाही. आपण आधी लग्न करू मग बाळाचा विचार करू. मी लग्नासाठी तयार झाले. मी  त्याच्या मागे सतत लग्नासाठी मागणी घालत गेले. आणि त्याने माझा नम्बर ब्लॉक केला.
आज तीन वर्ष झाले. समोर दिसतो तरी ओळख दाखवत नाही. कुणाकुणासोबत फिरतो. मला बघतो आणि पुढे गाडी नेतो.
शेवटी त्याने केलेला मेसेज मी विसरली नाही.
" प्रेमात अस लांब व्हावंच लागेलं. जे प्रेम खर असत त्यात लांबच व्हावं लागत. आणि मला सिद्ध करावंच लागेल कि आपलं प्रेम खर आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण खऱ्या प्रेमाला भविष्य नसत आपल्यात जे झालं ते सगळं विसरून जा."
त्या नंतर मग मीही कोणासोबत बोलले नाही. प्रत्येक मुलगा असाच असतो असा माझा समज झाला. शेवटी एक समजलं प्रेम म्हणजे सेक्सकरण्यासाठी केलेला एक बनाव. ज्याला खर प्रेम म्हणत सिद्ध करायचं. सवय लावायची, जीव लावायचा, वेळ घालवायचा, आणि सेक्स करून लांब व्हायचं. खर प्रेम होत म्हणून.

Copyrighted@2020

0 टिप्पण्या