लाईफ फक्स मी | life FUCKS me

starry night painting, vincent van gogh, van gogh life story, van gogh famous painting, van gogh bio, van gogh wiki, vangogh lust for life,
( The Starry Night-june 1889 by vincent van gogh )
भाग ०१
तुरुंगात कुबट वास येत होता. बाजूला दोन गुन्हेगार शांत बसून होते. व्हान स्वतःच्या विचारात रमलेला. तुरुंगाच्या दरवाजाच्या सळीवर दांडक वाजवल गेल. तिघे बघायला लागले.
पोलीस : व्हान डॉक्टर ‘रे’ आलेत. पण जास्त बोलायचं नाही पाच मिनिट फक्त, आणि जे बोलशील ते मोठ्याने बोलायचं. मला ऐकायला आल पाहिजे.
व्हान उठून दरवाजाच्या सळ्यांना धरून थांबला. या आधी व्हानने खूप वेळा त्या पोलिसाला कागद आणि पेन्सिल मागितलेली, त्याला तेओची आठवण येत होती. पण त्याला कागद मिळाला नाही, पेन्सील मिळाली नाही. डॉक्टर ‘रे’ ना भेटायची इच्छा हि त्याने ऐकून दाखवलेली. पण त्याला एका वेळेच्या घाणेरड्या जेवणाशिवाय काहीच नाही मिळाल. पण ‘रे’ ना कुठून तरी समजल व्हानला अटक केलीय. आणि ते पोलीस स्टेशनला आले.
रे आत आले. पोलीस तिथेच टंगळमंगळ करत उभा होता.
रे : कसा आहेस व्हान ?
व्हान : ठीक नाही.
रे : काय केलस तू ? तुझ्या विरोधात नव्वद लोकांच्या तक्रारीच्या कागदावर सह्या आहेत. आणि पोलीस तुला आता इथून इतक्यात सोडतील अस मला वाटत नाही. मी आता इथून जाऊन तेओला पत्र लिहितो आणि त्याला बोलावून घेतो. बघू पैसे भरून तुला सोडवता येत का ? किंवा मग वकील लावू.
व्हान : माझी शप्पथ आहे तुम्हाला डॉक्टर. तेओ आता लग्न करणार आहे. त्याच्या आनंदाला माझ गालबोट नको. मी खूप त्रास दिलाय त्याला, आता अजून त्रास नको. तुम्हाला वाटत असेल मी इथून सुटाव तर तुम्हीच मला मदत करा नाहीतर मी इथेच मरायला तयार आहे. काय फार तर माझ आयुष्य अजून वीस वर्ष असेल तर मी एक दोन वर्षात इथे मरून जाईन. बाकी काही नाही.
रे : अरे अस काय बोलतोयस तू व्हान. मी आहे ना ? तुला आता इथून सोडवण मुश्कील आहे. कारण त्या नव्वद लोकांनी तुला वेडा म्हणवून तुझ्यापासून त्यांना धोका आहे अस त्या कागदी अर्जात नमूद केलय.
व्हान : मी वेडा नाहीये डॉक्टर.
रे : मला माहित आहे व्हान.
व्हान : मग आत ?
रे : ‘सैं पोल दी मोसोल.’
व्हान : हे काय आहे ?
रे : तुला उपचार केंद्राची गरज आहे व्हान.


व्हान : डॉक्टर, मी तुम्हाला मदत मागतोय आणि तुम्हीच मला वेडा मानताय ? अहो मी वेडा नाहीये. ‘लामारतीन चौकात’ लोक, लहान पोर-मुल घराच्या खाली गोळा झाले आणि माझ्या खिडकीवर दगड फेकून मारत होते. माझी चेष्टा करत होते. माझ्यावर घाणेरड्या कविता बनवून मोठ्याने एकमेकांना ऐकवत होते आणि हसत होते. मी खिडकीतून त्यांना हटकवल पण त्यांनी माझ्या अंगावर दगडी फेकून मारली.
पोलीस : त्याच काही ऐकू नका डॉक्टर, एक खूण नाही त्याच्या अंगावर लागलेली.
व्हान : मी खरच सांगतोय डॉक्टर, ते ऐकेनासे झाले म्हणून मग मी खोलीतल्या वस्तू त्यांना फेकून मारायला लागलो. माझे ब्रश, मग फुलदाण्या आणि शेवटी खुर्ची, स्टूल आणि लाकडी फळ्या. तेव्हा ती लोक पळून गेली.
पोलीस : एवढ टाकल्यावर दमला असशील ना ? म्हणून झोपलेला खिडकीत.
व्हान : मी झोपलो नव्हतो. मला चक्कर आलेली.
पोलीस : रे साहेब, तुम्ही आता येऊ शकता. वेड्यांसाठी आम्ही जास्त वेळ देत नाही.
रे : व्हान काळजी घे, मी उद्या येतो.
व्हान : मी तयार आहे ‘दी मोसोलला’ जायला. बस इथून सोडवा मला.
रे : इथून पंचवीस किलोमीटरच आहे ते केंद्र. ‘सें रेमीला’. आपण उद्या जाऊ.
पोलीस : याला आधी सिध्द कराव लागेल कि हा खरच वेडा आहे.
रे : व्हान वेडा नाही. त्याला फक्त उपचाराची गरज आहे.
पोलीस : फक्त उपचारासाठी इथून कुणाला हि आम्ही सोडत नाही.
रे : मी कायद्याने त्याला उद्या इथून घेऊन जाईन. अशा आहे तुम्ही सहकार्य कराल.
पोलीस : नक्की. कारण हे पोलीस स्टेशन आहे. वेड्यांचा दवाखाना नाही.
आणि तो हसत टेबलापाशी जाऊन ग्लासातल पाणी प्यायला लागतो. व्हान मागे वळून भिंतीकडे एकटक बघत उभा राहतो. रे त्याला पाठमोर बघून बाहेर निघून जातात.
( Wheatfield with Crows-1890 by vincent van gogh )
भाग ०२
दुसऱ्या दिवशी सकाळी रे मुख्य पोलीस अधिकाऱ्याशी बातचीत करतात आणि सगळी परिस्थिती ऐकवतात. ते पोलीस व्हानला सोडण्याची परवनागी देतात. व्हान आणि डॉक्टर रे दोघे स्टेशनपर्यंत चालत जातात. तिथून गाडी पकडून ते ‘सैं रेमिला’ निघाले. व्हान शांत बसून होता. त्याच्या डोक्यात बरेच विचार त्याला त्रास देत होते. त्याला अती विचाराने त्रास होत असल्याचा प्राथमिक अंदाज रे यांचा होता. म्हणून त्याला त्यांनी बोलत केल.
रे : त्या पोलिसांना बरीच विनवणी केली तेव्हा त्यांनी तुला सोडण्याची परवानगी दिली व्हान.
व्हान : काय सांगून सोडवलत तुम्ही मला ?
रे : त्या लोकांनी मानसिक छळ केला तुझा. आणि तुझ्या जीवाशी आल तेव्हा तू त्याला प्रतिक्रिया दिलीस. हे सगळ पटवून दिल आणि मग त्यांना ते मान्य झाल.
व्हान : मी जिथे जातोय त्याबद्दल तेओला मला सांगावस वाटतय. त्याला काळजी लागून राहील नाहीतर.
रे : त्याला मी पत्र पाठवल आहे आणि सोबत शंभर फ्रांक्स मागितले आहेत. तू जिथे उपचार घेशील ते एक मोकळ वातावरण असलेल उपचार केंद्र आहे. तिथे तू वर्षभर राहशील तर आत्ता पेक्षा खूप वेगळा असशील. तुझ्या डोक्यात कसले हि विचार येणार नाहीत आणि तुला कसा हि त्रास होणार नाही. तुझी चीड चीड का होतेय याची चाचणी डॉक्टर पेरो घेतील. ते माझे फार जुने आणि खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी तू नीट वागशील अशी अपेक्षा आहे.

व्हान : जी गोष्ट मिळत नाही ती मिळाली तर माझी हरकत काहीच नसेल.
रे : अशी कोणती गोष्ट आहे जी तुला मिळत नाहीये ?
व्हान : प्रेम.
रे : ते तुझी तेओ सारखीच काळजी घेतील.
गाडी उपचार केंद्राच्या दारात उभारली. मोठ्या दरवाजाजवळ डॉक्टर पेरो उभे होते.

गाडीवाला : आला तुमचा वेड्यांचा दवाखाना. दोन फ्रांक्स झाले माझे.
व्हान रें कडे बघतो. रे पैसे गाडीवाल्याला देतात. पेरो पुढे चालत येतात.
पेरो : तुमचीच वाट बघत होतो डॉक्टर. आता दरवाजा बंद होईल. पण तुम्ही येणार म्हणून स्वतः मीच आज दरवाजा बंद करायला बाहेर आलो. कसे आहात ?
रे : मी अगदी उत्तम. हा माझा खास मित्र. व्हिंसेंट व्हान गॉग. तुम्ही याची आपुलकीने काळजी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. याच्या भावाकडून पैसे मिळाले कि लगेच तुम्हाला पोहोचते करतो. आणि हो व्हान, मी मला वेळ मिळेल तसा तुला भेटायला येईन. आणि या वर्षाच्या शेवटी तू मला बरा झालेला दिसला पाहिजेस.
व्हान : हो. पण एक विचारायचं होत मला.
पेरो : हो बोल व्हान. मी हि तुझा आता मित्रच आहे अस समज.
व्हान : मला पेंटिंग करता येईल का इथे ?  
पेरो : का नाही ? तुला हव ते करू शकतोस तू इथे फक्त ज्यातून तुला त्रास होईल अस करायला बंधन असेल.
व्हान : मला पेंटिंग करायला मिळाल नाही तर त्रास होतो.
पेरो : मग तर नक्की कर तू पेंटिंग. बर आत जायचं का ? कारण आता चर्चमध्ये प्रार्थना सुरु होईल आणि दरवाजा बंद करावा लागेल.
व्हान : हो.
रे : हो मी निघतो. उशीर झाला आहे. मला अजून दुसरी गाडी पकडायची आहे.
पेरो : हो. भेटू पुन्हा.
रे : हो नक्की, व्हान काळजी घे रे.
दरवाजा बंद झाला. व्हान आणि पेरो आत आले. रे चालत निघून गेले.
व्हानला त्याची खोली दाखवली गेली. खोलीत छोटे छोटे बेड होते. प्रत्येक बेडच्या बाजूला पडदे सोडलेले. एकच खिडकी त्यातून येणारा कमी प्रकाश आणि खोलीतला कुबट वासाने व्हानला कस तरी व्हायला लागला. एक मोकळा बेड होता तिथे व्हान बसतो. सोबत आणलेले थोडे कपडे तो बेडवर उशाशी ठेवून टाकतो. खोलीतल्या लोकांचा विचित्र अवतार आणि वेडचटपणा बघत व्हान बेडवर बसून असतो. त्याला तेओची आठवण येते. तेवढ्यात दरवाजावर एक माणूस येतो.
माणूस : व्हान गॉग, डॉक्टरांनी तुला भेटायला लगेच बोलावल आहे.
व्हान : हो. आलोच.
व्हान उठला आणि बाहेर जायला निघाला. दारात त्या माणसाने त्याला अडवल.
माणूस : इथले नियम पाळावे लागतील तुला वेड्या, समजल का. अति शहाणपणा दाखवायचा नाही.
त्याने व्हानच्या हाताला दोरी बांधली. आणि गुन्हेगारासारख त्याला घेऊन तो माणूस पेरोंच्या खोलीत घेऊन गेला. पेरो सिगरेट ओढत होते. व्हानला बघून त्यांनी त्याला खुर्चीवर बसायला खुणावल. व्हान बसला. 
( The Sower-1880 by Vincent Van Gogh )
भाग ०३
पेरो सिगरेटचा धूर सोडत बोलायला लागतात.
पेरो : डॉक्टर रे मला सगळ सांगून बसलेत तुझ्याबद्दल. पण तुला वेड लागलेलं नाहीये अस मला त्यातून समजल आहे. तू वेडा नाहीस पण तुला कसला तरी मानसिक त्रास आहे. आणि तो त्रास कोणत्या तरी विचाराने होतोय. मी बरोबर बोलतोय ना ?
व्हान : हो. सगळ्या गोष्टींचा विचार येतो जातो पण तिचा येतो आणि लवकर जात नाही. डोक्यातून कळ येत राहते. जोरात ओरडू वाटत. जोरात पळू वाटत. स्वतःला मारून घेऊ वाटत. ती विचारात आली कि काही काम करू वाटत नाही. पेंटिंग करताना लक्ष लागत नाही.
पेरो : ती कोण ?
व्हान : के.
पेरो : के..... तुझी बायको ? कि प्रियासी ?
व्हान : कोणीच नाही.
पेरो : मग ? तिच्यामुळे तुला त्रास होतो.... का ?
पेरो त्यला सिगरेट देतात. व्हान हातात सिगरेट घेतो. पेरो खुर्चीवरून उठतात आणि त्याच्या खुर्चीमागे येऊन उभे राहतात. व्हान सिगरेट ओठात ठेवून धूर आत घेतो. पेरो त्याकडून सिगरेट घेतात आणि व्हान तोंडातून धूर सोडतो.
संध्याकाळी,
व्हानची आई जेवण वाढवून टेबलावर ठेवत होती. व्हान मातीत भरलेलं बूट आणि रंगात भरलेले हात घेऊन तसाच टेबलाजवळच्या खुर्चीवर बसला. आई ओरडली तसा तो उठून हात पाय धुवून पुन्हा टेबलापाशी आला. वडील अजून यायचे होते.
आई : तूच आधी जेवणार का ? पाहुणे आलेत त्यांना पण बोलाव जा.
व्हान : कोण पाहुणे ?
आई : तुझी बहिण आलीय व्हान.

व्हान : कोण ?
आई : के. के आलीय मगाशी. जान सोबत.
व्हान घाईत आतल्या खोलत गेला. जान एकटा खेळत बसलेला. के एका खुर्चीवर बसलेली. व्हानला घाईत आलेल बघून ती जागची उठली.
के : कधी आलास तू व्हान ?
व्हान : आत्ताच.
के : मी खूप वाट बघितली दुपार पासून तुझी. मला वाटल होत तू दुसरीकडे असशील. पण आई बोलल्या तू इथेच आहेस. बर वाटल तुला बघून. पण तुझ्यात जराही बदल झालेला नाहीये. जसा तू आधी होतास तसाच दिसतो आहेस.
व्हान : मला बदलायला आवडत नाही. स्वतःसाठी बदल माणसाने का करावा ? जगात जेवढे काही बदल होतात ते दुसऱ्यासाठी झालेले किंवा केलेलं असतात.
के : तू चर्चमध्ये व्याख्यान द्यायचं सोडल तरी तुझ्यावर अध्यात्मिक विचाराची पकड दिसून येतेय. हि चांगली गोष्ट आहे. किमान तुझ दिसण नाही निदान बोलण आणि विचार तरी नक्कीच बदलेले आहेत व्हान. खूप छान वाटल खरच तुला भेटून.
व्हान : मला हि तुझ्यापेक्षा जास्त आनंद झालाय. तुला जर आवडणार असेल तर तू माझ्यासोबत पेंटिंग काढायला माझ्यासोबत रोज शेतात येऊ शकतेस. मी पेंटिंग करेन आणि तू सोबत बस. व्होची आठवण तुला येणार नाही. नक्कीच इतकी तरी मी तुझी काळजी घेऊ शकतो.
के : व्हो च्या आठवणीतून तू मला बाहेर काढायला मदत करतोयस हेच ऐकून मला बर वाटल. मी येईन तुझ्यासोबत. मला तुझी सोबत दे.
व्हान : नक्की.
के : आपली चांगली मैत्री झाली तर आपल्यात बोलण वाढेल आणि मी निश्चित माझ्या नवऱ्याला विसरू शकेन.
व्हान : अर्थातच, जुन्या गोष्टींना विसरण्यासाठी नव्या गोष्टी या जगाव्या लागतातच. नव्या गोष्टी या जुन्या आठवणींवर ठोस इलाज करू शकतात.
के : पटतय मला तुझ व्हान.
व्हान : चल आपण बाहेर जाता. जेवून घेऊयात आपण.
के : हो. तू पुढे हो. मी जानला घेऊन येते.
व्हान जानला उचलून घेतो आणि के कडे बघून गालात हसतो. जानला घेऊन तो बाहेरच्या खोलीत आला. के मागून काहीच वेळात बाहेर आली. सगळे मिळून जेवायला बसले.
जेवताना के आणि व्हान समोरासमोर बसलेले.
आई : व्हान, पोटभर जेव आणि तुझ्या बहिणीला पण विचार काय हव-नको.
के व्हान कडे बघते. आणि व्हान नजर दुसरीकडे फिरवून आईशी बोलायला लागतो,
व्हान : आई, मी उद्या शेतात पेंटिंग करायला जाईन तेव्हा सोबत जान आणि के ला घेऊन जाईन. जानला मोकळ्या वातावरणात खेळायला मिळेल. आणि के ला हि बर वाटेल.
आई : के, तुला जायची इच्छा आहे का ? कारण चित्रातल तुला काय समजणार. उलट तू इथे थांबलीस माझ्यासोबत तर तुला करमेल.
के व्हान कडे बघते. त्याच्या डोळ्यात तिला जाणवलेला आपलेपणा तिला बोलत करून सोडतो.
के : अस काही नाही, व्हो असताना आमच्या घरी त्यांचे खूप चित्रकार मित्र यायचे. त्यातल्या कित्येक चित्रकारांची चित्र व्हो ने विकत घेतली होती. त्यामुळे चित्र ओळखण आता जमत मला. चित्र समजतात मला. आणि व्हानची चित्रकला आता सुधारली असेल इतक्या वर्षात त्यामुळे मला आवडेल त्याला पेंटिंग करताना बघून.
आई : तुला चालत असेल तर नक्की जा तू.
व्हान : मी काळजी घेईन जानची. आणि के ची सुध्दा.
आई : मग काही हरकत नाही. मी तुम्हाला डबा बनवून देईन सकाळी. तो घेऊन जा. अंधार व्हायच्या आधी परत घरी या. आणि व्हान तू मोठा आहेस. तर तू या दोघांची काळजी घेतली पाहिजेस. धांदरटपणा अजिबात करू नकोस.
व्हान : हो आई. मी घेईन काळजी के ची.
सगळे पुढे जेवायला लागेल. दुसऱ्यादिवशी सकाळी पांढरा ड्रेस घालून केस व्यवस्थित वर बांधून के जान सोबत व्हानची वाट बघत बसलेली. व्हान पेंटिंगच सगळ सामान घेऊन आला. के ला बघून दोन मिनिट तिथेच तिच्याकडे बघत उभा राहिला. के ला ते समजल तेव्हा तिने त्याची नजर तोडत त्याला हातातला डबा दाखवला.
के : आईनी डबा दिला आहे आपल्यासाठी.
व्हान : अ...हा.. दे मी धरतो.
के : नको तुझ्याकडे खूप सामान आहे.
तू मी अस करत शेवटी व्हान ने तिच्याकडून डबा घेतलाच आणि सगळ सामान एकट्याने घेऊन व्हान हळू पावलांनी चालत होता. के जानला कडेवर घेऊन त्याच्यासोबत रस्त्याने चालत होती. दोघहि शांतच होते.  
( The Potato Eaters-13april1885-by Vincent Van Gogh )
भाग ०४
बरच चालल्यानंतर व्हानला तहान लागली. व्हान थकून एका जागी उभा राहतो. त्याला घाम आलेला बघून के पटकन त्याच्या मागे जाऊन सामानातून पाणी काढून त्याला प्यायला देते. व्हानला तीच अस प्रेमळ वागण आवडल. पुढे थोड अजून चालत गेल्यावर एक मोठ शेत लागल. व्हान तिथेच थांबायचा विचार करतो. पण तिथे काही अंतरावर काही शेतकरी शेतात काम करत होते. ते लांब असले तरी त्यांना के, जान, आणि व्हान दिसणार होते. व्हानला आजूबाजूला कोणी नको होत. तो पुन्हा पुढे गेला, आणि एक शेत लागल. व्हान सगळ समान तिथेच खाली उतरवतो, आणि पेंटिंग करायला सुरुवात करतो. के त्याच पेंटिंग करण बघत होती. जान तिथेच बाजूला खाली पडलेल्या फुलांसोबत खेळत बसलेला. के व्हानच्या पेंटिंगला बघत असली तरी तिच्या डोक्यात व्होच्या काही आठवणी येत होत्या. लग्न व्हायच्या वेळी तो आधी घरी येत जात होता. तेव्हा त्याने कित्येकदा तिला सुखात ठेवण्याची, सोबत आयुष्यभर राहण्याची वचन अगदी सहज दिलेली. पण तस झाल नाही. तो अचानक गेला. सगळी वचन संपली. आयुष्य विस्कटल गेल. आणि सोबत जानची जबाबदारी अंगावर आली. जानकडे बघून तिच आयुष्य जगण सुरु होत. पण खरच व्हो जाऊन एक वर्ष होत आलेला, आणि इतक्या दिवसात के कधीच खुश नव्हती जितकी ती कालपासून होती. कुणीतरी तिच्यासोबत होत या विचाराने तिला बर वाटत होत. व्हान तसा विक्षिप्त आहे हे तिला माहित होत. तो वेड्यासारख वागतो हे हि तिला माहित होत. पण त्याच्यात झालेला हा बदल तिला खूप बरा वाटत होता.
दुपार झाली. जान केव्हाच खेळून झोपलेला. के व्हानला जेवायला बोलावते. व्हानच्या आईने दिलेला डबा काढून ती त्याला जेवण वाढते. व्हान तिच्याकडे बघत जेवत होता. के मात्र तिच्याच विचारात हरवून जेवत होती. व्हानला विचार यायला लागले, ‘माझी बायको अशीच असणार. जी इतकी सुंदर असेल. जी माझी काळजी घेईल. माझ्यासाठी आवडीच जेवण बनवेल. मला जेवण वाढेल. कधी कधी घास भरवेल. माझ्यावर जीवापाड प्रेम करेल. माझ्या चित्रांवर प्रेम करेल. मला समजून घेईल हो.... अशीच हवी मला माझी बायको. अशीच पेक्षा हीच झाली तर ? के योग्य आहे माझ्यासाठी. तिच्या जानला मी आवडतो. त्यामुळे तो माझा बाप म्हणून स्वीकार करेल. आणि अजून त्याला नीट बोलता हि येत नाही. त्याला कळणार हि नाही मोठ झाल्यावर त्याचा खरा बाप कोण आहे. आणि के ? तिच्यावर तर मी इतक प्रेम करेन कि ते तिने तिच्या विचारात पण एवढ्या प्रेमाचा विचार केला नसेल. खूप सुखी ठेवेन मी. खूप पेंटिंग करेन. माझी पेंटिंग विकली गेली नाही तर मी माझी शैली बदलेन. जी सध्या विकली जातात तशी चित्र करेन आणि विकेन. के साठी मी वाट्टेल ते करीन.’ असा काही विचार डोक्यात सुरु असताना के बोलली,
के : दोन वर्षापूर्वी आम्ही अशाच एका शेतात फिरायला गेलेलो. व्हो खूप खुश होता त्याने माझ्याशी खूप गप्पा मारल्या. आणि आम्ही पुन्हा तिथे जायचं ठरवल पण पुन्हा जाणं जमलच नाही. आणि आता तर शक्यच नाही.
व्हान : पण आपण आलोच कि आणि आजच नाही रोज म्हंटल तरी जमेल कारण मी शेत, शेतात काम करणारे शेतकरी असलीच चित्र करतो. त्यामुळे तुला करमेल.
के : हो. तू अजून कसली-कसली चित्र करतोस ?
व्हान : मला शेत आणि शेतकरी करायला आवडतात. त्यांचा जो अंदाज असतो शेतात काम करतानाचा तो मला आवडतो. मला माझी वेगळी शैली करायचीय आणि त्यासाठी मी हा विषय निवडला आहे.
के : खूप चांगला विचार आहे.
व्हान : तू बघशीलच माझी पेंटिंग आणि तुला इथला निसर्ग हि आवडेल के.  
के : तू म्हणतोस तर आवडेल मला. आणि मला आवडेल यायला तुझ्यासोबत. व्हो ची आठवण येत राहील पण मन रमवण्यासाठी मी तुझ्यासोबत येत राहीन.
व्हान जागचा उठला. त्याने जेवणाचा डबा पायाने उडवला. केसातून जोरात हात फिरवला.
व्हान : तो मेला ना ? त्याची सारखी का आठवण येते ? मेली ती व्यक्ती. तिला आठवून ती जिवंत होत नाही. मेलेल्यांच्या आठवणीत जिवंत लोकांची मन मोडून काय साध्य होणारे ? मी सुख देईन ना. मी आनंद देण्याचा प्रयत्न ही करतोय ना ? तुझ्या जानला खेळवतो. तुझ्याशी नीट संयमाने वागतोय. तुझी काळजी घेतोय आणि तरी तुला मेलेल्या व्होची आठवण येते. म्हणजे मी इतक करतो त्याची किंमत शून्य. इतक सगळ करून त्याची आणि माझी तुलना होत राहणार सतत. मी काय वेडा आहे का इतक तुझ्यासाठी करायला ? तुला एकदाच सांगतो के, तुला जर तुझी मानसिक स्थिती नीट करायची असेल तर तुला घराबाहेर पडाव लागेल त्यासाठी तुला माझ्यासोबत यावच लागेल. आणि माझ्यासोबत यायचं असेल तर तुला व्होला विसराव लागेल. निदान माझ्यासोबत असताना तरी. समजल का ? नाहीतर तू आली नाहीस तरी चालेल. मी सोडून आणखी कुणाचा तू विचार करावास अस मला वाटत नाही. मला नाही आवडत. एकदाच सांगतोय. पुन्हा मला तुझ्या तोंडात व्होच नाव नकोय. तो तुझा नवरा होता. आता मेलाय. आणि त्याला वर्ष झालय. आणि हे सत्य तुला कळायला हव. समजल का ? ( व्हान तिच्याकडे रागाने बघतो, ती मान खाली घालून बघत असते ) माझ्यामते तुला समजल असेल. 
( Portrait of Doctor Gachet-june1890-by Vincent Van Gogh )

भाग ०५
जान झोपेतून जागा झाला. के उठून त्याच्याजवळ गेली. पण जान रडायचा थांबेना. व्हान विचारातून भानावर आला. त्याने समोर बघितल के नव्हती. बाजूला बघितल तर ती जानला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. व्हान उठून तिच्या जवळ गेला. जानला त्याने कडेवर घेतल. त्याला थोड खेळवल आणि जान रडायचा थांबला. के ला बर वाटल.
व्हान : मी जानला झोपवतो. तू जेवून घे.
के : तू पण जेवण राहीलय.
व्हान : मी जास्त जेवत नाही. तू होतीस म्हणून इतक जेवलो. माझ पोट भरल. तुला गरज आहे. बघ तब्येत कशी खराब झालीय. तू जेवून घे. मी आहे जान सोबत.
के : नक्की ?
व्हान : हो. जेव तू.
के अजून जेवायला बसली. व्हान जानला खांद्यावर बसवून शेतातून पळत होता. जानच्या हातातली छोट्या झाडाची फांदी वाऱ्याने हलत होती. त्याला त्याची गंमत वाटत होती. व्हानसोबत जानला आनंदी बघून के ला बर वाटल. तिने जेवून डबा आवरून सगळा ती त्या दोघांजवळ गेली. जानसोबत दोघे हि खेळायला लागले. जान खूप खेळला आणि पुन्हा त्याला झोप यायला लागली बघून व्हान के ला त्याला झोपवायला सांगतो. आधीच्या ठिकाणी दोघ येऊन के जानच मांडीवर डोक घेऊन त्याला थोपटवत झोपवते. व्हान त्याच पेंटिंग करायला सुरु करतो. जा झोपला तेव्हा के त्याला बाजूला झोपवून के व्हान च्या शेजारी उभी राहून त्याच पेंटिंग निरखून बघत होती. समोरचा सुंदर निसर्ग आणि व्हानने रंगवलेल ओबडधोबड पेंटिंग बघून तिला ते आवडल नाही. व्हानच तिच्याकडे लक्ष नव्हत. पण ती जवळ उभी असल्याचा अंदाज त्याला आलेला. त्या ऐटीत त्याने रंग अजून भरभर कॅनव्हासवर भरायला सुरुवात केले. के ला ते पेंटिंग बहुतेक आवडल नाही. ती माघारी वळली.
व्हान : कस झालंय पेंटिंग ? अजून खूप काम उरल आहे पण तरी तुला कशी वाटतेय रंगसंगती ?
के : खूप छान. डोळ्याचं लक्ष वेधून घेतायत हे रंग.
व्हान : खरच का के ?
के : हो.
व्हान : तेओनंतर तूच आहेस जिला माझ पेंटिंग आवडल. आणि ते बोलून दाखवल. मी खुश आहे आत्ता.
के : वेगळ अस काही नाही सांगितल मी. चांगल्याला चांगल म्हंटल गेलच पाहिजे.

व्हान : आभारी आहे तुझा.
व्हान पेंटिंग करायला लागतो. के जानजवळ जाऊन बसली. थोड्यावेळाने तिचा पण डोळा लागला. व्हानच पेंटिंग करून झाल. सूर्य बुडायच्या तयारीत होता. सगळ आकाश केशरी झालेलं. आकाशात पक्षी घराकडे जाताना दिसत होते. ‘पक्ष्यांना पण त्यांचा संसार आहे. आणि मलाच नाही. मी चित्रकार आहे म्हणून माझ आयुष्य अस आहे का ? कि मीच माझ्या आयुष्याची वाट लावून घेतोय ? कारण काहीही असो मला आता माझा संसार उभारला पाहिजे. खूप झाल आता. बाहेर चित्र काढायची, ती विकायची पैसे कमवायचे आणि घरी येऊन मुलांचे बायकोचे लाड पुरवायचे, आणि रात्री बायकोसोबत सेक्स करायचा बस.’ व्हान विचार करून समान गोळा करतो आणि त्याच मागे लक्ष जात. के शांत झोपेलेली. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घायची इच्छा होत होती. पण दिवसभर चांगल वागलेल एकाच क्षणात वाया गेल असत. आणि ती पुन्हा अशी रोज रोज सोबत यायची नाही या विचारात व्हानने स्वतःच्या मनाला सावरल.
व्हान जाऊन के ला हाक मारतो. के जागी होते. जान झोपलेलाच. त्याला कडेवर घेऊन के सावकाश चालायला लागली. व्हान हि सगळ सामान खांद्यावर अडकवून चालत होता. वातावरण सुंदर होत. दोघांच्यात खूप बोलन झाल असत. पण के तिच्या विचारात हरवलेली. आणि व्हान बोलू शकत नव्हता कारण जान झोपलेला. दोघ चालतच होते. बऱ्याच वेळाने जान उठला पण तो पर्यंत घर आलेल. व्हानला जान आवडत होता मनापासून. पण त्याच हे अस वागण त्याला नाही आवडल. पण तो लहान आहे त्याला काय कळतय असा विचार करून व्हान डोक्यातून विचार काढून टाकतो. प्रेम हे मिळवण्यासाठी असे कित्येक अडथळे पार करायचे असतात. आणि प्रेमात अडथळे आले कि समजायचे आपल्या मनात खर प्रेम जन्माला येतय. आणि या विचाराने व्हान खुश झाला. घरी गेल्यावर आईने के ला काय काय केल दिवसभर अस सगळ विचारलं. के सांगत बसली. व्हान आतल्या खोलीत जाऊन शांत भिंतीला टेकून बसला. त्याच्या डोळ्यांसमोर ती झोपलेली के यायला लागली. त्याला झोप यायला लागली. पण त्याने झोपेला आवरल. ‘नऊ वर्षापूर्वी शेवटची मिठी मारलेली मी उर्सुलाला. त्या नंतर कोणत्याच मुलीचा स्पर्श मला झाला नाही. मुलीच्या स्पर्शाशिवाय मीच मला किती दिवस अस खुश ठेवत राहायचं ? सहन होत नाहीये मला. मला गरज मुलीची नाही बायकोची आहे. जिच्यासोबत मी सगळ्या भावना वाटून घेऊ शकतो. मी मला नाही आता ताब्यात ठेवू शकत. उर्सुलाचा कीस घेतला तेव्हा तिने माझी लायकी काढली. माझ्या दिसण्याचा अपमान केला. मला केस कमी आहेत. माझ्या चेहऱ्यावर खरखरीत केसांची दाढी मिशी आहे. कान बारीक आहेत. घारे डोळे आहेत. मी बुटका लुकडा आहे. मान्य सगळ माझ्यात कमी आहे पण प्रेम नाही. पण तिने माझा अपमान केला. के तशी नाही. ती माझ कौतुक करतेच वर माझ्या पेंटिंगच पण तिने आज कौतुक केल. तिलाच खरी माझी कदर आहे. तिला मी लग्नासाठी मागणी घालतोच.’
( Self-Portrait with Straw Hat-1887-by Vincent Van Gogh )
भाग ०६
व्हान गादिवरून उठतो आणि आरशासमोर जाऊन उभा राहतो. केस विस्कटलेली. त्याखाली मोठ कपाळ. डोळे घारे दिसत होते पण त्यातून सगळा जीव गेलेला. डोळ्याखाली काळसर रंग उठलेला. सुरुकुत्या गालाला पडलेल्या. खरखरीत केलेली दाढी वेडीवाकडी उगवलेली. मिशी ओठाच्या वरून आलीय का नाकातून काहीच समजत नव्हत. व्हानने खोलीच दार आतून लावून घेतल. त्याने स्वतःचे सगळे कपडे काढले. आणि आता एक नजर पुन्हा त्याने स्वतःच्या उघड्या शरीरावर टाकली. तरी त्याची नजर चेहऱ्यावरून हटेना. त्याने दाढी करायला घेतली. दाढी झाल्यावर हळू हळू मिशी आकारात कापली. जास्तीचे केस एक एक उडवत त्याने दोन्ही गालावर पाणी लावल. गाल तसेच ओले ठेवून त्यावर हातावर तेल घेऊन नीट गाल चोळत बसला.
बाहेर व्हानची आई,
आई : व्हानने त्रास नाही ना दिला तुला ?
के : कसलाच नाही. उलट खूप काळजी घेतली त्याने माझी. जानसोबत तर तो इतका छान खेळलाय. जानला घरी यायच्या आधी त्यानेच झोपवल. जान माझ ऐकत नव्हता. पण त्याच ऐकल. खूप बदलला आहे व्हान.
आई : तो खूप चांगला आहे. पण त्याला सतत काहीतरी विचारात रमायला आवडत. तो माझ्याशी हि बोलत नाही. फक्त तेओशी बोलतो. पण ते हि कामपूरत. त्याच्या मनातल त्यालाच माहित. पण कधी कधी वेड्यासारखा वागतो. त्यामुळे भीती वाटते मला त्याची.
के : अजिबात नाही. तो खूप बदलला आहे. मी तर उद्या हि जाणार आहे त्याच्यासोबत.
आई : तुला करमत त्याला पेंटिंग करताना बघून ?
के : हो. मला आवडतात पेंटिंग. व्होमुळे मला चित्रकार आणि चित्रकला याबद्दल माहिती आहे. आणि कुठेतरी मन रमवायला कुठेतरी जाण्यापेक्षा व्हानसोबत मला आवडेल.
आई : चालेल. मी उद्याहि तुम्हाला डबा बनवून देते,
के : मी बनवू का ? व्हानला हि आवडेल.
आई : चालेल माझी काहीच हरकत नाही.
के : चालेल उद्या सकाळी मी लवकर उठून डबा बनवेन.
इकडे आत, व्हान उठून केसांना एकसारखं वळण देऊन नीट मागे ओढून घेतो.
आता तो जरा ठीक दिसत होता. दाराच्या मागे काढलेले बुट त्याने घेतले आणि मधोमध आणून ठेवले. रंग ब्रश घेऊन तो बुटासमोर येऊन बसला. हिरवा, लाल आणि काळा असे तिन्ही रंग मिळून त्याने गडद रंग बनवला आणि बुटाला जो आधी रंग होता तसाच रंग त्यावर ब्रशने द्यायला सुरुवात केली. बूट रंगवून झाले. त्याने ते खिडकीला बांधले आणि खिडकी उघडली बूट वाळण्यासाठी. व्हान खूप वेळ त्या बुटाकडे बघत बसला. बाहेरून आईचा आवाज आला जेवणासाठी तेव्हा व्हानने जेवायला यायला नकार दिला. आणि तो कपडे घालून झोपला.
के त्याला बोलवायला आली नाही. ती जेवून जानला झोपवायला दुसऱ्या खोलीत गेली.
सकाळी व्हान उठून सगळ आवरून रंगवलेले बूट घालून दारात उभा राहतो. के त्याला बघून गालात हसते. व्हानला बर वाटल.
व्हान : तू येणार आहेस ?
के : हो. आज खास मी जेवण बनवल आहे व्हान.
व्हान : मग तर मला आधी जेवल पाहिजे आणि मग पेंटिंग केल पाहिजे.
के : अजिबात नाही. आधी काम मगच जेवण.
व्हान : तू म्हणशील तसच होईल. मी आधी पेंटिंग करेन. पण कालच्या वेळेआधीच जरा जेवेन. चालेल ?
के : हो. आणि जास्तीच केल आहे जेवण तुला आवडेल कदाचित मी बनवलेलं.
व्हान : नक्कीच आवडेल. निघता ?
के : हो.
के डबा घेऊन व्हान सोबत बाहेर आली.
व्हान : जान कुठाय ?
के : आई त्याला सांभाळणार आहेत.
व्हान : बर. म्हणजे आपल्याला आज लवकर घरी याव लागेल. हो ना ?
के : हो.
व्हान : चल मग. जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर जाऊ.
दोघ निघाले.
( Bulb Fields-1883 by Vincent Van Gogh )
भाग ०७
के : व्हान तुझ आत्ता वय किती सुरु आहे ?
व्हान : अठ्ठावीस.
के : म्हणजे तुला चित्रकार होण्यासाठी किमान अजून दहा वर्ष लागतील. चित्रकार होऊन याश मिळवून मग लग्न. किमान तुझ लग्न चाळीशीत होईल. हो ना ?
व्हान : माहित नाही. पण चित्रकार व्हायला मला किती वेळ लागेल काय माहित. पण दहा इतके तर अजिबातच नाही. पाच वर्षात मी पूर्ण करेन.
के : बर.
व्हान : तुला कशी व्यक्ती आवडेल तुझ्या आयुष्यात पुन्हा नव्याने ?
के : व्हो माझ नव आयुष्य तसच अर्धवट सोडून गेलाय. आता मला इच्छा नाही कुणासोबत आयुष्य पुढे जगायची. जानकडे बघितल कि मला व्होची आठवण होते आणि त्यात मी खुश होते. व्होच्या माघारी आमच्या प्रेमाने झालेला जान, त्याला मोठ करण एवढच आता माझ ध्येय आहे. जरी कुणी आल आयुष्यात तरी व्होची जागा तो माझ्या मनात कधीच मिळवू नाही शकणार.
व्हान : बर. आज आपण एका टेकडीवर जातोय जिथून किमान पंधरा शेत-जमिनी वरून दिसतात. ती टेकडी जवळ आहे आणि उंचीला कमी आहे. दुपारपर्यंत आपण मघारी येऊ शकतो.
के : चालेल.
दोघ पुढे बराच वेळ शांत चालत राहतात. टेकडी चढून एका ठिकाणी टेकडीवर दोघे बसतात. व्हान चित्र करायला लागतो. के त्याच्या शेजारी बसलेली. व्हान चित्रात मग्न झालेला. के विचारात. अचानक जोराच्या वाऱ्याने एका झाडाची वाळकी फांदी खाली पडली आणि आवाज झाला. व्हान तिकडे बघतो. विचारात रमलेली के दचकली आणि तिने व्हानचा हात घट्ट पकडला. व्हान तिच्या हाताकडे बघतो. के भानावर आली आणि ती पुन्हा सावरून बसली. व्हान पुन्हा चित्र काढायला लागला. पण त्याचा तो उजवा हात ज्याला के ने धरलेलं तो एकसारखा थरथर करायला लागला. हृद्य धडधड करायला लागल. व्हान उठून बाजूला चालत गेला. थोड चालून पुन्हा माघारी आला. पण थांबेनाच. व्हानने सगळ सामन गोळा केल.
के : काय झाल ?
व्हान : मला काढू वाटेना चित्र, आपण उद्या येऊ.
के : आपण येऊन जास्त वेळ झाला नाहीये.
व्हान : माहित आहे मला पण मला काढू वाटेना चित्र.
के : ऐक, जरा वेळ डोळे मिटून शांत बस. आणि मग डोळे उघड तुला प्रसन्न वाटेल आणि चित्र करयला उर्जा मिळेल.
व्हान : अग के,
के : माझ ऐकशील ना ?
व्हान : बर.
व्हान डोळे मिटून शांत बसला. पण त्याच सगळ लक्ष उजव्या हाताकडे लागून राहिलेलं. आणि तस हृद्य अजून जोरात धडधड करायला लागल. थोड्यावेळाने व्हान डोळे उघडतो, के त्याने काढलेलं चित्र हातात घेऊन बघत असते.
व्हानने डोळे उघडलेले बघून के त्याला मोकळी पानं देते. आणि व्हान चित्र काढायला लागतो. पाच चित्र काढून झाली. दोघ बसून आता जेवायला लागले. जेवण झाल. आणि पुन्हा व्हान एक चित्र करतो नंतर दोघ घराकडे यायला निघतात.
वाटेत येताना एका शेतात पिवळी लहान फुल उगवलेली. व्हान तिथे पळत गेला. काही फुल त्याने गोळा केली आणि के ला आणून दिली. के ती फुल हातात घेते. पिवळी फुल बघून तिला आवडली. पण तिच्या चेहऱ्यावर तस काहीच दिसत नव्हत. व्हानला वाईट वाटल.
व्हान : पिवळा रंग तुला नाही का आवडत ? का हि फुल आवडत नाही.
के : आवडली मला. हि फुल व्होला खूप आवडायची.
‘माझा विचार आहे उद्या ह्या फुलांच चित्र कराव अस व्हान बोलणार होता पण के च बोलन ऐकून त्याने ठरवल आयुष्यात परत कधी ह्या फुलाला हात पण लावायचा नाही. आणि व्हान भर भर चालायला लागला. के सोबत आहे हे विसरून. आणि के त्याचा वेग धरून चालायला लागली.
( Portrait of the Artist's Mother-octomber 1888 by Vincent Van Gogh ) 
  
भाग ०८
के : व्हान, जरा हळू चालशील का तू ?
व्हान : का ?
के : मला चालवत नाहीये.
व्हान : मला थांबायचं नाहीये आता.
के : मग तू पुढे जाऊ शकतोस. मी मागून येईन.
व्हान थांबून मागे बघतो. के च्या पायाला लागलेलं. ती लंगडत, पाय घासत चालत होती. व्हान तिच्याजवळ पळत गेला. तिच्या पायाला धरून त्याने पायाला तिच्या दाबून धरल. तिला बर वाटल. पण जोरात दाबून धरल्यामुळे  तिला दुखायला लागल. तिने व्हानच्या डोक्याला धरून मागे ढकललं. व्हान उठला.
व्हान : काय झाल ?
के : काही नाही.
व्हान : मग बाजूला का केल ?
के : असच. चल आपण जाता.
व्हान आणि के दोघ चालायला लागले.
के : माझा पाय दुखतोय. बहुतेक मला यायला नाही जमणार उद्या.
व्हान : मी पण नाही जाणार मग उद्या.
के : माझ्यापाशी काय आहे तुझ ? तू जा. मला बर वाटल कि मी येईन.
व्हान : नक्की ?
के : हो.
व्हान तिच्या हाताला धरतो. आणि तिला धरून हळू-हळू दोघ चालायला लागले. लांब एका रस्त्यावरून दोघे हातात हात घेऊन चाललेलं जोडप दिसत होत. मागे सूर्य वर आलेला. पायाशी त्यांच्या सगळी हिरवळ होती. लांब कुठेतरी शेतात काम करणारी लोक दिसत होती. काही लोक रस्त्याने जात होते. प्रत्येक चेहरा दुःखात-कष्टात आणि विचारात हरवलेला दिसत होता पण हे जोडप अगदी खूप आनंदी दिसत होत. अस वाटत होत ते दोघेच फक्त चालतायत बाकी सगळ एका जागेवर आहे.
दोघ घरी पोचले. व्हानची आई के ला बघून तिला पायाला मलम लावते. व्हान आत जाऊन गादीवर बसला. व्हान के च्या स्पर्शाला आठवून के च एक चित्र करायला लागला. पण ते जमल नाही. दोन वेळा काढल. पण चुकल. बाहेरच्या खोलीत येऊन तो के च्या खोलीकडे गेला. दार बंद होत. दारावर थाप वाजली. के ने दार उघडल. व्हान आत शिरला.
के : काय काम आहे व्हान ?
व्हान : जानशी खेळावं म्हणून आलो.
के : बर.
व्हान आणि जान दोघ एकमेकांशी खेळायला लागले.
के दोघांना बघून तिथेच बसून झोपून गेली. नंतर जान हि झोपला. व्हान जानला के च्या बाजूला झोपवून बाहेर जायला निघाला. दारात जाताना त्याची नजर के कडे गेली. तिला झोपलेली बघून व्हानला ती आवडली. व्हान आत आला. त्याने के च्या केसांवरून हात फिरवला. आणि तिच्या ओठांजवळ हात नेला आणि तेवढ्यात त्याला आईचा आवाज आला. तो बाहेर आला आणि दार ओढून घेतल.
( At Eternity's Gate-may 1880 by Vincent Van Gogh )
   
भाग ०९
सकाळी, व्हान उशिरापर्यंत त्याच्याच खोलीत झोपलेला. त्याच्या आईला वाटल तो पेंटिंग करायला गेलाय. के उठून आवरून पाय लंगडत बाहेर येऊन थोडस खात होती. तिला व्हान दिसला नाही. तिला हि वाटल व्हान गेलाय. ती तिच्या खोलीत जाऊन जानला थोड भरवून झोपली. जान त्या खोलीतून खेळत खेळत कधीच व्हानच्या खोलीत येऊन बसला.
व्हानला जाग आली तेव्हा जान रंगात हात भरवून बोट चाटून त्याची चव कशी लागते हे बघत बसलेला. व्हानला त्याला तस बघून मजा वाटली. त्याला विचार आला, ‘मला हि लग्नानंतर मुल असेल एखाद आणि ती मुलगीच असावी. के सारखी नाजूक सुंदर शांत. पण माझ्यासारखी चित्रकार. ति पण असेच माझे रंग खाईल. माझ्यासोबत चित्र काढत बसेल. आणि मी तिला चित्रकला शिकवेन’. व्हान उठून जानसोबत खेळत बसला. मग त्याने जानच चित्र करायला घेतल. जानला समोर अजून रंग दिले आणि ब्रश दिले. जान त्या रंगात ब्रश बुडवून स्वतःच्या अंगावर रंग भरत होता आणि त्याच्या तशा अवस्थेच चित्रण व्हान करत होता. के ला झोपेत जाणवल जानचा खोलीत आवाज येईना. तेव्हा ती घाबरून उठली. बाहेरच्या खोलीत आली. जान दिसेना. व्हानच्या खोलीपासून जाताना तिला आतून आवाज येत होता. कसला आवाज आहे बघायला तिने दरवाजा उघडला तर आत जान रंगाने भरलेला तिला दिसला आणि त्याच चित्र काढताना व्हान दिसला. के आत आली आणि ती जानला घेऊन गेली. व्हानच समोर लक्ष गेल तर जान नव्हता. व्हान उठून बाहेर आला. आजूबाजूला बघितल. जान दिसत नव्हता. व्हान के च्या खोलीत गेला. के जानच अंग पुसत होती.
व्हान : त्याला घेऊन का आलीस ? मी त्याच चित्र करत होतो.
के : कसा अवतार करून घेतलाय त्याने. व्हो असता तर मला ओरडला असता. त्याला हे अस राहणीमान आवडत नाही. माणसाने कस स्वच्छ दिसायला हव शरीराने आणि कपड्यांनी हि. अस त्याचं कायम मत असायचं.
व्हान : रंग आहेत ते जातात ते लगेच त्यात काय एवढ.
के : सवय जात नाही.
व्हान : म्हणजे ?
के : त्याला रंग आवडले, तुझी खोली आवडली आणि त्याची जर का त्याला सवय लागली तर जाणार नाही ती. आणि मी इथ कायम राहायला नाही आले. आणि व्हो चे विचार मी इतक्यात तरी नाही विसरणार. जानला त्याच्या वडिलांसारखच बनवायच आहे मला. व्हान मला चुकीच समजू नकोस पण हेच वय असत मुलांना चांगल वाईट शिकावायचं. या वयात ते जे बघतात, शिकतात, जगतात तेच कायम करत राहतात. आणि मला त्याला चित्रकार नाही बनवायचा.
व्हान : जशी तुझी इच्छा. तुझा पाय कसा आहे ? दुखतोय का ?
के : हो. खूप.
व्हान : आपण दवाखान्यात जाता का ?
के : मला हि तसच वाटतय.
व्हान : इथे जवळच आहे एक दवाखाना तिथे आपण जाऊ. चल.
के : चालेल.

के आवरून आली. व्हान जरा बरा आवरून आला. के ला जानला कडेवर घेऊन चालता येणार नाही म्हणून व्हान जानला कडेवर घेतो आणि के व्हानच्या हातावर हात ठेवून चालत होती. के च्या वेगाने व्हान ही हळू हळू चालायला लागला. दोघ दवखान्यात जाऊन आले. के ला जेवनाच ताट आत नेऊन देऊन, तिला जेवायला लावल. औषध देऊन तिला झोपवल. के जेवत असताना जानला व्हान स्वतः भरवतो आणि त्याला हि नंतर झोपवतो. दोघे झोपल्यावर व्हान बाहेर जाऊन एका टेकडीवर जाऊन बसला. जिथे कुणीच नव्हत. वार, पक्षी आणि मनाताला विचार या तिघांच्या शिवाय तिथ कुणाचाच आवाज नव्हता. पण तरी व्हानला या सगळ्या आवाजाचा त्रास होत होत. तो तिथेच खाली पालथा झोपला. सगळी माती त्याच्या तोंडाला लागली आणि त्या मातीला चाटत तो शांत पडून राहिला. 
( The Bedroom-september1889 by Vincent Van Gogh )
भाग १०   
पेरो दारातून बाहेर होत चाललेला अंधार बघत होते. व्हान बांधलेल्या दोरीची गाठ दाताने काढायचा प्रयत्न करतो. पण ती निघत नाही. व्हान उठून पेरोंच्या शेजारी उभा राहतो. पेरो बाजूला बघतात. व्हान बुडणाऱ्या सूर्याला बघत बोलतो,
व्हान : या सूर्यासारखी आठवण हि प्रत्येकाच्या वाट्याला येते. जी येते-जाते आणि पुन्हा येते. याला खंड नाही.
पेरो : हो. आठवणी बनतात त्या आपल्याचमुळे. आपण जी माणस निवडतो त्यांच्या चांगल्या-वाईट वागणुकीमुळे आपल्याजवळ त्यांच्या आठवणी राहतात.
व्हान : हो.
पेरो : पण, पुढे काय झाल ?
व्हान : दीड वर्ष मी इकडून तिकडे अस राहत फिरत दिवस काढले. या काळात कुणीच मला मॉडेल म्हणून मुलगी किंवा बाई मिळाली नाही. कोणती स्त्री माझ्याशी डोळ्यात डोळे घालून बोलली नाही. स्पर्श तर लांबची गोष्ट आणि त्यामुळे सेक्स तर शक्यच नव्हत. जवळ पैसे नसायचे. जे असायचे ते कॅनव्हास, रंग, दारू, आणि सिगरेटवर घालवायचो. जेवण आठवड्यातून दोन तीन वेळा. बाकी वेळ झोपून नाहीतर पेंटिंग करून संपवायचो.
एकदा रात्री गुपिल्समधल्या एका कॅफेमध्ये,
व्हान पाच दिवस उपाशी होता. जवळ शिल्लक थोडेच पैसे होते. एक वेळेच जेवून उद्या सकाळी रिकाम पोट घेऊन उपाशी पोटाचा विचार करण्यात दिवस घालवण्यापेक्षा दारू पिऊन रात्रभर पेंटिंग करून उद्या सकाळी झोपलं तर भूक लक्षात राहणार नाही या विचाराने व्हान या कॅफेत आलेला. कॅफे पूर्ण भरलेला. एक जागा बाजूला रिकामी होती. म्हणजे तिथे नुसता तिरका पाय असलेला मोडका टेबल ठेवलेला. व्हान तिथ जाऊन उभा राहिला. एका वेटरला त्याने खुर्ची आणायला सांगून त्याने त्या मोडक्या टेबलावर स्वतःचा हात ठेवला. टेबल जरा हलायला लागला. व्हानने टेबल जरासा तिरका करून त्याचा तिरका लाकडी पाय स्वतःच्या उजव्या पायच्या बुटावर घेतला. आता टेबल हलायचा थांबला आणि सरळ झाला. दारू मागवून त्याने पहिली सिगरेट ओढायला सुरुवात केली. दारू आली. आणि ती पण त्याने प्यायला सुरुवात केली. गर्दीच्या आवाजाने व्हानला लवकर दारू चढत नव्हती. तीन ग्लास झाले तरी पूर्ण शुध्द घेऊन तो आजूबाजूला बघत होता. तेवढ्यात एक बारीक अंगाची वयाने तरुण पण दिसायला वयस्कर अशी मुलगी तिथे आली. तिने व्हानची परवानगी घेतली आणि दुसरी खुर्ची घेऊन ती व्हान समोर बसली.
तिने सगळी अंगातली ताकद लावून टेबलावर दोन्ही हात ठेवून त्यावर डोक टेकवून डोळे मिटले.
व्हानच्या पायावर टेबलाच वजन पडल त्याला दुखायला लागल. पण तिला कस सांगणार म्हणून तो शांत राहिला. पाच ग्लास दारू पिऊन झाले आणि व्हानला आता जीभ जड झालेली जाणवली. अंग पोकळ रिकाम वाटल. आता फक्त उभ राहून बघायचं होत कि किती चढलीय. त्याने शेवटची एक सिगरेट मागवली.
व्हान : इतक्या का थकला आहात तुम्ही ? तुमच नाव काय ?
ख्रिस्तीन : मी ख्रिस्तीन, कामाने थकायला होत. अंगात ताकद नाही हा थकवा पोसायला म्हणून मग रोज रात्री पिते. सकाळपर्यंत सगळ अंग हा थकवा अंगावर पोसतो. आणि सकाळी माझ फक्त डोक दुखत. बाकीच सगळ दुखण निघून गेलेलं असत. तुम्ही इथ नवीन आलाय का ?
व्हान : हो.
ख्रिस्तीन : काय करता तुम्ही ?
व्हान : मी चित्रकार आहे.
ख्रिस्तीन : म्हणजे तुम्ही मी सारखेच आहोत. मला पैशासाठी कष्ट आहेत आणि तुम्हाला चित्रकार होण्यासाठी. आपल चांगल जुळेल. मैत्री हि होईल आपल्यात बहुतेक.
व्हान : माझी कुणाशी हि पटकन मैत्री होते. पण टिकत नाही. मला माणस धार्जन नाहीत.
ख्रिस्तीन : अस काही नसत. ज्यांची लायकी नसते ते आपल्या आयुष्यातून निघून जात असतात त्याबद्दल आपण दुःख का करत बसायचं. त्यात त्यांचा तोटा असतो कि ते आपल्यासारखा सोबती त्यांच्या आयुष्यातून हरवून बसतात. आपल्याला माणस धार्जन नाही अस म्हणून चालणार नाही. एक लक्षात ठेव सगळीच माणस चांगली नसतात. आणि म्हणूनच ते सोबत आपल्या राहू शकत नाहीत. अ.... नाव काय तुझ ?
व्हान : विन्सेंट व्हान गॉग.
ख्रिस्तीन बोलत असताना दारूच्या नशेत बराच वेळ व्हानच्या डाव्या पायावर तिचा पाय फिरवत होती. व्हानला इतक्या वर्षांनी स्त्रीचा मिळालेला हा स्पर्श आवडला.
व्हान : तू इथेच राहतेस का कुठे ?
ख्रिस्तीन : मी लांब रहाते इथून जरा. पण घरी जायचा रस्ता हा आहे माझा त्यामुळे मी इथे येते प्यायला.
व्हान : तुला आत्ता खूप चढलीय दारू.
ख्रिस्तीन : मी याहून जास्त पिते. पण आज माझ्याकडे पैसे नाहीत.
व्हान : मी देऊ का ?
ख्रिस्तीन : हो.
व्हान तिला दोन ग्लास दारू घेतो, नंतर सहा दिवस तो उपाशी होता पैसे संपले म्हणून. आणि तेओने त्याला पाठवले तेव्हा त्याने घराच भाडही भरल.
ख्रिस्तीन उठली आणि तिचे तोल जायला लागले. व्हान टेबल नीट बाजूला सरकवून तिला आधार देतो आणि दोघ कॅफेच्या बाहेर येतात.
ख्रिस्तीन : मला कस तरी होतय. म्हणजे चढलीय दारू पण मला अस्वस्थ वाटतय. आणि माझ घर लांब आहे.
व्हान : मी सोडायला येऊ का ?
ख्रिस्तीन : नको, तुला त्रास होईल. त्यापेक्षा मी तुझ्या घरी येऊ का ?
व्हान : चालेल.
ख्रिस्तीन : बदल्यात तू मागशील ते देईन.
व्हान : मी काही पण मागू शकतो.
ख्रिस्तीन : हो. पण इथ नाही. चार भिंतीच्या आत. चल लवकर परत मला झोप आली तर मला तुला हव ते देण जमणार नाही.
व्हान तिला घेऊन घरी आला.   
( Agostina Segatori Sitting in the Café du Tambourin-1887 by Vincent Van Gogh )

भाग ११
रात्री व्हानने ख्रिस्तीनसोबत सेक्स केला. व्हान मनातून शांत झाला. ख्रिस्तीन केव्हाच झोपून गेलेली. व्हान पहाटेपर्यंत तिच्या प्रत्येक अंगाला पुन्हा पुन्हा स्पर्श करून ती स्त्री समजून घेत होता. तिचे केस एकसारखे नव्हते. ती गोरी होती पण चेहऱ्याची ठेवण बरोबर नव्हती. किस करताना तिच्या ओठांवरचे केस अगदी स्पष्ट ओठांना टोचत होते. छाती दाबताना एक लहान तर एक मोठा आकार हाताला लागत होता. अंगावर सगळीकडे बारीक बारीक केस उगवलेले. काही का असेना, प्रेम सौंदर्य बघून नाही मन बघून होत. व्हानला त्या रात्री तिने सुख दिल. अर्थातच तीच मन चांगल आहे अस समजून व्हान तिच्या प्रेमात पडला. सकाळी ख्रिस्तीन उठली तेव्हा व्हान झोपलेला. ख्रिस्तीन कॅनव्हास मागे लपवून ठेवलेल्या दोन सिगरेट नुसत्या वासाने शोधते आणि खिडकीजवळ बसून सिगरेट ओढत बसते. व्हानला नंतर जेव्हा जाग येते तेव्हा ख्रिस्तीन लाडात येऊन व्हानच्या मांडीवर हात हळुवार फिरवत त्याच्या गालावर आपले ओठ टेकवते.
ख्रिस्तीन : व्हान मी एक विचारल तर मला खर खर सांगशील ?
व्हान : हो,
ख्रिस्तीन : काल रात्री मी तुला सुख देऊ शकले का ?
व्हान : हो. खूप. या आधी कधीच मिळाल नाही इतक सुख मला मिळाल. मी तुझ्यासोबत रात्र घालवली, मला खूप आवडली हि रात्र. मी कधीच विसरणार नाही.
ख्रिस्तीन : आणि मला ?
व्हान : तुला हि विसरण अशक्य आहे आता मला.
ख्रिस्तीन : तू चित्रकार आहेस, तुझ नाव नाही पण चित्रकार असल कि मला माहितीय तुम्हाला दारूचा आणि बाईचा नाद असतो. दारू आतड्यांची तहान भागवते आणि बाई शरीराची. तुझ्या हि आयुष्यात आल्याच असतील ना अशा बायका किंवा मुली. त्यांच्यासोबत हि तू रात्रभर जागला असशील ? हम ?
व्हान उर्सुलाबद्दल थोड सांगतो आणि बोलता बोलता चुकून के च नाव घेतो. ख्रिस्तीन त्याला खूप आग्रह करते. पण व्हान विषय बदलून जागेवरून उठतो. ख्रिस्तीन परत इथे न येण्याची धमकी देते आणि व्हान के बद्दल सांगायला लागतो. डोळ्यात पाणी, छातीची स्पष्ट धडधड आणि हाताची थरथर अशी अवस्था करून व्हान तिला के बद्दल सांगत होता.
व्हान : त्या टेकडीवरून मी घरी आलो. मनात ठरवलेलं के ला मनातल सांगून टाकायचं. घरी आलो पण ती घरी नव्हती. काका तिला घेऊन गेले होते. तीन दिवसांनी ती परत आली. तिचा पाय बरा झालेला. मी तीन दिवस पेंटिंग करायला बाहेर गेलोच नव्हतो. चौथ्या दिवशी मी निघालो होतो तेव्हा तिने मला अडवल आणि मी हि सोबत येते म्हणून सांगितल. ती मी आणि जान आम्ही तिघ एका शेतात गेलो. पेंटिंग करताना माझ लक्ष लागत नव्हत. अस वाटत होत हीच वेळ आहे प्रेम व्यक्त करायची. आज नाही तर पुन्हा कधीच नाही. आकाशात पक्षी आणि ऊन, खाली मी जान आणि के शिवाय कुणीच नव्हत. मी पेंटिंग थांबवल. के आजुबाजूच शेत बघत होती. मी तिच्या समोर उभा राहिलो. तिच्या हाताना हातात घेऊन घट्ट मुठीत पकडल. आणि तिला सांगून टाकल, मला तुझ्यावर प्रेम आहे. खूप जास्त. आजवर मी इतक कुणावर प्रेम केल नाही इतक प्रेम तुझ्यावर करतो. तुझ लग्न झालय. मला काही हरकत नाही. तू विधवा आहेस मला काहीच हरकत नाही. तुझा मुलगा तोच माझा मुलगा मी माझ मुल हि होऊ देणार नाही. माझी हि आत्ता अशी अवस्था आहे, भावाच्या पैशावर मी जगतो, पण तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील तर मी एक दिवस नक्की नावाजलेला चित्रकार होऊन दाखवेन. जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी आणून लोळवेन. ती शांत होती. माझ्याकडे एकटक बघत होती. मला तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पण तीच शांत राहण यात मला तिचा होकार दिसला. मी तिला जवळ ओढलं. तिने प्रतिकार केला. आपण भाऊ-बहीण आहे अस ती एकच वाक्य परत-परत बोलत होती. भाऊ बहिण असलो तरी सख्खे नव्हतो. आणि प्रेमाला नात नाही मन जुळाव लागत. मी तिला जबरदस्ती जवळ ओढलं आणि किस केला. ती माग जोर लावून सरकत होती. मी तिच्या ओठांना ओठात पकडलेल आता चावायला लागलो. तिला मिठीत घट्ट ओढून धरल. पण ती ताब्यातून सुटली. तिने जानला घेतल आणि शेतातून पळत सुटली. मी तिच्या मागे तिला समजवायला पळायला लागलो. पण ती निघून गेली. माझ चित्राच सामान मागे राहिलेलं. ते घेऊन मी घरी आलो. के आणि जान नव्हते. पण घरी सगळ्यांना समजल मी काय केलेलं ते. वडील खूप चिडले ओरडले. आईने माझ्याकडे बघायचं सोडून दिल. तेओने लागलीच माझी इथे गुपिल्समध्ये राहायची सोय केली. आणि मी इथे आलो. इतके दिवसांनी स्वतःहून स्पर्श करणारी, प्रेम देणारी, माझ्यासोबत सेक्स करणारी, तू आहेस ख्रिस्तीन. तू खूप चांगली आहेस ख्रिस्तीन.
ख्रिस्तीन : व्हान तू सुध्दा.
ख्रिस्तीन व्हानला जवळ ओढून त्याच्या केसातून हात फिरवत त्याच्या ओठांना आपल्या ओठात पकडून ठेवत स्वतः भिंतीला टेकते. व्हान हि तिला भिंतीवर रेलून घट्ट मिठी मारतो. ख्रिस्तीन घरी जायचं विसरून जाते आणि रात्रीपर्यंत व्हानसोबतच घरी थांबते.
व्हान रात्री दारू प्यायला जातो. तेव्हा सोबत ख्रिस्तीन हि जाते. दारू पिऊन ख्रिस्तीन पुन्हा अंगातून जीव गेल्यासारखं व्हानवर सगळ अंग टाकून अर्धे डोळे मिटून रस्त्याने चालायला लागते. दोघ घरी येतात. आणि तिला थोड झोपून बर वाटत. तिला जाग येते तेव्हा मध्यरात्री व्हान झोपलेला तिला दिसला तिने त्याला उठवल, आणि दोघांनी प्रेम सुरु केल.
( The Night Cafe-5-8 september 1888 by Vincent Van Gogh )

भाग १२  
पेरो : तू आणि ख्रिस्तीन किती दिवस एकत्र होता ?
व्हान : सहा महिने.
पेरो : तुम्ही लग्न केल होत ?
व्हान : नाही. पण दोन दिवस माझ्यासोबत राहिल्यावर तिला घरी सोडावस मला वाटत नव्हत. ती पण कारण काढून घरी थांबत होती. पाचव्या दिवशी तिने सकाळी मला सांगितल कि ती दुपारी तिच्या घरी जाईल. घरी तिची म्हातारी आई, एक लहान बहिण आहे अस ती मला बोलली. मी तिला जायला होकार दिला पण तिला थांबवण्यासाठी कारण शोधायला लागलो. ती नंतर झोपली. मी बाहेर जाऊन पेंटिंग करत होतो. दुपारी येताना तिला आवडतील अशी जांभळ्या रंगाची फुल एका शेतातून काढून आणली. घरी आलो. दार वाजवल. दार नुस्त ढकलेल होत. मी आत आलो तर पूर्ण घर स्वच्छ होत. प्रत्येक कॅनव्हास नीट भिंतीला लावून आणि काही भिंतीला टेकवून ठेवलेले. रंगाच सामान नीट टेबलावर मांडून ठेवलेलं. चित्राची कागद नीट गठ्ठा करून दोरीने बांधून ठेवलेली. फरशीवर एक रंगाचा डाग नव्हता. आणि ख्रिस्तीन आत्ता स्टोव्हपाशी बसून सूप बनवत होती. मला बघून ती उठून माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारली. मी तिला फुल दिली. ती घेऊन त्याचा ती वास घ्यायला लागली. मी चित्राच सामान बाजूला ठेवल. आणि तिने बारीक डोळे करून खुणावल आणि मी ते सामना नीट बाजूला ठेवल. मी तिला जवळ घेतल. तिला किस केला.
व्हान : तुला एक विचारायचं होत ख्रिस्तीन.
ख्रिस्तीन : मला पण तुला एक सांगायचं आहे डार्लिंग.
व्हान : काय ?
ख्रिस्तीन : मी इथेच राहिले तर तुला काय हरकत आहे का ?
व्हान : अजिबात नाही. पण मीच हे तुला विचारणार होतो. तुला माझ्या मनातल कस काय कळाल ?
ख्रिस्तीन : मी खूप विचार केला व्हान, पण तुझ्यासारखा मला कधीच भेटणार नाही. इतक तू प्रेम करतोस, तू माझ्यावर.
व्हान : हो. माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि ते असच रोज रोज वाढत जाईल.
ख्रिस्तीन : हो तेच जाणवल मला म्हणून मी ठरवल, कि तुझ्यासोबत इथेच रहायचं. आपल हे घर सजवायचं. शेवटी घरात बाई असेल तरच घराला घरपण असत व्हान.
व्हान : माझ्याशी लग्न करशील ?
त्या प्रश्नाने ख्रिस्तीन व्हान पासून लांब गेली. सूप उकळल होत ते नीट बघून परत व्हान पाशी आली.
ख्रिस्तीन : नात हे बंधन असत. बंधन नसलेल्या नात्याच आयुष्य खूप काळ असत. व्हान, मी घरी राहीन. अगदी बायको सारख घर सांभाळेन, तुला रात्री प्रेम देईन. त्यासाठी मला तुझी बायको व्हायची गरज वाटत नाही. बाकी तू म्हणशील ते सगळ करीन.
व्हान : मग अजून एक करशील ?
ख्रिस्तीन : काय ?
व्हान : माझ्यासाठी मॉडेल म्हणून पोझ देशील ?
ख्रिस्तीन : तू मोडेल्सना किती पैसे देतोस ?
व्हान : पाच किंवा दहा फ्रांक्स.
ख्रिस्तीन : मला पंचवीस दे.
व्हान : एवढे ?
ख्रिस्तीन : तुला मी इथे हवी असेन तर तुला द्यावे लागतील. कारण मी इथे राहिले तर मला माझ्या आईला आणि बहिणीला पैसे द्यावे लागतील. या चार दिवसात ते जेवले असतील का नाही मला माहित नाही. तू पैसे दिलेस तर मी इथे राहीन.
व्हान : चालेल.
ख्रिस्तीन : मग आजपासून मी तुझी बायको आहे. अस समज तू.
व्हान : आजपासून ? आत्ता पासून व्हायला काय कराव लागेल मला ?
ख्रिस्तीन : देवाच नाव मनात घे आणि मला किस कर.
दोघांनी एकमेकांना किस केला.                             
( Still Life with Straw Hat- november/december 1881 by Vincent Van Gogh )
भाग १३
पेरो : म्हणजे तू विवाहित आहेस.
व्हान : बहुतेक.
पेरो : ख्रिस्तीन, तीच काय झाल पुढे ?
व्हान : बायकोने घर सांभाळायच, नवऱ्याने पेंटिंग करून पैसे कमवण्यासाठी धडपड करायची. संध्याकाळी थोडस खाऊन सिगरेट किंवा दारू प्यायची, आणि पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवत एकमेकांवर झोपून जायचं. असच चालाल होत आमच दोन महिने. नंतर ती मॉडेल म्हणून माझ्यासमोर पोझ देऊन बसायची. काही वेळा ती नकार द्यायची पण तरी हि तेओने पैसे पाठवले कि, ती मला पैसे मागायची. तिचे ठरलेले पैसे द्यायचो मी तिला. दोन-सव्वा दोन महिन्यांनी ती दिवसा घरी राहायचं टाळायची. मी विचारल दोन तीन वेळा तर मी घरी नसतो एकटीला करमत नाही म्हणून ती गावात फिरते अस तिने सांगितल. मी विश्वास ठेवला. डॉक्टर, मी चित्रकार आहे, मला जस स्पष्ट दिसत तसा स्पष्ट वास हि येतो. निसर्गात असतो मी कायम, वासाच आणि माझ नात खूप जवळच आहे. अलीकडे ती माझ्या जवळ यायची तेव्हा तिच्या छातीच्या टोकाला चावलेले व्रण दिसायला लागले. तिच्या घामात अजून कुणाच्या तरी घामाचे वास यायला लागले. पण मी त्याकडे कानाडोळा केला. “प्रेमात ज्याला संशय येत नाही त्याच प्रेम खर नाही”. अस माझ मत आहे. मी ख्रिस्तीनवर खर प्रेम करत होतो आणि म्हणून मला संशय यायला लागला. एकदा बाहेर जातो सांगून मी लपून तिचा पाठलाग केला. पूर्ण दिवस तिच्या मागावर राहिलो आणि मला सगळा इतिहास समजला.
पेरो : काय ?
व्हान : ख्रिस्तीन कामाला जात नव्हती. ख्रिस्तीन धंदा करायची. तिची आई पण हेच काम करत होती. तिनेच ख्रिस्तीनला पहिली मासिक पाळी यायच्या आधी धंद्याला बसवलेल. तिची बहीण बहुतेक काल्पनिक असेल. पण तिला एक मुलगी होती लहान. ख्रिस्तीनची आई आत कुणासोबत असली कि ती मुलगी बाहेर दाराच्या आतले आवाज ऐकत घाबरून बसायची. आणि,
पेरो : आणि काय ?
व्हान : ख्रिस्तीनचा एक प्रियकर होता. जो आम्ही दोघ एकत्र आलो तरी हि तिच्याशी संबंध ठेवून होता. पुढच्या दोन महिन्याने ख्रिस्तीनच पोट वाढल तेव्हा तिला जाब विचारल्यावर तिने सांगितल ती गरोदर आहे. माझ स्वप्न सत्यात येणार होत. गॉग घराण्याला माझ्यासारखा दुसरा चित्रकार मिळणार होता. माझ्या कल्पनेतला संसार उभारणार होत. मी खुश झालो होतो तीच पुढच वाक्य ऐकेपर्यंतच. ते बाळ त्या प्रियकराच होत. मी दिलेले पंचवीस फ्रांक्स पुरत नाही म्हणून मी बाहेर गेल्यावर ती सकाळी प्रियकरासोबत वेळ घालवायची, दुपारी एखाद गिऱ्हाईक करून संध्याकाळी माझ्याआधी घरी यायची. प्रियकर, रोज नवीन गिऱ्हाईक आणि घरी मी. लहानपणापासून शरीरासोबत झालेला खेळ तिला झेपला नाही. अशात प्रियकराला खुश करायचं, गिऱ्हाईक शोधून त्याला खुश ठेवायचं आणि माझ्या घरी राहायची म्हणून मला खुश करायचं आणि त्यात तिच्या पोटात बाळ होत. सगळा परिणाम तिच्या शरीरावर झाला. आणि तो परिणाम फक्त तिला माहित होता. मी एकदा पेंटिंग करून घरी आलो संध्याकाळी तर ख्रिस्तीन घरात बेशुध्द होऊन पडलेली. मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितल हिने शरीराची काळजी घायायाल हवी नाहीतर बाळासोबत हिचा मृत्यू काही दिवसात होईल. मी जमेल तितकी तिची काळजी घेतली. पण तिला पैसा आणि शरीराला लागलेली सेक्सची सवय स्वस्थ बसून देत नव्हती. मला फसवून ती अधून मधून प्रियकराकडे जात होती. मी तिला हात लावायचं सोडून दिल होत. (काळजीपोटी) पण तरीही पुन्हा एकदा तिला डॉक्टरांकडे घेऊन जाव लागल. आणि मी प्रेमाने करत असलेली जबरदस्ती तिला आवडली नाही. तिला त्याचा त्रास व्हायला लागला. ती माझ्यासोबत भांडण करायला लागली. आणि एकदा तर रात्री तिने सामान भरल आणि मला तिच्या घरी सोडायला सांगितल. मी फक्त तिच्या मागे चालत होतो. रेल्वे आली. ती गाडीत बसली. मी तिला सामान दिल. गाडी गेली. मी आठवड्याभरात पुन्हा घरी आलो. गुपिल्स सोडून दिल. तिथ तिच्या आठवणी मला जगून देत नव्हत्या. घरी आलो तरी बाबा आणि आई मी त्यांच्या मनाविरुद्ध जगून चित्रकार होत आहे यामुळे माझ्याशी बोलण टाकून होते. त्यात के मुळे त्यांना माझी लाज वाटत आहे अजूनसुध्दा. मग पुन्हा तेओकडून पैसे घेऊन नवीन पेंटिंगच सामान आणून मी शेतात जाऊन चित्र करायला लागलो. महिनाभर असाच गेला. पण नंतर रोज माझ्या मागावर कुणीतरी येतय असा मला भास व्हायला लागला. बहुतेक माझ्या विचारातली ती के किंवा ख्रिस्तीन होती. मला वाटल के नसेल, कारण तीच माझ्यावर प्रेम नव्हत मग बहुतेक ख्रिस्तीन असावी. पण ती पाठलाग का करत असेल ? आणि माझ मन बोलून गेल, बहुतेक ख्रिस्तीन मेलीय आणि म्हणून तिचा आत्मा माझा पाठलाग करतोय. मी दोन दिवसांनी एक दगड नीट कोरून एका टेकडीवर निम्मा पुरला. मातीत समोर ख्रिस्तीनच नाव ब्रशने कोरल. शेतातली काही फुल त्या नावावर चढवली. आणि तिला श्रद्धांजली वाहिली.  
( La Mousme-1888 by Vincent Van Gogh )
  
भाग १४  
तिथून मी पुढे शेतात गेलो, पेंटिंग केल पण मनात जाणवत होत काही तरी आहे जे माझ्या मागावर आहे. मी पेंटिंग करायचं सोडून घरी आलो. घरी सामान ठेवल आणि संध्याकाळी कॅफेत जाऊन दारू पिलो.
पेरो : तू दारू अती पितोस त्यामुळे बहुतेक तुला असे भास झाले असावेत.
व्हान : नाही. मला प्यायची सवय आहे. जशी कि पेंटिंग करायची सवय आहे. आणि सवयीच्या गोष्टीने त्रास होत नाही. त्या सवयींवर आपला ताबा असतो. आणि माझा माझ्यावर ताबा असतो मी कितीही दारू प्यायली तरी.
दारू पिऊन जेव्हा व्हान घरी निघाला होता, रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. वर्दळ नव्हती. समोरून येणारी दोन माणस व्हानकडे एकटक बघत येतात. व्हान जरा घाबरतो. पण तो उगीच अंगात नसलेली ताकद डोळ्यात आणून त्यांना नजर मिळूवून चालत राहतो. पुढे गेल्यावर अजून एक माणूस येताना व्हानला दिसतो. तो माणूस डोळ्यांच्या भुवया उचलून ओळख दाखवतो. व्हान त्याला पहिल्यांदाच बघत असतो. व्हान त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातो. पुढे गेल्यावर काही भिंतींवर दिवे लावलेले ज्याच्या प्रकाशात व्हानला रस्ता पूर्ण दिसायला लागला. आणि स्वतःची सावलीसुध्दा. तो पुढे गेला तसा तो प्रकाश मागे गेला आणि मागची सावली पुढे आली. एक नाही दोन. व्हान पटकन मागे वळून बघतो.
कुणीच नाही. खाली बघितल सावली हि एक झाली. व्हानला काहीच समजेना. व्हान घरी कसा तरी पोचला. घरी जाऊन तो त्याच्या खोलीत गेला. आरशासमोर उभ राहून त्याने काही वेळ स्वतःच्या डोळ्यात एकटक बघितल. डोळ्यात नशा होती. पण भीती जास्त दिसत होती. आपण काय चुकीच केल आहे का ? असे भास का होतात आपल्याला ? व्हानला हे समजायला काही मार्ग नव्हता. त्याला उर्सुलाचा विचार आला. तिने तर स्वतः त्याला नाकारलं होत, त्यानंतर व्हान तिला काहीच त्रास देत नाही. भेटत हि नाही. त्यामुळे उर्सुलाचा हा त्रास अजिबात नव्हता. के...तिचा हि काही संबंध नव्हता. हि भुताटकी असेल का ? या विचाराने त्याला सुचायच बंद झाल. त्याने विचार सोडून झोपण पसंत केल. तो झोपला. पण त्याला झोप येईना. डोळ्यासमोर उर्सुलाचा मऊ हाताचा पंजा, के चे केस आणि गोलाकार छाती यायला लागली, ख्रिस्तीनच्या पोटाखालची बारीक कंबर दिसायला लागली. व्हान उठून सिगरेट ओढायला लागला. त्याला अस वाटायला लागल इथून निघून जाव. इथे काय तरी वेगळ होतय. आणि हि विचार करायची योग्य वेळ नाही, कारण आत्ता कामाची वेळ आहे विचार करण्याची नाही. त्याने ठरवल उद्याच तेओकडून पैसे घेऊन उद्या हे गाव सोडायचं आणि दुसरीकडे जायचं. तो झोपला. सकाळी उठून तो तेओची वाट बघत होता पण व्हान उशिरा उठलेला आणि तेओ सकाळीच शेजारच्या शहरात काही नवख्या चित्रकारांची चित्र विकत घ्यायला गेलेला. व्हानला आता संध्याकाळी उशिरापर्यंत त्याची वाट बघायची होती. घरात बसण्यापेक्षा काम केलेलं बर म्हणून तो सामान घेऊन शेतात गेला. पेंटिंग करता असताना त्याला पुन्हा भास झाला. त्याने दुर्लक्ष केल. पण कपड्यांचा झोळदार बारीकसा आवाज झाला. त्याने मागे वळून बघितल. आणि मागे एक बाई उभी होती. खूप सुंदर. के आणि उर्सुलापेक्षा. दोघींपेक्षा भरलेल्या अंगाची पण जरास चेहऱ्यावरच तेज उतरलेली. पण व्हान जेव्हा तिच्याकडे बघत होता ती गालात हसत चाललेली. व्हान उठला.
व्हान : काय पाहिजे का ?
मार्गोट : हो. पण मिळेलच अस नाही. आणि तुम्ही द्याल अस हि नाही वाटत मला.
व्हान : अस काय हवय ?
मार्गोट : तुम्ही.
व्हान : म्हणजे ?
मार्गोट : इतक्या वर्षात ज्या माझ्या मनातला राजकुमाराला मी शोधत होते तो मला तुमच्यात दिसला. तो राजकुमार मला कधी माझ्या घराच्या जवळ, कधी रात्री कॅफेत दारू पिताना, घराच्या खिडकीत सिगरेट ओढताना, आणि असा शेतात पेंटिंग करताना दिसलाय, आणि म्हणून माझा हा पाठलाग अखेर थांबलाय. मी खूप थकले तुमचा सगळीकडे पाठलाग करून. किती चालता तुम्ही अहो. रेल्वे पण रोज इतक्या धावत नाहीत आपल्या गावातून शहराकडे.
व्हान : म्हणजे ते भूत तू होतीस ?   

मार्गोट : काय ?
( Self Portrait without Beard-1889 by Vincent Van Gogh )


भाग १५
व्हान : काही नाही. हल्ली मी एका भितीमध्ये वावरत होतो.
मार्गोट : कसली भीती ?
व्हान : भुताची.
मार्गोट : तुम्ही भुताला भिता ?
व्हान : नाही. पण मी देव मानतो आणि म्हणून या जगात सैतान हि असण्याची शक्यता आहे. आणि त्यातलाच एक सैतान-भूत माझ्या मागावर असल्याच मला जाणवत होत. माझा ते पाठलाग करत होत. पण आत्ता कळाल ते सैतान नाही ती तू होतीस.
दोघ हसायला लागले.
व्हान : पण तू माझा पाठलाग का केलास ? सरळ येऊन भेटायचंस.
मार्गोट : अस म्हणतात चित्रकार ठार वेडे असतात. ते काहीही करतात आणि बायकांच्या बाबतीत तर भयंकर असतात. त्यांना सौंदर्याचा सतत शोध असतो आणि प्रत्येक बाई सुंदर असते.
व्हान : हो, तू पण खूप सुंदर आहेस.
मार्गोट : काहीही. सौंदर्य असण्यासारख काही नाही माझ्यात. आणि सौंदर्याच ठराविक वय असत. सौंदर्य मुलीत असत आणि मी बाई आहे. माझ वय चाळीस आहे.
व्हान : माणसाच्या शरीराला वय असत मनाला नाही. तरी हि, आत्ता तू सुंदर दिसतीयस, आणि तुझ मन त्याहून अधिक सुंदर आहे. आणि हे सौंदर्य मला रोज बघायला मिळाल तर नक्कीच आणि लवकरच मी याचा चाहता होईन.
मार्गोट : खरच ?
व्हान : हो.
मार्गोट : मला तुम्ही आवडता, मला तुमची अदा, तुमच सतत विचारात गुंग होऊन चालण, नशेत अखंड असलेल हे घारे डोळे. हे चित्रकाराचे भरलेले रंगीत हात मला सगळ आवडल. मला तुम्ही आवडता व्हान. मला चुकीच समजू नका. या आधी मला विसाव्या वर्षी एक मुलगा आवडला होता. पण मी त्याला मनातली गोष्ट सांगू नाही शकले. आणि तो लग्न करून दुसरीसोबत रहायला गेला. त्या नंतर मी पुन्हा प्रेमात पडले नाही. कारण तसा कुणी आयुष्यात आलाच नाही. सब्र का फल मिठा होता है. खर आहे ते, तुम्ही उशिरा दिसलात मला पण मला हवे तसे आहात. मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. पण मी माझ्या मनातल तुमच्यासाठीच प्रेम व्यक्त केल. तुम्ही मला चुकीच समजणार नाहीत अस मी समजते. बाकी काही चुकल असेल तर मला माफ करा.
व्हान : घरी कोण असत तुझ्या ?
मार्गोट : आई आणि तीन बहीण. सर्वात लहान मी आहे. तिघींची लग्न झालेली नाहीत.
व्हान : मग माझ्याशी लग्न कर म्हंटल तुला तर ?
मार्गोट : ते शक्य नाही. आईची इच्छा आहे मोठ्या बहिणींची लग्न झाल्याशिवाय माला नाही करता येणार. माझ्या नशिबात एकटेपणा देवाने केव्हाच लिहून ठेवला आहे. आला दिवस फक्त संपवायचा असच सुरु आहे गेली वीस वर्ष झाले. अलीकडे दोन तीन दिवस तुमच्यामुळे हे दिवस तुमचा पाठलाग करण्यात घालवले. बाकी वेगळ अस काहीच घडल नाही. पण आज रहावलं नाही म्हणून तुम्हाला सगळ मनातल सांगितल. वाटल, तेव्हा सारख बोलायचं राहून जायला नको. कारण अजून पुढच्या वीस वर्षांनी मी असेन-नसेन माहित नाही, पण असले तरी माझ्याकडे सौंदर्य नसेल, प्रेम करायच तेव्हा वय उरलेलं नसेल म्हणून मी मनाची तयारी केली, आणि तुमच्याशी बोलले.
व्हान : मला व्हान म्हण. एकेरी नाव. मी तुझ्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. नात्यात वयाला थारा नसेल तरच नात एकसमान जपलं जात.
मार्गोट : चालेल व्हान. तू म्हणशील तसच वागेन मी.
व्हान : मी चित्र करणार आहे आता पुढे जाऊन. येतेस सोबत ?
मार्गोट : माझ नशीब उजळल आज तर. हो चला.
व्हान : काय ?
मार्गोट : सॉरी, चल व्हान.
दोघ शेतातून वाट काढून चालायला लागेल. व्हान पुढे बघून खांद्यावरच सामान घेऊन हळू हळू चालत होता. मार्गोट त्याला अधून मधून त्याची नजर चुकवून बघत होती.

एके ठिकाणी थांबून व्हान पेंटिंग करायला लागला. मार्गोट त्याच्या शेजारी बसून त्याला बघत होती. सहज व्हानची नजर बाजूला गेली. मार्गोट त्यालाच बघत आहे बघून व्हान तिच्या चेहऱ्यावर आलेली केस बाजूला करून कानांमागे सरकवतो. ती गालात हसते. त्याच्या बोटांचा रंग तिच्या कपाळापाशी लागला. त्याच लक्ष नसताना तिने पुन्हा केस कानामागून पुढे सोडली. व्हानच लक्ष जात आणि पुन्हा ती पुढे चेहऱ्यावर आलेली केस तो कानामागे सरकवतो आणि ती त्याच्या हाताला धरून त्याच्या हाताच्या रंगाचा वास घेत राहते. व्हान तसाच तिच्या हातात हात ठेवून खुर्चीवरून उतरून तिच्या पुढे बसतो. आणि तिच्या पुढे सरकतो. ती डोळे मिटते. 
( a Lane near Arles-1888 by Vincent Van Gogh )
भाग १६
पेरो : मार्गोटबद्दल मला डॉक्टर रे बोलले आहेत. ती गेली तेव्हापासून तुला मानसिक धक्का बसला असावा असा त्यांच्या प्राथमिक अंदाजात एक आणखी अंदाज नमूद होता. पण तीच जाण्यासारखं वय नव्हत. चाळीशीत पाचव-सहाव प्रेम करत असतात लोक. त्या वयात मार्गोट गेली हे वाईट झाल. तिला कसला जुना रोग होता का ?
व्हान : नाही. हे सगळ खोट आहे. मार्गोट मेली नाही. आणि तिला कसला रोग पण नव्हता.
पेरो : म्हणजे ?
व्हान : आम्ही पाच दिवस एकत्र घालवले. आमच्यात किस सोडला तर कोणताच शारीरिक संबंध आला नाही. पण तरीही आम्ही खुश होतो, तृप्त होतो. तिला मला गमवायच नव्हत. खूप प्रेम करायचं होत. आणि मला आधीसारख मनातल प्रेम शरीरावर व्यक्त न करता तिला प्रेम द्यायचं होत. उर्सुला गेली, सहन केल. के गेली सहन करत होतो. ख्रिस्तीनला विसरू शकत नव्हतो. त्यामुळे आता मार्गोटपासून लांब जाण माझ्या मनात सुध्दा आल नाही. आम्ही ठरवल पाचव्या दिवशी. कि बस, आता भेटण वैगरे आता न वाढवता कायमच एकत्र व्हायचं. तिच्या आईला कळाल असत कि मार्गोट खोट बोलून मला भेटायला येते रोज तर परिणाम वाईट झाला असता. मला काहीच कुणी बोलल नसत. पण तिच्यावर बंधन आली असती. आणि तिला त्रास नको म्हणून मी त्या रात्री घरी सांगून टाकल कि मी मार्गोटशी लग्न करणार आहे. मी परवानगी मागितली नाही. मी सांगितल. घरच्यांनी विरोध केला आणि मी घराबाहेर पडलो. उशिरा घरी गेलो. घरातले घाबरलेले मी काहीतरी करेन माझ्या जीवाच म्हणून. तेओ पोलिसांकडे अजून थोडा वेळ वाट बघून जाणार होता पण मी जरा लवकर पोचलो. घरातले होकार देऊन बसले. आता तिच्या घरची परिस्थिती काय आहे मला जाणून घ्यायच होत. पण इतक्या उशिरा जाण योग्य नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या आईला भेटायला गेलो.
आई : तुम्ही एकमेकांवर प्रेम करता म्हणताय पण व्हान, मला तुम्ही सभ्य घरातले दिसत. तुम्हाला हे अस शोभा देत नाही.
व्हान : त्यात शोभा न देण्यासारख काय आहे ? प्रेम एकमेकांवर करायचं असत. जगाला त्यांच्याशी किंवा त्या दोघांना जगाशी काहीही देण-घेण नसत आणि नसाव. प्रेम हे पवित्र नात त्या दोघांना पोसायच असत जग त्यात येऊन काहीही मदत करत नाही.
आई : तुम्ही म्हणता ते योग्य आहे व्हान, पण मी काय म्हणते ? प्रेम खर हि असेल तुमच मी विरोध नाही करत पण प्रेम खर असाव, त्यात खरेपणा असावा आणि.
व्हान : खर प्रेम आहे म्हणून तर तुमच्या दारात मी आलो. खोटेपणा असता माझ्या प्रेमात तर मी इथवर आलोच नसतो.
आई : तुम्ही खरे आहात हो पण, मार्गोट तुमच्याशी खर बोलालीय का ?
व्हान : काय खर बोलायचं होत तिने ?
आई : मार्गोट दिसत नसली तरी वयाने मोठी आहे. पन्नाशीला आलीय ती. तुम्ही त्या मानाने बरेच तरूण आहात. तिच्याहून लहान आहात.
व्हान : माहित आहे मला. तिने पहिल्याच भेटीत सांगितल. आणि बरच काही सांगितल आहे.
आई : होका ? मग तिच्या आधीच्या प्रियकराबद्दल माहिती आहे  ?
व्हान : हो.
आई : तुम्हाला मान्य आहे ?
व्हान : हो.
आई : तुम्हाला भाऊ बहिण कोण आहे ?
व्हान : मोठा भाऊ आहे.
आई : लग्न झला आहे का त्याच ?
व्हान : नाही.
आई : तरी तुम्ही पहिलं लग्न करणार का ?
व्हान : हो.
आई : बर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला अडवणार नाही.
व्हान : म्हणजे मी होकार समजू ?
आई : हो. पण मला तुमच्या घरच्यांना भेटाव लागेल. म्हणजे तुम्ही त्यांना इथे घेऊन या.
व्हान : जाऊन आणू का आत्ता ?
आई : नाही आज तर आपण भेटलो. मी तुम्हाला सांगते कधी आणायचं ते. तुम्ही येऊ शकता.
व्हान : मी मार्गोटला भेटू शकतो ?
आई : हो.
व्हान आत जाऊन मार्गोटला मिठीत घेतो. दोघ एकमेकांना किस करतात. आणि अगदी मन गहिवरून अजून मिठी घट्ट करतात. मार्गोटची आई दाराजवळ येते. आणि दाराला टकटक करते. दोघ मिठीतून लांब होतात. व्हान निघून जातो. मार्गोट दारातून त्याला जाताना बघते. तिचे भरलेले डोळे बघून तिची आई तिचा हात घट्ट धरून मागे कंबरेला धरते आणि जोरात हात पिरगळून तिला आत ढकलून देते आणि बाहेरून कडी लावून घेते. आतून काहीच आवाज आला नाही. मार्गोट व्हानच्या स्पर्शात हरवलेली असते. जेव्हा त्या विचारातून बाहेर येते तेव्हा,                   


------------------------


संदर्भ : तेओ : व्हान गॉगचा मोठा भाऊ.
डॉक्टर रे : ज्यांनी व्हान गॉगवर उपचार केले होते.
लामारतीन चौक : जिथे व्हान भाड्याने दुमजली घर घेऊन राहत होता.
के : व्हानच्या काकांची मुलगी ( व्हानची मोठी बहिण )

copyrighted@2020

( कथा अभ्यासून लिहिलेली आहे. या कथेचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहे. या कथेतील कोणताहि प्रसंग वा संवादास किंवा पूर्ण कथेला कुठेही परवानगीशिवाय प्रसिद्ध केले किंवा दाखवले गेले तर पाच लाखांपर्यंत दंड कायद्यानुसार भरावा लागेल. याची नोंद घ्यावी )  

0 टिप्पण्या